तू सांगितलंस म्हणून
सगळीकडच्या मिसळींची चव घेताना
बरी मिसळ सापडली होती तेंव्हा...
तेव्हा म्हणालास,
गल्ली, बोळातल्या आणि पेठेतल्या
कुठल्याही मिसळी खातोस कशाला?
मिसळ एकाच ठिकाणी खायची,
अन् ती पण डब्बल हाणायची.
मिसळीची खरी चव एकच-तिथलीच
खायला जाण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द तुझे निर्णायक ठरले
कारण गाव तर तुझंच होतं
मला फारसं माहित नसणारं
***
गेल्या कळेला
फेरी मारून मी आलो होतो
आता पुन्हा एकदा कळ आलीय
ताकद नसली तरी जायचं आहे
एकाच फेरीत पोट साफ करायचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
मिसळ खायची हाव तर आहेच
तू मिसळ खात असशील! मनसोक्त, नेहमीसारखीच
मीही खाणार!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त
गुडगुड पोटात साठवून घेत!
या त्रासाचे मूळ मात्र
आता मला शोधायचे आहे
लाकभडक जळजळीत मिसळ खाल्ल्यावर
ताक कुठं मिळेल ?
-कवी शाहरुख
रचनाकाल: मूळ कविता व्याकरण पाहिल्यापासून विडंबनाची वाहती गंगा आटण्याआधी..
मोडकजी, मनापासून माफी..
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 10:57 am | अवलिया
हा हा हा मिसळ सहन होत नसेल तर खातो कशाला रे ??
जा की तिकडे... त्या तिथे पलिकडे... शेव कुरमुरे मिळतात लहान मुलांसाठी !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 11:23 am | श्रावण मोडक
ह्या... स्पोर्ट्समनस्पिरिट नावाची चीजच नाही. नवा बोलर घावलाय, ठोका!!!
:)
13 Oct 2009 - 1:06 pm | विसोबा खेचर
मस्त! :)
तात्या.