अवतार

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
23 Sep 2009 - 1:02 pm

असाच एक वृद्धाश्रम.
वृद्धाश्रम पेक्षा ३स्टार हॉटेल अथवा सॅनिटोरीयम.
पैसा ठेवायला जागा नसलेल्या,अल्शेशियन,डालमेशन वगैरे साठी जागा असलेल्या,
मात्र वृद्ध पालकांसाठी जागा नसलेल्या शिरीमंतानी बांधलेले.
चकचकीत रिसेप्शन च्या मागे एक मोठा फोटो.
निरखुन बघत होतो मी.
एरवी अशा ठीकाणी मिळतात त्यापेक्षा वेगळा, मद्दड न दिसणारा मॅनेजर.
माझ्या निरखण्याला रोखुन बघणारा.
"काय, बघताहात हो साहेब त्या फोटोकडे, काय एवढे विषेश आहे त्यात?
तुम्हाला देणगीदाराच्या तोंडावर विष्णुअवतार दिसतोय का हो? अगदी मागच्या तेजोमय चक्रासकट.
मॅनेजर हसला.
"सगळेच नसतात हो तसे. काही अपवाद पण असतात की. आता बघा ना परवा एक गृहस्थ आले, एक लाख रुपये देउन गेले. कुठही नाव नको म्हणाले. अगदी व्हाईट इनकमचा ड्राफ्ट"
"तुम्ही काय करता "?
मी सांगितले.
" ह्या क्षेत्रात पण अवतार व्हायला खुप स्कोप असतो की. तुमचा होतो की नाही?"
खिशात फणी बाळगतो. कार्यक्रम झाला की लगेच केस विंचरतो. त्या निमित्ताने थोडेफार चक्र आले तर ते लगेच पुसुन टाकतो.
तो परत हसला.
" तुमचा ट्रिगर काय" समाजाचे देणे परत फेड्णे वगैरे."
छे. मला त्यात आनंद मिळतो. पैशापेक्षा मोठा. अगदी सेल्फिश मोटीव्ह. म्हणुन फावल्या वेळात करतो.
तुम्ही? मी विचारले.
"भरपुर कमावले. २० वर्षे अमेरिकेत होतो. मुलांसाठी भरपुर करुन ठेवले आहे. बायको गेल्यावर आत ह्या म्हातार्‍यांची सेवा करतो. माझ्या आई वडीलांसाठी काहीही करु शकलो नाही ह्या बोचणी वर उतारा. माझा ट्रिगर. अवताराचा प्रश्नच नाही"
मी विचार करु लागलो.
असे दोन पायाचे अवतार रोज भेटतात की.
सणाच्या आदल्या दिवशी टाकीचा नळ वाहतो. मुश्कीलीने प्लंबर मिळतो. नळ दुरुस्त होतो. बायकोने पैसे हातात देउन थँक यु म्हटल्यावर त्याच्या तोंडावर 'तारणहार' दिसतोच की.फोन केल्यावर लगेच येउन नेट दुरुस्त करणारा एम्.टी.एन्.एल वाल्यात पण हा दिसतो.
शेजारणी ला रात्री अचानक खुप पोटात दुखल्यावर एक प्रसिद्ध डॉक्टर येतात. बरोबर कार्डीओग्राम पण असतो. आता पोटातील दुखण्याला हे अस्त्र का, असा प्रश्न रात्री दोन वाजता कसा विचारायचा?
निदान होते. इंजेक्शन दिले जाते. अर्ध्या तासात दुखणे थांबते. १५०० रुपये फी घेउन डॉक्टर निघतात. नवरा अगदी सदगदीत. डॉ.कटर लगेच शाहु मोडक, अभि भट्टाचार्य, अरुण गोविल, नितिश मुद्रेत. फक्त बॅग्राउंड वर शंख ध्वनी नसतो.
__________________________________________

असाच एक कार्यक्रम संपवुन 'पोस्ट कुलींग प्रोसेस' ला मी लांब एकटाच बसलेलो.कधी नव्हे तो कार्यक्रमात एक छोटीशी चुक. त्याची व्यथा. प्युन ला न जुमानता एक गृहस्थ येतात.
"सर बहुत अच्छा काम कर रहे हो. लेने से देने मे आनंद रहता है, क्या कहते हो?"
मी गृहस्थाच्या चेहेर्‍याकडे बघतो. चेहेर्‍यावर 'वराह अवतार' दिसत होता.
मला पुढचे ' त्याने काही दिलेल्याचे' नेहमीचे संभाषण नको होते. पण उत्तर देणे भाग होते.
"बाबा रे, बहुतेक जण देव मानतात. पुजा करतात. सर्व आशा आकांक्षा त्या देवाभोवती फिरतात.
कुठेतरी त्या देवत्वाला पोचायची इच्छा बाळगतात. आणि काहीतरी देतात आणि देव बनतात"
"उसमे गलत क्या है"?
" ते मी कशाला ठरवु? मी माणुस आहे आणि मला अवतार व्हायचे नाही. तुम्हाला व्हायचे असेल तर त्याला माझी काहीही हरकत नाही"
हॉस्पिटल मधे असताना माझा एक सहकारी डॉक्टर मला म्हणायचा, "अरे ज्या कामाचे पैसे मी घेतो.
माझ्या सर्व गरजा भागवतो. म्हणुनच ' थँक यु डॉक्टर' प्रोसेस मधुन मला नको. मला खुप त्रास होतो. उद्या काही चुकले तर हेच लोक जोड्याने मारतात. जीव वाचवणे हे माझा व्यवसाय आहे."देव देव खेळ" हा नाही.
जाता जाता: लेखावरील प्रतिसादात तुम्हाला कुठले कुठले 'अवतार' दिसतात?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Sep 2009 - 1:49 pm | घाशीराम कोतवाल १.२

लेखावरील प्रतिसादात तुम्हाला कुठले कुठले 'अवतार' दिसतात?

३७ वाचन एक ही प्रतीसाद नाही मास्तर मला कोरा चांगदेवाचा अवतार दिसतो हो
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

समंजस's picture

23 Sep 2009 - 2:02 pm | समंजस

छान विवेचन!
वर दिल्या प्रमाणे असे अवतार नेहमीच भेटतात. मात्र यांना अवतारपद देतो कोण?

सहज's picture

23 Sep 2009 - 2:09 pm | सहज

>जाता जाता: लेखावरील प्रतिसादात तुम्हाला कुठले कुठले 'अवतार' दिसतात?

>मी गृहस्थाच्या चेहेर्‍याकडे बघतो. चेहेर्‍यावर 'वराह अवतार' दिसत होता.

???

समजले नाही :-(

दशानन's picture

23 Sep 2009 - 6:11 pm | दशानन

खरचं डोक्यावरुन विमान गेलं सर :(

***
राज दरबार.....

विनायक प्रभू's picture

23 Sep 2009 - 7:29 pm | विनायक प्रभू

कारण हा लेख फक्त अवतारी वाचकांसाठी आहे.

अवलिया's picture

23 Sep 2009 - 10:39 pm | अवलिया

मत्स्य
ही मंडळी पाण्यातल्या माशाप्रमाणे राहुन कुणाशीही वैर न करता मदत करतात. यांचे दुःख मात्र समाजाला कधीच कळत नाही. पाण्यातल्या माशाचे अश्रु दिसतात का ?

कुर्म
ही मंडळी पाठीवर मेरु पर्वत धारण करुन मदत करतात. ह्यांच्या सहयोगी वासुकीला मात्र सारे क्रेडीट मिळते.

वराह
नाकाच्या शेंड्यावर पृथ्वी तोलणारा... सगळी जबाबदारी एकटेच उचलणार. पण ... असो.

नरसिंह
सिस्टीममधल्या लुपहोल्सचा आक्रस्ताळेपणा करुन फायदा करुन घेणार, देणार. असतील तर सुत नाहीतर..

वामन
साधारणपणे समाजाकडुन अंडरएस्टीमेट केले जाणारे पण काम करुन मदत करण्यात पटाईत

परशुराम
सुडाच्या आधाराने कल्याण करणारे देव. योग्य हेतु असल्यास समाजाचा फायदा होतो

राम
दिलेला शब्द पाळुन मदत करणार, त्यात कितीही त्रास सहन करावा लागला तरी मागे हटणार नाही.

कृष्ण
सगळ्यात भारी देव. स्वार्थात परमार्थ करणारे... सिस्टीम कशीही असली तरी आपल्याला सोईस्कर करण्यात पटाईत आणि तरीही कुठेही न अडकता मदत करणार, फायदा करुन घेणार, देणार

बुद्ध
काय सांगावे यांच्याबद्दल. सगळ्याच्या पलिकडे गेलेले. सुखदुःख शोकआनंदाच्या पलीकडे गेलेले महान देव.

कल्की
भविष्यकालात होणारा कसा असेल सांगता येत नाही, सबब टिपण्णी करणे शक्य नाही.

याशिवाय हयग्रीव, मोहीनी वगैरे अनेक फुटकळ अवतार आहेत. त्यांचे प्रयोजन जिज्ञासुंनी आपल्या बुद्धीआधारावर लावावे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

संजय अभ्यंकर's picture

23 Sep 2009 - 11:05 pm | संजय अभ्यंकर

बाबारे, एवढ्या व्याख्या (डेफिनेशन्स) सुचल्या कशा?
मास्तरांची ट्यूशन लावली काय?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

राजे,
+१ .. एकदम सहमत,
लेख वाचताच अस्मादिकांचा "बळी" झाला, थेट अज्ञाताच्या गुढ अंधकारात ढकलुन दीले.

मास्तर,
शिकवणी लावावी म्हणतो, वेळ आहे का?