"डार्विनच्या अनुनयांनो.." हा लेख माझ्या मनात एक वेगळेच विचार वादळ ऊडवून गेला. पुर्वीचे काही कच्चे मुद्दे स्पष्ट झाले व काही नवे विचार जन्माला आले. त्यातील माझाच मला आवडलेला विचार होता- "मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत."
आज अचानकपणे सुवर्णा ह्या मिपाकरीणीने त्या धाग्याला प्रतिसाद दिला आणि वरील विचाराला एक उजळणी मिळाली. त्यास उत्तर देतांना मी डिव्हाईन नंबरचा विचार केला. नंतर वाटू लागले की, इतरांनाही अशा चमत्कृतीपुर्ण रचनांच्या बाबत माहिती असावे व ह्याचा नवा एक धागा केल्यास चांगली चर्चा येथे होऊ शकते म्हणून हा भाग २ काढून तो डिव्हाईन नंबरला अर्पण केला आहे.
ह्या धाग्याची मागील घडामोड येथे वाचावयास मिळेल.
प्रोलॉग-
खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल?
कदाचित असे असावे-
मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब-
"मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...."
"मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक"
"ओ. के. सर"
"तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही"
"ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका"
"त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?"
"सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे"
"चांगला विचार आहे, आगे बढो"
"सर मला प्रमोशन पाहिजे"
"हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये"
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
>>>**********************>>>
डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं.
[डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.]
हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे-
प्रतिक्रिया
27 Nov 2009 - 6:19 pm | अवलिया
गोल्डन रेशो वगैरे सोडुन द्या, आम्हाला गोल्डन शॉवर माहित आहे.
--अवलिया
27 Nov 2009 - 6:31 pm | सूहास (not verified)
मानव ...माकड... डार्विन... डोळे ....हे विश्व...पोप ...डाटा? की डेटा ....नान्या ....धम्या ....मिपा..तात्या....शरदिनीताईंच्या कविता ...अमृतांजनचे की अमृतांजनताईचे धागे.....संपादकीय धोरण.....सगळच समजायला अवघड ...डोक गेल कामातुन ...आलोच जरा चहाबिडी मारुन ...
सू हा स...
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की लाव चाल आणि आमच्या बाबतीत...... चालढकल
27 Nov 2009 - 7:06 pm | सहज
असा हा जबरद्स्त इंजिनियर्ड मानवी डोळा अन्य बर्याच जीवजंतुंपेक्षा (पक्षी, सरडे, काही जलचर इ इ) खूपच प्राथमिक आहे. असो..
२००९ साल हे डार्वीन यांची २०० जयंती वर्ष (200th anniversary of Charles Darwin's birth ) आहे. त्यानिमित्ताने हा दुवा जरुर पहा, बीबीसीचे माहीतीपट, विशेषता चार्ल्स डार्वीन एन्ड ट्री ऑफ लाईफ अवश्य पहा.
27 Nov 2009 - 7:54 pm | अमृतांजन
>>असा हा जबरद्स्त इंजिनियर्ड मानवी डोळा अन्य बर्याच जीवजंतुंपेक्षा (पक्षी, सरडे, काही जलचर इ इ) खूपच प्राथमिक आहे. असो.
हो ह्याबाबतीत मी आपल्याशी सहमत आहे. गरुड तसेच इतर हवेचर प्राणी ह्यांच्या नजरेच्या क्षमतेबद्दल बरेच ऐकले आहे.
27 Nov 2009 - 7:36 pm | मदनबाण
मानव जर माकडापासून उत्क्रांत झाला असेल तर अजुन आपल्याला माकडे कशी बर पाहावयास मिळतात ? :?
म्हणजे त्यांची उत्क्रांती जाणीव पुर्वक कोणी थांबवली का?
बाकी मानवी डोळा कमाल की चीज आहे... करोडो प्रकाशवर्ष लांब असलेले तारे आपल्याला डोळ्याने सहज दिसतात...आणि पाण्याच्या बुडबुड्यासारखा अत्यंत पातळ आवरण असलेला बुडबुडा सुद्धा याच डोळ्यांना दिसतो !!!
बाकी "मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत."
याच म्हणाल तर हे जरा वाचा बरं:---
http://en.wikipedia.org/wiki/Alien_abduction
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
खरचं मानव चंद्रावर गेला होता काय ?
http://www.youtube.com/watch?v=z17WsAOgf4U
27 Nov 2009 - 7:55 pm | अमृतांजन
>>मानव जर माकडापासून उत्क्रांत झाला असेल तर अजुन आपल्याला माकडे कशी बर पाहावयास मिळतात ?
प्रिसाइजली हाच प्रश्न मला पडतो म्हणूनच मी डार्विन्च्या थेअरीच्ला मानत नाही.
27 Nov 2009 - 7:58 pm | अमृतांजन
http://en.wikipedia.org/wiki/Alien_abduction
हा दुवा मात्र एकदम फक्कड आहे बरं!
27 Nov 2009 - 8:02 pm | अमृतांजन
हा दुवा जरुर पहावा- http://goldennumber.net/body.htm
27 Nov 2009 - 9:00 pm | मेघवेडा
खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही.
सहमत! हेच म्हणतो. मानवी शरीराची आणि एकूणच विश्वाची संरचना संपूर्ण हायली इंजिनीअर्ड आहे. हे सगळं शून्यातून विकसित झालं हे मानायला मन तयार होत नाही. कुणीतरी नक्कीच आपल्यावर नियंत्रण धरून असला पाहिजे! माझ्या माहितीनुसार हायझेनबर्ग ने बर्याच वर्षांपूर्वी हे सांगितलं होतं की, आपलं ब्रह्मांड हे कदाचित आपल्यापेक्षा अतिप्रगत आणि अतिविकसित जीवमात्रांची एक छोटीशी प्रयोगशाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता 'द डिव्हाईन प्रपोर्शन' बद्दल थोडं!
डिव्हाईन प्रपोर्शन/ गोल्डन रेशिओ, फिबोनाची सीरीज खरंच या सगळ्या थक्क करून सोडणार्या गोष्टी आहेत! तुम्ही वर नमूद केल्याप्रमाणेच आणखी बर्याच गोष्टी आपल्याला डिव्हाईन प्रपोर्शन पर्यंत आणून ठेवतात. ('द दा विन्ची कोड' मधे यावर बराच उहापोह केला आहे. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.)
जगातल्या कोणत्याही मनुष्याच्या बाबतीतः
बोटाच्या एकूण लांबीचे दोन पेरांशी असलेले गुणोत्तर,
हाताच्या एकूण लांबीचे बोटापासून कोपरापर्यंतच्या अंतराशी असलेले गुणोत्तर,
एकूण उंचीचे नाभीपासून तळपायाच्या अंतराशी असलेले गुणोत्तर!
तसेच, मधमाश्यांच्या कुठल्याही पोळ्यातील नर माश्यांचे मादी माश्यांशी असलेले गुणोत्तर .. आणखी बरेच काही!! सर्व गुणोत्तरे सारखीच! हा नक्कीच एक योगायोग नाही!
'द दा विन्ची कोड' वाचल्यावर आणि मग तो चित्रपट पाहिल्यावर कित्येक रात्री झोपलो नाही!!!
27 Nov 2009 - 9:05 pm | अमृतांजन
तुमचा प्रतिसाद वाचून समविचारी मित्र भेटल्यावर जसा आनंद होतो तसा झाला.
27 Nov 2009 - 9:12 pm | अमृतांजन
>>>> माझ्या माहितीनुसार हायझेनबर्ग ने बर्याच वर्षांपूर्वी हे सांगितलं होतं की, आपलं ब्रह्मांड हे कदाचित आपल्यापेक्षा अतिप्रगत आणि अतिविकसित जीवमात्रांची एक छोटीशी प्रयोगशाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचून मला हेच म्हणावेसे वाटते.
28 Nov 2009 - 12:30 am | Nile
म्हणजे आपल्या 'हायली' इंजीनीअर्ड' विश्वाला आपल्या पेक्षा प्रगत अश्या कुणीतरी 'वसवलं'. मग त्या आपल्या पेक्षा प्रगत म्हणजेच 'हायली हायली इंजीनीअर्ड' विश्व असणार मग त्यांनाही कुणीतरी 'वसविलेच' असेल आणि ...
28 Nov 2009 - 12:33 am | अमृतांजन
>>म्हणजे आपल्या 'हायली' इंजीनीअर्ड' विश्वाला आपल्या पेक्षा प्रगत अश्या कुणीतरी 'वसवलं'. मग त्या आपल्या पेक्षा प्रगत म्हणजेच 'हायली हायली इंजीनीअर्ड' विश्व असणार मग त्यांनाही कुणीतरी 'वसविलेच' असेल आणि ...>>>
हो हे तसेच असते. लहान आयटी कंपन्या मोठ्या आयटी कंपन्यांच्या ट्रेनिंग डिव्हिजन असतात तसेच. आणि..
27 Nov 2009 - 11:16 pm | धनंजय
गोल्डन रेशो हे प्रमाण सौष्ठवपूर्ण आहे. चित्रकला आणि स्थापत्यकलांमध्ये त्या प्रमाणबद्धतेचे महत्त्व आहे.
प्रमाणबद्ध फरक (प्रपोर्शनल चेन्ज) केला की अशा प्रकारच्या वस्तू आपोआप तयार होतात. काही ठिकाणी लाटांच्या किनर्यावर आदळून आपोआप प्रपोर्शनल (लॉगॅरिद्मिक) स्पायरल किनारे तयार होतात.
प्रमाणबद्ध जोडणी ही अप्रमाणबद्ध जोडणीपेक्षा "सहज" आहे, असे मला वाटते. उदाहरणार्थ वनस्पतीच्या एखाद्या काडीला पाने/लहान फांद्या फुटत असताना त्याच-त्याच प्रमाणात परतपरत फुटत जातील हे सहज, आणि प्रत्येक फांदी वेगळ्या प्रमाणात फुटेल हे तसे कठिण. प्रमाण एकच ठेवल्यामुळे कित्येकदा लॉगॅरिद्मिक स्पायरल आपोआप तयार होतो.
फांदी फुटताना खालील मोठ्या फांदीत उपलब्ध रसदीच्या प्रमाणातच तयार होणे सोपे. रसदीपेक्षा मोठ्या प्रमाणात फांदी उत्पन्न कशी होऊ शकणार?
चेहर्यांत जर प्रमाणबद्धता असेल तर ते सुंदर दिसतात - म्हणून काही चित्रकार चेहरा काढताना गोल्डन रेशोचा उपयोग करतात, हे खरे आहे. पण खरे चेहरे मात्र तंतोतंत या प्रमाणात असत नाहीत. खालील चित्र बघावे -
चित्रातील दोन्ही चेहर्यांची प्रमाणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे दोन्ही प्रमाणे गोल्डन रेशो असू शकणार नाहीत.
त्याच प्रमाणे वनस्पतीच्या फांद्यासुद्धा "आपोआप" लॉगॅरिद्मिक स्पयरल आकार धारण करत असल्या तरी तो आकार ढोबळमानानेच तसा असतो. प्रत्येक वेळी रसद कमी-अधिक होते, एखाद्या किडा रस पितो... प्रमाण कमी-अधिक होते, आणि स्पायरल थोडे वेडेवाकडे होते. पण चित्र काढताना अनेक चित्रकार प्रमाणबद्ध काढतात, कारण त्यात नयनसुख असते.
सौंदर्यशास्त्रातील गोल्डन रेशोबद्दल ओळख करून दिलीत हे छानच. (पण त्याचा प्रास्ताविक भागाशी संबंध काय आहे?)
28 Nov 2009 - 12:17 am | अमृतांजन
खरे म्हणजे मी अशाच एका पानाच्या चित्राच्या शोधात होतो. झाडांची पाने मला नेहमीच एक वैशिठ्यपुर्ण मॉडेलमधे दिसतात.
वरील चित्रातील झाडांची पाने संयुक्त पानं आहेत. ह्या संयुक्त पानांचा आकार एका अखंड पानासारखाच असतो. नारळाचे पानही पहा. हेच मॉडेल तुम्हाला इतर झाडामधेही दिसेल.
पुर्ण वाढ झालेली पाने त्यांचे प्रमाण तेच ठेवतात. अचानक मधेच एखादे पान खूप मोठे होत नाही. (जसे आपला एकादा कान, हात, पाय)- हे सगळे सजीव आपापले एक मॉडेल सांभाळत वाढतात.
वरील झाडाचे बी साऊथ अमेरीकन असेल तर ते जरी भारतात आणून लावले तरी ते तसेच वाढेल. - कंट्रोलिंग मॉडेल. आणि रिकर्सिव्ह मॉडेल असे म्हणता येईल.
वरचे स्पष्टीकरण ह्यासाठी की, जरी प्रत्येक मानवी शरीर एकसारखे नसले, प्रत्येक झाडाचा आकार एक सारखा नसला तरी ते सगळे आपापल्या रेशोत वाड्गतात.
मानवातही (अपवाद वगळता) पाय एकदम छोटे व कमरेपासून वरचा आकार नेहमीसारखा असा मानव तयार होत नाही. कुठेतरी तो गोल्डन रेशो काम करत असतो. (जसे वरील चित्रातील पानांमधे दिसते).
28 Nov 2009 - 12:19 am | मनिष
धनंजय दाखवू पाहतात आहे ते हे चित्र -
27 Nov 2009 - 11:26 pm | अमृतांजन
>> (पण त्याचा प्रास्ताविक भागाशी संबंध काय आहे?)
प्रयोगकर्त्याने ज्या ऑब्जेक्ट ओरीयंटेशनचा (मॉडेलचा) वापर केला आहे त्याच्याशी संबंध आहे.
"उत्क्रांत" म्हणजे नैसर्गिकपणे (म्हणजेच योगायोगाने?) तयार झालेल्या सजीवांमधे, जेव्हा असे प्रमाणबद्ध मॉडेल दिसते तेव्हा त्याचे आश्चर्य वाटते व हे योगायोगाच्या जरा पुढे आहे असे वाटते.
विषेश म्हणजे हे मॉडेल (डिव्हाईन नंबरचे) जलचर, हवेचर, अभयचर, भूचर, वनस्पती, प्राणी, मानव, ह्यात सगळ्यात दिसते.
खनिजे, मुलद्रव्य, अणू ह्यात डिव्हाईन नंबर्चा संबंध दिसतो का? हे उत्तर मला तरी माहित नाही.
27 Nov 2009 - 11:30 pm | धनंजय
वर दिले आहे
27 Nov 2009 - 11:27 pm | धनंजय
डोळ्याबद्दल डार्विनचे मूळ विवेचन पुढे वाचावे.
सारांश असा : मज्जातंतू सरळ त्वचेपर्यंत जाणारे प्रकाश-ठिपके, ते गुंतागुंतीचे डोळे, या क्रमातील सोपे->थोडे क्लिष्ट->फार गुंतागुंतीचे अवयव; हे सर्व प्राणिविश्वात दिसतात. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या प्राण्याला जीवितासाठी त्या सोप्या/गुंतागुंतीच्या प्रकाश-इंद्रियांचा उपयोग होतो. त्यामुळे अगदी गुंतागुंतीचे अवयव क्रमाने विकसित होण्यास काहीच प्रत्यवाय नसावा, कारण प्रत्येक टप्प्यात (म्हणजे अर्ध-गुंतागुंतीच्या टप्प्यातही) तो अवयव प्राण्यास जीवितासाठी उपयोगीच आहे.
http://www.talkorigins.org/faqs/origin/chapter6.html
- - -
...
Organs of extreme perfection and complication. To suppose that the eye, with all its inimitable contrivances for adjusting the focus to different distances, for admitting different amounts of light, and for the correction of spherical and chromatic aberration, could have been formed by natural selection, seems, I freely confess, absurd in the highest possible degree. Yet reason tells me, that if numerous gradations from a perfect and complex eye to one very imperfect and simple, each grade being useful to its possessor, can be shown to exist; if further, the eye does vary ever so slightly, and the variations be inherited, which is certainly the case; and if any variation or modification in the organ be ever useful to an animal under changing conditions of life, then the difficulty of believing that a perfect and complex eye could be formed by natural selection, though insuperable by our imagination, can hardly be considered real. How a nerve comes to be sensitive to light, hardly concerns us more than how life itself first originated; but I may remark that several facts make me suspect that any sensitive nerve may be rendered sensitive to light, and likewise to those coarser vibrations of the air which produce sound.
In looking for the gradations by which an organ in any species has been perfected, we ought to look exclusively to its lineal ancestors; but this is scarcely ever possible, and we are forced in each case to look to species of the same group, that is to the collateral descendants from the same original parent-form, in order to see what gradations are possible, and for the chance of some gradations having been transmitted from the earlier stages of descent, in an unaltered or little altered condition. Amongst existing Vertebrata, we find but a small amount of gradation in the structure of the eye, and from fossil species we can learn nothing on this head. In this great class we should probably have to descend far beneath the lowest known fossiliferous stratum to discover the earlier stages, by which the eye has been perfected.
In the Articulata we can commence a series with an optic nerve merely coated with pigment, and without any other mechanism; and from this low stage, numerous gradations of structure, branching off in two fundamentally different lines, can be shown to exist, until we reach a moderately high stage of perfection. In certain crustaceans, for instance, there is a double cornea, the inner one divided into facets, within each of which there is a lens shaped swelling. In other crustaceans the transparent cones which are coated by pigment, and which properly act only by excluding lateral pencils of light, are convex at their upper ends and must act by convergence; and at their lower ends there seems to be an imperfect vitreous substance. With these facts, here far too briefly and imperfectly given, which show that there is much graduated diversity in the eyes of living crustaceans, and bearing in mind how small the number of living animals is in proportion to those which have become extinct, I can see no very great difficulty (not more than in the case of many other structures) in believing that natural selection has converted the simple apparatus of an optic nerve merely coated with pigment and invested by transparent membrane, into an optical instrument as perfect as is possessed by any member of the great Articulate class.
He who will go thus far, if he find on finishing this treatise that large bodies of facts, otherwise inexplicable, can be explained by the theory of descent, ought not to hesitate to go further, and to admit that a structure even as perfect as the eye of an eagle might be formed by natural selection, although in this case he does not know any of the transitional grades. His reason ought to conquer his imagination; though I have felt the difficulty far too keenly to be surprised at any degree of hesitation in extending the principle of natural selection to such startling lengths.
It is scarcely possible to avoid comparing the eye to a telescope. We know that this instrument has been perfected by the long-continued efforts of the highest human intellects; and we naturally infer that the eye has been formed by a somewhat analogous process. But may not this inference be presumptuous? Have we any right to assume that the Creator works by intellectual powers like those of man? If we must compare the eye to an optical instrument, we ought in imagination to take a thick layer of transparent tissue, with a nerve sensitive to light beneath, and then suppose every part of this layer to be continually changing slowly in density, so as to separate into layers of different densities and thicknesses, placed at different distances from each other, and with the surfaces of each layer slowly changing in form. Further we must suppose that there is a power always intently watching each slight accidental alteration in the transparent layers; and carefully selecting each alteration which, under varied circumstances, may in any way, or in any degree, tend to produce a distincter image. We must suppose each new state of the instrument to be multiplied by the million; and each to be preserved till a better be produced, and then the old ones to be destroyed. In living bodies, variation will cause the slight alterations, generation will multiply them almost infinitely, and natural selection will pick out with unerring skill each improvement. Let this process go on for millions on millions of years; and during each year on millions of individuals of many kinds; and may we not believe that a living optical instrument might thus be formed as superior to one of glass, as the works of the Creator are to those of man?
If it could be demonstrated that any complex organ existed, which could not possibly have been formed by numerous, successive, slight modifications, my theory would absolutely break down. But I can find out no such case. No doubt many organs exist of which we do not know the transitional grades, more especially if we look to much-isolated species, round which, according to my theory, there has been much extinction. Or again, if we look to an organ common to all the members of a large class, for in this latter case the organ must have been first formed at an extremely remote period, since which all the many members of the class have been developed; and in order to discover the early transitional grades through which the organ has passed, we should have to look to very ancient ancestral forms, long since become extinct.
We should be extremely cautious in concluding that an organ could not have been formed by transitional gradations of some kind. Numerous cases could be given amongst the lower animals of the same organ performing at the same time wholly distinct functions; thus the alimentary canal respires, digests, and excretes in the larva of the dragon-fly and in the fish Cobites. In the Hydra, the animal may be turned inside out, and the exterior surface will then digest and the stomach respire. In such cases natural selection might easily specialise, if any advantage were thus gained, a part or organ, which had performed two functions, for one function alone, and thus wholly change its nature by insensible steps. Two distinct organs sometimes perform simultaneously the same function in the same individual; to give one instance, there are fish with gills or branchiae that breathe the air dissolved in the water, at the same time that they breathe free air in their swimbladders, this latter organ having a ductus pneumaticus for its supply, and being divided by highly vascular partitions. In these cases, one of the two organs might with ease be modified and perfected so as to perform all the work by itself, being aided during the process of modification by the other organ; and then this other organ might be modified for some other and quite distinct purpose, or be quite obliterated.
...
- - -
27 Nov 2009 - 11:52 pm | अमृतांजन
खालील परीच्छेदाच्या पुढे वाचण्याआधी हा विचार आला म्हणून कळवला आहे-
>>सारांश असा : मज्जातंतू सरळ त्वचेपर्यंत जाणारे प्रकाश-ठिपके, ते गुंतागुंतीचे डोळे, या क्रमातील सोपे->थोडे क्लिष्ट->....... जीवितासाठी उपयोगीच आहे<<<
ह्याचा अर्थ असाही घेता येईल का, - आताच्या ज्या क्षमाता आहेत, त्या ह्याच्याही पेक्षा जास्त विकसित होतील? (त्या कितीही हळू असतील तरी त्या विकसित होण्याची प्रक्रिया जर अव्याहत्पणे चालू असेल तर?) म्हणजे मानवाच्या आजच्या डोळ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या काही लाख वर्षांनी नाहीशा झालेल्या असतील असे मानावे का? (हेच इतर अवयवांच्या बाबतीतही लागू)
ज्या व्याधी असाध्य आहेत त्या कालांतराने मानवाच्या शरीरात बदल घडून नाहीशा होतील का?-
जर सजीव सृष्टी पृथ्वीच्या वातावरणाशी जूळवून घेत-घेत उत्क्रांत झाली असेल तर ती किती ही प्रतिकूल वातावरणात भविड्ष्यात जगत असेल का?
[असे असते तर डायनासोर्स एकाएकी का नामशेष झाले?]
आजची झाडे सूर्याच्या प्रकाषाचा वापर करुन हरीतद्रव्ये तयार करुन जगतात (अन्य मिळवतात) असे आजचे विज्ञान सांगते. हे जर आजचे उत्क्रांत स्वरुप मानले तर फार-फार पुर्वी झाडे असे जगत नव्हती का?
मला वाटते डार्विनकडे काही पॉइंटस आहेत पण ते खूप ओव्हर-सिंप्लिप्फाईड वाटतात.
28 Nov 2009 - 10:37 am | अमृतांजन
>>>Organs of extreme perfection and complication. To suppose ............ther and quite distinct purpose, or be quite obliterated.<<<
मला खूपच स्पेक्युलेटीव्ह वाटले. तरीही एखाद्या मेडीकल डॉ. ने ह्यावर भाष्य केल्यास अधिक योग्य होईल.
27 Nov 2009 - 11:39 pm | अमृतांजन
गणितीशास्त्र आणि कला ह्यातील गोल्डन रेशोचा संबंध ऐतिहासिक ईजिप्तिशिअन्सला माहित असावा असे म्ह्णणले जाते-
http://en.wikipedia.org/wiki/Mathematics_and_art
28 Nov 2009 - 11:35 am | विसुनाना
प्रयोगशाळा असलीच तर 'त्या' अतिप्रगत 'प्राण्यांनी' जो पहिला चमत्कारीक प्रयोग केला आहे तो म्हणजे स्वयंप्रेरणेची निर्मिती.
विश्वनियमित जडत्वाला झुगारून स्वयंप्रेरणेने काही अणू - रेणू एकत्र येतात आणि स्वतःचे अस्तित्व एकत्रितपणे टिकवण्याची, त्या समूहाची वैशिष्ट्ये पुढे चालवण्याची धडपड करतात ही 'बुद्धी' अनायास निर्माण होणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे.
पुढे झालेली सजीवसृष्टीच्या प्रगतीची वाटचाल खूपच सावकाश आहे. ही प्रगती होण्यासाठी कोट्यावधी वर्षे लागली. बाह्यसृष्टीतील त्या अतिप्रगत प्राण्यांनी पहिल्या प्रयोगानंतर या प्रयोगशाळेकडे दुर्लक्ष केले असे म्हणता येईल.प्रयोगशाळेत एखादी पेट्री डिश विसरून जावी आणि तिथे जीवाणूंची एक प्रगत वसाहत निर्माण व्हावी तसे वाटते.
पुढे झालेला दुसरा चमत्कारिक प्रयोग म्हणजे मानवी मेंदूचा विकास. एखाद्या 'सिस्टीम' मधला एटीएटीफाईव्ह प्रोसेसर काढून तिथे अचानक कोअर टू ड्युओ प्रोसेसर बसवावा आणि डॉस ऑपरेटिंग सिस्टीम काढून तिथे मल्टीथ्रेडेड पॅरलल प्रोसेसिंग लिनक्स ओएस असा हा प्रयोग आहे. :)
बाकी डार्वीनवगैरे योग्यच आहेत. मला त्यांची मते पटतात. नवनवे संशोधन नवीन काही सांगेलच! :)
अवांतर :
कुणी स्टीफन हॉकिंगचे " गॉड्स क्रिएटेड इन्टेजर्स" हे पुस्तक वाचले आहे काय?
28 Nov 2009 - 12:29 pm | अमृतांजन
>>विश्वनियमित जडत्वाला झुगारून स्वयंप्रेरणेने काही अणू - रेणू एकत्र येतात आणि स्वतःचे अस्तित्व एकत्रितपणे टिकवण्याची, त्या समूहाची वैशिष्ट्ये पुढे चालवण्याची धडपड करतात ही 'बुद्धी' अनायास निर्माण होणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे.<<
हे जरा अधिक खुलवून सांगाल काय, कृपया? त्यातील "त्या समूहाची वैशिष्ट्ये पुढे चालवण्याची" ह्याने फार उत्सुकता निर्माण झाली आहे.
"पुढे झालेली सजीवसृष्टीच्या प्रगतीची वाटचाल खूपच सावकाश आहे"... त्या अतिप्रगत वाल्यांसाठी हा पिरीयड त्यांच्या वेळेसापेक्ष असावा, किंवा जेस्टेशन असावा.
28 Nov 2009 - 12:44 pm | Nile
तुम्ही जर इव्होलुशन मानत नसाल तर त्या संकल्पनेला तुमच्या मते अर्थ उरत नाही.
28 Nov 2009 - 3:35 pm | अमृतांजन
हो, योगायोग ह्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. ("There's no such thing as a free lunch"). तरीही ती बाजू काय हे समजावून घेणे आवशय्क आहे.