कौशल इनामदार ह्यांच्या पुढाकाराने खालील एकमेवाद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या "मराठी अस्मिता" ह्या संस्थेने केले आहे. त्याबद्दल माहिती मिपाकरांना द्यावी ह्या उद्देशाने, त्यांच्या संस्थळावरील माहिती खाली दिली आहे-
"मराठी अभिमान गीताचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा शेवटचा टप्पा म्हणजे एकत्र २०० गायक-गायिकांचं एका वेळी ध्वनिमुद्रण.
आपल्यापैकी ज्यांना एका पट्टीमध्ये, बऱ्यापैकी सुरात गाता येतं त्यांनी या ध्वनिमुद्रणात अवश्य सहभागी व्हावं. हा कार्यक्रम नाही, ध्वनिमुद्रण आहे. त्यामुळे आलं की गावं लागेल हे लक्षात ठेवावं!!!
जगात कधीही असं झालं नाहीये की एखाद्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला २००हून अधिक लोकांचा समूह गायला आहे. मराठी भाषेत हा जागतिक विक्रम केवळ आपल्या सहाय्याने होऊ शकतो!"
तारीख: ५ नोव्हेंबर २००९
वेळ ११ ते १७.००
स्थळ: यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट
प्रतिक्रिया
3 Nov 2009 - 4:53 pm | टारझन
देव काका एकटेच २०० लोकांचे आवाज काढू शकतात असं ऐकून आहे ! :)
त्यामुळे तुम्हाला ह्यातून देव सोडवू शकेतो