वन बॉल टू गो अॅन्ड फोर रन्स टू विन !! इति हंपायर उवाच
सामना जिंकायला ४ धावा मात्र सिनेमातल्या हिरोचे शतक पुर्ण व्हायला पाहिजेत ६ धावा. उत्सूकता आहे ती आपला तेंडल्या शतक करतो का नाही याची ! संघाचा विजय झाला काय आणि नाही झाला काय ?
प्रत्येक जण आता काय होणार या उत्सूकतेने नख खात आहेत. पण शिनिमाचा हिरो तेंडूलकर ( मियांदाद म्हणायला पाहिजे काय त्याला ?) मात्र अपेक्षेप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुढे सरसावत सिक्सर मारतो ती ही एवढ्या जोरात की सांताक्रुज विमानतळावरुन नुकतंच उड्डान केलेले जेट विमान थोडक्यात बचावते.
आपला तेडूंलकर आणि ( त्याचे शतक झाले असताना कधी नव्हे ते ) त्याचा संघ ही विजयी होतो. क्या बात है. आपण सुटतो. आणि त्या थंडगार सिनिमा हॉलमधून घामेघाम होऊन बाहेर येताना आपण म्हणत असतो. 'पिक्चरच्या xxx घो'
नुकताच आलेल्या मराठी चित्रपटातील त्यातल्यात्यात मनोरंजन करणारा हा सीन.
बाकी या चित्रपटातील थीमही काहिशी 'थ्री इडीयटसी ' मिळती जुळती वाटावी अशी. सध्याच्या युगात शिक्षणाचा फार बाऊ न करता प्रत्तेकाने आपापल्या आवडीचे क्षेत्र करिअर म्हणून ( छंद नव्हे ) निवडावे हाच संदेश हा सिनेमा दितो. थ्री इडीयटस मधे निदान फोटोग्राफीसारख्या करिअरचा (चाकोरीबाहेरील करिअर म्हणून ) विचार केला आहे. आपण मात्र सिनेमात सुध्दा क्रिकेटशिवाय दुसरा विचार करु शकत नाही याचा खेद वाटतो.
चित्रपटातील कलाकारांच्या बाबतीत सांगायचे झाले तर मध्यमवर्गीय मराठी माणसाचा रोल भरत जाधवने चांगला केला आहे. दे धक्का सिनेमातील दोघे बहिण - भाऊ या सिनेमात ही दिसतात .त्यांचा अभिनय ही उत्तम. मांजरेकर साहेबांनी ही नेहमीप्रमाणे आपल्याच सिनेमात छोटिसी का होईना भुमिका करायचीच या नियमाचे पालन केले आहे ( मराठीचे सुभाष घई म्हणावे काय यांना ?)
सिनेमाच्या नावावरुन एक विनोदी सिनेमा असेल ( आणि भरत जाधव म्हणजे नक्कीच विनोदी सिनेमा ) अशी कल्पना असेल तर बर्यापैकी भ्रमनिरास होतो. काही ठिकाणी टिपीकल मराठमोळे वातावरण , चाळीतील प्रासंगिक विनोदाची जोड आहे मात्र म्हणावा तेवढा तडका नाही.
सिनेमा पहावयास जाणार्यांसाठी विशेष सुचना :
सिनेमा पहायला जायचे असेल तर १७ चा पाढा पाठ करुनच जावा. बर्याच प्रसंगात सतरा सत्ते किती ? असे नायक बर्याच जणांस विचारतो . आणि आपणही साती साती एकोणपन्नास, राहिले नऊ , ह्च्चा चार, सात एके सात आणि चार ११ म्हणजे सतरा सत्ते ११९ असे उत्तर काढतो आणि तोपर्यंत पुढील काही प्रसंगाना मुकतो.
तेंव्हा पुर्ण सिनेमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर १७ चा पाढा येणे चांगले
अमोल
--------------------------------
मला इथे भेटा
प्रतिक्रिया
18 Jan 2010 - 2:00 pm | टारझन
ओक्के !
18 Jan 2010 - 2:05 pm | आनंदयात्री
छान रे अमोल ..
अवांतरः सतरा सत्ते किती ?
18 Jan 2010 - 2:21 pm | गणपा
आवडल परिक्षण.
साही सखं बेचाळीस ;)
18 Jan 2010 - 10:31 pm | प्राजु
हाहाहा..
सह्ही लिहिले आहेस.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Jan 2010 - 1:53 pm | मॅन्ड्रेक
हे हॅ स्स्स्स.
at and post : Xanadu.
23 Jan 2010 - 9:10 am | बट्ट्याबोळ
---सिनेमा पहायला जायचे असेल तर १७ चा पाढा पाठ करुनच जावा. बर्याच प्रसंगात सतरा सत्ते किती ? असे नायक बर्याच जणांस विचारतो . आणि आपणही साती साती एकोणपन्नास, राहिले नऊ , ह्च्चा चार, सात एके सात आणि चार ११ म्हणजे सतरा सत्ते ११९ असे उत्तर काढतो आणि तोपर्यंत पुढील काही प्रसंगाना मुकतो.
---तेंव्हा पुर्ण सिनेमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर १७ चा पाढा येणे चांगले
हा हा हा हा !!!
23 Jan 2010 - 9:16 am | मदनबाण
हा.हा...हा. मस्त लिहलयं....
मांजरेकर साहेबांनी ही नेहमीप्रमाणे आपल्याच सिनेमात छोटिसी का होईना भुमिका करायचीच या नियमाचे पालन केले आहे ( मराठीचे सुभाष घई म्हणावे काय यांना ?)
अगदी मनातल वाक्य... ;)
जाता जाता :---
राम: रामौ रामा:
हेच लिहतो...कारण गणित कच्च हाय माझं... ;)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
23 Jan 2010 - 9:53 am | नितिन थत्ते
>>मराठीचे सुभाष घई म्हणावे काय यांना
सरड्याची धाव कुंपणापर्यंत =)) . अहो म्हणायचं तर हिचकॉक म्हणा की !!!
नितिन थत्ते
24 Jan 2010 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपट पाहतांना, 'सतरा साते किती' ह्या प्रश्नाला मीही मनात पाढे मोजून पाहिले ! :)
बाकी,चित्रपट चांगला आहे. संदेश महत्त्वाचा...!
-दिलीप बिरुटे