घ्या..... केळी..........

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Dec 2009 - 4:13 pm

मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात.
पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति.
सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो.
हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो.
वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत.
नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात.
मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.
केळे हे फळ तसे निरुपद्रवी फळ गरीबांचे अन्न वगैरे वगैरे. असे फळ काही करु शकेल हे अशक्य . पण त्याने एकदा एक संप पूर्ण मोडून टाकला होता.
सातार्‍यात एकदा एम एस ई बी चा संप सुरु होता. काहितरी स्थानीक भानगड होती. पण चिघळली असती तर ती राज्य पातळीवर पसरली असती.
सातार्‍याच्या राजवाडा चौकातले एम एस ई बी चे ऑफीस हे त्या घडामोडींचे केंद्रस्थान होते.
राजवाडा चौक गावातले मध्यवर्ती ठीकाण सात आअठ रस्ते येथे एकत्र येतात आणि सर्वत्र पसरतात. फळ बाजार ,एस टी बसस्टॅन्ड, रीक्षास्टॅन्ड , नगर वाचनालय , शाळा, चित्रपटगृह, हॉटेले, राजकीय सभेसाठीचे गांधी मैदान.... सगळे काही इथेच. त्यामुळे नेहमीच एक गर्दीचे ठीकाण . आसपासच्या गावातू येणार्‍या जाणार्‍या लोकाना उतरण्याचे एक महत्वाचे ठीकाण. फेरीवाले,फळाच्या गाड्या यांच्यासाठी तर हा नेहमीचा धंद्याच्या अड्डा. आरडाओरडा करून गिर्‍हाईकाना बोलावणे हे नित्याचेच.
त्या दिवशी वातावरण तंग होते. एका कागाराला अपघात झाला , सरकारने त्याला काढून टाकले ...की काहीसे असेच कारण होते
सगळे अभियंते , कामगार ऑफीसच्या दारात उभे होते. संपाला सुरुवात करायचा मुहूर्त जवळ येत चालला होता.
उपोषणाला बसणार्‍या मंडळींचे वैद्यकीय चेक अप नुकतेच संपले होते. प्रमुख पाहुण्यानी नारळ फोडला. टाळ्या वाजल्या. कामगारानी/ अभियंत्यानी घोषणा दिल्या . आमच्या मागण्या मान्य करा. ...... कोन म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही.....
वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी फटाफटा फ्लॅश मारु लागले. हारतुरे वगैरे वाटले गेले.....
समारंभ पार पडला. फोटोत येणारे नेहमीचे यशस्वी आज फोटो झाल्यावर पांगले नाहीत. खूपच महत्वाचे कारण होते संपाचे. घोषणा ऐकून गर्दी जमा होऊ लागली.
बघ्यांची गर्दी जमा झाली तसा घोषणावाल्याना चेव चढला. ते मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले.
अमूक तमूक की ........जय....... अमूक तमूक कामगार संघाचा ........विजय असो.....
जय ...विजय असो म्हणणारे सुद्धा; बघे आहेत श्रोते आहेत हे पाहुन उत्साहाने घोषणादेउ लागले.
आमच्या मागण्या मान्य करा....... एका अभियंत्याने हात उंचावून मुठी वळून बेंबीच्या देठापासून घोषणा दिली.
घोषणेला काही उत्तर येण्या अगोदरच एका कोपर्‍यातून आवाज आला ...." घ्या ...केळी..." गर्दी शेजारीच उभ्या असलेला एक केळी विक्रेता ओरडला.
गर्दी हसली...घोषणा देणारा चपापला..त्याने इकडे तिकडे पाहिले. थोडेसे ओशाळून त्याने पुन्हा एकदा घोषणा दिली
"आमच्या मागण्या मान्य करा....."
"घा केळी...." आता कोरस मध्ये आवाज आला.... नक्की काय गंमत झाली असावी हे कळल्यामुळे इतर केळी विक्रेत्यानी त्या केळी विक्रेत्याच्या आवाजात आपला आवाज मिसळला होता .
अभियंत्याने पुन्हा एकदा घोषणा दिली....आमच्या मागण्या मान्य करा........
घ्या केळी.........
आमच्या मागण्या मान्य करा....
घ्या केळी.....
आमच्या मागण्या मान्य करा....
घ्या केळी.....
आमच्या मागण्या मान्य करा.... हे वाक्य आले की लेगेचच उत्तर यायचे
घ्या केळी.....
गर्दी या घोषणा युद्धाची मजा लुटत होती.
लोक पोटधरून हसत होते. आणि संपकरणारे वैतागले होते.
थोड्या वेळ हे घोषणायुद्ध चालूच राहिले.
आमच्या मागण्या मान्य करा..............याला समर्पक उत्तर मिळत होते...घ्या केळी....
आता तर जमलेली गर्दीच ओरडत होती
आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या केळी....
या गडबडीत उपोषण करणारे वैतागले . त्यातल्या एकाने चिडून केळेवाल्याच्या गाड्यावरून केळ्याचा घड उचलला आणि सहकार्‍यात वाटून टाकला....
या सगळ्या गोंधळात संप / उपोषण सगळेच विसरले......
एका संपाचा मॅनेजमेंटच्या प्रयत्नाशिवाय बीमोड झाला होता.....

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

तिमा's picture

15 Dec 2009 - 4:25 pm | तिमा

ही गोष्ट कुठल्या काळातली आहे ?
कारण आता जर असं झालं तर विक्रेत्यांच्या पँटीत तंगड्या रहाणार नाहीत. त्यात जर युनियन कुठल्या सेनेची असेल तर कानशीलाखाली पण आवाज निघतील.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

घाशीराम कोतवाल १.२'s picture

15 Dec 2009 - 4:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

घ्या केळी
घ्या केळी

(केळेवाला) कोतवाल

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

मदनबाण's picture

15 Dec 2009 - 4:27 pm | मदनबाण

विजुभाऊ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
घ्या केळी ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
;)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

अनिकेत वैद्य's picture

15 Dec 2009 - 4:34 pm | अनिकेत वैद्य

केळकर करंडक मिळणे हे कालेज जीवनात ऐकले होते.
त्याचा उगम असा असेल हे माहीत नव्हते.

एकुणच केलेल्या मागणीचा फ़ज्जा उडणे, हाती काहीही न येणे या अर्थी केळे मिळणे असा शब्द प्रयोग खूप वेळा ऐकला होता.

अवलिया's picture

15 Dec 2009 - 4:36 pm | अवलिया

श्री रा रा विजुभाउजीसाहेब

अतिशय माहितीपुर्ण लेखाबद्दल आपल्याला चार डझन केळी भेट देण्यात येत आहेत. कृपया त्यांचा स्विकार करावा आणि रोज दोन वेळेस प्रत्येकी दोन केळी खावी ही नम्र विनंती. केळाचे शिकरण करुन रोज खाल्यास (केळी शिल्लक असे पर्यत) आमची हरकत नाही, मात्र रोज खरड अथवा व्यनी करुन आज मी केळं खाल्लं असे पुनःपुन्हा सांगु नये. आपल्याला अशा आगंतुक खरडी पाठवायची सवय असल्याचे आपले पुर्वाश्रमीचे मित्र श्री. केळाराम सालकाढणे यांनी कळवले आहे. तरी काळजी घेणे.

केळी कच्ची असल्यास पिकवुन खाणे, कच्च्या केळांनी घसा धरल्यास आम्ही जबाबदार नाही याची जाणीव ठेवणे तसेच एकाच दिवशी अतिरिक्त केळी खावुन शरीराच्या काही भागांवर ताण येईल असे वर्तन करु नये.

धन्यवाद.

--अवलिया

टारझन's picture

15 Dec 2009 - 5:30 pm | टारझन

कोळंबी :)

jaypal's picture

15 Dec 2009 - 4:44 pm | jaypal

तुमची केळीकथा/पुराण एकदम कडक. वरवर साधारण वाटणा-या केळयाच सामर्थ्य पहा किती आफाट आहे "घ्या केळे,मिटवा संप, घ्या केळे,मिटवा संप" माझ्या आवडत्या फळावरील कथा वाचुन खुप आनंद झाला. माझं अजुन एक आवडतं फळ आही "अंजिर" या वर काही किस्से अस्ल्यास जरूर लिहा.
***********************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पर्नल नेने मराठे's picture

15 Dec 2009 - 5:08 pm | पर्नल नेने मराठे


चुचु

jaypal's picture

15 Dec 2009 - 6:34 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

माधुरी दिक्षित's picture

15 Dec 2009 - 6:46 pm | माधुरी दिक्षित

पर्नल नेने मराठे's picture

15 Dec 2009 - 7:18 pm | पर्नल नेने मराठे

=)) थन्क्स ग
चुचु

टुकुल's picture

16 Dec 2009 - 12:18 am | टुकुल

केळ्याने होत आहे रे,
आधी केळेच पाहिजे

विजुभौ, काल्पनीक कथा आहे का?

--टुकुल

विजुभाऊ's picture

16 Dec 2009 - 9:13 am | विजुभाऊ

हा किस्सा मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. घ्या केळी....
अभियंते घोषणा द्यायचे " आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत...." आणि त्या घोषणाना जणू समर्पक उत्तर म्हणून की काय केळीवाले बागवान ओरडायचे "घ्या केळी...."
लोकांची हसून हसून पुरेवाट झाली. अभियंत्यानी नाईलाजाने घोषणा देणे बंद केले....

चतुरंग's picture

16 Dec 2009 - 12:29 am | चतुरंग

विडंबन आपला प्रांत नव्हे हे माझे शब्द मी मागे घेतो!
(खुद के साथ बातां : रंगा, हे विजुभाऊ काही केल्या फळांना सोडायला तयार होत नाहीत! गुदस्तसाली त्यांनी आमरस काढायला सुरुवात केली होती आता शिकरण करुन ठेवताहेत! काय गौडबंगाल आहे? :?)

(फली)चतुरंग

विजुभाऊ's picture

17 Nov 2014 - 5:12 pm | विजुभाऊ

हा हा हा

लवंगीमिरची's picture

16 Dec 2009 - 12:43 am | लवंगीमिरची

=))

निखिलराव's picture

16 Dec 2009 - 10:23 am | निखिलराव

आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा....
आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा....
आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा....

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 2:09 pm | स्वीत स्वाति

:-)