'स्पर्श के नियम 'ह्या पुस्तिकेचे प्रसारण करणार्या न्यायमुर्ती ना माझा सलाम.
ओंगळवाणे आणि नको असलेले स्पर्श फक्त मुलींच्याच वाट्याला येतात हा एक मोठा गैरसमज.
__________________________________________________________
साल १९७०
वय १७
स॑काळची ६.१५ ची अंबरनाथ वरुन येणारी लोकल.
खच्चुन भरलेली.
आधी ओझरता.
नंतर थोड्या दिवसांनी जवळीक साधणारा.
काही दिवसांनी थेट
किळसवाणा, ओकारी आणणारा.
कुणाला सांगायचे.
गोंधळ.
मित्राला सांगायची हिंमत नाही.
हे फक्त आपल्यालाच होते आहे का?
कसे विचारु?
माझ्यातच काही कमी आहे का?
बर, प्रश्न स्वःत सोडवायची हिंमत नाही.
आडदांड दिसणारा ४० वर्षाचा पुरुष
डबा बदलला.
पण पाठलाग सुरुच.
नंतर हिंमत करुन आईला विचारले.
निरक्षर आई पण हिंमतवान.
हसली.
" घाबरु नकोस"
एक सुई दिली.
कपड्यात गुंडाळलेली.
सुईच्या टोकावर एक छोटासा कागद.
मला इजा होउ नये म्हणुन.
" खिशात ठेव"
"परत हात जवळ आला की कागद काढ, जोरात टोच"
"चेहेरा निर्विकार ठेव"
"परत कधी वाट्यास येणार नाही"
तीच लोकल.
तोच माणुस.
फरक होता तो सुईच्या टोचण्याचा
आणि टोचल्यावर उठलेल्या अखंड वेदनेचा.
दुसर्या दिवशी पासुन सर्व काही सुरळीत.
___________________________________________________________
वरील पुस्तकाच्या फक्त दिल्ली आणि आजुबाजुच्या प्रदेशासाठी प्रायोगिक तत्वावर फक्त १००० प्रती उपलब्ध होणार आहेत.
बरोबर एक डीस्क पण आहे.
बघु एखादी प्रत मिळते का.
देईन शाळेच्या मुख्याध्यपकांना. पलकांना आणि मुलांना देण्याकरता.
आजही वेगवेगळ्या पातळीवर ५३% मुलांना ह्या जाचाला तोंड द्यावे लागते असे भारत सरकारचे सर्वेक्षण आहे. ह्या स्पर्शाने सुरुवात आणि शेवटची पातळी म्हणजे बलात्कार.
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 3:28 pm | अवलिया
कळवा ...पुस्तकात किंवा डिस्कमधे काही वेगळे असेल तर...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 5:20 pm | दशानन
असेच म्हणतो...
***
राज दरबार.....
21 Sep 2009 - 3:48 pm | विनायक प्रभू
वेगळे तसे काहीही नाही.
पण साधे आणि सोपे सादरीकरण आहे.
पालकांना आणि मुलांना समजणारे
21 Sep 2009 - 6:19 pm | सहज
चांगले आहे.
21 Sep 2009 - 5:22 pm | स्वाती२
उशीरा का होईना जाग आली हेही नसे थोडके.
21 Sep 2009 - 10:19 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
22 Sep 2009 - 2:57 am | पाषाणभेद
मास्तर, चालुद्या तुमचे, पण 'केनियम' मध्ये सुईच्या टोकाईतके अंतर सोडा. मला 'केनियम' वाचून काहीतरी धातू (आपले मेटल हो) आहे की काय, काहीतरी काळेसाहेबांसारखा फोटो बिटो टाकलात का ते वाटले.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
22 Sep 2009 - 11:35 am | कानडाऊ योगेशु
केनियम वरुन मलाही युरेनियम वगैरेंसारख्या काहीतरी मूलद्रव्याबाबतीत लेख असावा असे वाटले.(काळेसाहेबांच अ.का.खान संबधित लेख मनात ताजा होता.)
सुईच्या टोकाईतके वरुन मला महाभारत आठवले.