प्रकाशवाटा वाचलं... डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि इतर काही सहकाऱ्यांनी बाबा आमटेंच्या मार्गदर्शनाने सुरु केलेल्या हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल हे पुस्तक आहे...
हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म का आणि कसा झाला... प्रकल्प सुरु केल्यावर आलेल्या अडचणीं वर मात कशी केली... तिथल्या आदिवासींना स्वयंपूर्ण कसं केलं... जंगली प्राण्यांबद्दलचे अनुभव; त्यांच्या साठी सुरु केलेलं अनाथालय... जिवावर बेतलेले प्रसंग... असं बरंच काही ह्या पुस्तकात वाचायला मिळतं...
भामरागड ह्या अतीशय दुर्गम भागातल्या माडिया गोंड जमातीच्या आदिवासींना इतर माणसां सारखच जगता यावं ह्यासाठी स्वताच संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले आमटे कुटुंबीय म्हणजे देवमाणसचं...
वेळातवेळ काढून प्रत्येकाने एकदातरी वाचावं असं पुस्तक आहे...
प्रतिक्रिया
18 Nov 2009 - 10:30 pm | आण्णा चिंबोरी
प्रशांतभाऊ थोडी अजून माहिती दिली असतीस तरी चालले असते.
18 Nov 2009 - 10:30 pm | प्रभो
विमुक्ता, अजून थोडा धावता आढावा घेतला असतास तर छान झाले असते.
"वेळातवेळ काढून प्रत्येकाने एकदातरी का वाचावं " याचे जरा विवेचन असते तर मजा आली असती..
*शॉपिंग लिस्ट मधे टाकलय पुस्तक... :)
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
18 Nov 2009 - 10:32 pm | नि३
छान माहीती ..अजुन थोडा आढावा घ्यायला हवा होता.
अवांतर : हे पुस्तक कोठे वाचायला मिळेल बर ??
---(पुस्तकप्रेमी) नि३.
18 Nov 2009 - 10:34 pm | विमुक्त
कुठेही मिळेल... फक्त २०० रुपये किंमत आहे
18 Nov 2009 - 10:33 pm | नि३
छान माहीती ..अजुन थोडा आढावा घ्यायला हवा होता.
अवांतर : हे पुस्तक कोठे वाचायला मिळेल बर ??
---(पुस्तकप्रेमी) नि३.
18 Nov 2009 - 10:33 pm | नि३
छान माहीती ..अजुन थोडा आढावा घ्यायला हवा होता.
अवांतर : हे पुस्तक कोठे वाचायला मिळेल बर ??
---(पुस्तकप्रेमी) नि३.
18 Nov 2009 - 10:39 pm | विमुक्त
खरंतर अजून माहिती द्यावी वाटत होती, पण इतक्या थोर लोकांच्या कार्याबद्दल ‘मी काय लिहिणार?’ असं वाटलं म्हणून जास्त नाही लिहिलं... आणि पुस्तक खूपच छान आहे... एकदा हातात घेतलं तर ठेवावंच वाटत नाही...
18 Nov 2009 - 10:41 pm | रेवती
खूपच छान पुस्तक आहे हे!
त्यांचा परिस्थितीशी असलेला झगडा वाचून अंगावर काटा येतो.
पुस्तकातले फोटो पहायला मात्र धाडस पाहिजे. अस्वलाच्या हल्ल्यातला जखमी माणूस व त्यावर केलेले उपचार वाचवत नाहीत.
रेवती
18 Nov 2009 - 10:43 pm | मिहिर
हे खरेच छान पुस्तक आहे. डॉ. प्रकाश आमटेंचे कार्य चांगल्या पद्धतीने वाचकापर्यन्त पोचते. सुंदर सुरुवातीनंतर शेवटी मात्र थोडासा कंटाळा येतो. पण एकूण परिणामकारक.
अवांतर: हे पुस्तक वाचनालयात वाचायला मिळेल.
18 Nov 2009 - 11:21 pm | मुक्तसुनीत
प्रकाशवाटावरील आणखी एक चांगला लेख.
20 Nov 2009 - 8:58 am | तात्यालबाड
इथेही वाचा. विडीयोजही पहाता येतील.
मदर टेरेसां चे फोटो ज्याप्रमाणे सगळीकडे पहायला मिळतात, भारतात सगळ्या शाळांतही मदर टेरेसाचे गोडवे गायले जातात. पण आपले आमटे कुटुंबिय मात्र त्याबाबतीत दुर्दैवीच म्हणायला हवेत. आपला महाराष्ट्र सुद्धा त्यांची उपेक्षाच करतो.
आमटे कुटुंबियांना माझा मानाचा मुजरा.
19 Nov 2009 - 12:14 pm | फ्रॅक्चर बंड्या
खरेच छान पुस्तक आहे....
एकदातरी वाचावे असे...
आणि हो..
बाजिराव रोड वर एक प्रदर्शन लागले आहे,,,
तिथे प्रकाशवाटा ह्या पुस्तकावर अजुन एक पुस्तक फुकट मिळते
19 Nov 2009 - 12:41 pm | समंजस
विमुक्त, तुम्ही हे छोटेशे विवेचन देउन एका चांगल्या पुस्तकाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. हे पुस्तक नक्कीच घेउन वाचावे लागेल.
बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या(कार्या) बद्दल काही जास्त लिहिण्याची
माझ्या सारख्यांची पात्रता नाही. त्यांचं अफाट, निस्वार्थी कार्य हीच खरी ओळख.
(त्यांच्या लोकबिरादरी या प्रकल्पा बद्दल जास्त माहिती या http://lokbiradariprakalp.org/index.html ठिकाणी मिळेल.)
19 Nov 2009 - 2:27 pm | विमुक्त
छान माहीती आहे ह्या " http://lokbiradariprakalp.org/index.html " link वर...
19 Nov 2009 - 12:46 pm | यशोधरा
प्रकाशवाटा वाचले आहे. आमटे कुटुंबियांनी निवडलेले आयुष्य पाहून अवाक् व्हायला होते! वाचनीय पुस्तक.
20 Nov 2009 - 9:23 am | उमराणी सरकार
भामरागढ महाराष्ट्रातच आहे. चंद्रपूर पासून ४ तासाचा रस्ता आहे. शक्य झाल्यास आवर्जून भेट द्या. प्रकाशदादांसारखे निगर्वी व्यक्तीमत्व शोधून सापडणार नाही. जाताना ग्लोरी ऑफ आलापल्ली पहायला विसरू नका.
उमराणी सरकार