जानेवारी संपत आला. पहिल्यांदा गड्डा मिस झाला.
अरे....समजलं नसेल ना मी काय म्हणतोय ते?
मी बोलतोय सोलापुरच्या जत्रेबद्दल, ज्याला सोलापुरातले सगळे गड्डा म्हणतात.
साधारण जानेवारीचा पूर्ण महिना जत्रेची तयारी आणी जत्रेला भेट देण्यातच जातात.
५-६ तारखेपासून गड्ड्याची तयारी सुरू होते. आणी गड्डा सुरू होतो १० तारखेपासून.भोगी,संक्रांतीला जास्त महत्व असायचं जत्रेत. काठ्यांची मिरवणूक, अनवाणी चालून ६८ शिवलिंगांना अभिषेक, सिद्धरामेश्वरांचे काठीसोबत लग्न आणी शेवटी दारूकामाची आतिषबाजी....
बाकी जत्रा म्हणजे अशी काही वेगळी असणारे गावचे रितीरिवाज सोडून. त्यामुळे पाळणे, मौत का कुआ, पन्नालाल गाढवाचा शो,मेरी गो राउंड, आरश्याचे खेळ,गारूडी-मदारी खेळ हे सगळं तर असायचच.
माझा आवडता खेळ होता छर्र्याच्या बंदूकीने फुगे फोडायचा. त्यात सगळे पैसे उडवायचो मी.
थोडं विषय सोडून झालं का? वळतोय हा विषयाकडे..
सगळी लहान पोरं आणी मोठ्यांच गड्ड्याला जायचं मेन आकर्षण असायचे भाग्यश्रीचे बटाटेवडे.
ह्या भाग्यश्रीवाल्याचे एक हॉटेल कम मंगलकार्यालय होते. (यातच आमच्या मायबापांचं लगीन झालेलं)
ह्याचा बारमाही व्यवसाय होता मक्याचा चिवडा विकायचा. आणी सिझनल (गड्ड्यापुरता) बटाटेवड्याचा.
होय बटाटेवडेच..वडापाव नाही. मस्त गोल गरगरीत असे असायचे वडे. २ वडे खाल्ले तर पोरांचं पोट भरायला हवं असे. एकदम खुसखुशीत. आणी सोबत तोंडी लावायला लसूण घातलेली सोलापूरी शेंगादाणा चटणी. एकदम जबदस्त समीकरण होते ते.
वडे हाती यायला कमीत कमी अर्धा तास तरी लायनीत थांबाव लागायचं. पण त्यातही एक वेग़ळी मजा होती.शब्दात बध्द न करता येणारी.
परवा गड्डा आणी भाग्यश्री च्या वड्यांची आठवण झाली, ऑफिसवरून आल्यावर नास्त्याला बटाटेवडे केल्यावर, अनायसे महिनाही जानेवारीच आहे.
त्या परवाच्या (स्वर्गवासी)वड्यांचे काही फोटो.
प्रतिक्रिया
30 Jan 2010 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गरमागरम बटाटेवडे आपला वीक पॉइंट आहे. :)
>>माझा आवडता खेळ होता छर्र्याच्या बंदूकीने फुगे फोडायचा. त्यात सगळे पैसे उडवायचो मी.
स्सही...! मलाही खूप आवडायचे.
-दिलीप बिरुटे
30 Jan 2010 - 3:41 pm | सुनील
छान लिहिलय.
होय बटाटेवडेच..वडापाव नाही
खरंय. वडापाव हा प्रकार त्यामानाने नवीनच. महाराष्ट्रात पूर्वापार प्रसिद्ध होता तो बटाटे वडाच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jan 2010 - 4:14 pm | झकासराव
प्रभो मी खाली लिहिलेल वाचु नकोस. ;)
मी गड्ड्याला गेलो होतो. फार वेळ नव्हतो पण दोन तास तरी होतो.
ह्यावेळी पन्नालाल अस गाढवाच नाव होत बॉ.
सगळीकडे रांगा. पन्नालाल असो वा मौत का कुवा असो वा पाळणे असोत.
पाळण्यांमध्ये भारी विविधता होती.
मी द्वाशी खाल्ली. बटाटेवडे खाल्ले आणि मक्याचा चिवडा (हा लांबोटीचाच काय रे?
तिथे एक स्टॉल होता) विकत घेतला. :)
30 Jan 2010 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ्या दुवा....!
गाढव हुशार असते यात काही शंकाच नाही. :)
-दिलीप बिरुटे
31 Jan 2010 - 6:04 pm | सोत्रि
ह्या हुशार गाढवाला 'कान लगाव', 'चेक करो' आणि 'दूर खडा मत रहो' हे कळीचे शब्द शिकवून हुशार केले आहे असे दिसते. संचालकाने हे शब्द बोलल्यावर गाढव हुशारीने(?) थांबताना दिसते.
31 Jan 2010 - 12:01 am | प्रभो
जळवा नुसते.....
येस्स पन्नालाल गाढव....नाव आठवत नवतं नीट..आता बदल करतो
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
30 Jan 2010 - 4:28 pm | स्वाती२
मस्त दिसतायत रे वडे!
30 Jan 2010 - 5:08 pm | टारझन
वडे तर मस्तंच !! परंतु :)
कालच्या (पुनर्जन्म घेतलेल्या) वड्यांचे फोटू न दिल्याबद्दल आपल्या सहिचे विडंबण माफ करण्यात येत आहे ;)
- टारझन
30 Jan 2010 - 6:23 pm | शुचि
लेख आवडला
>>थोडं विषय सोडून झालं का? वळतोय हा विषयाकडे..>>
हे विषय सोडून केलेला अवांतर च खरी चव आणत लेखाला. म्हणतात ना "द डेस्टिनेशन इस नॉट सो इम्पॉर्टन्ट आस द जर्नी इटसेल्फ."
त्या वड्यान्च्या बाजूला काळी चट्णी काहीतरी मस्त दिसतीये. मला वाटतं त्यात दही घालून छान लागेल. माझा आपला गेस ह्म्म.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
30 Jan 2010 - 6:57 pm | मदनबाण
प्रभो लयं भारी लिहलं आहेस...
च्यामारी आपल्या बटाटावड्यासमोर ते बर्गर वर्गर्,,,एकदम चाय कम पानी ज्यादा असल्यासारखं... ;)
जत्रेचा अनुभव घ्यावासा वाटला...इतक झकास लिहलं आहेस. :)
बिरुटे सर लिंक भारी दिलीत बघा...एकदम मुल्ला नसुरुद्दिन च्या काळात नेलत... ;)
http://en.wikipedia.org/wiki/Nasrudin
(http://spbindia.blogspot.com/2007/04/batata-vada-hifazat-hindi.html ) ;)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
30 Jan 2010 - 7:55 pm | प्रमेय
अगदी मनातले लिहिले आहेस.
मला पण गड्डा आवड्तो. पण ती सगळी गर्दी, गोंधळ, धूळ यांनी जीव हैराण होतो यार! परवा जुना शाळेतला मित्र भेटला ऑनलाइन. सोलापूरला जातोय म्हणाला,
त्यालाच माझ्यानावाने दोन भाग्यश्री बटाटेवडे खा असा दम भरून सांगितले.
काही पण म्हणा, गावची जत्रा या प्रकारात गड्डा अव्व्ल नंबर वाटतो.
तुझे वडे पण भारी झालेत भाउ! खासकरून वरचे कव्हर! कसे केलेस ते जरा टाक की इथे!
31 Jan 2010 - 1:50 pm | आप्पा
आप्पा
I remembered my childhood at Solapur. Thanx. missing GADDA for so many years. sorry I cann't type in Marathi. I will learn it. soon. Thirty years in solapur, thirty years in Thane now last 5 yrs in Pune. I still remember Gadaa, Batatevada, Usacha ras, & offcourse Phuge Phodne.
31 Jan 2010 - 5:31 pm | नरेन
आजुनहि भाग्यश्रिचे वडे जत्रेत आहेत्.पण आज किन्वा उद्या सम्पेल आता जत्रा.तशि तर २६ जाने. लाच सम्पते पण अजुन चालु आहे.
5 Feb 2010 - 11:10 pm | पक्या
मस्त बटाटेवडे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !