टशन या हिंदी चित्रपटातले शिर्षक गीत ऐकले असेलच. (ताली बजावे, नचे गावे).
इतर गाण्यांपेक्षा त्यात काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून त्यांनी वरील "हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" अशा विचित्र कोरस ने त्या गाण्याची सुरूवात केली आहे. आठवून बघा गाणे! असलाच काहितरी आवाज आहे तो!
असे वाटते की चार पाच भूते कुणालातरी घाबरवायला आली आहेत आणि अचानक त्यांना थंडी वाजते. आणि त्यांचे दात दुखायला लागतात. तेव्हा मग त्या स्थितीत माणसांना घावरवतांना त्यांचा होणारा आवाज म्हणजे "हीएइह्योए ह्याईहीयेहे"
दर शुक्रवारी अर्धा डझन चित्रपट रिलीज होतात. त्या प्रत्येकात किमान चार तरी गाणी असावी लागतात. त्यात एक शिर्षकगीत आजकल आवश्यक झालं आहे. आणि आता पूर्वीच्या चित्रपटातल्या गाण्यांच्या काही ओळी म्हणजे नव्या चित्रपटाचे नाव असते. म्हणजे पूर्वीच्या असलेल्या गाण्याच्या विरूद्ध आणि वेगळ्या चालीचे गाणे बनवावे लागते कारण ते नव्या चित्रपटाचे शिर्षक गीत असेल. मग सतत वेगळेपणा कोठून आणणार? एक छोटीशी धून चोरली तर नाहीतर, राकेश रोशनसारखा कोटी रुपयांचा फटका बसावा! मग अगदी वेगळे गाणे कोठून आणणार आणि इतकी दर शुक्रवारी शेकडोंनी गाणी आणि धून कशी बनवायची? हा प्रश्न संगीत/गीत कारांना पडला असावा आणि त्यांनी ठरवले असावे की काहीही गायचे. अगदी "हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" सुद्धा!
प्रतिक्रिया
1 Jan 2010 - 2:24 am | पाषाणभेद
बाकीच्यांचे माहित नाही पण या कोरस चे मुळ मिपावरील एक सदस्य 'हैयो हयैयो' हेच आहेत. काळजी करू नका, असली गाणी केवळ क्षणाचेच सोबती असतात.

:-)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
1 Jan 2010 - 10:39 pm | निमिष सोनार
आपल्या प्रतिसादातील "बाकीच्यांचे माहित नाही पण या कोरस चे मुळ मिपावरील एक सदस्य 'हैयो हयैयो' हेच आहेत" या वाक्याचा अर्थ कळला नाही, माफ करा. पुन्हा समजावून सांगता का?