उजळलेला लेख आणि प्रतिसाद डागाळलेले
खाज मला लिहायचीच, असे जरी ते ढापलेले !
बघ पोसतो अहंकार...., वैचारीक दीवाळखोरीने
पिसा अवतार माझा, मी विचार ठोकलेले !
कसे धागे दोन ओळीचे, हलकेच खाली बुडाले
साम्राज्य हे कंपुबाजांचे, अन शेरे मातलेले !
उदासवाणे सख्या गाणे, गातो नव्या आयडीचे
सर्व्हर बापुडा केविलवाणा, संपादक कळवळलेले !
असेच दळेन धागे या इथे , पिळेन लोकां आनंदाने
व्याकरणाचे नियम पाठ, मी कधीचे उधळलेले !
न चुकता येई खाज मला , धागा पुढे नेण्याची
सहमत सहमत होत जाई , मीच माझे लिहिलेले
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 2:27 pm | विशाल कुलकर्णी
क्या बात है विजुभाऊ! सो क्विक?
जबरा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Oct 2009 - 2:27 pm | अवलिया
=)) =)) =))
विजुभाउ... खाजवा .. खाजवा ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 2:27 pm | प्रभो
विजुभाऊ , राडा विडंबन....
जबहरा !! जबहरा !! जबहरा!!
--प्रभो
12 Oct 2009 - 2:48 pm | श्रावण मोडक
ज ह ब ह रा!!!
12 Oct 2009 - 3:11 pm | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ ! ईजु भाउ जास्त खाजवु नका.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
12 Oct 2009 - 3:23 pm | विनायक प्रभू
भारी खाज इजुभौ
12 Oct 2009 - 3:39 pm | सखाराम_गटणे™
:)
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
12 Oct 2009 - 5:04 pm | दशानन
+१
=))
=))
=))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
12 Oct 2009 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ, लै भारी.