नवीन पुस्तक

क्रान्ति's picture
क्रान्ति in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 8:36 pm

नागपूरच्या श्याम पेटकर यांच ऋतूस्पर्श हे एक अत्यन्त सुन्दर निसर्गवर्णनपर लेखांच पुस्तक. ऋतू ख-या अर्थान अनुभवायचे तर ते गावाकडेच! त्या अनुभवांचा घरात बसून अनुभव देणार चित्रण लेखकान या लेखांमध्ये केल आहे. प्रत्येक लेख वाचताना आपण मनाने त्या ठिकाणी आहोत अस वाटत रहात. नुकतीच डिसेंबरमध्ये पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. नागपूरच्याच विजय प्रकाशनच हे नितांतसुन्दर पुस्तक संग्रही असावच अस आहे. "वसन्त भुलीला भुलून शिशिरात निमूटपणे गळून पडणा-या पानांना...." लेखकान हे पुस्तक अर्पण केल आहे. एकदा तरी वाचाव आणि पुन्हा पुन्हा वाचतच रहाव अस अप्रतिम पुस्तक आहे.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

8 Mar 2009 - 12:45 pm | मराठमोळा

माहितीबद्दल धन्यवाद. संधी मिळाल्यास नक्की वाचेन.

आपला मराठमोळा

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2009 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते

नक्की वाचेन. पण जरा अजून लिही ना या पुस्तकाबद्दल. अगदी थोडक्यात करून दिली आहेस ओळख.

बिपिन कार्यकर्ते

विमुक्त's picture

3 Sep 2009 - 10:26 pm | विमुक्त

घेतो आणि वाचतो आता...

श्रेया's picture

12 Sep 2009 - 11:23 am | श्रेया

हे पुस्तक नक्की वाचेन आणखी पुस्तकाची महिती द्यावी

धन्यवाद

क्रांती, धन्यवाद पु्स्तकाबद्दलच्या माहितीसाठी. आत्ता सध्या मी नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा हे भारती ठाकूरांचं पुस्तक वाचतोय. तेही छान आहे. परिक्रमेकडे बघण्याचा थोडा वेगळा प्रयत्न म्हणता येईल. अधिक माहिती इथे आहे.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती