फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था...
सामने बैठा था मेरे, लेकिन वो मेरा न था...
आपलं असूनही कुणी आपलं नाही, ही वेदना कुणालाही बेचैन करते. हेमंत राग ही वेदना फार तीव्रतेने व्यक्त करतो. आशा आणि निराशा यातील अवकाश म्हंजे हेमंत! त्यात बेचैनी, व्याकूळता, विरहवेदना आहेच; पण तो येईल कधीतरी... होईलच आपला, हे समाधान आणि आसही त्यात आहे.
हेमंत रागाला व्यक्त करणारी
माझिया प्रियाला प्रीत कळेना... ही फार सुरेख रचना आहे.
http://www.esnips.com/doc/577dd674-4d9c-4454-b8f9-8dcd6aa4891c/Majhiya-p...
प्रीत कळेना...मधील गंधार, मध्यम आणि धैवतावरून निषादावर उतरणारा स्वर याच मार्गाने परतताना पंचमाला घेऊन पुढे सरकतो. त्यावेळी "कळेना' शब्दाची येणारी प्रचिती केवळ अप्रतिम...
पावसात भिजतो श्रावण... यात "श्रावणा'ला भिजविणारा षडज, रिषभ, मंद्रातील निषाद, मध्यातला गंधार चिंब करतो.
पुढे निषाद आणि तार षड्ज "आवरू मनाला कैसे...'मधील व्याकूळता टोकदारपणे व्यक्त करतात...
प्रतिक्रिया
26 Sep 2009 - 11:09 pm | अन्वय
आणखी एक अप्रतिम हेमंत
http://www.esnips.com/doc/8efd8a49-598e-4b95-8219-f528b07205fd/Abhay
28 Sep 2009 - 6:09 pm | प्रमोद देव
झिया प्रिया प्रीत कळेना.
माझिया प्रियाला प्रीत कळेना....अशी दुरूस्ती करा.
झिया प्रिया.....वाचून काहीच अर्थबोध होत नाहीये.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
27 Sep 2009 - 6:26 am | प्राजु
लाडकं गाणं आहे हे माझं.
त्यातला पावसात भिजतो श्रावण.. ही ओळ अशी काही गायली आहे.. केवळ अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2009 - 12:07 am | विजय राणे
खरेच आहे प्राजू तुझे म्हणणे.
गाण्यातला श्रावण शोभाताइँनी वेगवेगळ्या तर्हेने इतका भिजवलाय की अन्वयने म्हटल्याप्रमाणे आपणही चिंब होतो.
27 Sep 2009 - 8:50 am | क्रान्ति
अतिशय सुरेख आहे हे गाणं. त्याचं स्वररसग्रहणही तसंच सुंदर!
ही हेमंतची आणखी एक सुरेख झलक. उद्या वयाची ८० वर्षं पूर्ण करणार्या अमर सुरातली.
याच सुरांनी गायिलेलं मीराबाईचं अप्रतिम भजन "उड जा रे कागा" हेही हेमंतातलंच बहुधा.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
27 Sep 2009 - 9:03 am | नंदन
छोटेखानी स्फुट मस्तच. क्रांतिताई आणि तुमच्या पहिल्या प्रतिसादातले दुवेही सुरेख. शक्य झाल्यास अजूनही लिहा, वाचायला आवडेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Sep 2009 - 8:19 pm | अन्वय
http://video.tiscali.it/canali/truveo/2295997138.html
यातील याद पिया की आये
या ठुमरीवरही हेमंतचीच छाया आहे
28 Sep 2009 - 12:03 am | विजय राणे
बर्याच वेळा गाणे आवडते असते पण
ते कोणत्या रागातील आहे याकडे लक्ष दिले जात नाही.
अन्वयने गाणे उलगडून दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
त्याला धन्यवाद द्यायलाच हवेत.
28 Sep 2009 - 4:30 pm | घोडीवाले वैद्य
चांगल्या गाण्याची याद करून दिलीत
धन्यवाद