गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या स्वच्छतेच्या बैलाला.. http://vishesh.maayboli.com/node/26 या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच
http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला. आणि मग थांबला.
सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.
या विषयावर एक डॉक्यु करून ती संबंधितांवर हॅमर केली पाहीजे असं काही वाटत होतंच.
मध्यंतरी याच विषयावर एक डॉक्यु ऑलरेडी केलेली आहे असं कळलं होतं. 'Que to Pee' असे त्या डॉक्यूचे नाव आहे. कॉपी अजून मिळालेली नाही त्यामुळे पाह्यलेली नाही.
मी बनवायच्या डॉक्युच्या दृष्टीने रिसर्च मटेरियल जमा होतच आहे. माझं त्या दृष्टीने काम चालूच आहे. मला गरज आहे तुम्हा सगळ्यांच्या मदतीची. आर्थिक मदत नव्हे तर संशोधनात प्रत्यक्ष सहभाग याअर्थी.
संशोधनात जे लोक मदत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.
डॉक्यु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मधे दुसर्या एका एनजीओ साठी मी एक डॉक्यु बनवून दिली त्यामुळे संपूर्णपणे आपण काही गोष्टी करण्याचा अनुभव पदरात आलाय. ती चांगली झालीये असा त्या एनजीओ आणि इतर काही लोकांकडून निर्वाळा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलाय. अजून एका डॉक्युचं काम मिळाल्याने अजून थोडा अनुभव आणि आत्मविश्वास...
कॅमेरा आणि एडिट सेटप या बाबींचं प्रकरण लवकरंच हातात येणार आहे. अॅव्हिड सेटप हाताशी असल्याने एडिट शिकणंही सोपं जाणारे. अर्थात हे आमच्या फिचर फिल्मच्या शूट नंतर पण तरीही सेटप झालाय हे महत्वाचं.
बाकी काय काय मुद्दे आणि कसे कसे यायला हवेत याबद्दल कोणालाही काही शेअर करायचे असल्यास मला toiletdocu@gmail.com इथे संपर्क करा.
धन्यवाद,
नीरजा पटवर्धन
प्रतिक्रिया
15 Nov 2009 - 2:08 pm | प्रसन्न केसकर
माझ्याकडुन जी अन जेव्हढी मदत शक्य आहे तेव्हढी मदत करेनच.
15 Nov 2009 - 2:26 pm | नीधप
आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Nov 2009 - 2:14 pm | विसोबा खेचर
मूळ लेख तिकडे अन् चर्चा आणि मदत वगैरे इकडे? बरं बरं! :)
डॉक्यूकरता आमच्या शुभेच्छा हो!
तात्या.
15 Nov 2009 - 2:25 pm | नीधप
गेल्यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख आहे. तो इथे न टाकणे साहजिकच. चर्चा तिथे सुरू झाली आणि तिथेही आवाहन केले आहे. माझ्या ब्लॉगवर पण केले आहे. इथे ते आवाहन करणे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही लेख उडवून टाका. कदाचित तुम्हाला एका महत्वाच्या मुद्द्यापेक्षा तुमच्या संकेतस्थळाची exclusivity महत्वाची असेल. मर्जी तुमची.
तसंही मी इथे काही लिहिण्याची सोय नाही. कितीही महत्वाचे काही लिहा पण तरी मी लिहिलंय म्हणल्यावर काय प्रकारचे प्रतिसाद येतात हे मिसळभोक्ता या आयडीच्या घाणेरड्या प्रतिसादातच दिसतंच आहे. प्रत्येक ठिकाणी मी काहीही लिहिलं असेल तिथे येऊन काहीतरी घाणेरडं बोलायचं यामधे या आयडीला धन्यता वाटते. त्याला तुमचा पाठिंबा असतो हेही आहेच. नसता तर असला प्रतिसाद तुम्ही उडवला असतात. असो.. पण असे असताना मी मूळ लेख इथे न लिहिण्यावर तुम्ही काही बोलणे चुकीचेच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Nov 2009 - 2:35 pm | विसोबा खेचर
असे मी कुठेही म्हटलेले नाही..इथे आवाहान करणे मला पटले नसते तर तुम्ही सांगायच्या आधीच लेख उडाला असता!
शक्यता नाकारता येत नाही!
ती तर आहेच. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणेच वागावे!
तात्या.
15 Nov 2009 - 2:39 pm | नीधप
वरचा घाणेरडा प्रतिसाद संपादीत केल्याबद्दल आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Nov 2009 - 2:42 pm | विसोबा खेचर
अश्या घाणेरड्या प्रतिसादांबद्दल मला किंवा इतर संपादकांना वेळोवेळी कळवल्यास योग्य ती कारवाई होत राहील/केली जाईल. धन्यवाद..
तात्या.
15 Nov 2009 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.
हं यात आपणास मी मदत करीन. आपण प्रश्नावली आम्हास पाठवावी.
>>मिसळभोक्ता या आयडीच्या घाणेरड्या प्रतिसादातच दिसतंच आहे. प्रत्येक ठिकाणी मी काहीही लिहिलं असेल तिथे येऊन काहीतरी घाणेरडं बोलायचं यामधे या आयडीला धन्यता वाटते.
अहो, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. खूप रिकामा वेळ असला की त्या आयडीतून असे प्रतिसाद येतात.
-दिलीप बिरुटे
15 Nov 2009 - 3:00 pm | नीधप
व्यनितून तुमचा इमेल आयडी कळवलात किंवा toiletdocu@gmail.com याठिकाणी टेस्ट इमेल पाठवलात तर प्रश्नावली तयार होतास लगेच पाठवते.
आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Nov 2009 - 1:58 pm | पक्या
तात्या , चांगल्या कामाकरीता काहो इतका संकुचित विचार करता? आश्चर्य वाटले वरचा प्रतिसाद पाहून.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
15 Nov 2009 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते
शक्य ती सगळी मदत करेन.
बिपिन कार्यकर्ते
15 Nov 2009 - 5:37 pm | अवलिया
डॉक्यूमेंट्रीकरता आमच्या शुभेच्छा !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
15 Nov 2009 - 5:44 pm | श्रावण मोडक
शुभेच्छा.
15 Nov 2009 - 5:54 pm | स्वाती२
नी, शक्य ती मदत करीन. शुभेच्छा आहेतच.
15 Nov 2009 - 6:06 pm | प्रकाश घाटपांडे
एक चांगला विषय कृतिशील रित्या हाताळला जातोय याबद्दल समाधान व प्रोत्साहन. १५ ऑगस्ट २००९ च्या साप्ताहिक सकाळ मध्ये संध्या टांकसाळे व अमृता वाळिंबे यांनी या विषयाला चांगली वाचा फोडली आहे. हा एक जनआंदोलनाचा विषय आहे.
कुठल्याही संस्थेत/ठिकाणि आपण गेल्यावर तेथील स्वच्छतागृह पिण्याचे पाणि व कचरा या गोष्टी पाहिल्यावर त्या संस्थेची / ठिकाणाची लायकी समजते.
हा विषय जास्तीत जास्त बोलला जावा. वैयक्तिक पातळीवर शासनावर दबाव आणण्यासाठी किमान पत्र लिहिण्याचा उपक्रम सातत्याने राबवला तरी खुप झाले.
मागच्या पंधरवड्यात पुण्यातील एमटीडीसी च्या कार्यालयात जाउन मी तेथील अधिकार्यांना भेटुन पर्यटनात स्वच्छतागृहांची मोहीम राबवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर संवेदनशील रहावे अशी विनंती केली. आपल्या मिटिंग मध्ये धोरणात्मक बाबी जेव्हा हाताळता त्यावेळी या विषयाचा आग्रह धरा. उत्तराखंड ला गेलो होतो तेव्हा एका स्वच्छतागृहचालकाने नोंदवलेले निरिक्षण होते कि पेड टॊयलेट यशस्वीरित्या राबवल्यावर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली .
केरळ मधील विवेकानंद केंद्राचे एक संचालक श्री घारपुरे यांनी कमीत कमी साधनात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करु शकतो यावर पुण्यात सदिप व्याखान दिले त्यावेळि गावातील स्वच्च्छतागृहांचे अनुभव सांगितले.
नीरजा यांनी हा विषय कृतीशील रित्या लावुन धरल्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन व आभार.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Nov 2009 - 6:32 pm | बहुगुणी
सहभागी होऊन मदत नक्कीच करेन. Keep up the good work, शुभेच्छा!
16 Nov 2009 - 3:15 am | Nile
हेच म्हणतो! माझा इमेल व्यनी करत आहे.
15 Nov 2009 - 6:41 pm | माझी दुनिया
उपक्रमाला शुभेच्छा ! मी टेस्ट मेल पाठवला आहे. प्रश्नावली तयार झाल्यावर पाठवावी. मी माझी उत्तरे भरून पाठवीन.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
15 Nov 2009 - 6:49 pm | सुनील
शुभेच्छा!
शक्य होईल ती मदत करण्यास आनंद वाटेल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Nov 2009 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीरजा, उपक्रमासाठी शुभेच्छा! प्रश्नावली तयार झाली की मलाही जरूर पाठव. माझ्यासारख्या आणखी काही (रिकामटेकड्या) सर्कारी लोकांकडूनही उत्तरं घेऊन जरूर पाठवेन.
'एक शून्य मी' या पुस्तकातही पुलंनी या विषयांवर काही दशके आधी लिहीलेला निबंध आहे. अजूनही आपण त्याच दशकात आहोत याची लाजही वाटते, आणि प्रत्यक्षात बाहेर फिरायची वेळ येते तेव्हा त्रासही होतो.
अदिती
15 Nov 2009 - 9:45 pm | प्रभो
शुभेच्छा!
मदत करायचा प्रयत्न नक्कीच करेन...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
15 Nov 2009 - 11:40 pm | नीधप
सगळ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार. सर्वांना प्रश्नावली तयार होताच लवकरात लवकर पाठवून देते.
तसेच डॉक्यु मधे काय नी कसे करता याबद्दलही तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.
घाटपांडे,
चांगली माहीती आहे. श्री घारपुर्यांना संपर्क करायचा असल्यास कुठे करता येईल का?
कर्क,
अतिशय उत्तम माहीती. या संस्थांकडे मी नक्कीच चौकशी करीन.
'कचराकोंडी' मी पाह्यलीये आणि माझ्याकडे प्रतही आहे. उत्तम डॉक्युमेंटेशन आहे. आणि अतुलचं मार्गदर्शन घेणे हा मुद्दा तर यादीमधला एक महत्वाचा मुद्दा आहेच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Nov 2009 - 10:14 am | प्रकाश घाटपांडे
पुण्यात सजग नागरिक मंचाची स्थापना करणारे व अनेक नागरी विषय माहिती आधिकाराद्वारे लाउन धरणारे अॅक्टिविस्ट विवेक वेलणकर pranku@vsnl.com यांनी त्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.अधिक माहिती त्यांचेकडे मिळेल. त्यांचा संपर्क क्र. ९८५००६३४८०
त्यांची या कामी नक्की मदत होईल.( माझा संदर्भ नाही दिला तरीही)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
16 Nov 2009 - 12:20 am | हुप्प्या
स्त्री खासदार वा आमदार ह्यांना ह्या उपक्रमाची माहिती दिली तर कदाचित त्या जास्त मदत करतील.
इतकी मूलभूत गरज इतकी दुर्लक्षित आहे ह्याची खंत वाटते. एकंदरीत भारतीय सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, आरोग्य याविषयी बेफिकिर असतो पण ह्या संदर्भात तर कळसच आहे.
मला वाटते की स्त्रियांची स्वच्छतागृहे फुकट न ठेवता पैसे देऊन सशुल्क ठेवावीत. मग कदाचित ती स्वच्छ ठेवली जातील. जास्त सुविधा हव्या असल्या तर जास्त शुल्कवाली असावीत असे काही कुणी केले आहे का?
परदेशवासीयांना या उपक्रमाला कशी मदत करता येईल?
16 Nov 2009 - 9:27 am | नीधप
सुलभने सशुल्क केले होते काही प्रमाणात पण त्यांचीही अवस्था फारशी भली नाही.
सशुल्क असेल तरी चालेल कितीही ठेवा शुल्क पण सुविधा पुरवा असं म्हणणारा आमच्यासारखा एक वर्ग आहे.
त्याच वेळेला महिन्याच्या बजेटमधे रोजच्या २-५ रूपयांच्या खर्चाने फरक पडू शकणारा एक वर्ग आहे. या दुसर्या वर्गामधे मुंबईत बहुतांशी अशा महिला आहेत ज्या रोज खूप दूरवरून प्रवास करत आपल्या हपिसात पोचतात आणि तेवढाच प्रवास करून घरी पोचतात.
अगदी रोजचे रोज डेक्कन क्वीन चा पास काढून अप्-डाउन करणार्या पण अनेक महिला बघितल्या आहेत. सशुल्क आठ आणे-रूपयापेक्षा जास्त ठेवल्यास या वर्गाचे काय हा प्रश्न उरतोच. स्वच्छ टॉयलेटस ही पैशाने विकत घेता येण्याजोगी चैन आहे मूलभूत सुविधा नाही असाही संदेश जातोच की.
असो...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Nov 2009 - 11:26 am | हुप्प्या
अन्न, वस्त्रे, निवारा ह्याही मूलभूत गरजा आहेत. चैनी नाहीत पण त्या तरी फुकट कुठे मिळतात? पैसे द्यावेच लागतात ना? तसे ह्यालाही द्यावेत. निदान दोन पैसे मिळतायत म्हणून त्या जागा स्वच्छ ठेवल्या जातील अशी एक आशा.
कुठलाही उपक्रम फुकट आणि सरकारी बनला की तिथे भ्रष्टाचाराचा बुजबुजाट होतो हे लक्षात घेतले पाहिजे.
असो.
16 Nov 2009 - 12:40 pm | नीधप
हाही मुद्दा बरोबर आहे.
मी लाउड थिंकींग या पातळीवरच हा मुद्दा मांडला होता.
मला चर्चा होणं अपेक्षित आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Nov 2009 - 1:16 am | चतुरंग
शुभेच्छा आहेतच.
तुमची प्रश्नावली तयार झाली की पाठवून द्या. संपर्काचा ईमेल आयडी व्यनीतून पाठवतोय.
सार्वजनिक स्वच्छतागृहे ही आपल्याकडची फार जुनी समस्या अजूनही फार मोठ्या प्रमाणावर तशीच आहे हे बघून वाईट वाटते.
सुलभ इंटरनॅशनल ला तुम्ही संपर्क केला आहे का? त्याचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक ह्यांना मध्यंतरी स्टॉकहोममध्ये स्वीडिश सरकारचा पुरस्कार मिळाला.
चतुरंग
16 Nov 2009 - 7:45 am | विंजिनेर
सुधा मुर्ती (इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख)सुद्धा ग्रामीण भागातील स्वच्छतागृह मोहीम राबवतात. त्यांच्या कडून अधिक माहिती/मदत मिळेल.
16 Nov 2009 - 11:22 am | रेवती
अतिषय योग्य उपक्रम! आपल्याला शुभेच्छा!
मलाही प्रश्नावली मिळावी असे वाटते. चतुरंगकडून घेइन.
आणखी काही मदत करण्यासारखी असल्यास करीन.
अवांतर: दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या शाळेची सहल एका जंगलसदृश भागात गेली होती. थंडीला सुरुवात झाली असताना सगळ्या साडेसात आठ वयाच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा जास्तवेळा रेस्टरूम वापरण्याची गरज असणार होती. दोनवेळा नेऊन आणल्यावर माझ्या मुलाला तिसर्यांदा जाणे शक्य झाले नाही व हा सगळ्यांसमोर सांगायला संकोचला. मग पुन्हा शाळेत पोहोचेपर्यंत त्रास झाला. ही गोष्ट तातडीने वर्गशिक्षकांना लेखी कळवली त्यावर त्यांनी पालक शिक्षक भेटीत तो मुद्दा महत्वाचा मानून आधी चर्चेला घेतला. त्यावेळी आपल्याकडे शाळेतल्या शाळेत रोज होणार्या मानसिक/शारीरिक कोंडीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
रेवती
16 Nov 2009 - 11:34 am | धमाल मुलगा
चांगला आहे प्रकल्प.
शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच.. प्रश्नावली जरुर पाठवावी, नक्की मदत करुच.
-(पक्का राडेबाज आणि कृतिशील अविचारी) ध.
16 Nov 2009 - 12:07 pm | निखिल देशपांडे
प्रकल्पासाठी शुभेच्छा
मेल आयडी व्यनी तुन पाठवतच आहे. जरुर मदत करु
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
16 Nov 2009 - 12:34 pm | दिपाली पाटिल
अगदी अगदी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे...प्रकल्पासाठी शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच... प्रश्नावली जरुर पाठवावी.
दिपाली :)
16 Nov 2009 - 12:37 pm | दशानन
शक्य ती मदत करीन. शुभेच्छा आहेतच.
rj.jain@gmail.com
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
16 Nov 2009 - 3:11 pm | सुधीर काळे
व्यनिद्वारा माझा ID पाठवत आहे. प्रश्नमंजूषा जरूर पाठवा, मीही जमेल तितकी मदत करेन.
उपक्रमाला शुभेच्छा!
सुधीर काळे
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
16 Nov 2009 - 3:44 pm | sneharani
प्रकल्पासाठी शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच... प्रश्नावली जरुर पाठवावी.