नुकताच सुट्ट्यांमध्ये बालीला जायचा योग आला. तसं पुलंचं पुर्वरंग वाचल्यापासून बाली कायम डोक्यात घर करुन होतंच पण शेवटी योग यावा लागतो. यावेळी मात्र महाजालावरून विमान आणि हॉटेल बुकिंग करूनच टाकलं आणि सहकुटुंब बालीला जाउन आलो. या ट्रीपचा हा सचित्र वृत्तांत.
देनपसार विमानतळावर उतरण्यापुर्वी विमानातून दिसणारा हा अगुंग पर्वत. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे. १९६३-६४ साली याचा उद्रेक झाला होता.
रामायणावरील सुप्रसिद्ध केचक नृत्यनाटिका. असं म्हणतात कि बालीत एकच कुठली गोष्ट पहायची झाली तर केचक पहावं.
चिकन राईस बाली स्टाईल.
बालीत चौका-चौकात हिंदू देवदेवतांचे पुतळे उभारलेत.
हा भीम. गंमत म्हणजे इथे सर्व पुतळे व मुर्त्यांना लुंग्या नेसवतात,
विनिता देवी. मला या देवीबद्दल बालीतच कळलं. (कसली देवी याची मात्र कल्पना नाही!)
विष्णू
उलुवाटू मंदीर.
बैसाखी मंदीर. ही बालीची काशी आहे. याला ’मदर टेंपल’ म्हणतात.
"
बालीतील घरांचं आणि देवळांचं वैशिष्ठ्य म्हणजे इथे या वास्तुंपेक्षा कुंपणांच्या भिंतींवर जास्त कारागिरी केलेली आढळते. देवदेवतांच्या मुर्ती मात्र गाभारा सोडून सर्वत्र आढळतात.
बैसाखीच्या देवळात तर गणपतीची मुर्ती दारात जय-विजयांच्या जागी आढळली.
इथे गाभाऱ्यात मुर्तीऐवजी काही भांडी आणि त्यात काही मौल्यवान खडे ठेवण्याची पद्धत आहे.
सूर्यास्त उलुवाटू
सूर्यास्त कूटा बीच
बाली नृत्यांगना
देवळात आलेलं एक नवपरिणित जोडपं.
उलुंदानु मंदीर. इंडोनेशियन करंसीवर या मंदीराचं चित्र आहे.
तानालॉट. Temple on the seas. बालीचा सुप्रसिद्ध Tourist Spot.
काही धर्मिक विधींनंतर नदीला विविध वस्तू अर्पण करायला निघालेल्या स्त्रिया.
धार्मिक समारंभांच्या दिवशी घरासमोर केली जाणारी बांबूची आरास.
हस्तकला बाजार.
बारोंग मुखवटा.
बालीतील काही लॅंडस्केप्स.
प्रतिक्रिया
13 Sep 2009 - 10:56 pm | बेसनलाडू
याबरोबरच बाली मधील आपल्या वास्तव्यादरम्यान आपल्याला आलेले संस्कृती, लोकजीवन, राहणीमान इ. बद्दलचे काहीसे सविस्तर निरीक्षण/अनुभवकथन वाचायला आवडेल.
(पर्यटक)बेसनलाडू
14 Sep 2009 - 1:05 am | श्रावण मोडक
सहमत. जरूर लिहा.
14 Sep 2009 - 2:19 pm | विशाल कुलकर्णी
खुप सुंदर छायाचित्रे ! अनुभव जरुर लिहा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Sep 2009 - 11:00 pm | अभिजा
छान फोटो! बसल्या बसल्या बालीची सहल झाली:-)
14 Sep 2009 - 12:00 am | रेवती
आपली बाली ट्रिप छानच झालेली दिसते. फोटो चांगले आलेत.
वेगळं राहणीमान आणि चालीरिती फोटूतून का होइना पहायला मिळाल्या.
रेवती
14 Sep 2009 - 12:24 am | टारझन
आहाहा ... फोटू तर के व ळ प्र ति म आहेतंच ..
पण नृत्यांगणा तर " ह्यांच्यावर आमचा फार जीव " म्हणण्यासारख्या आहेत ...
जायलाच हवं एकदा ;)
-(णृत्यांगणाप्रेमी) टारोबा डांसर
14 Sep 2009 - 12:31 am | प्रभाकर पेठकर
सुंदर चित्रप्रवास. अभिनंदन.
एकूण बालीच्या ट्रीप बद्दल एखादा लेख पाडावा.
खर्चासहित बित्तंबातमी मिळाली तर बालीला भेट देण्यासंबंधी कांही ठोस निर्णय घेता येईल.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
14 Sep 2009 - 1:22 am | दिपाली पाटिल
सुरेख फोटो, ते जोडपं, नृत्यांगना, बांबूची आरास आणि मुख्य म्हणजे इतक्या वस्तुंनी भरलेली दुकानं :D , सगळंच एकदम मस्त....
दिपाली :)
14 Sep 2009 - 1:34 am | नंदन
आलेत सगळेच फोटोज. अधिक विस्ताराने प्रवासाबद्दल लिहिलेत तर फारच छान.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Sep 2009 - 3:30 am | मीनल
सुंदर बाली !!
आशिया मधे खूप काही बघण्यासारख आहे ज्या पुढे अमेरिका/ युरोप पार थिट पडत.
मीनल.
14 Sep 2009 - 3:54 am | सुबक ठेंगणी
सगळे फोटो अव्वल! बाकी सगळे म्हणतात तसंच आपले शब्दांकित अनुभवही वाचायला आवडतील :) आशिया किती colorful आहे असं पुन्हा वाटून गेलं.
मला वाटतं की विनिता म्हणजे गरुडाची आई...कारण गरुडाला संस्कृतमधे वैनतेय म्हणतात.
14 Sep 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरं आहे ... फोटो पाहिल्यावर हेच वाटत होतं, आशिया खूपच रंगीबेरंगी आहे ...
बालीला जायलाच हवं, एकदातरी.
अदिती
16 Sep 2009 - 8:25 am | चित्रा
असेच म्हणते.
बाली आवडले. नवपरिणित जोडप्याची वेषभूषा आणि चेहर्यावरचे भाव आवडले.
14 Sep 2009 - 5:29 am | प्राजु
डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो...!
अतिशय सुरेख!!
यासोबत आपल्या प्रवासाचं वर्णनही वाचायला आवडेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Sep 2009 - 7:00 am | विसोबा खेचर
नेमके हेच बोल्तो....
नंदूशेठ, जियो....!
तात्या.
14 Sep 2009 - 8:08 pm | सूहास (not verified)
बाकी छान फोटोज..
सू हा स...
14 Sep 2009 - 6:23 am | वैशाली हसमनीस
आपले बालीचे फोटो फारच आवडले.दुसर्या लेखात तिथले वर्णन वाचायला आवडेल.पु.लंच्या भाषेत्'बाली हा समुद्रात फेकलेल्या पाचूंच्या बेटांतील कंठ्यातील कंठमणी' ! इथून जवळ असल्यामुळे तिथे जाण्याचा विचार आहे,आपल्या फोटोंमुळे तो पक्का झाला.
14 Sep 2009 - 6:53 am | प्रियाली
फोटो अप्रतिम आहेत. फारच आवडले. बालीतील केचक नृत्याबद्दल यापूर्वी वाचले होते आता फोटोंतून बघताही आले. सोबत अनुभवही असते तर आवडले असते.
विनिता हे देवीचे नाव आहे का विनता हे? विनता ही गरुडाची आई. सर्पजमातीची प्रत्यक्ष नसली तरी गरुडामुळे शत्रू. चित्रातील देवीच्या पायाशी सर्प आहेत असे दिसते पण ती त्यांवर विजय मिळवते असे दर्शवले आहे की ते तिचे वाहन, भक्त इ. आहेत हे कळून येत नाही.
14 Sep 2009 - 7:01 am | चतुरंग
विनता आहे त्यामुळे तो वैनतेय.
हिंदी विकीवरचा संदर्भ.
चतुरंग
14 Sep 2009 - 8:05 am | विसोबा खेचर
करेक्ट!
वैनतेयाची भरारी काय मशका साधते
का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते...
संदर्भ - गीत रामायण.
आपला,
(गदिमा प्रेमी) तात्या.
14 Sep 2009 - 7:02 am | मदनबाण
सर्वच फोटो सुंदर आहेत... :)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
14 Sep 2009 - 8:11 am | लवंगी
वाचल्यापासून मलापण बाली बघायची खूप इच्छा आहे. हे फोटो पाहून या पाचूच्या बेटाला भेट द्यायची इच्छा अजुन प्रबळ झाली. फोटो जबरदस्त.
14 Sep 2009 - 8:03 am | सहज
फोटो उत्तम.
उलूवाटू जवळच्या माकडांनी काही त्रास दिला का? अजुन कुठले बालीनीज खाद्यप्रकार "इकान बाकार" वगैरे? गिटगीट धबधबा बघीतला का?
किती जणांनी भारतातुन आलात ऐकल्यावर शाहरुख, बॉलीवूड हॅ हॅ हॅ केले? :-) अभिनेता शाहरुक खानवर भारी जीव हो बालीनीज बायकांचा :-)
लोक एकंदर अतिशय हसतमुख, मदतीला तयार. हिंदू धार्मीक इतकी स्वच्छ देवळे व त्यांची सुंदर सजावट, देखरेख, पुजापाठ तर मी भारतात पण.... हॅ हॅ हॅ फूल्ल परवानगी आहे भौ बाली आमचे बहुसंख्य हिंदू नगर आहे, काय समजलात!
आहाहा! काय आठवणी जाग्या केल्यात नंदूभौ! एक दिवस तर सगळ्यांना केचक डॉन्स, बाजारहाट पाठवुन मी व बाप्पा आमच्या अलिशान व्हिलामधे जीवनाचा आनंद लुटत होतो. कोण आहे रे तिकडे, समोरच्या झाडावर चढून शहाळे काढून द्या, कोण आहे रे तिकडे संध्याकाळच्या बारबेक्यु भोजनाची व्यवस्था करा इ इ बाली मधे पूलसाईड एकांत ओहोहो मंडळी स्वर्ग स्वर्ग...
बाकी बालीमधील चिमणी अगदी भारतातल्या चिमणीसारखीच दिसली. काही लहान पोरं शेतात पतंग उडवत होती. हिरवीगार डौलदार भातशेतं, खड्डेविरहीत रस्ते, कष्टकरी शेतकरी, शेतात बुजगावणी, सहज उपलब्ध बियर बिंतांग, उत्कृष्ठ भोजन, प्रायव्हेट स्पा वॉचिंग सनसेट, वगैरे वगैरे :-)
14 Sep 2009 - 10:53 am | अवलिया
निस्ते हॅ हॅ हॅ करुन सहमतीच्या परतिक्रिया देता कधी कधी लिव्हा पण..म्हंजी कळल आमच्यासारक्या अडाण्यांना कुट काय असतं ते..
नंदुभौ... दिल खुश !!!!! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Sep 2009 - 8:08 am | पाषाणभेद
एकदम मस्त फोटू की रं बाला!
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
14 Sep 2009 - 9:03 am | दशानन
वाह !
अतीसुंदर !
आवडले बरं का बालीदर्शन ;)
14 Sep 2009 - 10:40 am | अभिज्ञ
सुंदर छायाचित्रे.
बाली-इंडोनेशियातील हिंदु संस्कृतीबद्दल आणखीन माहिति अर्थातच तिथल्या चालीरिती, सण वगैरे ह्याबद्दल व तसेच
इथे पिढ्यानपिढ्या पोसलेला जाती आधारित हिंदु धर्म भारताबाहेर थेट बाली मध्ये कोणत्या अवस्थेत आहे का तिथेहि जातपात वगैरे भानगडी आहेत का हे वाचायला आवडेल.
अभिज्ञ.
14 Sep 2009 - 10:45 am | दिपक
अ प्र ति म !
14 Sep 2009 - 12:21 pm | भाग्यश्री कुलकर्णी
फोटो फारच छान आहेत्.बाली विषयी वाचायला आवडेल.
14 Sep 2009 - 2:23 pm | मनीषा
तानालॉट हे बहुदा शेषनाग आणि विष्णु चे मंदीर आहे ..
आम्ही तेथे अनुभवलेला सूर्यास्त अविस्मरणीय होता ..
14 Sep 2009 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय अप्रतिम. अजून नीट लिहा हो बाली बद्दल. छायाचित्रं पाहून जबरी दिलखुश झाला.
बिपिन कार्यकर्ते
14 Sep 2009 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच हो नंदुशेठ !
बसल्याजागी समग्र बालीदर्शन घडवलेत, धन्यवाद.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Sep 2009 - 4:30 pm | चतुरंग
'बालीदर्शन' असे घरबसल्या व्हायचा योग येईल असे वाटले नव्हते!
अतिशय नयनरम्य फोटू आहेत. वरती अनेकजणांनी विनंती केली आहे तसेच म्हणतो की तिथल्या संस्कृतीबद्दल, रहाणीमानाबद्दल, चालीरीतींबद्दल लिहिता आले तर फारच उत्तम.
(विमानतळाचं नाव 'देनपसार' किती छान आहे ना? मी आधी 'प्लेनपसार' असं वाचलं. ;) )
('बाली'मय)चतुरंग
14 Sep 2009 - 6:09 pm | क्रान्ति
सुरेख फोटो! विनिता देवीची मूर्ती तर केवळ अप्रतिम आहे!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
14 Sep 2009 - 8:21 pm | अजिंक्य
सुंदर फोटो, बालीची सफरच घडवून आणलीत.
आता आपले अनुभवही लिहावेत.
अजिंक्य.
14 Sep 2009 - 8:31 pm | नंदू
तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल मन:पुर्वक धन्यवाद. माझं हे पहिलच लिखाण (याला लिखाण का म्हणावं हा पण प्रश्नच आहे म्हणा) असल्यामुळे जरा गंम्मत वाटतेय. असो.
मला लिहीताना पण हे जाणवतच होतं की माहिती फारच त्रोटक होत्येय. लवकरच माझ्या या बाली प्रवासावर एक छोटासा वर्णनात्मक लेख नक्क्कीच लिहीन(पाडीन).
तुमच्या दिलखुलास प्रतिक्रियांनी उत्साहित
नंदू
15 Sep 2009 - 6:29 pm | मॅन्ड्रेक
at and post : janadu.