!! ~~ प्रतिमा ~~ !!
तो आकाशीचा सूर्य
लखलखत तळपणारा
सारे त्याचे दिवाने
त्याच्या तेजाने दिपणारे
कधी कोणी म्हणे
त्याला सागर
कधी त्याला उपमा
दिव्य तेजोनिधीची
सर्वांना मिळे प्रकाश
मिळे प्रेम जीवनाचे
आकाशच मग ठेंगणे
त्या जीवलगांचे
ती एक पणती
सारकाही दूरून न्याहाळायची
त्याच्या दिव्य प्रभेने
बावरून जायची
त्याच्या उगवतीला
नकळत आनंदाने सुखावायची
त्याच्या मावळतीला
तिही झाकोळून जायची
स्वत:शीच विचार करायची
मनमुराद स्वत:शीच हासायची
स्वप्नामध्ये त्या हिरण्मयाच्या
मग ती गुंगून जायची
ती इवलीशी पणती
तो गगनीचा तेजोगोल
काय करावे सुचेना तिला
होई जीवाची घालमेल
नभी अखंड तारका
त्यात प्रकाश हा इवला
दिसेल का? समजेल का
त्या आकाशीच्या राजसाला??
अखेर झालाच सामना
त्या दिवाकराशी एकदा
अधीकच गुरफटली त्याच्या
उबदार किरणात
आता प्रकाशच प्रकाश
अंध:कार संपला
तिच्या ज्योतीमध्ये
तोच प्रकाशीत झाला
येईला का सत्यात
तिचे स्वप्न इवले
त्या मित्राच्या
किरणात सामावायचे
- सोनाली घाटपांडे
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 11:27 am | अवलिया
कितीतरी वेगवेगळ्या कथा आणि रुपके डोळ्यासमोरुन तरळुन गेली.
चांगला प्रयत्न.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 5:57 pm | अनुप्रिया
धन्यवाद अवलिया
21 Sep 2009 - 7:29 pm | क्रान्ति
आता प्रकाशच प्रकाश
अंध:कार संपला
तिच्या ज्योतीमध्ये
तोच प्रकाशीत झाला
सुरेख कल्पना आणि कविता!
क्रान्ति
आई उदे ग अंबाबाई
अग्निसखा
रूह की शायरी
21 Sep 2009 - 7:45 pm | श्रावण मोडक
आता प्रकाशच प्रकाश
अंध:कार संपला
तिच्या ज्योतीमध्ये
तोच प्रकाशीत झाला
सुंदर कल्पना.
21 Sep 2009 - 8:08 pm | प्राजु
आता प्रकाशच प्रकाश
अंध:कार संपला
तिच्या ज्योतीमध्ये
तोच प्रकाशीत झाला
चांगली आहे कल्पना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2009 - 12:37 pm | अजिंक्य
आता प्रकाशच प्रकाश
अंध:कार संपला
तिच्या ज्योतीमध्ये
तोच प्रकाशीत झाला
चांगली आहे कल्पना.
असेच लिहीत राहावे. शुभेच्छा.
अजिंक्य.
22 Sep 2009 - 1:00 pm | विशाल कुलकर्णी
छान ! आवडली.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
22 Sep 2009 - 9:46 pm | अनुप्रिया
आभारी आहे मित्रांनो!!
23 Sep 2009 - 6:07 pm | फ्रॅक्चर बंड्या
भारी आहे
27 Sep 2009 - 1:34 pm | अनुप्रिया
धन्यवाद!!!