(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती)
घरात अपुल्या भरून उरल्या
मद्यराणीचा सुवास तू
वेगवेगळ्या गचाळ गंधाची
उभी ठाकलेली रास तू
क्षणैक जागेवरी न थांबे
लडखडणारा त्रास तू
मित्रांच्या कुबड्या करुनी
तरंगणारा भकास तू
अखंड रिचवणारा... झरझर
घोट संस्कृतीचा दास तू
चाखण्यावरती पोसलेली
तुंदीलतनू आरास तू
डोळे मिटूनी तुला पहावे..
ग्लास तू ..... ग्लासात तू
तुझ्याविना ते कसे जगावे
मद्यकर्त्याचा श्वास तू
पेगवेड्या त्या जनांना
लागलेला ध्यास तू..
बाटलीतील उत्कटतेचा
झिंगला उल्हास तू
सदा सदाच पीत रहावे
न संपणारा प्रवास तू
काल बेवडा... आज बेवडा
हवाहवासा हव्यास तू..
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 12:36 pm | प्रशांत उदय मनोहर
सॉलिड ... माफ़ करा.. लिक्विड..
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
27 Oct 2009 - 12:47 pm | मसक्कली
डोळे मिटूनी तुला पहावे..
ग्लास तू ..... ग्लासात तू
तुझ्याविना ते कसे जगावे
मद्यकर्त्याचा श्वास तू
पेगवेड्या त्या जनांना
लागलेला ध्यास तू..
बाटलीतील उत्कटतेचा
झिंगला उल्हास तू
सदा सदाच पीत रहावे
न संपणारा प्रवास तू
काल बेवडा... आज बेवडा
हवाहवासा हव्यास तू..
=)) =)) =))
(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती) 8>
:B :B :B
प्राजू... मुलगि आहे कि दारु... :O :T :?
8} :$
हा नवा ब्रान्ड आहे वाटत.... ;) >:)