मजला बघ प्रीत तुझी कळली
बघतेस जरी मला तू सखये
नयनात छबी दिसते दुसरी...
चुकवी नजरेस सदा दडुनी
कसली करते लपवा छपवी?
छळती तुज त्या जुन्या आठवणी
जसे भृंग वनामधुनी सुमना
फिरती तुझिया अवती भवती
झुरते मुखकमल तुझे रमणी
कथिले गुज मी तुजला मनचे
म्हणुनी झुकला सखये चरणी
पडले पुढती किति मौक्तिकही....
अपुल्या पुढती बघता हसली
वळुनी सखया झटकन वदली ....
'मजला बघ प्रीत तुझी कळली'
प्रतिक्रिया
26 Sep 2007 - 8:58 pm | राजे (not verified)
"छळती तुज त्या जुन्या आठवणी
जसे भृंग वनामधुनी सुमना
फिरती तुझिया अवती भवती
झुरते मुखकमल तुझे रमणी "
जबरदस्त.....
राजे
(*हेच राज जैन आहेत)