(मिसळपावीय स्वयंभोचक संघ )

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
9 Sep 2009 - 6:29 pm
गाभा: 

मिसळपाव स्वयंभोचक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे.
३०% मध्ये विलीन व्हायचे/अनिवासींवर वर अंकुश ठेवायचे/ अनिवासींचे चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
मिसळपाव स्वयंभोचक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी शेकडा खेकडा नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. हिन आणी हिणकस पक्षाच्या अवांतर सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या चांदणीच्या करिश्माच्या आणि चप्पल घालायच्या सहानभुतीच्या लाटेत 'अनवाणी' या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती.
३०% सरकारच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात शेकडा खेकडाने जाहीररित्या कंपु खेकड्याचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
पण नन्तर राजकारणात वैचारीक आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे अवांतर अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. शेकडा खेकडा म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र शेकडा खेकडातर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
मिपा राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे शेकडा खेकडा नव्हे. संघ म्हणजे हि & हि परिषद नव्हे संघ म्हणजे अवांतर दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी?
चप्पल हल्ल्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण चप्पलांचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. शेकडा खेकडाच्या राजकीय फायद्या साठी चपलांचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते .
दुर्दैवाने चप्पल स्ट्रेटेजी अनवाण्यांनी पाडली. ( संघाचा अनवाण्यांशी संबन्ध नाही)
आणि तो मुद्दा शेकडा खेकडाच्या हातून निसटला.
शेकडा खेकडा सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच भोचकसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी चांदण्यांना विरोध कर त्यासाठी स्वतःचे खाते डिलीट करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी भेळवाल्याला विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत मिपात शेकडा खेकडाने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. अवांतर प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर शेकडा खेकडाच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले.
मध्यन्तरी दुसर्‍या भेळेच्या दुकानात जाऊन भोचकसेवकांनी भेळवाल्याची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. काही भोचकसेवकांनी चांदणी काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंभोचकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
स्वातंत्र्यानन्तर दोन वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंभोचकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य सदस्यांना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंभोचक तयार होत नाहीत.
मिसळपाव स्वयंभोचक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य सदस्याचे हे मत आहे.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

9 Sep 2009 - 6:36 pm | लिखाळ

हा हा हा .. कमाल केलीस :)
फर्मास.. मजा आली...

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

दशानन's picture

9 Sep 2009 - 6:38 pm | दशानन

=))

लै भारी रे परा..... !

>>संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य सदस्यांना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंभोचक तयार होत नाहीत.

+ १

१००% सहमत.

अवलिया's picture

9 Sep 2009 - 6:40 pm | अवलिया

वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य सदस्याचे ( सदस्य एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली.

३०% मध्ये विलीन व्हायचे/अनिवासींवर वर अंकुश ठेवायचे/ अनिवासींचे चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.

ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य !

ज्यांना भोचकसंघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का?

असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या २ वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता?

मागे कुणीतरी म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार?

- नानाशांत

============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 6:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळपाव स्वयंभोचक संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. मिपाप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू खरडवह्यांमधून पाजले जाते. अविचारी विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच मिपाप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने मिपाच्या सिद्धहस्त लेखकांत भरती व्हावे. मि.स्व.संघ मैत्री-बित्री मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी मि.स्व.संघाचा प्रभाव एका विशीष्ठ टक्के लोकांवरच असतो. (कुठल्याही धाग्यातील बहुतांश प्रतिसादक पाहा). आजकाल इतर दालनांत जाऊन संख्या वाढवण्यासाठी या टक्क्यांच्या बाहेरच्या लोकांनाही प्रतिसाद दिले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा आपल्या टक्क्यातील लोकांनाच मिपावर वर काढणे हाच आहे.

प्रतिसादमात्र

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2009 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

एका सामान्यसदस्याने ही मते व्यक्त केली आहेत.
त्या सस्याला संघ नक्की काय कार्य करतो ते ठाऊक व्हावे ही अपेक्षा आहे. त्या सदस्याची मते जशीच्यातशी दिली आहेत.
संघाची भूमिका स्पष्ट करु शकत असाल तर बरे होईल अशी त्या सदस्याची अपेक्षा आहे.
त्या सदस्याची मते ही वैचारीक दिवाळखोरी असू शकेल पण त्याबद्दल आपण त्याला नीट महिती सांगु शकतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

अवलिया's picture

9 Sep 2009 - 6:51 pm | अवलिया

माफ करा मात्र ही एका सामान्य सदस्याची मते नाहीतच. सामान्य सदस्य हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे.

लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात.

भोचक संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्‍या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना?

भोचक संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ खरडी लिहून विचारल असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते.

त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना?

- नानाशांत

============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2009 - 6:51 pm | परिकथेतील राजकुमार

वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या सदस्याने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे.
निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित पिसाळप्रेमी दलाचा कार्यकर्ताही असू शकेल

पराभाऊ

अवलिया's picture

9 Sep 2009 - 6:55 pm | अवलिया

लेखातील वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक भोचक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं.

खरं तर भोचक संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना भोचक संघाच्या अवांतर क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय?

- (आनंदीत) नानाशांत

============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नीलकांत's picture

9 Sep 2009 - 6:52 pm | नीलकांत

सहमत आहेच.... :)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2009 - 8:32 pm | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो.. लेख शिक्षकीय सहमतीच्या प्रतिक्षेत होता असे कळले... खाजगी वितरणाच्या प्रतित वाचयला मागितला होता, पण तोवर बोर्डावर आला.. भोचक संघात खरोखरची लोकशाही आहे हे खरे. असो.
प्रा. पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

निखिल देशपांडे's picture

9 Sep 2009 - 6:44 pm | निखिल देशपांडे

संघ ही एक अतिरेकी संघटणा आहे

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

श्रावण मोडक's picture

9 Sep 2009 - 6:47 pm | श्रावण मोडक

झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार?
स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय!
वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन.
ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील लेखातील विनोदाने हसू येईल.
सर्वसामान्य सदस्य हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे.
आधीच उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय?
"अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"
आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.

सूहास's picture

9 Sep 2009 - 6:48 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

क ह र.......

सू हा स...

सहज's picture

9 Sep 2009 - 6:50 pm | सहज

द ण क्या त पु न रा ग म न!!!

अव्वल नंबर!

नंदन's picture

9 Sep 2009 - 6:49 pm | नंदन

लेख वाचून अंमळ हळवा झालो. आयटी प्रोफेशनल्स आणि अवांतर प्रतिसादकर्त्यांना पाकिस्तानात हाकलून देण्याच्या आंदोलनाबद्दल सोयीस्कर मौन बाळगलेले पाहून फॉक्स न्यूजची आठवण आली. येत्या दुर्गापूजेत आमचे एक परममित्र या विषयावर कमान उभारणार आहेत (तृतीय पारितोषिकप्राप्त). तोवर याबद्दल निषेध म्हणून तुम्हांला व्यनितून निषेधाचे खलिते आणि पोस्टातून कॉकटेलसाठी हाबानेरो मिरच्या धाडण्यात येत आहेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 6:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडक्यात नेहमीप्रमाणे काही विवक्षित लोकांनी, काही विवक्षित लोकांसाठी काही विवक्षित विषयांची टवाळकी करुन त्यांचे विवक्षित प्रकारे मनोरंजन व्हावे ह्याच विवक्षित हेतुसाठी साठी काढलेला धागा होता तर ....
असो, "लोकशाही"ची व्याख्याच ही आहे.
चालु द्यात ...

------
(येनकेन प्रकारे कंपूबाज) तोटा धाम

विसोबा खेचर's picture

9 Sep 2009 - 6:49 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Sep 2009 - 6:49 pm | बिपिन कार्यकर्ते

बरेच काही नवे वाचायला मिळाले.
लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो.
तुर्तास ही पोच समजावी ..

विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ...

------

मोठा कोण

... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

नितिन थत्ते's picture

13 Sep 2009 - 12:15 pm | नितिन थत्ते

>>विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ...

'विकृत' प्रतिक्रियेसाठी असे वाचले. =))

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2009 - 12:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीहीही ..

भलत्या ठिकाणी भलतंच वाचणार्‍या पूर्वीच्या खराट्याचा फुसका निषेध! लगे रहो ... ;-)

अदिती

नितिन थत्ते's picture

13 Sep 2009 - 12:37 pm | नितिन थत्ते

मनावर विकृत बुद्धिवादाची इस्त्री फिरल्याने असे होत असावे.
(परक्या देशातील- अरबस्तानातील लोकांची बाजू घेऊन माझा निषेध केल्याबद्दल निषेध) :)

(सपाट) नितिन थत्ते

संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच. :)

- धमाल मुलगा
(भक्ष्य)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2009 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही हसुन लोळणाररी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 7:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रा.डॉ., तिरका प्रतिसाद दिलात खरा ... पण ब्लॉककोटमधलं वाक्य अंमळ चुकलंच!

अदिती .. मरत्ये आता!

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 7:08 pm | धमाल मुलगा

च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं भक्ष्य म्हणालो की दुर्लक्ष्य :?

लै भारी... !

जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब :)

-II खाजे II

दशानन's picture

9 Sep 2009 - 7:49 pm | दशानन

साद व्यवस्थित कळला. आणि बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही विचार करणारी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.

व्हिस्कि मात्र

श्रावण मोडक's picture

9 Sep 2009 - 7:05 pm | श्रावण मोडक

कन्फ्यूज्ड बघा तुम्ही. कधी तरी 'फ्यूज' व्हा. अशा स्थितीत रणनीती कसली ठरवणार हो? रणनीती वगैरे शब्दांसाठी फ्यूज्ड असावं लागतं मालक.

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 7:35 pm | धमाल मुलगा

ते आमच्या हातात नाही हो.
आम्ही फक्त पेपरं वाचतो आणी आर्डर घेतो.

(अन्फ्युज्ड) धमाल.

श्रावण मोडक's picture

9 Sep 2009 - 7:40 pm | श्रावण मोडक

अर्धवट माहिती देऊ नका. आणखी एक गोष्ट तुम्ही करता. संप!!!

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2009 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

संघवाले नक्की काय करतात ह्यावर कोणी संघवाला प्रकाश टाकु शकेल काय? पुर्वी प्रतिसादात अवांतर चड्डी(अवैचारिकच असणार बहुतेक!) घालून हे लोक कवायत करताना दिसायचे.सध्या ते दिसत नाहीत्.त्यांचे खरड कार्य पण आहे असे ऐकून आहे पण काहीच माहिती नाही.सदस्यात अफवा पसरवण्यात ही मंडळी उस्ताद आहेत असेही ऐकून आहे.क्रुपया माहितगारांनी प्रकाश टाकावा.

भरित

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Sep 2009 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

संघवाले नक्की काय करतात ह्यावर कोणी संघवाला प्रकाश टाकु शकेल काय?

या बद्दल संघाची नाडी बघून कळेल का?

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

9 Sep 2009 - 7:42 pm | अवलिया

त्यासाठी तुम्हाला सोईच्या नाडी केंद्रात जावे लागेल

--नानाकांत ठोक
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

भोचक संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.

-नाराज बटाटे
(ठुस्स)
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 7:03 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 7:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भौ, भलतेच भडक भोचक आहात हो तुम्ही! हसतानाही त्रिकोणी झेंडा!!

अदिती

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 7:39 pm | धमाल मुलगा

जसं वारं फिरेल तशी टोपी फिरवणं जमतं आम्हाला..म्हणुनच टिकून आहोत.

(३_१४ फजीती) ध.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 7:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे, म्हणजे तुम्ही ७०%तले नाही? तुम्ही शेखेचे समर्थक नाहीत?? अरेरे ...

असो.

कमाल पोरगी

यशोधरा's picture

9 Sep 2009 - 7:04 pm | यशोधरा

=))

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 7:10 pm | धमाल मुलगा

स्वातंत्र्यानन्तर दोन वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंभोचकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य सदस्यांना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंभोचक तयार होत नाहीत.
मिसळपाव स्वयंभोचक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे

ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं.

खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय? :)

-(आनंदीत) धमालकांत

दशानन's picture

9 Sep 2009 - 7:12 pm | दशानन

एकुणच प्रशासनाला विद्वत्तापुर्ण काथ्याकुटांचे वावडे आहे असे दिसते.

राजत्सु

सुधीर काळे's picture

12 Sep 2009 - 9:44 pm | सुधीर काळे

तुमची राजत्सु ही नवी सही आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. पण शुद्धलेखनात चूक झाली आहे का? 'रुजुत्सु' ऐवजी 'राजत्सु' लिहिलय का तुम्ही?
मिस्कीलपणा आवडला.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

sujay's picture

9 Sep 2009 - 7:30 pm | sujay

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Sep 2009 - 7:36 pm | ब्रिटिश टिंग्या

आज बुधवार आहे ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2009 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय एकांगी लेख आहे.
स्वयंभोचक संघाबद्द काही जास्ती माहिती नसली तरी जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे...
बाकी चालूद्या.

- (सर्वव्यापी)-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

9 Sep 2009 - 8:01 pm | श्रावण मोडक

शेवटी ही 'कथा प्रवृत्ती निवृत्तीची' आहे!!!

धमाल मुलगा's picture

9 Sep 2009 - 8:06 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

अग्गायायायायायायाया..........
हसुन हसुन मेलोय मी!!!!

खरंय..ही प्रवृत्ती निवृत्तीचीच दिसतेय..
खुठाय माझा ब्रँड न्यु मरुत्सखा???? ;)

ओ अजुन च्यायला पत्रिका, ग्रह युत्या ह्यातलं कसं काहीच नाही आलं?

प्रभो's picture

9 Sep 2009 - 8:03 pm | प्रभो

एवढ्चं माहितीय कि ७०% 'पडले' की आपण पास होतो....
आणी च्यायला आपण जिंदगीभर नापासच.....

परिकथेतील राजकुमार's picture

12 Sep 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

लेख पुनःप्रकाशीत केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

बाळ्कोबा's picture

12 Sep 2009 - 12:42 pm | बाळ्कोबा

मी तरी फर्स्ट ट्यम वाचला......इतको हसूक इलो च्यायला टंकायला दिसेना इतकं पाणी डोळ्यात.....:)

पारंबीचा भापू's picture

12 Sep 2009 - 2:59 pm | पारंबीचा भापू

लेख वाचला पण समजला नाही. बहुदा उपरोधिक असावा त्यामुळे कळला नसावा.
एका द्रुष्टीने बरेच झाले कारण वाचकांचे अभिप्राय (जे बर्‍यापैकी कळले) वाचल्यावर हा लेख इतरांनाही कळलाय की नाही कुणास ठवूक! पण हे फारच गहन प्रकरण आहे व त्यावर लोकांची फार टोकाची मते आहेत हे जाणवले.
असा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
भापू

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2009 - 3:53 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते मिस्व संघ ही प्र वृत्ती आहे नी वृत्ती नव्हे! ती प्रत्येकात असतेच. प्रवृत्तीपादाच्या राज्यातही आहे आणि नीवृत्तीपादाच्या राज्यात ही आहे. काही लोक त्यावर काबू ठेवतात तर काही त्याचा कंपु बनवतात. काबूत ठेवा अथवा कंपुत ठेवा प्रत्येकाचे असे स्वतःचे फायदे वा कायदे आहेत. आणि खेकड्यालाच का म्हणुन प्रतिक मानायचे? हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला रेहमानी किडा अस्मानी ही नाही नी सुलतानी ही नाही. खेकडा हा कर्क आहे म्हणुन त्याला राशी चक्रात स्थान काय आणि रेहमानी किडा हा कृमी वर्गात मोडतो म्हणुन त्यास स्थान नाही. पंचांगातल्या अवकळा चक्रातही स्थान नाही. आम्ही त्यासाठी तेरावी रास पुन्हा नीर्माण करु. आमचे मते रेहमानी किड्याची वळवळ ही कर्काच्या कळवळी पेक्षा अधिक महत्वाची आहे कारण ती च्या प्रेरणेतुन नीर्माण होणारे साहित्य प्रकाशात येते.
आणि चांदण्या काय? अरे नक्षत्र म्हणा नक्षत्र! ग्रहांच्या रत्नांना खडा म्हणल्यासारखे आहे. रत्नांना खडा म्हणणे म्हणजे खड्याचा सन्मान असला तरी रत्नाचा अवमान आहे. इंद्राच्या ऐरावताला कुणी हत्ती म्हणत का? जालिंदरबाबाच्या पुण्यपत्तनाने पावन झालेल्या या मिपाभुमीत मिस्व संघाने विणलेल्या कोशाला जळमट कोण म्हणतय? ही वीण खरतर बहुवाचकतेतुन आली आहे. अपभ्रंशाने ती भोचकतेतुन आली आहे असे म्हटले जाते .व्युत्पत्तीशास्त्रासारख्या नी र स विषयात रस घेउन आम्ही ते शोधुन काढले आहे. आम्हास त्याचे श्रेय नको आहे पण वस्तुस्थिती म्हणुन सांगणे भाग आहे.
असो वरील नीबंधात आम्हाला परा कोटीची कळकळ जाणवते म्हनुनसनी हा पर्तिसाद
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2009 - 4:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, हे काय आहे?? तुम्ही अकरावीत आहात का??

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2009 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ही हा णिबंध जालिंदरबाबाच्या चष्म्यातुन वाचला आहे. पण त्याला (चष्म्याला)'परा'कोटीचा नंबर आहे. त्यामुळे असे होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पारंबीचा भापू's picture

12 Sep 2009 - 9:32 pm | पारंबीचा भापू

११ वीबद्दलचा पॉइंट कुणाला लिहिला आहे? मला की प्रकाशसायबाला?
आमच्याबद्दलच बोलायचे तर आम्ही जेमतेम चार बुकं शिकलोय. विंग्रजी वगैरे धा-पाच शब्दापुरता!
पण हा लेख आरेसेसला उद्देशून असल तर दोन-तीन गोष्टी सांगाया पायजेल हायेत.
१. ६५च्या युद्धात ऐन सरहद्दीवर आपल्या सैन्यामागोमाग संघवालेच रसद पोचवायला व इतर मदत करायला जिवाची तमा न बाळगता तैनात होते. बाकी कुणी माईचा लाल नाही गेला तकडे.
२. आरेसेसला कितीही नावे ठेवा पण ती संघटना ११० टक्के देशभक्त आहे.
३. मोरवीचे धरण फुटल्यावर हजारो प्रेतांची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावायला सरकारी यंत्रणेआधी हे संघवालेच पोचले होते व अनेक प्रेतांना वेळेवर अग्नी वगैरे देण्यात गुंतले होते.
४. अशीच मदत ही संघटना आजही करते.
५. आजकाल स्वतःचीच निंदा करायची फॅशन झाली आहे त्याचा हा इफेक्ट आहे काय? सरकारही तसेच आन लोकही. अगदी शिकलेले लोक पण गोंधळत आहेत. मग आम्हा अडाण्यांना काय पुसायचे?
६. शेवटची गोष्ट. इतक्या राष्ट्रभक्त संघटनेबद्दल असे आडून आडून "मिपा संघभोचक संघ" असे आडवलनाने लिवायचे कारनच काय? सरल सरल लिहा की. संघात लाज वाटण्यासारखे काय हाय? अभिमानाने ताठ मानेन उभा आहे हा संघ. तर सरळ लिवा, मग चांगल लिव किंवा वंगाळ. पण असा आडवळणाने न कळणार्‍या भाषेत नका लिवू. आमच्यासारख्याना समजत नाय!
भापू

प्रमोद देव's picture

13 Sep 2009 - 8:40 am | प्रमोद देव

हा लेख म्हणजे विजुभाऊंच्या लेखाचे विडंबन आहे....मात्र ह्यात रास्वसंघाचा काडीचाही संबंध दिसत नाहीये. तेव्हा उगाच आरडाओरड करू नका.
मिस्वसंघ ही इथलीच एक कंपूबाजांची संघटना आहे आणि त्यांची निशाणी होती खेकडा. त्या सर्व कंपुबाजांनी ती निशाणी आपल्या खवमध्ये चिकटवली होती...
मात्र आता ती बहुतेकांनी काढून टाकलेय. :)


ही पाहा ती निशाणी.
आता संबंधितांच्या मनातील शंकाकुशंका दूर होतील अशी अपेक्षा.

खरडवह्यांच्या विषयात ’विद्या वाचस्पती’ झालेल्या पराने अतिशय नेमक्या शब्दात ह्या कंपूबाजांची(स्वत: त्यांचा सदस्य असल्यामुळे असेल कदाचित ;) )
सद्द्याची मन:स्थिती वर्णन केलेय त्याबद्दल ’परा’कोटीचे अभिनंदन.

जियो पराशेठ!

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2009 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिस्वसंघ ही इथलीच एक कंपूबाजांची संघटना आहे आणि त्यांची निशाणी होती खेकडा.

माझ्या माहितीत इथे कोणीही कंपूबाज नाहीत. "शेखे"चा उल्लेख झालाच आहे तर सांगते, मीच ते चित्रं बनवलं होतं, पण मी 'कंपूबाजी' या शब्दातून जो तिरपा अर्थ प्रकट होतो तसलं आमच्यापैकी कोणीही काहीही करत नाही. आम्ही सगळे मिपावर काही काळानंतर मित्र झालो आणि एकमेकांची जाहीर टवाळी करत असतो हे तुम्ही फारतर म्हणू शकता. पण 'कंपूबाजी' म्हणजे नव्या लोकांची हुर्रे उडवणे, त्यांची सर्वांनी मिळून टवाळी करणे असले प्रकार आम्ही कोणीही करत नाही. जी काही मस्करी आहे ती आपसांतच असते. क्वचितच कोणा मित्र-मंडळाच्या बाहेरच्याला त्रास दिला जातो तेही मुलींना अनोळखी मुलांच्या खरडी वैग्रे आल्या तरच ...

देवकाका, तुमच्यासारख्या जुन्या सदस्याने कंपूबाजी वगैरे लिहावे याचा प्रचंड खेद झाला. पण ठीक आहे, कदाचित तुमचं वाचन वैग्रे कमी पडत असेल. पण जाणूनबुजून हे लिहिलं असाल, तर तीव्र निषेध.

बाकी रा.स्व.सं.बद्दल तुम्ही जे लिहीलं आहे, विडंबन इ. त्याच्याशी सहमत.

अदिती

दशानन's picture

13 Sep 2009 - 2:18 pm | दशानन

+१

अदितीच्या प्रत्येक शब्दाला सहमत.

कंपुबाजी आम्ही करतो ते काही ग्रुप हल्ला करण्यासाठी नाही... नाही तर सगळेच नाही का वटणीवर आले असते ;)

कंपुबाजी = जे सम विचारी आहेत ( तरुण ते आजोबा- पणजोबा) व ज्यांना एकमेकांशी मैत्री करायला आवडते त्यांचा ग्रुप. उगाच कुणाला आम्ही टार्गेट करावे म्हणून तयार केलेला ग्रुप नाही आहे हा... आमचा मस्तीचा / दंगा घालण्याचा एक देण्याचा तर एक (कधी कधी दोन) घेण्याचा... कंपुबाज अड्डा आहे जो व्यनीतून व खवतून प्रसार पावत आहे... नवनवीन शेंबडी पोरं / पोरी पण ह्या ग्रुप मध्ये... व नाना... बिपीन सारखे म्हातारे पण ह्याच आहेतच + माझ्या सारखे तरुण पण :ड

तेव्हा तुम्ही ज्या शब्दात कंपुबाजी मांडली आहे त्या शंब्दाचा व त्यामागच्या भावनेचा निषेध निषेध !!!!

जय हो !
कंपुबाजांनो एकत्र व्हा !
सगळ्यांना बाजूला टाकु नका...

सर्वांना आपल्या मध्ये समावून घ्या....

येवढं बोलून मी माझं दोन शब्दांचे भाषण संपवतो... !

राम राम.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 12:38 pm | बिपिन कार्यकर्ते

अदितीशी सहमत आहे. तुमची प्रतिक्रिया वाचून नवीन सदस्यांचा काही गैरसमज व्हायची शक्यता आहे (कारण कंपूबाजीचा सरळ अर्थ तिरपाच आहे आणि आम्ही तो अर्थ उपरोधाने घेतला होता.) म्हणून हे लिहित आहे.

खरं तर खाजगी चॅट वर पण २-३ वेळा मी हे सांगितले होते की, सुरूवातीला कोणीच कोणाला ओळखत नसते, रोज गप्पा वगैरे होतात कधी भेटीही झाल्या आणि मगच मैत्री दृढ झाली. साहजिकच इथेही गप्पा आणि खेचाखेची सुरू झाली. या मधे कोणीही सामिल होऊ शकतात. आणि तसे झालेही आहेत, होत आहेत. नवीन सदस्य येतात, चेष्टा मस्करी करतात, दोन देतात दोन घेतात आणि 'फलाटावरचे डब्यात येतात.' इतकंच काय ज्यांनी आधी 'कंपू' हा शब्द पहिल्यांदा रूढ केला तेच आता कट्टर कंपूबाज झाले आहेत. तो खेकडा आणि ते ७०% याला काही संदर्भ आहेत आणि त्या संदर्भांचे विडंबन म्हणून ते आलं होतं. काही ठराविक लोकांनी दुसर्‍या लोकांना कधीच सामिल न करून घेता इतरांची टवाळकी केली असती तर त्याला रूढार्थाने कंपूबाजी म्हणता आले असते.

अजून एक, पराने हे विडंबन लिहिले त्यात या तथाकथित खेकडा अथवा कंपूबाजीचा काहीच संदर्भ नव्हता. ते त्याच सारख्या एका दुसर्‍या लेखाचे निखळ विडंबन होते. तुम्ही जो खेकड्याशी आणि कंपूबाजीशी संबंध लावला आहे तो पटत नाहीये.

असो. हा विषय चघळला कारण तुम्ही अगदी तो खेकडा वगैरे टाकून उत्साहाने स्पष्टीकरण दिलेत. अन्यथा, आमची कंपूबाजी चालूच आहे, नवीन मित्र मैत्रिणी भेटत आहेत, ओळखी होत आहेत. खर्‍या आयुष्यातले ताण तणाव या आभासी आयुष्यातल्या निखळ आणि खर्‍या मैत्रीने कमी होत आहे. सर्वांचे स्वागतच आहे.

या!!!

सर्वांचे स्वागतच आहे. :D

बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव's picture

13 Sep 2009 - 12:59 pm | प्रमोद देव

कंपूबाज नंतर ;) ही हसरी टाकायला विसरलो. त्यामुळे अदिती,बिकाशेठ आणि इतर मित्रमंडळींचा गैरसमज झाला...त्याबद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
बिकाशेठच्या खवत लिहिलेले त्याचेच वर्णन त्याच्याच भाषेत असे आहे.....
माझ्याविषयी

एक नंबर कंपूबाज.
त्यावरून मी त्याला गंमत म्हणून नेहमी कंपूबाज म्हणून चिडवत असतो....पण त्याचा अर्थ माझ्या मनात असा कधीच नव्हता आणि नाही....की तो आणि त्याचे खास मित्रमंडळ हे कंपूबाजी करून इतरांना सतावत असते ....ह्याची कृपया नव्या-जुन्या अशा सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 2:48 pm | श्रावण मोडक

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते

आऽऽरम!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2009 - 3:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी गेय कविता लिहीणारच नाही ... हीहाहाहाहा :D

अदिती

प्रशांत उदय मनोहर's picture

21 Sep 2009 - 10:43 pm | प्रशांत उदय मनोहर

मदत करायला तयार आहे. ;) (दिवे घ्या हं देव काका)
आपला,
(तत्पर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 3:56 pm | श्रावण मोडक

अग्रेसर...
अग्रेसर १ - बिका
अग्रेसर २ - टारझन
अग्रेसर ३ - नंदन
(अग्रेसर दक्ष, अग्रेसर सम्येक (?), अग्रेसर आsssरम)
संघ संपद...
लावा आता रांगा एकेका अग्रेसराच्या मागे -
संख्या घ्यायला या रांगांमध्ये शेवटाला अनुक्रमे कमी उंची असणारे धमु, डान्या, परा यांनी यावे.

विजुभाऊ's picture

21 Sep 2009 - 11:57 am | विजुभाऊ

या लेखाचा मुळ संदर्भ हा इथे पहा http://misalpav.com/node/9296

विकास's picture

12 Sep 2009 - 5:40 pm | विकास

प्रकाशराव नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे? का अदीती म्हणत असल्याप्रमाणे हा परीक्षेतील निबंध वाटला? सगळ्या गोष्टी कव्हर केल्यावर कशाला तरी मार्क मिळतील ही खात्री! ;)

स्वगतः आता कळलं अवघड लिहीतो तेंव्हा इतरांना वाचताना काय होत असेल ते :)

टारझन's picture

12 Sep 2009 - 4:21 pm | टारझन

माझी प्रतिक्रिया उडाली ?
आता स्मायलीपण उडणारेत का ? तसं असेल तर बाकी प्रतिक्रिया अजुन शाबुत ?

असो ! चालूद्या

-(प्रतिक्रिया डिलीटप्रेमी) टारोबा खोडरबर

घाटावरचे भट's picture

12 Sep 2009 - 4:23 pm | घाटावरचे भट

क आणि ह आणी र!!!

पराभाऊंना आणी इतर सर्व ष्टार (म्हणजे चांदणी नव्हे.... पण एका अर्थाने तशी चांदणीच) प्रतिसादकांना कोपरापासून दंडवत!!!

- भट

तिमा's picture

12 Sep 2009 - 7:23 pm | तिमा

हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया पाहून 'जाने भी दो यारों' मधल्या धृतराष्ट्रासारखं "ये क्या हो रहा है" असे म्हणावेसे वाटते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2009 - 7:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया पाहून 'जाने भी दो यारों' मधल्या धृतराष्ट्रासारखं "ये क्या हो रहा है" असे म्हणावेसे वाटते.

तुमचं वाचून होतंय ... आमचं लिहीतानाच असं होत होतं! ;-)

अरे, कोण्या संपादकाने माझ्या प्रतिसादातलं आख्खं वाक्यच उडवलेलं दिसतंय. असो.

अदिती

सुधीर काळे's picture

12 Sep 2009 - 9:59 pm | सुधीर काळे

आपण लिहिलेले मुद्दे तपासून पहातो. फारच इंटरेस्टिंग मुद्दे लिहिले आहेत आपण. मी लहानपणी संघाच्या शाखेला जात असे व तिथं देशभक्तीशिवाय दुसरं काही चर्चिलं जायचं नाही एवढं आठवतंय. आमचे मामासुद्धा संघवाले होते व त्याचा त्रासही त्यांनी खूप सहन केला ४८ साली!
पण मूळ लेख नव्यांना तरी जरासा अनाकलनीय आहे. शेकडा खेकडा, ३० टक्केचाले, ७० टक्केवाले वगैरे काही शब्द आधी वापरले गेले असावेत, पण मलाही समजले नाहीत.
असो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

काळा डॉन's picture

12 Sep 2009 - 11:58 pm | काळा डॉन

सुधीरकाका, समजेल हळू हळू सगळे! थोडा वावर वाढवा. :)
(जाकार्ताहून) काळू

दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.

काळा डॉन's picture

12 Sep 2009 - 11:56 pm | काळा डॉन

च्यायला हा परा मला संघवाला वाटायचा. तोही चड्डीवाल्यांच्या टवाळकी मधे? लेकाचा संघीष्ठ किंवा स्युडोसंघीष्ठ तरी असेल असे वाटले होते.

काळू

दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.

JAGOMOHANPYARE's picture

13 Sep 2009 - 12:09 pm | JAGOMOHANPYARE

स्वयंभोचक सन्घात स्त्रिया आहेत का? त्याना काय म्हणायचे? स्वयंभोचिका का ? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2009 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वयंभोचक सन्घात स्त्रिया आहेत का? त्याना काय म्हणायचे? स्वयंभोचिका का?

का हो का? तुम्हाला भलत्याच चौकशा दिसतात. स्त्रियांना आदराने आणि त्यांच्या नावानेच संबोधतात. बादवे, संघ-'व्यवस्थापका'ची जागा रिकामी आहे. आणि पदाचं नाव आहे स्वयंटोचक.

विंट्रेश्ट असेल तर व्यनी करा ... मला नाही, स्वयंभोचक संघाच्या आय.डी.वर व्यनी टाका.

अदिती

JAGOMOHANPYARE's picture

13 Sep 2009 - 1:03 pm | JAGOMOHANPYARE

मला स्त्रिया बाबत आदर आहे हो . पण काही सन्घात स्त्रिया नसतात म्हणून ते सन्घ स्त्री द्वेष्टे असतात, असे भयन्कर निष्कर्ष काही लोक काढतात... असा स्त्री द्वेष्टेपणाचा आरोप या सन्घावर येऊ नये म्हणून चौकशी केली... :)

तेन्नालीराम's picture

13 Sep 2009 - 9:44 pm | तेन्नालीराम

भापूसाहेबांनी RSS बद्दल लिहिलेले मुद्दे पटले.
विचार व्हायला हवा!
ते. रा.

अनुप्रिया's picture

21 Sep 2009 - 2:00 pm | अनुप्रिया

O:) O:) O:) O:) O:) O:) O:) O:) O:)

आशु जोग's picture

24 Aug 2011 - 12:45 am | आशु जोग

पंखे सगळे चालू
उकाडा रॉक्स