(जयंतरावाची माफी मागून... )
दमले फराळ करता, आता निजेन म्हणते
स्वप्नातल्या दिवाळी, थोडे रमेन म्हणते
चकली जराच चुकली, हा दोष मोहनाचा
आहे जशा सरळ त्या, तैशा तळेन म्हणते
साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते
अंदाज लाडवाचे, चुकले पुन्हा नव्याने
बेसन रवा मिळोनी, गोळे वळेन म्हणते
पाळीतला उगा का बसला रुसून शंकर ?
समजावण्यास त्याला, पुर्या चिरेन म्हणते
शेवेस गाळताना, का हात कंप पावे ?
रचना नव्या दमाच्या, नाना करेन म्हणते
जिन्नस मी न सारे, हे चाखले अजूनी
बकरा करू़न यांना, मी वापरेन म्हणते
बोलावलेच आहे, शेजारच्या स़ख्यांना
जे ठेवतील नावे, त्यांना छळेन म्हणते
लो कॅलरीज आता मी चाखणार नाही
जे जे हवेच ते ते स्वाहा करेन म्हणते
माझ्याच कौशल्याचा आता निनाद आहे
खातील कोण सहजी तेही बघेन म्हणते
प्रतिक्रिया
21 Oct 2009 - 2:10 pm | गणपा
हा हा हा मस्त रे
कौतुकास्पद.
21 Oct 2009 - 4:19 pm | चतुरंग
हा फराळ आवडला! :)
(हायकॅलरी)चतुरंग
21 Oct 2009 - 4:41 pm | सुबक ठेंगणी
नामी फराळ! आवडला!
अवांतर:
साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते
हयाऐवजी
"हसल्या जरी मला त्या तळणीतल्या करंज्या
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते"
कसं वाटेल?
21 Oct 2009 - 6:36 pm | कौतुक शिरोडकर
सुरेख सुबक द्विपदी.
करंज्याचे प्रकार जे पाहिलेत तेच लिहीलेत. कदाचित थोडा अजून वेळ स्वयंपाकघरातही घालवायला हवा.
21 Oct 2009 - 6:48 pm | सुबक ठेंगणी
एक ओळ तर तुमचीच आहे...
पहिल्या ओळीबद्दल...करंज्या जेव्हा तळणीत फुटतात तेव्हा करंज्या 'हसल्या' असं म्हणतात...म्हणून लिहिलं...
स्वयंपाकघरातील घडामोडींबद्दल अधिक माहितीसाठी गणपा किंवा प्रभूशी संपर्क साधा ;)
21 Oct 2009 - 7:00 pm | चतुरंग
स्वयंपाकघरातील घडामोडींबद्दल अधिक माहितीसाठी गणपा किंवा प्रभूशी संपर्क साधा
हे 'प्रभो'शी संपर्क साधा असे हवे, 'प्रभू'शी संपर्क साधलात तर ते स्वयंपाकघरातल्या वेगळ्याच घडामोडींबद्दल माहिती देतील अशी दाट शक्यता! ;)
चतुरंग
21 Oct 2009 - 7:06 pm | श्रावण मोडक
+१.
मी विचारातच पडलो होतो 'हे प्रभू कोण' या...
21 Oct 2009 - 7:10 pm | दशानन
मी पण दचकलोच... प्रभू ... =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
21 Oct 2009 - 7:12 pm | प्रभो
'प्रभूं'शी संपर्क साधलात तर कोळंबी समजेल फक्त.. =))
--प्रभो
21 Oct 2009 - 11:11 pm | मदनबाण
मस्त फराळ... ;)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
23 Oct 2009 - 12:41 pm | विशाल कुलकर्णी
कौतुका, तुझ्या कांदापोह्या नंतर हे पण जबराच आहे बरं ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"