मित्रहो, माझ्या साधा माणुस या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे देत आहे. या काव्य संग्रहाला विशेष प्रस्तावना ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांची
लाभली आहे, हे मी माझे परम भाग्य समजतो. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये दूरदर्शनचे अभय मोकाशी, विख्यात कवी अशोक बागवे,
अशोक लोटणकर, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे, साहित्य त्रैमासिकाच्या संपादिका सुहासिनी किर्तीकर इत्यादी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याची सांगता
काव्य संध्येने झाली.
गोखले यांची कविता हा त्यांचा उदगार आहे, माझ्या कवितेशी त्यांच्या कवितेची नाळ जुळते म्हणुन मी आलो. त्यांची कविता साधी सोपी आहे म्हणुन
ती तुमच्याशी लगेच संवाद साधते असे प्रतिपादन पं यशवंत देवांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रथमेश गोखले यांनी नेटकेपणाने केले. या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद होता. सभागृह तुडुंब भरले होते.
विशेष म्हणजे मिपा प्रतिनीधी म्हणुन रामदासजी व प्रमोद देवजी सुद्धा उपस्थित होते.
पाहुण्यांचे आगमन (डावीकडच्या छायाचित्रात बेस्ट समिती सदस्य मा. सुनिल गणाचार्य आणि (उजवी कडे) आदरणीय पं यशवंत देव
आगमन. सुत्रसंचलन प्रथमेश गोखले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन
साधा माणुस या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सर्वश्री इंद्रनील तावडे , विलास खानोलकर चन्द्रशेखर गोखले, पं यशवंत देव. कवी अशोक लोटणकर डॉ. सुनिल सावंत. देवांचे आशीर्वाद
चन्द्रशेखर गोखले यांचा सत्कार आणि कवी स्वता:चे मनोगत व्यक्त्त करतांना
रसिकांचा उदंड प्रतिसाद !
मान्यवर पाहुणे
दूरदर्शन प्रतिनिधिंशी मुलाखत
कवी अशोक लोटणकर कवितासंग्रहावर भाष्य करतांना
प्रतिक्रिया
19 Jan 2010 - 3:04 pm | सुधीर काळे
अभिनंदन.
वेबसाईट उघडली नाहीं.
------------------------
सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
19 Jan 2010 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन.
फोटो उघडत नाहिये. अजून तपशील कळू द्या की.
बिपिन कार्यकर्ते
19 Jan 2010 - 9:22 pm | प्राजु
अभिनंदन!!
फोटो आणि इतर वृत्तांत वाचण्यास उत्सुक.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
19 Jan 2010 - 9:51 pm | सुधीर काळे
वेबसाईट उघडली नाहीं कारण ती "पब्लिक" नाहीं असा निरोप येतोय्.
तरी ती जनतेला खुली करावी!
------------------------
सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
20 Jan 2010 - 9:59 am | मीनल
अभिनंदन!!
मीनल.
20 Jan 2010 - 10:04 am | चतुरंग
य्शवंत देवांसारख्या दिग्गज कवीच्या हस्ते प्रकाशन व्हावे हा संस्मरणीय प्रसंग! अभिनंदन गोखले साहेब.
चतुरंग
23 Jan 2010 - 12:40 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री चतुरंग यशवंत देव हे कवी आहेत की संगीतकार?
खरोखरच विचारतोय कृपया गैरसमज नसावा. आतापर्यंत मला वाटत होते की ते संगीतकार आहेत.
23 Jan 2010 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते
माझ्या मते ते संगितकार असले तरी त्यांनी कविता पण लिहिल्या आहेत. चुभूदेघे.
बिपिन कार्यकर्ते
28 Jan 2010 - 9:16 pm | चतुरंग
आठवणीतील गाणी ह्या ठिकाणी त्यांच्या कवितांची जी यादी दिलेली आहे ती पाहता ते एक श्रेष्ठ कवीसुद्धा आहेत ह्यात शंका रहाणार नाही!
चतुरंग
20 Jan 2010 - 1:34 pm | पक्या
अभिनंदन !
जय महाराष्ट्र , जय मराठी !
20 Jan 2010 - 3:20 pm | वाहीदा
पण फोटो का दिसत नाही आहेत :/
~ वाहीदा
20 Jan 2010 - 8:13 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री गोखले आपले अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.
22 Jan 2010 - 3:21 am | धनंजय
छायाचित्रे आता दिसत आहेत. वृत्तांत वाचून बरे वाटले. अभिनंदन आणि शुभेच्छा!
22 Jan 2010 - 8:21 am | II विकास II
+१
22 Jan 2010 - 8:32 am | मदनबाण
अभिनंदन !!!
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
23 Jan 2010 - 11:09 am | सुधीर काळे
जय हो!
------------------------
सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
23 Jan 2010 - 11:47 am | देवदत्त
अभिनंदन :)
23 Jan 2010 - 5:14 pm | ऋषिकेश
अरे वा! अभिनंदन.
--ऋषिकेश
23 Jan 2010 - 5:25 pm | उग्रसेन
आरं वा ! आनंद वाटला.
कवीतेच्या पुस्तकप्रकाशनाला एवढी गर्दी.
कवीला आन कवीतेला चांगले दीस आलं म्हणाचं !
बाबुराव :)
28 Jan 2010 - 2:02 pm | उदय सप्रे
मनःपूर्वक अभिनंदन !
पुढील सर्व लेखनासाठी पण शुभेच्छा !
आपणच "चारोळी"कार गो़हले साहेब ना?
सप्रेम
29 Jan 2010 - 2:57 am | बंडू बावळट
मनःपूर्वक अभिनंदन !
29 Jan 2010 - 4:07 am | पाषाणभेद
दणक्यात हाबिनंदन बरका गोखले साह्येब.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)