सप्रेम नमस्कार मंडळी..
आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात..
किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला. त्यामुळं ह्या घराण्याला नावं 'किराणा घराणं' असं पडलं. हे कधी झालं याची काही माहीती मिळत नाही. त्यानं पुढे जाऊन 'इस्लाम' धर्माचा स्विकार केला होता असं मानलं जातं.
गोपाल नायकांपासुन किराण्याच्या ४ उपशाखा निघाल्या त्या अशा..
गोपाल नायक
|
-------------------------------------------------------------------------------------------
| | | |
१. २. ३. ४.
१.१ उस्ताद अजीम खाँ २.१ उस्ताद बंदे अली खाँ ३.१ उस्ताद गफुर खाँ ४.१ मेहेबूब बक्ष
१.२ मौला बक्ष २.२ उस्ताद नन्हे खाँ ३.२ उस्ताद वाहीद खाँ ४.२ रेहमान खाँ
१.३ अब्दुल घानी खाँ २.३ उस्ताद काले खाँ ३.३ शकुर खाँ ४.३ अब्दुल माजीद खाँ
२.४ उस्ताद अब्दुल करीम खाँ ३.४ मशकूर अली ४.४ अब्दुल हमीद खाँ
३.५ मुबारक अली ४.५ अब्दुल बशीर खाँ
४.५.१ नीयाज़ अहमद खाँ
४.५.२ फैयाज़ अहमद खाँ
एक आपले लोकप्रिय उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब सोडले तर बाकीच्या शाखा एक तर काळाच्या ओघात नाहीश्या झाल्या किंवा विविध कारणांमूळे पुढे येऊ शकल्या नाहीत.
आता बघुयात उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य परीवार..
१. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व,
२. रोशनाआरा बेगम़,
३. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी,
४. बेहेरेबुवा,
५. उस्ताद अब्दुल रेहमान उर्फ सुरेशबाबु माने, (खाँसाहेबांचे मोठे चिरंजीव),
६. हिराबाई बडोदेकर, (खाँसाहेबांची मोठी मुलगी)
बघा, वर एकसे एक नावं. एका नाव झाकावं आणि दुसरं उघडावं अशी एक एक नावं आणि अशी त्यांची कारकिर्द..
आता सवाई गंधर्वांचे शिष्यगण बघुयात,...
१. गानतपस्विनी गंगुबाई हनगल,
२. पं. भीमसेन जोशी (अण्णा),
३. पं. फिरोज़ दस्तुर,
४. डॉ. प्रभा अत्रे,
५. पं. संगमेश्वर गुरव,
पं. संगमेश्वर गुरव यांच गाणं ऐकण्याचा योग कधी आला नाही पण आपण सगळेच जण बाकीच्या वरील मोठ्या लोकांचे गाणं भरभरुन ऐकत आहोत. वरील ह्या मोठ्या गुरुंच्या शिष्यांपैकी खालील शिष्य जे किराण्याची पताका धरुन आहेत किंवा होते असे,
१. कै. कृष्णा हनगल (गंगुबाई हनगल यांची मुलगी),
२. श्रीकांत देशपांडे,
३. माधव गुडी,
४. नारायणराव पटवर्धन,
५. मिलींद चित्तल,
ह्या सगळ्यांनी आपापली गायकी सिद्ध केलेली आहेच. ह्या सगळ्यांना ही लक्षवेधक लोकप्रियता मिळाली कारण किराण्याची एका विशिष्ठ पद्धतीने विकसित होत जाणारी ख्याल व आलापीची पद्धत. आणि त्यातून विकसित होत जाणारा प्रत्येक स्वर.
उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांनी घराणेदार पेशकश करताना त्यात निरनिराळ्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या सरगमांचा अलंकारी प्रयोग केला होता. खाँ साहेबांनी अजुन एक नोंद घ्यावी असा छान केलेला प्रयोग म्हणजे किराणा घराण्याच्या भरदार गायकीत भावपुर्ण, आर्त, सुंदर अशा प्रणयप्रिय चिंजाचा अंतर्भाव. मंडळी, खाँ साहेबांचा स्वःताचा आवाज अतिशय नादमय आणि नाजूक होता त्यामूळे त्या चिजा अजुनच खुलत असत. खाँ साहेब स्वःत अतिशय जागरुक असत आपला आवाज जपण्यासाठी बरंका.
किराण्याची गोष्ट चालू असताना पं. भीमसेन (अण्णा) यांच्या शिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही, इतकं त्यांच कार्य मोठं आहे. अण्णांच्या गायकीनं किराणा घराणं चांगल्या पद्धतीने बदलाला सामोरं गेलं. आजच्या काळात ते किराण्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत तर बाकीचे बिनीचे शिलेदार.
अहोरात्र केलेला रियाझ, अखंड असलेली गुरुभक्ती, प्रचंड विचार व विद्वत्ता ह्या आणि अश्या असंख्य कारणांनी किराणा घराणं कायम लोकप्रिय राहिलेलं आहे आणि तसच राहु दे अशी प्रार्थना करुन इथेच थांबतो.
धन्यवाद,
- सांगितीक वाटाड्या...
==============================================================
एक सुचना/विनंती: ह्या माहीती मधे काही त्रुटी अथवा अधिक माहीती आढळल्यास कृपया मला व्यक्तिशः संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
26 Oct 2009 - 7:57 am | विसोबा खेचर
ही मंडळी किराण्याची पताका वगैरे धरून आहे असं मला वाटत नाही. बाकी माहिती छान.
आपला,
(किराणा घराण्याचा अभ्यासक) तात्या.
26 Oct 2009 - 9:17 am | shweta
तात्यांच घराणं कुठलं ? किराणाच ना?
मग त्यांच नाव कसं नाहि ह्या यादि मधे?
26 Oct 2009 - 9:58 am | प्रमोद देव
२. श्रीकांत देशपांडे,
३. माधव गुडी,
४. नारायणराव पटवर्धन,
५. मिलींद चित्तल,
ही मंडळी किराण्याची पताका वगैरे धरून आहे असं मला वाटत नाही. बाकी माहिती छान.
तात्याशी सहमत!
किराणा घराण्यातील काही नव्या-जुन्या गायक-गायिकांची माहिती इथेही मिळेल. त्यातल्या काहीजणांनी फक्त किराणा घराण्याशी संलग्न न राहता इतर घराण्यांचेही गायन आत्मसात केले. त्यापैकी प्रमूख म्हणजे अमीर खॉं आणि बसवराज राजगुरु,माणिक वर्मा इत्यादि.
संगमेश्वर गुरव ह्यांचे गायन पूर्वी आकाशवाणीवर नित्यनेमाने ऐकलेले आठवतंय. खूप छान गायचे ते.
========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
26 Oct 2009 - 8:22 am | टुकुल
छान माहीती..
संगीत जगतातला अडाणी ,
टुकुल
26 Oct 2009 - 8:53 am | shweta
छान माहिती आहे.
किराणा शब्द फक्त "किराणा माल " म्हणुन माहित होता.
सगळे क्लासिकल गाणारे खान ह्याच घराण्याचे आहेत का ?
सलमान, शहारुख, अमीर ह्या खानांचा काहि संबध आहे का किराणा घराण्याशी ?
26 Oct 2009 - 4:47 pm | टारझन
तुम्ही सांगितलेली लोकं "खान" आहेत .. कानाखाली बसते ना .. "खान्" कन .. त्यातले खान ..
आणि किराणा घराण्यात तोंडाचा चंबु करून खा म्हंटल्यावर अजुन मोठा चंबू करून सोडून द्यायचं , मग जो उच्चार होतो .. तो खाँ !!
कळलं का? फरक आहे :)
-(स्पष्टीकारक) टारझन
26 Oct 2009 - 9:12 am | JAGOMOHANPYARE
गोपाल नायक हा देवगिरीचा राजगायक होता.. देवगिरी संस्थानाजवळ रेवा नदीच्या काठावर बसून तो गायचा... त्याने रेवा या नावाचा एक राग देखील रचला आहे.( उत्तरांगप्रधान बिभास म्हणजे साधारणपणे रेवा..) .. अल्लाउद्दीन खिलजीने त्याचे अपहरण केले होते, असे ऐकल्याचे आठवते.. नक्की माहीत नाही.
का, तो गोपाल नायक वेगळा आणि हा वेगळा, हेही माहीत नाही.. :)
http://www.otherminds.org/html/Prannath.html
ही आणखी एक कथा मिळाली...
http://en.wikipedia.org/wiki/Baiju_Bawra
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
26 Oct 2009 - 9:28 am | JAGOMOHANPYARE
वरच्या माझ्या पोस्टमध्ये काही तरी घोळ वाटतोय..... विकिपेडियावर गोपाल नायक हा बैजू बावराचा शिष्य म्हटले आहे.... म्हणजे साधारणपणे अकबराचा काळ... आणि त्याच्यावर जी लिन्क मी दिली आहे, त्यात अल्लाउद्दीन खिल्जीचा काळ आहे.. बहुतेक हे दोन वेगळे असावेत..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
26 Oct 2009 - 9:43 am | खडूस
लोकप्रभाच्या दिवाळी अंकात हा एक चांगला लेख आहे.
तसाच मलिकार्जुन मन्सूर यांच्यावरील हा लेख देखील चांगला आहे.
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
26 Oct 2009 - 8:48 pm | मैत्र
दोन्ही लेखांच्या दुव्याबद्दल अनेक धन्यवाद.
सुंदर लेख आहेत.
सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोल या बहीण भावांना अनेक वर्षे मोगूबाई आणि किशोरीताईंचा सहवास लाभला त्यामुळे त्यांच्यावर जयपूर - अत्रौळी घराण्याचा खूप प्रभाव आहे आणि तो या लेखांमधूनही दिसतो.
त्यामुळे किंवा त्यावर लिहायचं आहे हे आधी स्पष्ट केल्यामुळे इतर घराण्यांचा उल्लेख किंवा तपशील कमी आहे.
पण एकूणात दोघांचंही लिखाण मांडणी, रागांची, नामवंत गायकांची विचारधारणा, घराण्याचा इतिहास लिहिण्याची पद्धत छान आहे. लेखन शैलीचा प्रभाव पडतो.
नाद-वेध हे त्यांच्या लोकसत्तामधील लेखांचं संकलन असलेलं पुस्तक संग्रहणीय आहे. एकेका रागाचा विचार केला असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या घराण्यांच्या, गायकांच्या चीजा, बंदिशी, आठवणी, उत्तम मांडल्या आहेत.
26 Oct 2009 - 9:11 pm | वाटाड्या...
प्रथम,
ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचे आभार.
आता थोडं लेखाविषयी..
तात्या..
तुमच्या लेखी जे जे किराण्याची पताका चालवत आहेत, त्यांची नावं मला सांगता का? माझ्या माहीतीत त्याने भरच पडेल.
स्वाती ताई..
तात्यांच नाव मला घालायला नक्कीच आवडेल..पण तुमच्या उत्तरावरून तुमचा मुड चेष्टेचा आहे असं वाटत आहे. कृपया हा विषय चेष्टेचा नसल्याने अशी चेष्टा परत करु नये ही विनंती.
देवसाहेब..
नेहेमीप्रमाणेच माहीतीत भर घातल्याबद्दल स्पेशल धन्यवाद...कैवल्यकुमारांच नाव राहिलं. त्यांच गाणं प्रायवेट मैफीलीत ऐकल आहे आणि खासंच आहे.
टारझन..
श्वेता ताईंना परस्पर उत्तर दिल्याबद्दल पेशल धन्यवाद....बाकी सगळ्यात एक गोष्ट आवड्ली भावा...तु आज काल संगीतविषयक गोष्टींची चेष्टा करणं सोडलस.
प्यारेभाऊ..
अधिक माहीती मिळाल्यास नक्की कळवा...
खडुस शेठ..
तुम्ही दिलेले लेख अधिच वाचले होते. तेव्हाच असं वाटलेलं की आपण असा एखादा लेख लिहुन विषयावरील थोडी धुळ झटकणं गरजेचे आहे. जसं.."सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं."..
सगळ्यांचे पुन्हा मनापासुन आभार...
- वा