ज्यूल्स व्हर्न हा लेखनातला अवलीया.
त्याची आणि माझी ओळख झाली ती "८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा" या भा रा भागवतांच्या अनुवादीत पुस्तकातून.
भौतीक शास्त्र /भूगोल यांचे नियम पाळून ज्या काळात प्रवासाची खूप साधने नव्हती त्या काळात मि.फॉग आणि त्याचा नोकर पासपार्तू ने ८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा पार पाडली त्याची साहस कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. हे असे घडू शकते यावर मुद्देसूद मांडणी करत वाचकाना वेगळ्या जगाची सफर करवून आणणे ही ज्यूल्स व्हर्न ची खासियत.
अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज या पुस्तकावर अनेक चित्रपट अॅनिमेशन पट निघाले राजकपू र ने सुद्धा राजश्री सोबत एक भ्रष्ट नक्कल करायचा प्रयत्न केला होता.
ज्यूल्स व्हर्न ने तात्कालीन विज्ञानाचा आधार घेत बरीच पुस्तके लिहिली.
एकोणीसाव्या शतकात ( ८ फेब्रूवारी १८२८ -- २४ मार्च १९०५)जगताना त्याने अनेक कल्पना केल्या. अनेक भारार्या मारल्या
चंद्रावर स्वारी ( ट्रीप टॉ मून) या त त्याने चंद्राला फेरी मारून येणारे एक यान आणि त्यातील प्रवासी कल्पिलेले होते. अवकाशातली गती/गुरुत्वाकर्षण हे त्याने फारच प्रभावीपणे मांडले होते. कोणतेच ज्ञान नसताना देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा आधार घेत त्याने अवकाशात आढळणार्या गुरुत्वाकर्षण विरहीत अवस्थेचे वर्णन केले होते. (नन्तर त्या मागची कारणमिमांसा थोडी चुकीची ठरली हे अलाहिदा)
स्पेस शिप आणि रॉकेट उडवणे स्पेस मध्ये गेल्यानन्तर त्या प्रवाशांच्या याना सोबत कुत्रीच्या देहाचे परिभ्रमण हे सगळे चित्र त्याने हुबेहूब उभे केले.
अमेरीकेच्या अपोलो कार्यक्रमाशी त्याचे खूपच साधर्म्य आहे हा योगायोग.( पुस्तकातले यान ( तोफ गोळा) हे फ्लोरीडातल्या टेम्पा टाऊन मधून उडते. टेम्पाटाऊन नासाच्या केप कार्निव्हल च्या लाँचिंग साईट च्या नजीक च आहे)
हल्लीच्या काळात डिस्कव्हरी चॅनेल वरून सर्व माहीती मिळालेली असूनही ट्रीप टु मून ( फ्रॉम अर्थ टू मून)वाचताना अजूनही मज्जा येते. वाचकाला गुंगवून ठेवणे ही ज्यूल्स व्हर्न ची हातोटी.
ज्यूल्स व्हर्न ची पुस्तके वाचताना अनेकदा त्याच्या कल्पना शक्तीचे आश्चर्य वाटते. ज्या काळी वीज ही सर्वत्र नव्हती/ प्रवासाची साधने नावाखाली घोडागाडी ... डिझेलची वाहने नुकतीच कुठे येऊ लागली होती त्याकाळात त्याने २००००लीग्ज अम्डर द सी या पुस्तकात अणू इंधनावर चालणार्या पाणबुडीची कल्पना केली होती.
( त्याने त्या पाणबुडीला दिलेले "नॉटीलस" हे नाव अमेरीकेने त्यांच्या पहिल्या अण्वीक पाणबुडीला दिले होते)
पुस्तकात त्याने समुद्राखालील जग प्रत्यक्ष समोर पाहिलेले असल्यासारखे दाखवले आहे. पॅसीफीक समुद्रातील हायड्रो थर्मल व्हेंट्स हे त्याने त्या पुस्तकात वर्णिले होते. त्या नन्तर कित्येक दशकानी याचा प्रत्यक्ष शोध लागला
ज्यूल्स च्या अफाट कल्पना शक्तीचे कौतुक वाटते नव्हे तर थक्क होऊन जायला होते.
त्याने लिहिलेली सगळी पुस्तके अगोदर थिल्लर म्हणून पाहिली गेली.
जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ सारख्या काही पुस्तकातून अजून आपल्याला न उलगडलेले जग त्यान उलगडून दाखवले आहे.
पृथ्वीच्या गाभ्या कडे प्रवास करताना आलेले अनुभव त्याने त्यात मांडले आहेत.
केंव्हा केंव्हा ज्यूल्स व्हर्न हा द्रष्टा होता की काय अशी शंका येते.
त्याच्या कथा अधुनीक विज्ञानाच्या कसोटीवर पूर्णांशाने खर्या ठरत नसतील पण प्रत्येक कल्पना रंगवताना त्याने विज्ञानाच्या नियमांच्या असा काही आधार घेतला आहे की त्याने मांडलेले खोटे आहे असा दावा वाचक निदान त्या क्षणी तरी करु शकत नाही. उदा ध्वनीचे वेगवेगळ्या माध्यमातून वहन वेगवेगळ्या गतीने होते.
"धुमकेतूच्या शेपटीवर" लिहिताना त्याने ग्रहांचे वस्तुमान आणि त्यांचे गुरुत्वाकर्षण यांचा संबंध एकदम मस्त पद्धतीने समजावून सांगितला आहे.
" बलून मधले प्रवासी ( फाइव्ह विक्स इन बलून)" त्याने वाचकाला वार्याच्या दिशा आणि भुगोल आणि बलूनचा प्रवास प्रत्यक्ष यांचे थेट प्रात्यक्षीक दिले आहे.
ज्या काळात जग कंदीलाच्या प्रकाशात वाचायला शिकत होते त्या काळात ज्यूल्स व्हर्न ने एक कादंबरी लिहिली " पॅरीस इन २०थ सेन्च्यूरी " यात त्याने नव्या जगात असणार्या लोकांबद्दल लिहिले आहे. हेलीकॉप्टर / एअर कंडिशनर्स , इंटरनेट , टीव्ही ,स्वयंचलीत गाड्या या बद्दल बरेच काही लिहिले आहे.
१८६३ ते १९०५ लेखन प्रवासात या काळात ज्यूल्स व्हर्नने पन्नासहूनही अधीक पुस्तके लिहिली. बहुतेक पुस्तकातून त्याने कोणतीना कोणती सफर घडवून आणली.
एकोणीसाव्या शतकात एकविसाव्या शतकाची सफर घडवून आणणार्या या अवलीयाला सलाम.
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 1:59 pm | गणपा
मस्तच हो विजुभौ बालपण जाग केलत परत एकदा.
मी पण लहान असताना ज्यूल्स व्हर्नची भा रा भागवतांनी अनुवादीत केलेली बरीच पुस्तके वाचली होती.
खरच एक अवलियाच होता तो. अचाट कल्पना शक्ती. ज्या काळी विमानाचा विजेचा पाणबुडीचा शोध लागला न्हवता तेव्हा त्याने आपल्य कल्पनेतुन सार काही साकारल. बहुतेक त्याला भविष्यातल पाहण्याची दिव्य दृष्टी लाभली आसावी.
11 Nov 2009 - 2:05 pm | sneharani
छान झालाय लेख...!
केवढी ही कल्पनाशक्ती.!!!
त्यांची पुस्तकं वाचायला आवडतील.
11 Nov 2009 - 2:41 pm | भोचक
मस्त लेख. ज्युल्स व्हर्नचे अराऊंड द वर्ल्ड इन ८० डेज हे पुस्तक अर्धवट वाचलंय. पुढे ते पूर्ण करायला वेळ मिळाला नाही. पण आता तुमच्या लिखाणामुळे त्याविषयीची उत्सुकता वाढली.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
11 Nov 2009 - 2:59 pm | अवलिया
सुरेख लेख ! विजुभाउ !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Nov 2009 - 3:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख लेख ! विजुभाउ !!
11 Nov 2009 - 3:03 pm | विंजिनेर
अंमळ त्रोटक परिचय झाला आहे. पण छान.
'चंद्रावर स्वारी' हा भा.रा. भागवतांनी केलेला सर्वात आवडता अनुवाद.
अजून येउद्या..