मी हुशार आहे.
(कोइ शक?)
हल्ली अंगातले बाळस् फारच वाढत चाललेले आहे.
सारखे काहीतरी करावेसे वाटते.
मध्यंतराचा सुद्धा अगदी कंटाळा येतो आहे.
क्रिकेट आवडत नाही.
सिरियल्स बद्दल पॅथॉलॉजिकल नावड आहे.
चॅलेन्स वर जे काही चाललेले आहे त्याने संताप होतो आहे.
काय करावे सुचवाल काय?
प्रतिक्रिया
26 Nov 2009 - 1:48 pm | अवलिया
विचारवंताच्या सुचना वाचायला उत्सुक.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
26 Nov 2009 - 1:53 pm | विनायक प्रभू
तुम्ही सुचना करा हो.
अहो माझा दिवस सकाळी ६ ला सुरु होतो.
बाकी सर्वांचा १० नंतर.
करायचे तरी काय हा प्रश्न आहे.
26 Nov 2009 - 1:57 pm | Nile
आयला लै सोप्प आहे हे तर.
कुठल्याही मराठी संकेतस्थळावर दोन खाती उघडा. एकाचं नाव सरळ ठेवा एकाचं वाकडं. सरळ ने सरळ प्रतिसाद द्या वाकड्याने वाकडा. पण तुमच्या प्रतिसादाला कुणी उपप्रतिसाद दिला तर त्याला तुम्ही उत्तर दिलंच पाहीजे हा नियम पाळा. बास्स! 'बाळसं चांगलंच धरेल', पहा प्रयत्न करुन! ;)
26 Nov 2009 - 2:01 pm | टारझन
पौगंडावस्था ? इलाज नाही मग !
आणि हो .. श्रीमान विनायकराव प्रभुजींचा आनखिन एक उत्तमोत्तम धागा .. असे म्हणण्यास हरकत नसावी. छान छान चर्चा होईल .. प्रतिसाद वाचून आमचे ज्ञान वाढेल अशी अपेक्षा आहे.
- टारझन
26 Nov 2009 - 2:14 pm | विजुभाऊ
ही एक उत्तम प्रोग्राम
आर ई एम : याने मन आणि शरीर दोन्ही ला व्यायाम होतो . व्हर्शन१.०
{
स्टेप १ :दोन बादल्या घ्या
स्टेप२ :पहिल्या बादली ला क्र १ असे म्हणा दुसर्या बादलीला क्र २ असे म्हणा
स्टेप३ : क्र.१ बादली पाण्याने भरा. दुसरी रीकामी राहुद्यात.
स्टेप४ : क्र १ बादलीतले पाणे प्लास्टीकच्या मगमध्ये भरून घ्या.
स्टेप५ :ते क्र २ बादलीत रीते करा.
स्टेप६ : ही क्रीया बादली पूर्ण रीती होईतोवर करा. (डू व्हाईल)
स्टेप७: बादल्यांच्या क्रमांकाची अदलाबदल करा
स्टेप ८ : घड्याळात वेळ पहा. जर संध्याकाळचे ६ वाजले असतील तर कॉल स्टॉप.
अन्यथा
स्टेप ८ : गो टू स्टेप ३.
}
26 Nov 2009 - 2:16 pm | श्रावण मोडक
मी कोण आहे?
(है कोई जवाब?)
हल्ली मनातले कल्लोळ फारच वाढत चाललेले आहेत.
सारखे काहीतरी खरडावेसे वाटते.
फुटकळ प्रतिसादांचा अगदी कंटाळा येतो आहे.
काथ्याकूट, पाकृ वगैरे आवडत नाही.
वैचारिक लेखनाबद्दल पॅथॉलॉजिकल नावड आहे.
संस्थळांवर जे काही चाललेले आहे त्याने संताप होतो आहे.
काय करावे सुचवाल काय?
26 Nov 2009 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम ठ्यॉ प्रतिसाद ... श्रावण काकांनी एकाच प्रतिसादात शेंचुरी मारली!
अदिती
26 Nov 2009 - 4:11 pm | वाहीदा
भोवताली कित्ती कल्लोळ सारा ....
पण पाहीजे तो आवाज नाही ...
प्रतिसादांचा वर्षाव सारा ..
पण पाहीजे ती साद नाही
वातावरण खुपच sad... Drowsy, lethargic होत चालले आहे ...
कुछ change लाते क्यों नहीं.. मोडक सर ??
Take a Chill Pill :-)
(बाकी तुमचा प्रतिसाद १ नंबर ! )
~ वाहीदा
27 Nov 2009 - 2:27 am | चतुरंग
श्रामोंनी एकदम थंडगार पाण्याची बालटीच उपडी केली डोक्यावर! ;)
(गारठलेला)चतुरंग
27 Nov 2009 - 2:01 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ मोडक साहेब बोर्डावरच्या चपला पाहील्या नाहीत काय?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
26 Nov 2009 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार
गुर्जी..... यु टु ???
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
26 Nov 2009 - 2:54 pm | टारझन
का ? गुर्जी ला भावना नाहीत का रे ?
26 Nov 2009 - 3:30 pm | प्रसन्न केसकर
मस्त प्रतिसाद श्रावण मोडक साहेब!
27 Nov 2009 - 11:14 am | टारझन
उत्तर द्यायचं श्रामोंना आणि चिटकवायचं पर्याच्या खाली ? :)
अवांतर प्रतिक्रिया म्हाईत होतं ! तिरळी प्रतिक्रिया प्रथम पाहिली ;)
27 Nov 2009 - 11:06 am | ज्ञानेश...
"बाळस्" असा शब्द आहे मराठीत?
27 Nov 2009 - 1:32 pm | विजुभाऊ
तो शब्द बाळसे असा आहे. त्याचा उच्चार शेवतची मात्रा जाऊन अनुस्वार यावा तद्वत म्हणजे बाळसं असा होतो. मराठीत असे एकारांत शब्द बरेच आहेत.
उदा : माणसे , खुपसे , फुरसे , चांगले ,
27 Nov 2009 - 1:46 pm | टारझन
खुलाश्याबद्दल मियाउं मियाऊं !!
- मनिमाऊ
थुल्ल्या (मराठीत टँप्लिस) घेउन प्रतिसाद दिला आहे.
27 Nov 2009 - 4:14 pm | ज्ञानेश...
आमचाही तिरळा प्रतिसाद! ;)
29 Nov 2009 - 1:57 pm | पर्नल नेने मराठे
झी मराठी पहात बसावे :d मस्त २४ तास टिपि आहे. दुपारी 'आम्ही सारे खवय्ये' पहावे व इकडे पा़क्रु टाकाव्यात. 'होम मिनिस्टर' पहावे आणी इथे अक्शर देउन नाव घ्यायला लावावे. =))
भारतात गेल्यावर नोकरी मिळाली नाहि तर ... म्हणुन आतापासुनच कुन्कु न होम मिनिस्टर मधे इन्टरेस्ट वाढवुन गुन्तवुन घेतेय :(
चुचु