सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.
अजय-अतुलचे संगीत- आम्ही पामरं काय बोलणार- संगीताचे शिक्षणही न घेता त्यांच्या कलाविष्कार इतका अद्भूत होऊ शकतो हे पाहिल्यानंतर त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण होते व ते मराठी संगीतकार आहेत ह्याचा अभिमान वाटतो. त्यांनी झी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हणाल्याप्रमाणे, त्यांची पाटी कोरी असल्यामुळे त्यांना त्यावर स्वतःला जे हवे ते लिहिता येते. हेच त्यांच्या सध्याच्या वर्चस्वाचे यश आहे. (मागेच एक-दोन आठवड्यापुर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील महत्वाच्या संगीतकाराच्या यादीत अजय-अतुलचे नाव त्या लेखकाने त्या संकुचित लेखात टाकले नव्हते).
नटरंग- एक उत्तुंग कामगिरी! धन्य!
नव्या वाटेवर मराठी सिनेमाला टाकणाऱ्या ह्या चित्रपटाला भव्य यश तर मिळणारच आहे पण त्याहून जास्त मोठे यश त्यांचे हे असेल की, अनेकांना ह्यातील कला एक मॉडेल म्हणून पहाता येईल.
[माझा आणि झी टॉकिजचा काहीच संबंध नाही. मी केलेली स्तुती पाहून उगाच गैरसमज नको- जे सत्य आहे ते मांडले- एका अचंबित झालेल्या कानसेनाच्या नात्याने, प्रेक्षकाच्या नात्याने, व मराठी असल्याच्या नात्याने]
प्रतिक्रिया
9 Dec 2009 - 9:30 am | मदनबाण
अजय-अतुलचे संगीत अप्रतिमच आहे...
नव्या वाटेवर मराठी सिनेमाला टाकणाऱ्या ह्या चित्रपटाला भव्य यश तर मिळणारच आहे पण त्याहून जास्त मोठे यश त्यांचे हे असेल की, अनेकांना ह्यातील कला एक मॉडेल म्हणून पहाता येईल.
येस्स्स्स... अगदी बरोबर. :)
सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.
हे गाणं केवळ अ प्र ति म आहे... :)
(गंधर्व)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
8 Dec 2009 - 3:29 am | अमृतांजन
कोमल काया की मोहमाया
पुनव चांदनं न्हाले
सोन्यात सजले रुप्यात भिजले
रत्नप्रभा तनु ल्याले
ही नटली थटली, जशी उमटली
चांदनी रंगमहाली
मी यौवन बिजली, पाहून थिजली
इंद्रसभा भवताली
कोरस-
अप्सरा आली इंद्रपुरीतुनी खाली
अप्सरा आली पुनव चांदनं ल्याली
छबीदार सुरत देखणी, जनु हिरकनी
नार गुलजार
सांगते उमर कंचुकी, ़़़़ सोसते भार
शेलटी खुणावी कटी, तशी हनुवटी
नयन तलवार
कोरस-
अप्सरा आली इंद्रपुरीतुनी खाली
अप्सरा आली पुनव चांदनं ल्याली
8 Dec 2009 - 3:31 am | अमृतांजन
दिलिप परबने नेहमी सारखी धमाल केली आहे!
8 Dec 2009 - 5:47 am | संदीप चित्रे
असला की कसदार अभिनय बघायला मिळेल ह्याची खात्री असते.
ही दुसरी सोनाली कुलकर्णी चांगली दिसते पण अभिनयाबाबत पहिल्या सोनाली कुलकर्णीच्या जवळपासही नाहीये ! दुसरे म्हणजे सिनेमात जर हे गाणं तिच्यावरच चित्रित झाले असेल तर ती सिनेमात तरी इथे वर दिलेल्या लाइव्ह शो मधल्यापेक्षा चांगली नाचली असावी अशी आशा करतो :) इथे तिच्या हालचाली फारच ऑकवर्ड वाटल्या !
अवांतरः वेगळा विषय आणि अतुल कुलकर्णी ह्या दोन कारणांसाठी 'नटरंग'ची मी वाट बघतोय पण पुन्हा एकदा (फक्त) तमाशापटांची निर्मिती व्हायला लागू नये हीसुद्धा आशा आहे !!
8 Dec 2009 - 6:03 am | स्वप्निल..
>>अतुल कुलकर्णी असला की कसदार अभिनय बघायला मिळेल ह्याची खात्री असते.
असेच म्हणतो ..
8 Dec 2009 - 11:53 am | जे.पी.मॉर्गन
तो बाप माणूस आहे. ह्या चित्रपटासाठी त्यानं आधी खूप वजन वाढवून मग खूप कमी केलंय असं ऐकलंय. गाण्यांची सीडी आलेली आहेच. चित्रपट यायची वात बघतोय !
8 Dec 2009 - 12:39 pm | अमृतांजन
पुण्यातील काही म्युझिक स्टोअरमधे चौकशी केली पण अजुन त्यांच्याकडे सीडी आली नाही असे कळाले. पुण्यात मिळत असल्यास जेथे मिळते त्या दुकानाचे नाव कृपया कळवा.
8 Dec 2009 - 1:07 pm | लवंगीमिरची
तरीच!
मला कळेना हि अशी का दिसतीये.. :T ~X(
मी आपली "दोघी" , "मुक्ता" फेम सोनाली समजत होते... 8>
8 Dec 2009 - 4:01 pm | पर्नल नेने मराठे
ह्या सोनालीचे कॉम्प्लेक्शन काय सुरेख आहे :X
चुचु
8 Dec 2009 - 8:51 pm | रेवती
अगं माझाही तोच गोंधळ झाला!
पण हे गाणं किती मस्त आहे.
नटरंग यायची वाट बघते आहे.
अतुल कुलकर्णीही चांगलं काम करतो.
रेवती
8 Dec 2009 - 7:41 am | sujay
आपल्याला तर हिरॉईन आवडली ब्वॉ, गाण बी झाक हाय.
अन अजय्-अतुलच मुजीक नेहमीच भारी असतं, हा पिक्चर बी तेला अपवाद न्हाय.
अवांतर- कुणाकडे हाय काय नाय काय मधल "देही वणवा पिसाटला" गाण असेल तर प्लीज व्यनी करा.
सुजय
8 Dec 2009 - 2:05 pm | माझी दुनिया
इथून घ्या - सुनिधी चौहानचे आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
9 Dec 2009 - 6:18 am | sujay
धन्यवाद !!
8 Dec 2009 - 9:04 am | निमीत्त मात्र
संगीत तज्ञ तात्यासाहेबांचे ह्यावर मत काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
8 Dec 2009 - 10:43 am | सौरभ.बोंगाळे
अरे हे गाणं एकदमच फक्कड आहे. अजय-अतुल ह्यांनी मराठी चित्सृसृष्टीत संगितक्षेत्रात क्रांती घडवून आणलीये. एक हे गाणं आणि दुसरं जोगचित्रपटातलं जीव रंगला हे गाणं. जमिन-अस्मानाचा फरक. मराठीला जागतिक पातळीवर दखल घ्यायला लावणार हे दोघे. यंदा ए.आर.रेहमानला ऑस्कर मिळालं आहे. भविष्यात ह्यांनादेखिल मिळेल अशी अपेक्षा नक्कीच करु शकतो. :)
11 Dec 2009 - 7:13 pm | घाशीराम कोतवाल १.२
जोगवा मधील लल्लाटी भंडार हे गाण ही खुप मस्त आहे..
( अजय - अतुलचा जबर्दस्त पंखा) कोतवाल
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
8 Dec 2009 - 7:18 pm | स्वाती२
अजय-अतुलचं संगीत आवडतेच. पण वेगळा विषय आणि अतुलचा अभिनय या मुळे नटरंग बद्दल उत्सुक आहे.
12 Dec 2009 - 1:23 pm | दिपक
ही सोनाली नाचते मात्र फक्कड. दिसायलाही छान आहे. :)



तिने केलेला ’वाजले की बारा.." चा व्हिडिओ शोधत होतो. तो काही मिळाला नाही. पण सोनालीचा ब्लॉग मिळाला. त्यावरले काही फोटोही.
20 Jan 2010 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
1 Jan 2010 - 7:58 pm | काजुकतली
आजच पाहिला नटरंग.. अतिशय सुंदर आहे. अतुल कुलकर्णीने कमाल केलीय.
18 Jan 2010 - 10:48 pm | सनविवि
हे गाणे खरंच सुंदर आहे. काय नाचलीये सोनाली! आणि अजय-अतुल चे संगीत नेहमीसारखेच उत्क्रुष्ट आहे.
चित्रपट मात्र कधी बघायला मिळतोय काय माहिती :(
19 Jan 2010 - 3:07 am | पाषाणभेद
नटरंग वर घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगीच आहे.
तमाशापटांचा जमाना पुन्हा आला तरी हरकत नाही. ग्रामीण भागातच महाराष्ट्र वसतो आहे. आपण शहरी त्या मानाने कमी आहोत.
(अवांतर: शहरातल्या नाट्यगृहांत लावण्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काय दर्शवीते हो?)
27 Jan 2010 - 9:51 am | पाषाणभेद
मंडली कालच्याच दिशी म्या हा खेळ पाह्यला. आक्षी लय भारी हाय पगा. म्या तर पुन्यांदा पाहनार हाय त्यो.
------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
27 Jan 2010 - 10:51 am | बंडू बावळट
सर्वच छान!
अतुल दी बेस्ट!
--बंड्या.