शिवरायांचे "८" वावे रूप

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in काथ्याकूट
27 Mar 2008 - 10:56 am
गाभा: 

रसिक वाचकही , "सप्रे"म नमस्कार !
या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय?
पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की "या शिर्षकात वापरलेला"८" ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे" हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह ! मी स्वतः एक अभियंता असल्यामुळे कदाचित मला हे "अंकशास्त्र" भावले आहे आणि लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा निवाळ योगायोग नव्हे !

लेख सुरु करण्यापूर्वी "गुणांक" महणजे काय हे समजावून घेवूया कारण यालेखात हा शब्द फार वेळा येणार आहे.

समजा एखाद्या माणसाचा जन्मदिनांक २१-मार्च-१९८५ आहे तर त्याच्या जन्मतारखेचा गुणांक काढण्यासाठी आपण सगळ्या आकड्यांची "एक" अंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करायची - जसे यात २१-०३-१९८५=२+१+३+१+९+८+५=२९=२+९=११=१+१ =२, म्हणजे गुणांक "२"

तर आता आपण मूळ लेखाकडे वळुया.या लेखाचे "८" महत्वाचे "योगायोग" आहेत ते क्रमशः असे :

१. शिवरायांना "८" बायका होत्या :
१. सईबाई निंबाळकर
२. सगुणाबाई शिर्के
३. सोयराबाई मोहिते
४. लक्ष्मीबाई विचारे
५. सकवारबाई गायकवाड
६. काशीबाई जाधव
७. पुतळाबाई मोहिते
८. गुणवंताबाई इंगळे

२. शिवरायांना "८" अपत्ये होती ती पुढीलप्रमाणे :

माता अपत्याचे नांव अपत्याच्या नवरा / बायको चे नांव
सईबाई १. सखुबाई ऊर्फ सकवारबाई - महादजी निंबाळकर
२. राणुबाई ऊर्फ राणूअक्का जाधव
३. अंबिकाबाई हरजीराजे महाडिक
४. संभाजी येसुबाई, दुर्गाबाई, चंपाबाई (कछवाह घराणे)
सोयराबाई ५. दीपाबाई विसाजीराव
६. राजाराम जानकीबाई,ताराबाई,राजसबाई,अंबिकाबाई
सगुणाबाई ७. नानीबाई ऊर्फ राजकुंवर गणोजी शिर्के
सकवारबाई ८. कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा)

३. शिवरायांची उंची होती ५' ८" = १७० सेंटीमीटर=१+७=८ गुणांक "८"

४. शिवरायांचा जन्म : १९-०२-१६३०=१+९+२+१+६+३ =४ जन्म गुणांक= ४
शिवरायाचा म्रुत्यु : ०३-०४-१६८०=३+४+१+६+८=४ म्रुत्यु गुणांक=४
आयुष्याचा गुणांक्=जन्म गुणांक्+म्रुत्यु गुणांक= ४+४ = "८"

५. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रोहिडेश्वरी : १५-०४-१६४५, गुणांक "८"

६. कल्याण्-भिवंडी काबीज केली : २४-१०-१६५७ , गुणांक "८"

७. सईबाईंचा म्रुत्यु : ०५-०९-१६५९ , गुणांक "८"

८. शिवरायांचा राज्याभिषेक झाला (१६७४ साल) तेंव्हा त्यांचे वय होते ४४ पूर्ण = ४+४= गुणांक "८"
शिवरायांचे वजन होते १६,००० होन= ४ मण
शिवरायांच्या सिंहासनाचे वजन होते ३२ मण , म्हणजेच शिवराय स्वतःपेक्षा त्या पवित्र सिंहासनाला ३२ /
४= "८" पटीने मान द्यायचे
राज्याभिषेकानंतर शिवरायांनी मंत्रीमंडळाची स्थापना केली : "अष्ट" प्रधान मंडळ , मंत्री "८"

म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामींनी म्हटले नसेल ना?

शिवरायांचे "८" वावे रुप
शिवरायांचा "८" वा प्रताप
शिअवरायांचा "८" वावा साक्षेप
भू मंडळी !

आम्ही पण "८"वतो शिवरायांना "अष्टौ"प्रहर म्हणजे "८" प्रहर !
हा लेख मी लिहिला (बरेच दिवस मनात असूनही काल लिहिला) २६ तारखेला - गुणांक "८" , साल - एकविसाव्या शतकातील "८" वे , लेख पूर्ण केल्याची वेळ रात्री १० व. ३१ मि. म्हणजेच इंग्रजी वेळेप्रमाणे तासांच्या हिशोबात २२.३१ अवर्स = २+२+३+१= गुणांक "८"

अश्या या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत "अष्ट्"दिशांना पसरत राहो ह्या सदिच्छेसह,

उदय गंगाधर सप्रे-ठाणे
Sudayan2003@yahoo.com

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 12:26 pm | सृष्टीलावण्या

शिवरायाच्या जीवनात जडण घडण विलक्षण आहे...

>
>
स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी...

सागर's picture

27 Mar 2008 - 12:35 pm | सागर

उदय मित्रा,

अगदी बुद्धीवादी लेख आहे...

मी तर असा विचार कधीच केला नव्हता... आता मात्र मी ही म्हणेन
- शिवरायांचा "८"वावा प्रताप
- शिवरायांचा "८"वावे रुप

वा वा... खूपच सुंदर

(शिवराय भक्त) सागर

वरदा's picture

27 Mar 2008 - 6:17 pm | वरदा

असा विचारच नव्हता केला..खूपच विचारपूर्ण ..लेख आवडला

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 9:20 am | उदय सप्रे

वरदा ताई,
अभिप्रायाबध्दल धन्यवाद !
काथ्याकूट वर म्हटल्याप्रमाणे मी शिवरायांची माणसे यावर लिहित आहे, यातील बाजी पासलकर लिहून तयार आहे , कान्होजी जेधे ८५% लिहून झाले आहे, संभाजी महराजांवर कादंबरी लिहित आहे - पण आता पुढील सवा वर्ष वेळ नसेल - चिरंजीव (म्हणजे पर्यायाने आम्हीच नाही का?)१० वी मधे जाणार म्हणून , पण या कदंबरीची पण १४० पाने (जावळीच्या चंद्रराव मोर्‍यां चा वध इथपर्यंत) - ही कादंबरी मात्र मोठी असेल आणि त्यात शहाजी पासून ते संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत इतिहास येणार आहे.

उदय "सप्रे"

मनस्वी's picture

27 Mar 2008 - 6:52 pm | मनस्वी

अवांतर : प्रमोद महाजन आणि "५" याचेही गणित वाचल्याचे आठवते.

प्राजु's picture

27 Mar 2008 - 7:35 pm | प्राजु

आपले अभिनंदन...
आणि धन्यवाद शिवरायांचे 'हे 'रूप आम्हांला ८ वण्यासाठी इथे दिल्याबद्दल..

- (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 9:07 am | उदय सप्रे

प्राजु,
अभिप्रायाबध्दल धन्यवाद !
मी काही लिन्क्स दिल्या आहेत "माझे लेखन" मधे (तुम्हाला ते काथ्याकूट किंवा जनातलं मनातलं मधे दिसतील) , त्यात जागतिक महिला दिन आणि शिवरायांवर असे मिळुन ३ लेख आहेत आणि माझी एक कविता "जिजाऊ पाहिजे" आहे, वाचून पहा अशी विनंती आहे.
उदय "सप्रे"

प्रमोद देव's picture

27 Mar 2008 - 8:15 pm | प्रमोद देव

कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा)

हे काही नीट कळले नाही.

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 9:04 am | उदय सप्रे

कमलाबाई जानोजी पालकर - यातील जानोजी पालकर हा नेताजी पालकर यांचा मुलगा होता ! कमलाबाई जर का शिअवरायांची मुलगी असेल तर कंसात नेताजी पालकर यांचा मुलगा म्हणजे कमलाबाईंचा नवरा कुणाचा मुलगा हे साहजिक नाही का प्रमोदराव?
यातील राणूअक्का जाधव यांच्या नवर्‍याचे नांव आणि विसाजीराव यांचे आडनांव मात्र मिळाले नाही ही खंत आहे, असो, मिळाले की नक्की कळवीन!
लेख आवर्जून वाचलात आणि शंका विचारलीत याचे खूप समाधान आहे.
आपल्याबध्दल अधिक काही कळवल्यास आणखिन बरे वाटेल.

आपला विनम्र,
उदय "सप्रे"
sudayan2003@yahoo.com

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 12:04 pm | विसोबा खेचर

शिवरायांच्या आयुष्यातील ८ या अंकाचा योगायोग अंमळ गंमतीशीर वाटला!

असो,

राजांना वंदन...!

तात्या.

सौरभ's picture

28 Mar 2008 - 3:01 pm | सौरभ

राजांच्या जिवनाचा आणि "८" चा किति संबंध आहे ते कळाले.
मला फक्त "८"प्रधान आणि "८" पत्नि एवढेच माहित होते.

मि आपला आभारि आहे.

आपला सौरभ.

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 3:28 pm | उदय सप्रे

परमेश्वराबध्द्ल सम्पूर्ण माहिती उपलब्ध नाही तसेच "शिवराय" आणि "संभाजी" ही २ छत्रपती एव्हढे थोर आहेत की त्यांच्याबध्दल अचूक आणि सम्पूर्ण माहिती उपलब्ध होईल तो सुदिन !

या दोहांबध्दलही काहिही माहित असल्यास मला माझ्या ई-मेल वर जरूर कळवावे कारण मी सध्ध्या "शिवरायांची माणसे" आणि "संभाजी महाराज" या दोन्हीही विषयांवर लिहीत आहे, कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही !

एका शिवभक्ताने दुसर्‍या शिवभक्ताचे आभार मानू नयेत सौरभ !

उदय "सप्रे"

केशवराव's picture

28 Mar 2008 - 3:42 pm | केशवराव

'सप्रे'म महाराज ;
शिवचरीत्रातील '८' अंकाचे स्थान दाखवून दिलेत; छान वाटले. संशोधनातही रंजकता आणता येते. मजा वाटली.
- - - - - - केशवराव.

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 4:10 pm | उदय सप्रे

केशवराव,
तुमची भेट झाली नाही ही रुखरुख आहे !
विडंबन थांबवू नका ही विनंती , माझे विडंबन यावरुन वाद झाले आहेत - तर मीच थांबवतो."सृष्टीलावण्या" यांचे अतिरंजित विचार व टीका पाहून मन एकदम विषण्ण झाले ! मला पण खरमरीत उत्तर द्यावे लागले ही तर आणखीनच खेदाची गोष्ट !
कळाए - लोभ आहेच , तो वृध्दिंगत व्हावा ही "सप्रे"म विनंती !

केशवराव's picture

28 Mar 2008 - 10:27 pm | केशवराव

विडंबनकार तो केशवसुमार , मी केशवराव !

वाचक हो,
हे ३ योगायोग असे :

१. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती.
२. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते
* सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते.
३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८"

अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व !

उदय "सप्रे"

प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2008 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

ते अष्टप्रधान मंडळ लिवायच र्‍हायल कि?
प्रकाश घाटपांडे

उदय सप्रे's picture

31 Mar 2008 - 10:25 am | उदय सप्रे

प्रकाश जी,

अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख आहे - क्रमांक ८ मधे, या लेखाची व्याप्ती फक्त "८" अंकाची महती दाखवण्यापुरतीच असलयाने मंत्र्यांची नावे टकली नाहियेत - ती माझ्या ऐतिहासिक कादंबरीत येतीलच.
उदय "सप्रे"

स्वाती राजेश's picture

31 Mar 2008 - 3:01 pm | स्वाती राजेश

शिवाजींमहाराजांच्या वरील खूप पुस्तके वाचली पण ही माहिती विलक्षण वाटली. कदाचित आम्ही तुमच्या इतके चांगले चिकित्सक,गांभिर्याने वाचन करत नसू, माहिती मिळाली कि झाले हे आमचे वाचण्याचे उद्दीष्ट असेल. कारण इतक्या डीप मधे कधी विचार केला नव्हता.
तुमचे नवे पुस्तक (अप्रकाशीत) आहे, आता ते वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच प्रकाशीत होवो ही शुभेच्छा!!!!!!!!!!
बाकी लेखनशैली फारच छान आहे.

उदय सप्रे's picture

31 Mar 2008 - 3:53 pm | उदय सप्रे

स्वाती राजेश,

अश्या एखाद्या वाक्याने खूप हुरूप येतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नकोच.
प्रयत्न सुरू आहे , त्या आधी बहुतेक "शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहिलेली पुस्तके प्रकाशित करण्याचा विचार आहे , यातील पहिले पुस्तक "बाजी पासलकर" (म्हणजे कान्होजी जेधे यांचे सासरे) लिहून तयार आहे, कान्होजी जेधे ८५ % झाले आहे.बाजी..... लवकरच येईल अशी आशा आहे, लहान आहे साधारण २५ पाने.आले की कळवीनच.

आज भाषाप्रभू कै.रणजित देसाई आणि कै.शिवाजी सावंत हयात नाहित हे माझे वईयक्तिक खूप मोठे नुकसान आहे.....

उदय "सप्रे"

प्रसन्न's picture

2 Apr 2008 - 1:11 pm | प्रसन्न

भन्नाट निरीक्षण आहे आपल, वाचुन नविन माहिती मिळाली.

धन्यवाद,
प्रसन्न