मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!

अमृतांजन · · कलादालन
सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही. अजय-अतुलचे संगीत- आम्ही पामरं काय बोलणार- संगीताचे शिक्षणही न घेता त्यांच्या कलाविष्कार इतका अद्भूत होऊ शकतो हे पाहिल्यानंतर त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण होते व ते मराठी संगीतकार आहेत ह्याचा अभिमान वाटतो. त्यांनी झी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हणाल्याप्रमाणे, त्यांची पाटी कोरी असल्यामुळे त्यांना त्यावर स्वतःला जे हवे ते लिहिता येते. हेच त्यांच्या सध्याच्या वर्चस्वाचे यश आहे. (मागेच एक-दोन आठवड्यापुर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील महत्वाच्या संगीतकाराच्या यादीत अजय-अतुलचे नाव त्या लेखकाने त्या संकुचित लेखात टाकले नव्हते). नटरंग- एक उत्तुंग कामगिरी! धन्य! नव्या वाटेवर मराठी सिनेमाला टाकणाऱ्या ह्या चित्रपटाला भव्य यश तर मिळणारच आहे पण त्याहून जास्त मोठे यश त्यांचे हे असेल की, अनेकांना ह्यातील कला एक मॉडेल म्हणून पहाता येईल. [माझा आणि झी टॉकिजचा काहीच संबंध नाही. मी केलेली स्तुती पाहून उगाच गैरसमज नको- जे सत्य आहे ते मांडले- एका अचंबित झालेल्या कानसेनाच्या नात्याने, प्रेक्षकाच्या नात्याने, व मराठी असल्याच्या नात्याने]
लेखनविषय:

वाचन 10783 प्रतिक्रिया 0