भारतीय रेल्वेच्या आरक्षण साईट प्रमाणेच आपल्या एस्.टी ने ही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा चालू केली आहे.
त्याची लिंक
या साईटवर प्रथम आपले अकांट काढावे लागते. व त्यानंतर टिकिट बूक करता येते. ठाणे-पुणे मार्गासह, दादर, बोरीवली, नाशिक, औरंगाबाद या मार्गावरील बसेसचे आरक्षणही ऑनलाइन उपलब्ध असेल.
इतर मार्गा बद्दल माहिती नाही.
अमोल
-------------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
प्रतिक्रिया
11 Jan 2010 - 3:27 pm | आशिष सुर्वे
उपउक्त माहिती!!
धन्यवाद..
-
कोकणी फणस
11 Jan 2010 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार
अमोलभौ खुप खुप धन्यवाद हो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jan 2010 - 6:27 pm | चिरोटा
उपयुक्त माहिती. अकाउंट काढला. पासवर्ड फक्त सहा अक्षरांचाच का पाहिजे ह्याचे कारंण कळले नाही."Search Bus Services' मध्ये गेलो. मुंबई-रत्नागिरी १९ जानेवारी/night express निवडले. Journey Time मध्ये काय टाकायचे कळत नाही. २०:०० म्हणजे रात्री आठ नंतरच्या गाड्या बघायच्या होत्या.म्हणून २०:०० लिहिले.ह्या दिनांकास ह्या वेळेस गाडी उपलब्ध नाही अशी सुचना आली.
आता रात्री आठ नंतर किती गाड्या आहेत हे कसे बघायचे?
अवांतर- साईट म्हणावी तेवढी सुरक्षीत दिसत नाही. उ.दा.From मध्ये मी "%" लिहिले आणि To मध्ये %% %%लिहिले,AC-Shivneri सिलेक्ट केले आणि search बटन दाबले .एकूण ८ गाड्यांचे पर्याय दिसले. काही गाड्या परळहून तर काही गाड्या शिवाजीनगरहून.!
भेंडी
P = NP
12 Jan 2010 - 4:02 pm | सुहास
असाच अनुभव मला ही आला.. कुरुंदवाड-स्वारगेट शोधताना ह्या वेळेस गाडी उपलब्ध नाही अशी सुचना आली, पण स्वारगेट - कुरूंदवाड शोधताना ८ ची वेळ दिल्यानंतर दुपारी ३ ची गाडी दिसली.. एकूणात स्तुत्य प्रयत्न असला तरी नाक्यावरच्या किराणावाल्याकडे जाऊन बुकींग केलेले परवडेल (तसे पुण्याहून सांगली-कोल्हापूरला जाणार्यांना बुकींगची गरज पडत नाहीच म्हणा..!)
--सुहास
11 Jan 2010 - 6:06 pm | पर्नल नेने मराठे
अंबेजोगाईला जाते का हो?
चुचु
11 Jan 2010 - 6:31 pm | II विकास II
मला सीट क्रमांक दिसला नाही.
11 Jan 2010 - 7:13 pm | परिकथेतील राजकुमार
कोणाच्या सीटचा क्रमांक बघत होतात ??
©º°¨¨°º© दुस्वास ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jan 2010 - 9:29 pm | पाषाणभेद
आव एस्.टी ला आधीच आरक्षण आसतांना त्याच्यावाल्या साईटी बी निगाल्या का आता?
आम्हा ओपन वाल्यांच्याबी साईटीला आरक्षन कवा येनार? का आमी मेजर, मायनर झाल्याव येनार?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
12 Jan 2010 - 10:56 am | टुकुल
सभासदत्व घेतल,
एकदम YZ साईट आहे, वेळ टाकताना तर ज्याम गोंधळ उडतो. त्यातुन भर म्हणजे वेळापत्रक बघायची सोय नाही.
आपल्या कांतानी सवलती दरात यापेक्षा चांगली साईट बनवली असती.
--टुकुल