बुधवारची कविता : (खवट)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
10 Dec 2009 - 8:21 pm

नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो.
आमची प्रेरणा

ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता
काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता

सोबत होते तिची नि माझी पेग काही
जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता

एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा
इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता

चुकून जुळती कधीमधी मते आपली
आठवही त्याचा न उरावा.. पिता पिता

वाढे प्रसिद्धी प्रतिसादे, सहमत म्हणती
चालकांचीही पोच मिळावी .. पिता पिता

क्षुब्ध प्रतिसाद ना मला कळले क्षणभर
बुधवारीची कविता उतर .. पिता पिता

-सदर कविता एका गाण्यार्‍या मित्राला समर्पित

भयानकसंस्कृती

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Dec 2009 - 8:27 pm | श्रावण मोडक

यावे... यावे... मित्र परिचयाचा वाटतोय!!!

गणपा's picture

10 Dec 2009 - 8:46 pm | गणपा

>>त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे.
या वेळेस दिलगीरी अ‍ॅक्सेप्टेड. पुढच्या वेळेस खपवुन घेतले जाणार नाही.
आधी सवय लवुन दिलित.. आता डोस (आणि उतारे) वेळच्या वेळी मिळाले नाहीत तर त्याचा आमच्या प्रकृतीवर परिणाम होतो ;)

-माझी खादाडी.

प्रभो's picture

10 Dec 2009 - 9:01 pm | प्रभो

नादलेस कविता

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

10 Dec 2009 - 9:42 pm | चतुरंग

नाय रे जमलं ह्या वेळी...पाणी अंमळ जास्त झालंय! :(
पुपेशु.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Dec 2009 - 7:50 am | llपुण्याचे पेशवेll

बुधवारी टाईम नसल्याने आधीच पाडून, पाणी घालून ठेवलं. त्यामुळं अंमळ तेवलं आहे. त्यामुळे *ले अंमळ सुटल्याने बेढब दिसणार्‍याप्रमाणे झाले आहे हे आम्हास मान्य आहे. असो, बदलीन..
:)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

आकडा's picture

10 Dec 2009 - 11:07 pm | आकडा

बुधवारीच कविता का टाकली बरे? बुधवारचं काय महत्त्व आहे?

असो. विडंबन ठीकठाक.

पाषाणभेद's picture

11 Dec 2009 - 4:50 am | पाषाणभेद

बुधवाराचं महत्व अगाध आहे महाराजा, विचारता काय नुसते, अंमलबजावणी करा एकदा मग समजेल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

विजुभाऊ's picture

11 Dec 2009 - 9:43 am | विजुभाऊ

ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता
काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता


आलो भानावर ऐकता ; पिता .. पिता..
घरी चला लवकर ; चवताळली ..माता माता

नंदन's picture

11 Dec 2009 - 10:37 am | नंदन

वाढे प्रसिद्धी प्रतिसादे, सहमत म्हणती
चालकांचीही पोच मिळावी .. पिता पिता

-- क्या बात है! एकूणात कविता आणि प्रतिसाद ख आणि व आणि ट :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अवलिया's picture

11 Dec 2009 - 10:42 am | अवलिया

पुपे भिकारचोट आहे.
त्याच्या इमोसनल अत्याचारामुळे अनेक वृद्ध बालके त्रस्त झाली असल्याचे आमचा जीमेलवरचा वार्ताहर कळवतो. असो.
जास्त माहिती अवांतर ठरेल.

आणि हो, कविता छानच आहे हे लिहायचे विसरलोच होतो.. असो, सुधरीन.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2009 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

अतिशय खवट व कुचकट विडंबन अप्रतिमच.

मी आपणाला सांगु इच्चितो की आम्ही येथे आम्ची बुद्धी दाखवायला वा आम्ही जगावेगळे दाखवायला तसे लिहिलेले नाही
पण मला नेहमीचे अवैचारिक ,विदंबन असे लेख आवडत नाहीत महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या असंख्य मित्रांसारखे पहिल्यादीवशी दुसर्याचे लेख वगिअरे बघावासा वाटत नाही
त्या संदर्भात हे लिहिले होते असो बदलीन

©º°¨¨°º© परायक खाचलग ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

11 Dec 2009 - 3:24 pm | टारझन

ह्हा ह्हा ह्हा !!
मस्त रे फेशव्या ... बाकी खवट नावाला जागलीये कविता.

असो बाकरीन ..

--(आद्य हिजडा)
:B :B :B खवटवडी :B :B :B

ANIRUDDHA JOSHI's picture

20 Dec 2009 - 12:27 pm | ANIRUDDHA JOSHI

peshve PITA PITA kavita tumhi farch chan lihili aahe ho. aavdli amhaa pita pita

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2009 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेशवे विडंबन आवडलं. (मुद्दामच प्रतिसाद दिला, म्हणजे आमच्या उतार्‍यालाही एक जादा प्रतिसाद मिळेल.) ;-)

अदिती

दमनक's picture

21 Dec 2009 - 2:50 pm | दमनक

कवितेस 'पास वो आने लगे जरा जरा' या गाण्याची चाल व्यवस्थित बसते (अंगासरशी). आम्हीसुद्धा (आदरार्थी एकवचनी) बुधवार करतो आणि बुधवार केल्यावर गाण्यातल्यासारखे नाचतो. नाचताना मात्र आम्ही दोघे नाचत आहोत असे वाटत असते. असो. तर कविता आवडली.

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Dec 2009 - 3:15 pm | ब्रिटिश टिंग्या

बदलीन!