उजळलेला अंधार आणि चांदणे डागाळलेले
माज मला आयुष्याचा, असे जरी दृष्टावलेले !
बघ पोसतो अहंकार...., दारिद्र्याचा सुखाने
दशावतार आयुष्याचे, मी अहंकारे झाकलेले !
कसे चांदणे पुनवेचे, हलकेच अंधारात बुडाले
साम्राज्य हे तिमीराचे, अन तारेही मातलेले !
उदासवाणे सखे चांदणे, गातो गाणे अंधाराचे
चंद्र बापुडा केविलवाणा, नभ ही कळवळलेले !
असेच गाईन जीवनगाणे, जगेन आनंदाने
जिवनाचे सारीपाट, मीच कधीचे उधळलेले !
विशाल
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 2:16 pm | प्रभो
असेच गाईन जीवनगाणे, जगेन आनंदाने
जिवनाचे सारीपाट, मीच कधीचे उधळलेले !
मस्त रे
-प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Oct 2009 - 3:42 pm | विशाल कुलकर्णी
चला ५८ वाचनात एकाला तरी प्रतिसाद द्यावा वाटला. हे ही नसे थोडके ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Oct 2009 - 3:50 pm | प्रभो
गप रे...७ वाचन असताना दिलाय...
--प्रभो
12 Oct 2009 - 4:06 pm | अवलिया
ही आमची दाद.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 5:42 pm | विजुभाऊ
अरे वा असे कसे ही पहा माझी दाद. केवळ ५ वाचने http://misalpav.com/node/9703 असताना दिली आहे.
( दाद खाज खुजली या पैकी ही दाद नव्हे)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Oct 2009 - 4:12 pm | llपुण्याचे पेशवेll
छान कविता. ही आमची दाद.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
12 Oct 2009 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
12 Oct 2009 - 8:04 pm | अन्वय
छान कविता