मिसळपाव करता करता

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जे न देखे रवी...
29 Dec 2009 - 11:41 am

मिसळपाव करता करता सांडलवंड झाली
अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको ही निघाली.

आम्ही चार पावांचीही आस का धरावी
जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी?
कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली..

कपाटात केले कुणी बंद घुशी साती
मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती
उरे चायनीज, उडपी एकमेव वाली

उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा
इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या जिर्‍याचे धुपारे
नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे
हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

शक्तिमान's picture

29 Dec 2009 - 11:52 am | शक्तिमान

भाऊ एकदम मस्त...
मी या कवितेचे विडंबन पाडणार होतो.. "मिसळपाव खाता खाता" असे.. पण आपले विडंबन इतके खास आहे की मी माझा प्लॅन रद्द करतो..

JAGOMOHANPYARE's picture

29 Dec 2009 - 12:27 pm | JAGOMOHANPYARE

तुम्हीही विडंबन टाका. प्लॅन रद्द करु नका.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

पैसा's picture

21 Mar 2012 - 7:08 pm | पैसा

खिखिखि! मस्त विडंबन!

कवितानागेश's picture

22 Mar 2012 - 6:51 am | कवितानागेश

:D

चौकटराजा's picture

22 Mar 2012 - 8:42 am | चौकटराजा

विडंबन म्हणजे काय याची व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक गाणे घेऊन दुसर्‍या अगदी वेगळ्या विषयावर गीत तयार करायचे याला विडंबन कसे म्हणायचे ? तोच विषय घेउन त्याला पिळायचे याला खरे विडंबन म्हणावे. माझ्या मते हे विडंबन नाहीच ! तेंव्हा शक्तिमान तुम्ही तुमच्या विडंबनाची जिलबी पाडाच पण त्यात मिसळ उसळ फरसाण याना सोडून रात्र, चांदणे, धुंदी, स्वप्न वगैरे आणू नका .

पैसा's picture

25 Mar 2012 - 5:49 pm | पैसा

त्या कवितेची तारीख बघा हो! शक्तीमान हल्ली दिसत पण नाहीत कुठे!

मितभाषी's picture

25 Mar 2012 - 4:54 pm | मितभाषी

डॉ. मूळ स्त्रोत कुठे आहे?

यकु's picture

25 Mar 2012 - 5:44 pm | यकु

छाण् ! ;-)

सुहास झेले's picture

25 Mar 2012 - 10:09 pm | सुहास झेले

हा हा हा ... लैच :) :)