ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप-
लालसर झाल्या त्या जागा
जेथे डासा रे तू मला चावला
उडत ये तसाच गुणगुणूनी
आजच तू या संध्याकाळी...
टायर, डबे, घाण अंगणी
त्यात पाणी थोडे ठेवूनी
तुझिया स्वागताची तयारी
जय्यत करोनी ठेविली...
डोक्यावर तेल लावून,
बसले मी ओट्यावरी
गुणगुण तुझी ऐकूनी
कांती माझी आसुसली...
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना...
अधीर ही तनू बावरी..
खाजवू ती चाव्यजागा,
मजाच त्याची निराळी
तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी
सुज्जित बाला दिसे निराळी...
तुझ्या असंख्य डोळ्यातूनी
ऊडून पहा खालती
लाललालती सुजगर्विता
सभोवतालचे जग हासती...
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 7:34 am | shweta
यमक चांगल जमलं आहे.
:)
20 Oct 2009 - 9:43 am | बाकरवडी
मस्तच रे लय भारी
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
20 Oct 2009 - 12:37 pm | सहज
नॉट बॅड :-)
20 Oct 2009 - 1:00 pm | मदनबाण
छान...
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
20 Oct 2009 - 1:13 pm | मसक्कली
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
आइला अमृतांजनराव तुमि रक्त दान करत आहात कि काय...
=)) =)) =))
मानसे कमी पडली वाट्त... :? :T
;) :D
चला स्वागत करु डासान्चे.... <:P :O)
>:)
लै भारि =D>
20 Oct 2009 - 1:42 pm | दिपाली पाटिल
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना...
अधीर ही तनू बावरी.. =))
मलेरियाचा किंवा चिकनगुनियाचा डास असेल तर....कुर्हाडीवर पाय मारल्यासारखं होईल की हे तर... :S :( :T :< @)
दिपाली :)
20 Oct 2009 - 2:36 pm | अमृतांजन
सर्वांना-
विडंबन आवडल्याचे कळवल्याने मन ताजेतवाने झाले. धन्यवाद!!!
20 Oct 2009 - 3:34 pm | टारझन
=)) =)) =)) आहो हाच तर स्वभाव आहे मिपाकरांचा अंजनराव !!
प्राजु ला विडंबण आवडो ... अशी शुभेच्छा !!! अन्यथा काही खरं नाही तुमचं !!
- वास्तुनिष्ठ
21 Oct 2009 - 9:49 am | अमृतांजन
वर्जीनेटर कवयित्रींनी कळविले आहे की, त्यांना विडंबन आवडले!!! त्यामुळे सगळेच खरं आमचं!
21 Oct 2009 - 10:32 am | टारझन
वर्जीनेटर कवयित्रींनी कळविले आहे की, त्यांना विडंबन आवडले!!!
नक्की ?? शक्यतो मुळ लेखक/की ला विडंबण आवडल्यास ते आवर्जुन प्रतिक्रिया देउन सांगतात. असो !!
- मलेरिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.