कमिलिऑन

पॅपिलॉन's picture
पॅपिलॉन in जे न देखे रवी...
25 Apr 2009 - 4:40 am

जेव्हा ते मावळतीच्या शेजार्‍याघरीं बालेकिल्ला बांधत होते -
तेव्हा ते होते पवित्रभूमिरक्षक!

जेव्हा ते उगवतीच्या शेजार्‍याला रक्तबंबाळ करीत होते -
तेव्हा ते होते शहीद व्हायला निघालेले स्वातंत्र्यसैनिक!

आता त्यांच्या बंदुका रोखल्यात आमच्यावरच -
हो, खरे आहे - ते आहेत दहशतवादी!!

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

25 Apr 2009 - 7:12 am | क्रान्ति

इतक्या मोजक्या शब्दांत भयानक वास्तव मांडलंय, खरंच काय लिहावं, सुचत नाही. खूप खूप आवडली कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2009 - 9:08 am | भडकमकर मास्तर

वा पॅपिलॉन..
चांगली आहे कविता / मुक्तक...

_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2009 - 9:12 am | llपुण्याचे पेशवेll

खरोखर छान कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अविनाशकुलकर्णी's picture

25 Apr 2009 - 10:55 am | अविनाशकुलकर्णी

हो मान्य पण प्रत्येक वेळी त्यांचा हेतु निराळा होता

विशाल कुलकर्णी's picture

16 Nov 2009 - 10:43 am | विशाल कुलकर्णी

<<हो मान्य पण प्रत्येक वेळी त्यांचा हेतु निराळा होता>>

माफ करा अविनाशजी पण मला असे वाटत नाही. प्रत्येक वेळी त्यांचा हेतु फक्त आणि फक्त आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हाच होता आणि तोच राहील.

असो.. कविता सुरेखच. मोजक्या शब्दात परिस्थितीची दाहकता मांडण्याचं कसब आहे तुमच्याकडे. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पॅपिलॉन's picture

26 Apr 2009 - 2:43 pm | पॅपिलॉन

धन्यवाद.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

प्राजु's picture

26 Apr 2009 - 9:47 pm | प्राजु

ज्वलंत... वास्तव!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

16 Nov 2009 - 12:14 pm | श्रावण मोडक

झणझणीत!

सुधीर काळे's picture

16 Nov 2009 - 1:37 pm | सुधीर काळे

पापियाँभाऊ, मस्त कविता! अजून लिहा!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

पॅपिलॉन's picture

16 Nov 2009 - 6:38 pm | पॅपिलॉन

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

मनीषा's picture

18 Nov 2009 - 8:02 pm | मनीषा

--- वास्तवदर्शी कविता .....!