गर्द अरण्यात शिरताना
हंस स्वतःशीच म्हणाला,
"शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध -
शून्य, अपूर्ण की पूर्ण?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंदका
शून्याकडून पूर्णाकडे झेपावला...
***
पंख आवरून उतरताना
भूमीवर पाहिलं हंसानं
तेव्हा 'शून्या'तही त्याला
एक संख्या दिसली...
दिसणं, आणि असणं
या खेळाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
उंचावत श्वेत-धवल पंख
एकाकी उड्डाण केलं तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती संख्या म्हणाली,
"शून्य हेच तर पूर्ण!"
रचना: केव्हातरी, २००८
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 2:06 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
22 Oct 2009 - 3:00 pm | चेतन
:T :? 8| ~X(
22 Oct 2009 - 4:11 pm | वेदश्री
>शून्य, अपूर्ण की पूर्ण?
छ्या! शून्य हा पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या हंसाला गर्द अरण्यात वरून खाली, खालून वर उड्डाण करायला लावले ते लावलेच पण वर हुंदकेही द्यायला लावले! कविला गणिताचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. ;-) इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. संख्येलाच सांगावे लागले!!!
>दिसणं, आणि असणं
>या खेळाचे नियम
>उमजेपर्यंत तो हरला...
हाहाहाहा.. शून्यासारखी कातिलाना संख्या नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!!
>उंचावत श्वेत-धवल पंख
>एकाकी उड्डाण केलं तेव्हा
>त्याच्याकडंच पाहात
>ती संख्या म्हणाली,
>"शून्य हेच तर पूर्ण!"
आता आणिक मरायला एकाकी कशाला केले उड्डाण?! संख्येलाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा संख्यांचे पूर्णापूर्णत्व ठरवायला वरखाली उड्डाणं करत बसावी लागायची त्या बिचार्याला!!! :)
22 Oct 2009 - 4:24 pm | मदनबाण
आधिच आमचं गणित हायं लयं म्हणजी लयं कच्चं...त्यात शून्यावर कविता...
झेपला नायं बरं का !!! आपल्याला तर हंस म्हणल की आता फक्त "उड जायेगा हंस अकेला" हेच आठवत... ;)
रचना: केव्हातरी, २००८
हे मात्र समजल... ;)
(आर्यभट्टांनी ही कविता वाचली असती तर त्याचे रसग्रहण कसे केले असते बरं ? :? )
(इन्फिनिटी मधला...) ;)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
22 Oct 2009 - 4:30 pm | अवलिया
मस्त :)
आमचं गणित इथे बघा
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
22 Oct 2009 - 5:05 pm | टारझन
एक्सलंट !!!!
जियो मोडकराव !!!
--गणितीया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
22 Oct 2009 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता फारशी कळली नाही, तरीही दाद द्यावीशी वाटली.
अदिती
22 Oct 2009 - 5:12 pm | पार्टनर
(पण तरीही पूर्णपणे समजली नाही ..! )
हंसच का ? :)
- पार्टनर
22 Oct 2009 - 7:10 pm | धनंजय
परस्परविरोधी कल्पनांचा एकवद्भाव सांगणार्या कविता नेहमी गूढ असतात.
वरील कवितेतील दोन-चार शब्द बदलून वेगळ्याच अर्थाने "भोग आणि गूढ (अंग आणि अनंग)" अशा एका उपप्रतिसादात वापरले आहेत. क्षमस्व आणि धन्यवाद.
22 Oct 2009 - 7:36 pm | गणपा
मोडकराव आपल्या गणिताची पार मोड-तोड करुन टाकली की हो लोकांनी.
कसल सकस खाद्य पुरवलय.