नमस्कार,
परवा रात्री मी याहु लॉगिन केले. काल सकाळी येउन परत लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर पासवर्ड चालत नाहिये असा मेसेज येतोय.
मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे.alternate id वर रिप्लायची वाट पहात आहे. मी गुगलवर जाउन सर्च केले तर बर्याच लोकाना असा अनुभव आला आहे. माझ्या काही मैत्रीणीचे असे म्हणणे आहे कि माझे याहु अकाउन्ट /आयडी डिअॅक्टिवेट झाला. डिअॅक्टिवेट असेल तर बरे होइल कारण बरिच परर्सन्ल माहिती त्यात आहे जसे स्कॅन्ड कॉपीज(पासपोर्ट, पॅन,सर्टीफिकेट्स) म्युचुअल फन्द्स ऑनलाइन स्टेटमेन्ट्स. पण जर हॅक झाला असेल तर कठिण आहे, दुरुपयोग होउ शकतो. कोणी काही मदत करु शकल्यास बरे होइल.
आपली,
(चिन्तीत) चुचु
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 10:35 am | नेहमी आनंदी
:(
1 Nov 2009 - 10:42 am | शाहरुख
>>मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे
२५०-३०० दशलक्ष (फुकट) ग्राहक आहेत त्यांचे..
बाकी आपली चिंता समजू शकतो.
1 Nov 2009 - 10:39 am | लबाड लांडगा
पर्सनल माहिती याहु वर टाकण्याचा वेडेपणा लोक का करतात कळत नाही. आता बसा ओरडत- याहू.चाहे कोई मुझे पर्नल कहे.
लबाड
1 Nov 2009 - 10:40 am | दशानन
या या तुम्हीच एक शहाणे राहिलात ह्या जगात ;)
1 Nov 2009 - 11:13 am | अवलिया
खरे आहे अमित तुझे म्हणणे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Nov 2009 - 10:40 am | नेहमी आनंदी
माझ याहू आकाऊंट व्यवस्थित सुरु झालेल आहे.
1 Nov 2009 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा तरी याहू अकाऊंट या क्षणापर्यंत व्यवस्थीत चालू आहे. पुन्हा व्यवस्थीतपणे लॉगीन करुन पाहा, अकाऊंट कदाचित पुर्ववत होईल. आपल्याकडून लॉगीन करतांना काही चूक झाली असेल म्हणून तसे होत असेल. बाय द वे, पण आपली महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन ठेवतांना काळजी घेतली पाहिजे असे वाटते.
याहूचे एक मोठे पदाधिकारी मिपावर असतात म्हणे, त्यांची मदत होऊ शकेल.
अवांतर : याहूने अरुणाचल प्रदेश चीनला दान केला अशी बातमी आज दै. सकाळमधे झळकली.
तेव्हा आपली कागदपत्रे त्या समोर काय आहेत, असे वाटते. काळजी घ्या...!
-दिलीप बिरुटे
1 Nov 2009 - 10:46 am | दशानन
सहपासर्व.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
1 Nov 2009 - 10:46 am | पर्नल नेने मराठे
याहूचे एक मोठे पदाधिकारी मिपावर असतात म्हणे, त्यांची मदत होऊ शकेल.
कोण आहेत त्यानी क्रुपया मदत करावी.
चुचु
1 Nov 2009 - 7:25 pm | प्रदीप
ते कुणालही मदत करत नाहीत. त्यांना आनंद नेऊन द्यावा लागतो.
1 Nov 2009 - 10:54 am | पर्नल नेने मराठे
मी बरेच options ट्राय केले
*****
Looks like you need some help?
Let us help you find a solution.
What's the problem you are experiencing?
*****
I forgot my password
My password doesn't work
I forgot my Yahoo! ID
My account may have been compromised
*****
४ ही ला एकच उत्तर
******
Sorry, your password can't be reset online (9024)
For security reasons, we require you to contact Customer Care
चुचु
1 Nov 2009 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी ट्राय करुन पाहतो. ! :)
1 Nov 2009 - 11:11 am | अजय भागवत
तुमचे मुळ अकाउंट चालत नाही त्यामुळे पुढील पर्याय योग्य नाहीच असे गृहीत धरुन काही "प्रयोग" करायचे असतील तर हे करुन पहा-
आऊटलूकवर पॉप-एसएमटीपी मेल-बॉक्स कसा तयार करायचा हे याहूवर दिले आहे. त्यानुसार, सेटींग करुन याहूवरील विरोप तुमच्या आउटलूकवर उतरवता येतील असे वाटते.
1 Nov 2009 - 11:36 am | दिपाली पाटिल
पर्नल तू याहु कस्ट्मर केअर ला कॉल कर नी ते तुला अकाऊंट ओपन करताना टंकलेल्या सेक्युरिटी प्रश्नांची उत्तरं विचारतील, जर तु उत्तरं बरोबर सांगितलीस तर पासवर्ड रिसेट होतो...माझं अकाऊंट हॅक झालं होतं तेव्हा मी असंच करुन दोन तासात पासवर्ड रिसेट करुन घेतला होता...
दिपाली :)
1 Nov 2009 - 11:43 am | पर्नल नेने मराठे
ह्म्म करते
चुचु
1 Nov 2009 - 6:48 pm | यन्ना _रास्कला
द्येव पान्यात बुड्वुन बस किवा नव खात उघड.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
2 Nov 2009 - 11:19 am | शक्तिमान
हा मिसळपाववरील १०००० वा धागा आहे!
जिओ मिपा!