मंद वार्यात,धूंद तार्यात, लाजत रात्र आली
चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली !
मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले
स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली !
शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके
लाजलेली रातराणी..., फुलवीत रात्र आली !
लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे
गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली !
नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे
रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली !
चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू
मिटले अंतर सगळे...,अन गंधीत रात्र झाली !
विशाल.
प्रतिक्रिया
15 Dec 2009 - 5:07 pm | विशाल कुलकर्णी
१९७ वाचने आणि शुन्य प्रतिसाद ! हा अन्याव हाये....... :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Dec 2009 - 5:29 pm | अवलिया
श्री रा रा विशालजी कुलकर्णीजीसाहेब
आपण तनुत देहराग आवळण्यात मग्न असल्याने कुणी प्रतिसाद देवुन आपल्याला त्रास न देण्याचे धोरण अवलंबले असावे. बाकी आपण स्वांत सुखाय लिहित असतांना काही वृद्ध बालके ज्याप्रमाणे प्रतिसाद आसुसलेले असतात तसेच आपण वर्तन करता हे पाहुन अंमळ दुःख झाले. मनुष्यास केवळ कर्म करण्याचा अधिकार असतो, त्याच्या फलावर नाही या श्रीकृष्ण (सामंत नाही) यांच्या उपदेशाचा आपणास विसर पडला हे पाहुन किंचित आश्चर्य वाटले. सुधारणा करण्यास वाव आहे असे मला वाटते. खरे तर आपण प्रतिसादासाठी केलेली विचारणा पाहुन संपादक मंडळींमधील वयाने, अनुभवाने जेष्ठ मंडळी आपली समजुत घालण्यासाठी सरसावतील अशी अपेक्षा होती, परंतु अपेक्षा फोल ठरली. असो.
कविता छान आहे, कार्यबाहुल्यामुळे सध्या प्रत्येक धागा नजरेखालुन घालणे शक्य होत नाही, त्यामुळे माझा प्रतिसाद देवु शकलो नाही याबद्दल मी आपली माफी मागतो.
आपली कविता खरंच खुप छान आहे. असेच लिहित रहा.
धन्यवाद !
--अवलिया
16 Dec 2009 - 10:07 am | विशाल कुलकर्णी
भगवन,
क्षमस्व, मी फक्त देवबाप्पांचे अनुकरण करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला होता... (कोण रे तो नक्कल म्हणणारा... ;-) )
पण आपल्या देववाणीने माझे डोळे उघडले आणि मी अजुन कविता पाडण्यास सिद्ध झालो आहे.
(नप्रतिसादास आसुसलेला ;-) )
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Dec 2009 - 5:38 pm | टारझन
व्वा !! जियो विशाल राव ;) काय संकल्पना आहे ;)
बाकी जाणकार सांगतात अशा वेळी सर्व कार्यक्रम आधीच्च उरकुन घ्यावेत.
आहो आम्हाला कवितेतलं काय कळतंय .. :) तरीबी तुम्हाला वाईट वाटलेले पाहून वाईट वाटले म्हणून प्रतिसादले ;)
- सुगंधीवडी
16 Dec 2009 - 12:01 pm | हर्षद आनंदी
अप्रतिम कविता..
भावना अगदी नकद पोचल्यात!
लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे
गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली !
क्या बात है..
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
16 Dec 2009 - 12:55 pm | विजुभाऊ
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
या वाक्याला म्हणतो
वा ! क्या बात है!
16 Dec 2009 - 1:22 pm | टारझन
वा ! क्या बात है!
ह्या प्रतिसादाला म्हणतो ..
व्वा ! जियो !! क्या बातां है !!
जपानी गादी , माणुस आणि उंदीर
- महिपाल
16 Dec 2009 - 3:29 pm | विशाल कुलकर्णी
आत्ता कस्सं बरं वाटतय ! ~X(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"