राज यांचे अभिनंदन

अ-मोल's picture
अ-मोल in जनातलं, मनातलं
24 Sep 2009 - 12:44 pm

टाईम्स नाउ या वाहिनीला मुलाखत देताना
आवर्जून मराठीच बोलून निर्भीड विचार मांडल्याबदृल
राज ठाकरे यांचे अभिनंदन.
मुलाखतीसाठी खालील दुवा पहा -
http://www.timesnow.tv/videoshow/4328045.cms

राजकारणसद्भावना

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

24 Sep 2009 - 12:51 pm | विशाल कुलकर्णी

हो मी पाहिली ही मुलाखत !

मुलाखतकर्त्याने एक प्रश्न विचारला होता की हिंसाचाराच्म समर्थन कसं काय कराल म्हणुन?

त्यावर राजजींनी दिलेले उत्तर जबरा होते. ते म्हणाले की ते जर ३००० मैलावरुन येवुन काठ्या वाटण्याची भाषा करणार असतील तर आम्ही तलवारीची भाषा का करु नये. यापुढे अशा गोष्टीचे उत्तर याच प्रकारे दिले जाईल आणि केवळ शब्दच नव्हे तर कृतीही केली जाईल.

मुलाखतकर्त्याने एकदम विषयच बदलला.

क्या बात है राज ! त्रिवार मुजरा !!

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

शैलेन्द्र's picture

26 Sep 2009 - 5:06 pm | शैलेन्द्र

याच इंग्लीश भाषांतर जबरा केलंय टाईम्सवाल्यांनी.. जरा वाचा,

"Arnab: So, you said that you will distribute swords?

Raj : See, I will not keep quiet. Don’t speak the language of distributing lathis . 3000 women should not force their power upon Maharashtrian people. And this will not be tolerated under any circumstances, whether now or later. If they continue to behave like that then I will be compel to respond the same way. And I don’t know whether you call it violence or anything else. Secondly, this is a state of Shivaji Maharaj. "

*त्ये *ले....

राज म्हणाला "३००० मैलावरुन, या ***नी "३०००महिला" असं समजुन भाषांतर केलं. असल्या लोकांना **गतावर सोडलं पाहिजे काही दिवस, सुधरतील बहूदा.

The great pleasure in life is doing what people say you cannot do

सुधीर काळे's picture

24 Sep 2009 - 1:18 pm | सुधीर काळे

राज छान बोललाय! राज कामाचा माणूस आहे. त्याचे विचार बाळासाहेबांचे १९६०-१९८० दरम्यान होते तसे स्वच्छ व केंद्रित (focussed) आहेत. तो एक प्रचंड शक्ती आहे. त्याने आपली लायकी सिद्ध केली आहे. म्हणून ती लायकी व शक्ती वाया न घालविता बाळासाहेबांनी व उद्धवने वेळेवर जागे व्हावे व राजला सन्मानाने शिवसेनेत परत बोलवावे व त्याला व त्याच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न डिवचता मोठ्या मनाने शिवसेनेत एकरूप होऊ द्यावे. मराठी माणसाच्या कल्याणार्थ अशी अभूतपूर्व एकजूट घडवून आणून इतिहास घडवावा.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अमोल केळकर's picture

24 Sep 2009 - 1:18 pm | अमोल केळकर

अभिनंदन आणि विधानसभा निवडणूकीसाठी त्यांच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पर्नल नेने मराठे's picture

24 Sep 2009 - 1:34 pm | पर्नल नेने मराठे

मी चुकुन ||राजे|| वाचले 8|
चुचु

सखाराम_गटणे™'s picture

24 Sep 2009 - 1:35 pm | सखाराम_गटणे™

+१

कानडाऊ योगेशु's picture

24 Sep 2009 - 2:26 pm | कानडाऊ योगेशु

मी ही! :S

तत्त्व म्हणून इंग्रजीत न बोलता अट्टाहासाने मराठी बोलणे हे मला कौतुकाचे वाटते. काही काळापूर्वी असे केल्यास काय गांवढळ आहे म्हणून नाके मुरडली गेली असती. मराठीला थोडातरी मान मिळू लागला आहे असे वाटते.
आणि राजने मुद्देही व्यवस्थित मांडले. मुलाखतकार (ह्याचे नाव काय माहित आहे का?) राजची कोंडी करू पहात होता पण त्याने त्याचे मनसुबे उधळून लावले.
विधानसभेत निदान थोड्यातरी जागा मनसेला मिळून त्यांची धुगधुगी टिकून रहावी अशी इच्छा आहे.
(जाताजाता: पूर्वी कधीतरी प्रितिश नंदीने लता मंगेशकरची मुलाखत घेतली होती त्याची आठवण झाली. तो सगळे इंग्रजीत बोलला आणि लतादिदी अस्खलित हिंदीत.)

टारझन's picture

25 Sep 2009 - 2:50 am | टारझन

हॅहॅहॅ ... तो प्रितिश नंदी ना ? तो ही अंमळ येडझवाच आहे बघ !

अवांतर : मनसे जरी बहुमतात यावी असं वाटत असलं तरी माझ्या वार्डात कोण उभा आहे ते पाहुनंच मत देऊ !

-(मनसेप्रेमी) टाराज ठाकरे

>>>तरी माझ्या वार्डात कोण उभा आहे

आरं जंगल्या, ते म्युनसिपाल्टीचं इलेक्सन नाय रं.....
----------------------------------------------------------------------
अवांतरः तुला लिहिता वाचता येत नसल्याने लालूंचं 'रेल्वे ईंजिन' ह्या वर शिक्का मारायचा..म्हणजे सायबांना मत पडते...

चतुरंग's picture

25 Sep 2009 - 3:09 am | चतुरंग

राज ठाकरेने त्याचे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत. स्वतःच्या विचारांबाबत ठाम असणे आणि कुठच्याही बाजूने त्यांचा प्रतिवाद करता येणे हे वाखाणण्याजोगेच आहे. मुलाखतकार अर्णब गोस्वामीने "हिंसाचार हे मराठी माणसाचे कल्चर नाही!" वगैरे भाषणबाजी सुरु करताच त्याला तोडत "हे तुम्ही मराठी माणसाला शिकवू नका!" असा सणसणीत दम तोंडावर भरता येणे ह्याला जिगरच हवी!
ह्या मुलाखतीत "मी मराठी माणसाच्या अजेंड्यासाठी, मुंबईच्या प्रश्नांसाठी लढतोय, अपूर्ण कामे पूर्ण करुन घेण्यासाठी मी सत्तेत असण्यापेक्षा पाठिंबा देणे पसंत करीन आणि सरकारकडून कामे करुन घ्यायला प्राधान्य देईन." असे तो म्हणतोय. पाहूयात काय काय घडते.

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

25 Sep 2009 - 5:09 am | पिवळा डांबिस

चतुरंगाशी सहमत! मलाही असंच वाटलं क्लिप बघून!!

एनिवे, ए माझ्या भावांनो आणि भैणिंनो,
एक काम करा रे...
तुम्हाला हव्या त्या पक्षाला मत द्या...
पण ही जी सगळी नेत्यांची पिलावळ उभी रहातेय ना इलेक्शनला, त्या सगळ्यांना हमखास पाडा रे!!!!
कोणत्याही पक्षाचे असू द्यात...
आयत्या बिळातले नागोबा सगळे...
यांचं डिपॉझिट जप्त होईल असं बघा...

स्वप्निल..'s picture

25 Sep 2009 - 7:00 am | स्वप्निल..

अगदी मनातलं बोललात !!
१०० % सहमत!!

स्वप्निल

विनायक प्रभू's picture

25 Sep 2009 - 8:04 am | विनायक प्रभू

बोली पिडाभाई

शाहरुख's picture

25 Sep 2009 - 11:19 am | शाहरुख

मलाही मुलाखत आवडली..
येत्या निवडणूकीत या मुलाखतीचा त्यांना नक्कीच फायदा होईल.

ऋषिकेश's picture

25 Sep 2009 - 11:43 pm | ऋषिकेश

राजने मुलाखत नेमकी आणि स्पष्टपणे दिली. तसंच मराठीत दिली याचं कौतूक वाटलं... बघुया काहि अधिकार मिळाले की पुढे काय करतोय ते

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ११ वाजून ४३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "खबरदार जर टाच मारूनि याल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या...."

प्रशान्त पुरकर's picture

25 Sep 2009 - 7:30 am | प्रशान्त पुरकर

दुबई अनि मोरितिअस मधे पन चट्पुजा करतात काय............हाहाहाहा

रेल्वे भरती..........ईन्डिअन रेल्वे ना....... सही उत्तर

राज बोलायला भारी आहे......पण तो स्वतः शिवसेनेत १५ वर्ष होता...त्यावेलेला काय काय काम केलि आहेत हेहि जनतेसमोर माण्ड ना भाउ....कि नुसतेच बोल बच्चन....काकासाहेबासाराखे...
(Being in BMC for last 15 yrs…Shivsena could have done lot many things for Mumbai..)

विशाल कुलकर्णी's picture

25 Sep 2009 - 11:46 am | विशाल कुलकर्णी

इथे केंद्राकडुन मुंबईला किती निधी मिळतो हे देखील तितकेच महत्वाचे नाही का? देशातुन केंद्राला सगळ्यात जास्ती रेव्हेन्यु मुंबईतुन मिळतो आणि तो उत्तर प्रदेशसारख्या राज्यांकडे फिरवला जातो. ज्या मुंबईच्या जोरावर तुम्ही गमजा करता त्या मुंबईला किती निधी मिळतो विकासकामासाठी?

बीएमसीत सत्तेत कोण आहे याबरोबरच त्यांना किती साधनसामुग्री, निधी उपलब्ध आहे हे ही पाहायला नको का? मुळात सत्तेत असलेले राज्यसरकार मुंबईसाठी किती आवाज उठवते केंद्रात?

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वि_जय's picture

25 Sep 2009 - 12:36 pm | वि_जय

विशालराव.. परफेक्ट मत्त हो!!!

बीएमसीत सत्तेत कोण आहे याबरोबरच त्यांना किती साधनसामुग्री, निधी उपलब्ध आहे हे ही पाहायला नको का? मुळात सत्तेत असलेले राज्यसरकार मुंबईसाठी किती आवाज उठवते केंद्रात?

मुळात विकासकामाचा निर्णय प्रशासन घेते.. आणी प्रशासनप्रमुख म्हणजे आयुक्त राज्यसरकारच आपल्या मर्जीप्रमाणे ठरवते.. त्यामुळे महानगरपालीकेत सत्ता असूनही कोंडी होते.. शिवाय मुंबईतून गोळा होणारा महसूल खर्च करण्याचा अधिकार राज्यास आणी केंद्रास.. त्यामुळे आणखीनच गोची..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडी कामं होऊ देत भय्याभूमीतही! सगळा विकास, नोकर्‍या धंदे मुंबईत येऊन फायदा कोणाचाच होणार नाही आहे.
पिडाकाकांशी हज्जार टक्के सहमत. पिलावळ पडलेली उत्तम.

(असो. आमचा जिच्यावर जीव त्या लिनक्सला सुव्वरज्वर झाला असावा, व्हिडीओ बंद पडत आहे.)

अदिती

पाषाणभेद's picture

25 Sep 2009 - 8:15 am | पाषाणभेद

एक मात्र आहे, राज हा इतर पुढारी लोकांसारखा गोल गोल गप्पा मारत नाही. मुळूमुळू तर नाहीच. छान मारलाय मुलाखतकार्‍याला पर्यायाने त्याला नावे ठेवणार्‍यांना.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2009 - 5:20 pm | सखाराम_गटणे™

राजची मुलाखत घेणार्‍याचे नाव कोणाला माहीती आहे का?

टारझन's picture

25 Sep 2009 - 5:31 pm | टारझन

का ? सुपारी देताय की काय साहेब ?

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2009 - 5:37 pm | सखाराम_गटणे™

घेताय का?

चतुरंग's picture

25 Sep 2009 - 5:50 pm | चतुरंग

माझा प्रतिसाद नीट वाचा!

(नेमका)चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2009 - 5:52 pm | सखाराम_गटणे™

धन्यवाद.

सूहास's picture

25 Sep 2009 - 8:14 pm | सूहास (not verified)

अर्थात ही सोय आम्ही फक्त,ज्यांच्या हाफीसात मटा बॅन आहे पण मिपा चालु आहे(म्हणजे बॅन नाही, चालले लगेच बेला बनायला) त्यांच्या साठीच केली आहे..बाकी कोणाला हवी असल्यास ते http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5053257.cms ईथे वाचु शकतात..

बाकी व्हीडीओ बघताना तुम्हाला अंगभाषा कळतीलच..

लोकसभा निवडणुकीनंतर आपण एकदम गायब झालात?

- गायब कशासाठी होईन? या मधल्या काळात मी पक्षबांधणीचे काम करीत होतो. त्यासाठी रोज मीडियात दिसायलाच पाहिजे असे काही नाही. पक्षाच्या बैठका, मेळावे, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन या सगळ्यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविणे आणि पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हेच काम सुरू होते. त्यामुळे या सगळ्यांच्या रोजच्या रोज बातम्या यायला हव्यात असे मला वाटत नाही. त्यात मीडियला हव्या असलेल्या बातम्याही यात नव्हत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षातून श्वेता परुळकर, प्रकाश महाजन तसेच संजय घाडी यासारखे पदाधिकारी फुटून शिवसेनेते गेले...

- संजय घाडीविषयी म्हणत असाल तर पोरगा अत्यंत चांगला आहे, मात्र त्याच्या आजूबाजूच्यांनी त्याला फितवला. तो शिवसेनेत गेला ते त्याचे दुदैर्वच. मात्र श्वेता आणि प्रकाश महाजनांना मी पक्षातून काढून टाकले होते. आता एकदा त्यांना पक्षातून काढल्यावर त्यांनी दुसऱ्या पक्षात जावे किंवा घरी बसावे याच्याशी माझे काही घेणे-देणे नाही.

लोकसभा असो की विधानसभा निवडणुका... मनसे शेवटी शिवसेनेचीच मते खाणार असे म्हटले जाते....

- असे म्हणत जर कुणी स्वत:चीच समजूत काढून घेत असेल तर त्यांनी तसे करावे. मुळात असे म्हणणे हाच बचपना आहे. राज्यात मराठीचा टक्का सर्वाधिक असताना शिवसेनेची पूर्णपणे सत्ता का नाही आली? मराठी मुद्दा शिवसेनेने उचलून धरला, तेव्हा त्यांची सत्ता आली नाही. हिंदुत्वाचा विषय त्यांनी हातात घेतला, तेव्हा त्यांना सत्ता मिळाली. मग आता ते मराठी मतांची चिंता कशाला करतात? कोंबडा कोणाचाही आरवू देत, सूर्य उगवतोय ते महत्त्वाचे. तसेच आंदोलने कोणाचेही होऊ देत मराठी माणसाचा उत्कर्ष होतोय ते महत्त्वाचे.

आपण मराठीचा मुद्दा हातात घेतल्यावर मराठीला अचानक 'ग्लॅमर' का आले?

-अहो हे मराठी भाषा वा मराठी माणसाविषयीचे प्रेम नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत जी लाख लाख मते मिळाली त्यानंतरचे हे पुतनामावशीचे प्रेम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या ४० वर्षांत मराठी माणसांविषयी जे काही काम केले ते पक्षाच्या कार्याध्यक्षांना किती समजले? लोकसभा निवडणुकांआधी छटपूजा आणि उत्तर प्रदेश दिन कोण साजरा करीत होते? मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या उत्कर्षासाठी आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे खासदार का गप्प होते? मराठी भाषेविषयी यांना प्रेम नसून हे लोकसभा निवडणुकांनंतर सुचलेले शहाणपण आहे.

मनसेत उमेदवारी देण्याचे काय निकष होते?

-एखाददुसरा अपवाद वगळता माझे उमेदवार हे माझ्या पक्षातीलच ९८ ते ९९ टक्के पदाधिकारी आहेत. उमेदवारी देताना प्रामााणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि निवडून येणारा उमेदवार असे निकष मी लावले आहेत.

आपण आपल्या मित्रांनाच उमेदवारी दिली असा आरोप होतोय...

- हा आरोप मुर्खपणाचा आहे. माझे मित्रच माझे सहकारी आहेत आणि सगळ्या सहकाऱ्यांना मी मित्रांचीच वागणूक देतो.

आपल्या पक्षात बंडखोरी झाली की नाही?

- बंडखोरीचा प्रश्न येतोच कुठे? प्रत्येकाचा एक ठराविक स्वभाव असतो. उमेदवारीची इच्छा असण्यात काहीच गैर नाही. उमेदवारी न मिळाल्याने होणारी नाराजीही आपण समजू शकतो. मात्र बंडखोरीला आपण मनसेमध्ये थारा देणार नाही.

बंडखोरी न होण्यास आपली दहशत कारणीभूत आहे का?

अहो यासाठी दहशत कशाला पाहिजे. समजूत काढल्यानंतरही बरेच प्रश्ान् निकाली निघतात.

प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कसे तुटून पडणार?

- आघाडीची राज्यात अबाधित सत्ता असताना एक मेगावॉट वीजही निर्माण करू न शकणे हे सरकारचे पाप आहे. सरकारने मुंबईतल्या जमिनी विकायला काढल्या आहेत. सत्तेमधल्या पुढाऱ्यांच्याच शिक्षणसंस्था असून त्यामध्ये मराठी तरूणांना प्रवेश मिळण्याऐवजी प्ररप्रांतीयांचाच अधिक भरणा आहे. याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण नाही. अनधिकृत गोदामांमध्ये साठेबाजी होत असताना त्यावर कारवाई नाही. शिक्षण खात्याच्या बट्ट्याबोळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. अशी सर्व परिस्थिती असताना राजकारणी मात्र साखर कारखाने आणि शिक्षणसंस्थामध्ये मश्गुल आहेत. हे सर्व सरकारचे कारनामे आपण चव्हाट्यावर आणणार आहोत.

भाजपच्या मराठी प्रेमाविषयी काय म्हणाल?

- भाजपचे मराठीविषयीचे प्रेम बेगडी आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू असताना आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्ान् निर्माण झाला असताना भाजप कुठे गेले होते?

परप्रांतीयांचा नेमका आपल्याला काय धोका वाटतो?

- परप्रांतीयांच्या लोंढ्यांचे मतदारसंघात रूपांतर करण्याचा कुटील डाव आहे. हे असेच सुरू राहिले तर सगळे हाताबाहेर जाईल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकांनंतर विधानभवनावर आणि वर्षा बंगल्यावर सर्वसामान्य मराठी जनतेचा अधिकार राहणार नाही. आताच मराठी भाषेला दुय्यम वागणूक मिळत असून मराठी माणूस दूरवर फेकला जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे आणि महाराष्ट्राची प्रगती इतरांच्या घशात घालण्याचे काँगेससारख्या पक्षांचे मनसुबे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देऊन पर्यायाने महाराष्ट्राला वाचविण्याची हीच खरी वेळ आहे अशी माझी मायबाप जनतेला विनंती आहे.

आदेश बांदेकर, महेश मांजरेकर शिवसेनेसाठी प्रचार करीत असताना आपण कोणत्या कलाकारांना प्रचारात उतरवणार आहात...

- छी...छी...मी कोणाला प्रचारात उतरवणार नाही. शिवसेनेला अशा कलाकारांची गरज भासतेय ही दुदैर्वाची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमुखांना कधी असल्या कलाकारांची गरज भासली नाही.

लोकसभेला, एकदा संधी द्या, असे म्हणत होतात, आता विधानसभेला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मागत आहात...

- अहो या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असल्याने मला लोकांसमोर जावेच लागणार आहे. बरं शिवसेना आणि भाजपही १९९९पासून काय मागत आहेत...संधीच ना? लोकसभेला अनेकांना वाटत होते की मनसेला मिळून मिळून किती मते मिळणार? मात्र आम्हाला लाख लाख मते मिळाल्यावर अनेकांचे डोळे पांढरे झाले. अनेक जागांवर आमचा थोडक्यासाठी विजय हुकला. आणखी थोडा जोर लावला असता तर मनसेचा उमेदवार विजयी झाला असता अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आमचा जनाधार आणखी वाढेल आणि मागची हळहळ आता यावेळेला उरणार नाही.

मनसेला मतदान म्हणजे काँग्रेसला मतदान असे शिवसेनेचे म्हणणे आहे, त्याविषयी...

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर कित्येक वषेर् त्यांच्यावर अशाचप्रकारचे आरोप होत होते. आजचा भाजप जो पुवीर् जनसंघाच्या नावाने ओळखला जायचा, तो देखील पुवीर् शिवसेनेवर अशाचप्रकारचे आरोप करीत होता. पण असो, नवीन आलेल्या लोकांना हे माहित नसणार.

मनसे आणि शिवसेनेच्या आंदोलनात नेमका काय फरक आहे?

- शिवसेनेची आंदोलने ही आमच्यावर कुरघोेडी करण्यासाठी असतात. मनसेची आंदोलने ही निर्णय देणारी आहेत. सर्वसामान्यांना हीच गोष्ट अपेक्षित आहे. मधल्या काही काळात मराठीच्या मुद्द्यावरून कोणी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तडीपाऱ्या भोगल्या आणि अशा बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्या सगळ्यांना स्मरणार्थ आहेत. एका नव्या उमेदीने आमचा पक्ष उभा ठाकलाय. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. जनतेने आतापर्यंत सगळ्यांचीच आश्वासने ऐकून त्यांना संधीही दिली आहे. आता एकदा माझ्या पक्षाचाही विचार करावा...आणि यावेळेला मायबाप जनता आमचा नक्की विचार करेल अशी माझी खात्री आहे.

सरकार बनविणाऱ्यांना पाठिंबा देणार, मात्र सत्तेत सहभागी होणार नाही म्हणजे काय?

-मी सत्तेत असो किंवा नसो लोकांचे प्रश्ान् सुटणे महत्त्वाचे आहे. राज्यात सर्वत्र बजबजपुरी झालीय. झोपड्या दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. परप्रांतीयांच्या लोढ्यांना आळा घालण्याची कोणामध्ये हिंमत उरली नाही. त्यासाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुष ठेवणे गरेजेचे आहे, जे मी करेन. जनता आम्हाला पूर्णपणे सत्ता हाती देईल, तेव्हा आम्ही सत्तेत सहभागी होऊच. मात्र तोवर आम्ही काय करतोय हे तर लोकांना कळूदेत.

आपल्यामुळे शिवसेनेची सत्ता न आल्यास शिवसेनाप्रमुखांना दु:ख होईल त्याचे काय?

- माझी शिवसेनाप्रमुखांवर नितांत श्रद्धा असून त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे. मात्र महाराष्ट्राचे प्रश्ान् जर कोणाच्या माध्यमातून सुटत असतील तर त्यांना निश्चितच आनंद होईल, असे मला वाटते. माझ्या पक्षाच्या माध्यमातून मराठी माणूस आणि त्याची अस्मिता अबाधित राहणार असेल, त्याचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होणार असेल तर शिवसेनाप्रमुखांना त्यांना त्याचे नक्कीच समाधान वाटेल, असेही मला वाटते.

- संजय व्हनमाने

सू हा स...

सागर's picture

25 Sep 2009 - 11:30 pm | सागर

राजसाहेबांनी या मुलाखतीच्या माध्यमातून उत्तरेच्या पुंडांना चांगलेच सुनावले आहे. आणि मराठीतून इंग्रजी वाहिनीवर मुलाखत म्हणजे जबर्‍याच :)

कोणाला संगणकावर व्हिडिओ उतरवून घ्यायचा असेन तर येथे अपलोड केला आहे.
भाग - १
http://rapidshare.com/files/284695430/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

http://rapidshare.com/files/284702226/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

भाग - २
http://rapidshare.com/files/284710264/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

http://rapidshare.com/files/284719432/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

फक्त ऑडिओ हवा असेन तर इथे अपलोड केला आहे
भाग १ : http://rapidshare.com/files/284764710/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

भाग २ : http://rapidshare.com/files/284774995/RAJ_THAKAREY_INTERVIEW_ON_TIMESNOW...

(१३ ऑक्टॉबरच्या प्रतिक्षेत ...) सागर

आशिष सुर्वे's picture

26 Sep 2009 - 12:50 am | आशिष सुर्वे

सर्वप्रथम 'राज ठाकरे' यांना मला मनःपूर्वक प्रणाम करावासा वाटतो.

आता ह्या मुला़खतीच्या निमित्ताने माझी काही मते मांडू इच्छितो.

सर्वप्रथम मराठीसाठी आणि मराठी माणसांसाठी 'लढा' द्यायची वेळ आलीय ह्याचेच दु:ख वाटते आणि 'राज'नी ह्याची जबाबदारी शिरावर घेऊन जो 'लढा' चालवलाय ह्याचा अभिमानही वाटतो.

बोलता येऊ लागल्यावर जे शब्द मी सर्वप्रथम उच्चारले ते होते 'आई'..
माझी मायबोली आहे मराठी.. आणि मराठीचा अपमान हा मी माझ्या आईचाच अपमान समजेन.
तसे पाहता मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबधीत नाही आणि माझा हिंसाचाराला सहसा पाठिंबाही नसतो.
पण संत तुकारामांचे एक वचन मात्र आठवल्याशिवाय राहिले नाही..
'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे माथी हाणू काठी'

सध्या हीच परिस्थिती आहे.. काही ठराविक परप्रांतीय गट आता आपल्याला डोईजड होऊ लागलेत, आणि त्यांना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे.
तसे पाहता महाराष्ट्रात विविध प्रांतातील लोकं येऊन स्थायिक झाली आहेत. मी ही आता महाराष्ट्राबाहेरच आहे. आणि माझ्या खास मित्रांमध्ये 'ठाण्या'त जन्मापासून राहणारा 'गुप्ता' आडनावाचा मित्रही आहे. त्याच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, आमचे सर्व संभाषण १००% मराठीत होते आणि तो अस्सलिखीत मराठीत बोलतो. ह्यात मला त्याचे कैतुक वगैरे वाटत नाही कारण तो मला अस्सल मराठीच वाटतो कारण त्याच्या संभाषणातून मला त्याचा 'मराठी'बद्दलचा आदर पदोपदी जाणवत असतो.
ह्या निरीश्कणातून मला जाणवले की, काही ठराविक परप्रांतीय गटच मराठी माणसाच्या 'सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या' स्वभावाचा गैरफायदा घेताना दिसत आहेत.
ह्या परिस्थितीत ज्याला जी जी भाषा परिपूर्ण आणि लवकर समजेल त्याला त्या त्या भाषेत समजवायला हवीच. मग तो मार्ग 'तोंड' चालवण्याचा असो वा 'हात', तो योग्यच असेल.

इथे मला ५-६ महिन्यांपूर्वी आलेला एक अनुभव नमूद करावासा वाटतो.
माझ्या सर्वात पहिल्या कार्यालयात माझ्यावरील अधिकारी हे मूळ्चे 'केरळ'चे होते आणि आता ती नोकरी सोडल्यावरही आम्ही नियमितपणे संर्पकात असतो. एकदा मी त्यांच्याशी दूरध्वनीवर सहज गप्पा मारत होतो तेव्हा ते सहज बोलून गेले.. ''क्या रे तूम घाटी लोगोका राज तो एकदम हिरो बन गया है!''..
मी ताबडतोब त्यांना उत्तर दिले.. ते असे होते..
''सर, क्या आप जानते हो 'घाटी' का मतलब क्या है? नही तो पहले जान लिजीए..
'घाटी' मतलब 'घाट पे रहने वाला'.. वही 'घाट', जिसको देखतेही बहोत लोगोकी 'फट' जाती है!.. इसपे चढने के लिए जिगर चाहीये!''
दॅट्स व्हाय, आय अ‍ॅम प्राऊड टू बी अ 'घाटी'!

शेवटी एकच म्हणतो..

''पुरे झाली आता 'खेकडा'वॄत्ती..
या मावळ्यांनो, जर उंचावर चढून हंडी फोडण्याची जिगर नसेल.. तर चला मग एकत्र येऊयात.. दुसरा फोडतोय.. त्याला निदान आपले खांदे तरी देऊयात!''

-

कोकणी फणस

सुधीर काळे's picture

26 Sep 2009 - 7:59 am | सुधीर काळे

शाबास ९६-मराठा (aka कोकणी फणस),
माझे एक अय्यंगार बॉस म्हणायचे कीं महाराष्ट्र हा एकच असा प्रांत आहे कीं जिथे मराठी नाहीं आले तरी आयुष्य काढता येते.
किती लाजिरवाणी गोष्ट आहे!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

हैयो हैयैयो's picture

27 Sep 2009 - 8:46 am | हैयो हैयैयो

अभिमान

आम्हाला मराठीभाषा येते ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्हाला तो वाटलाच पाहिजे असे आमचे म्हणणे नाही. परंतु तुम्हाला तमिळभाषा आली तर आम्हाला अभिमानच वाटेल.

हा प्रतिसाद व्यक्तिकेन्द्रित - कोणा एका व्यक्तिस उद्देशून - नाही. ऐयङ्गार साहेबांसारखी विचारसरणी बाळगणे हेच लाजिरवाणे आहे.

हैयो हैयैयो!

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 2:14 am | शक्तिमान

मुलाखत नेहमीप्रमाणे दमदार!
आणि अर्नाब ला मराठी नीट कळते हे पाहुन आश्चर्य वाटले!

हर्षद आनंदी's picture

27 Sep 2009 - 8:21 am | हर्षद आनंदी

मराठी लोकांसाठी मराठी लोकांशी आधी भांडावे लागते, हे दुर्दैव.

माझ्या मते, राजकारणी लोकांबद्दल बोलण्याचा आपला हक्क आपण कधीच हरवुन बसलोय, कारण "मला काय त्याचे?" म्हणत त्यांना मदत करण्यात सामान्य माणुस नेहमीच पुढे असतो.