रसूल अल्लाह आणि तो

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
14 Sep 2009 - 12:39 am

रसूल अल्लाह या बंदिशीचा जालावरील धागा मिळविण्यासाठी चर्चा टाकाली होती. ही बंदिश मिळेल का नाही ही शंकाच होती. ती मिळाली. त्यासाठी हुप्प्याचे विशेष आभार!
या बंदिशीने मला खूप पूर्वीपासून वेड लावले आहे. या विषयावर असंख्य मिपाकरांचे प्रतिसाद मिळाले. त्यावरून रसूल अल्लाह बंदिशीवर लोक किती प्रेम करतात, हेच दिसून आले. त्यामुळे मला या संबंधीचा एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. हा किस्सा मी फारसा कुणाला सांगितलेला नाही....
एकदा रात्रपाळीचे काम उरकून आम्ही तिघेजण (त्यातील एक मिपाकर आहेत.) आत्म"शांती' करण्यास बसलो होतो. अर्थातच हॉटेलमध्ये. आमची संगीतावर चर्चा सुरू झाली. मध्येच मी काही गुणगुणत असे. आमच्या गप्पा ऐकून माझ्या पाठच्या टेबलवर बसलेल्या एका इसमाने आम्हाला हटकले. आम्हाला वाटले कदाचित आमच्या गप्पांचा त्याला त्रास होत असेल. परंतु त्याने गप्पात सहभागी करून घेण्याची विनंती केली.
शहाजोग. म्हटलं, जॉइन व्हायचं असेल तर गाणं म्हणून दाखवावं लागेल. महाशय त्यालाही तयार झाले. म्हणाले, चालेल.
आमची पंचायत. वाटलं, टेबलावर आला, तर हा आपल्यातल्या दोन पेगची नक्कीच वाट लावणार. म्हणूनच आम्ही त्याला गप्पात सामील करून घेण्यास फारसे उत्सुक नव्हतो. पण स्वारी "पेटलेली'च होती काही करून ऐकेनाच.
त्याला टाळण्यासाठी मी आणखीच शहाजोगपणा केला. म्हटलं, तुला काय येतं संगीतातलं. तर म्हटला साहेब तुम्ही फर्माईश करा.
माझी अल्पबुद्धी. वाटलं ह्याला येऊन येऊन काय येणार आणि हा काय गाणं गाणार. मी त्याला मानभावीपणे विचारलं, तुला हृदयनाथ मंगेशकर माहीत आहेत का? त्यानं माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि नम्रपणे म्हणाले, थोडेफार माहीत आहेत.
तो थोडेफार म्हटल्या म्हटल्या मी विचार केला त्याला आता एकाच "गुगली'त आऊट करू. म्हटलं, ये बाबा बस इथे (खुर्चीवर).
तो बसला. म्हटलं, काय ऐकवतोस.
"साहेब तुम्ही सांगा'
नाही तूच गाऊन दाखव एखादं गाणं, मी पुन्हा शहाजोगपणा केला.
"साहेब तुम्ही फर्माइश करा,' त्याचा हट्ट कायम होता.
यायला म्हटलं याची दांडीच काढतो.
"रसूल अल्लाह म्हण' मी त्याला सांगितलं
वाटलं त्याला ही बंदिश माहितीही नसेल. पण.....
खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता.
माझीच लाज वाटली. माझीच विकेट त्याने अगदी "शांती'त काढली होती.
त्याचा आवाजातला तो दर्द मी आजही महसूस करतो.
---
त्यानं गाणं संपवलं आणि बाहेर हॉटेलच्या दारावर पोलिसाची लाठी आपटली. तशी त्यानं खुशकीच्या मार्गाने कल्टी मारली.
नंतर मी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला; पण तो काही सापडला नाही.
माझं दुदैवच म्हणायचं!

तळटीप : "शांती' शब्दाला कोट केवळ मिपावरील आमच्या एका मित्राला समजण्यासाठी..

संगीतअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2009 - 12:49 am | भडकमकर मास्तर

मस्त गोष्ट .. अगदी त्रिफळाचित
आवडली....

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विसोबा खेचर's picture

14 Sep 2009 - 1:33 am | विसोबा खेचर

खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता.

खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! :)

मस्त अनुभव...!

त्या अज्ञात गवयाला माझा प्रणाम!

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2009 - 1:48 am | भडकमकर मास्तर

एक शंका.. तो माणूस स्वतःच्या वाहनाने स्वतः वाहन चालवत घरी गेला की सध्या कलम १८५ वाहतूक कायद्याला घाबरून असतो रे बाबा, असे म्हणत रिक्षा बिक्षाने घरी गेला?

____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चतुरंग's picture

14 Sep 2009 - 1:50 am | चतुरंग

आपली ही लहान शंका एकदमच जबरा बरं का मास्तर!! ;)

(वाहतूक नियंत्रक)चतुरंग

श्रावण मोडक's picture

14 Sep 2009 - 2:58 am | श्रावण मोडक
खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता.

खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! Smile
मस्त अनुभव...!

सहमत!!! त्या गवयाला सलाम.

सहज's picture

14 Sep 2009 - 8:45 am | सहज

त्या अनामिक गवयाला व तसेच एक प्रांजळ आठवण लिहल्याबद्दल अन्वयराव तुम्हालापण!

अन्वय's picture

15 Sep 2009 - 12:16 am | अन्वय

या मित्रांमध्ये एक जण पेगबरोबर हिरवी मिर्ची आणि आलं चवीनं खाणारा एकजण होता

म्हंजे तोही आमचा मित्रच होता

त्याची सवय सांगितली , बाकी काही नाय