घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in जनातलं, मनातलं
31 Aug 2009 - 11:56 am

कधी कधी एखादी गोष्ट मनासारखी झाली की इतका आनंद होतो.. आणि मग कसा व्यक्त करायचा हा आनंद असा पूर्वी पडणारा प्रश्न आता नाही :-)..थँक्स टु मिपा...:-)
यावर्षी गौरी च्या दर्शनासाठी आईकडे गेले होते....त्यावेळी ती सहज म्हणाली..."यावर्षी मोदकांचं काय झालं ते कळलंच नाही...एकतर हरीतालिकांच्या पूजेमुळे फक्त बाबांपुरतेच मोदक करायला घेतले...पण ते सुद्धा चुकले...काय चुकलं कळलंच नाही..सगळी उकड फसली माझी....त्यामुळे मी आणि श्वेतु (माझी बहीण) ने मोदकच नाही खाल्ले यंदा..."
आणि पहिल्या दिवशी चुकल्यामुळे तिनं परत मोदक करायचं धाडसच नाही केलं..
मग मी आल्यावर तिला विचारलं की पीठी आणि सारण असेल तर मी करते की मोदक..माझे यंदा छान जमले होते...
म्हणुन मग मी करुन दिले तिला...


आणि मोदक फार छान साधले गेले...मनासारखी सुरेख उकड जमली...आणि सुरेख कळीदार एकसारखे मोदक करता आले...इतकं इतकं छान वाटलं ना....आईचं तर असं झालं होतं की लेकीचं किती कौतुक करु आणि किती नको...सगळ्या येणार्‍या जाणार्‍यांना ४-४ वेळा सांगुन झालं ...
"आज स्मिता ने इतके चुटचुटीत मोदक केले ना...मलापण जमत नाहीत इतके सुरेख....त्या कोणा अमुक-तमुक आत्याच्या घरात कोणालाही अजुनी करता येत नाहीत मोदक..तिचा आता ३२ वर्षाचा संसार झाला तरी तिचे मोदक चुकतात्...एक ना दोन..आईचं संपतच नव्हतं.... "
कसं असतं ना....आईनेच शिकवले मोदक मला....

जितकी तांदुळ पीठी तितकंच पाणी घ्यायचं...त्या पाण्यात थोडं तेलं किंवा लोणी..आणि मीठ घालायचं....आणि पाण्याला तळाशी बुडबुडे येताना दिसले की लगेच पीठी टाकुन भरभर हालवायचं...आणि झा़कण ठेवुन मस्त २-३ वाफा काढायच्या..मग तेलापाण्याचा हात घेउन उकड गरम असताना भराभर मळायची..हाताला न चिकटणारी उकड साधली की पुढचा सगळा कलाकुसरीचा मामला....उकडीचा छोटा गोळा घेउन पारी करायची..त्याला चुण्या काढायच्या..आणि मधे सारण ठेवुन चारी बाजुनी नाजुक हाताने चुण्यांना एकत्र आणायचे.....वरती छोटुसं टोक काढायचं...कसं सुचलं असेल ना हे सगळं कोणालातरी...
आणि माझ्यापर्यंत आईनेच तर पोचवलं हे सगळं...यावर्षी जरा चुकली असेल तिची उकड काढताना...पण म्हणुन लेकीचं किती कौतुक...पण तिला एक गोष्ट सांगावीशी वाटली मला...

"अगं माझे मोदक छान जमले हे तुझचं तर देणं आहे ना....शेवटी काय तर विंदांनी म्हटलेलंच आहे ना.....

देणार्‍याने देत जावे...घेणार्‍याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....
आज मी माझ्या आईचे हात घेतले होते...."
थँक्यु आई.."

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

31 Aug 2009 - 11:58 am | सहज

काय मस्त दिसतायतं!

पर्नल नेने मराठे's picture

31 Aug 2009 - 12:02 pm | पर्नल नेने मराठे

मस्त्च ,,,केशरी मोद्क ;;)
चुचु

फार मस्त हो ताई ! फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय.
तुम्ही पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मला स्वतःलाच उकडीचे मोदक करुन बघायची इच्छा आहे. ती कदाचित आता पूर्ण होईलसे वाटते.

सुबक ठेंगणी's picture

31 Aug 2009 - 12:11 pm | सुबक ठेंगणी

रंग घातलात की केशर वगैरे? (सुबक काय वेडी आहेस तू! इतका पिवळा रंग यायला पाव किलो वगैरे केशर लागेल! :))
माझी आई पण सही मोदक करते...पण ती पारी पोळपाटावर लाटून करते! मी पडले धसमुसळी! त्यामुळे 'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' असं ती मला नेहमी सांगते.

स्मिता श्रीपाद's picture

31 Aug 2009 - 12:33 pm | स्मिता श्रीपाद

रंग घातलात की केशर वगैरे?

जिलबीचा केशरी रंग घातला होता...:-)..केशर नव्हे ..परवडलं नसतं गं ;-)

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2009 - 12:14 pm | स्वाती दिनेश

स्मिता,
सुंदर दिसत आहेत ग मोदक आणि त्या मागच्या पार्श्वभूमीला विंदांच्या कवितेतले शब्द अगदी समर्पक!
स्वाती

स्मिता श्रीपाद's picture

31 Aug 2009 - 12:31 pm | स्मिता श्रीपाद

आणि त्या मागच्या पार्श्वभूमीला विंदांच्या कवितेतले शब्द अगदी समर्पक!

धन्यवाद स्वातीताई...विंदांचीच कविता आहे याबद्दल खात्री नव्हती म्हणुन संदर्भ नव्हता दिला मी...पण आता बदल केला आहे :-)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

31 Aug 2009 - 1:03 pm | भाग्यश्री कुलकर्णी

तुमची मोदकाची उकड करण्याची रीत चांगली समजली .आता मोदक करुन बघायला जमेल असं वाटतय.आणी रंगीत मोदक फारच छान दिसताहेत.

यशोधरा's picture

31 Aug 2009 - 1:10 pm | यशोधरा

काय सुरेख दिसताहेत मोदक! :)
कालच हे तुमच्या ब्लॉगवर पाहिलं होतं, पण तिथे प्रतिक्रिया द्यायला जमेना. बरं झालं, इथेही लिहिलत आणि फोटो दिलेत ते :)
मस्त, मस्त, मस्त!!

दशानन's picture

31 Aug 2009 - 1:16 pm | दशानन

:''(

:''(

:''(

:''(

:''(

मोदक............................. गचकलो मी !

अवलिया's picture

31 Aug 2009 - 1:23 pm | अवलिया

५ मोदक पार्सल करुन पाठवावे. तोपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिपाली पाटिल's picture

31 Aug 2009 - 1:47 pm | दिपाली पाटिल

खुपच सुरेख दिसतायत मोदक...केसरी रंगपण सुंदर दिसतोय.

दिपाली :)

प्रसन्न केसकर's picture

31 Aug 2009 - 2:23 pm | प्रसन्न केसकर

खूप आवडलं. खूप नाजुक भावना लोभसवाण्या भाषेत व्यक्त केलीत. अन मोदकांचे तर काय बोलायचे? फोटो बघुन तोंड खवळलंय!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

शाल्मली's picture

31 Aug 2009 - 3:42 pm | शाल्मली

स्मिता,
केशरी आणि पांढरे मोदक खूपच मस्त आणि चकचकीत दिसताहेत.

३-४ वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी आणि आईनी केशरी-पांढरे-हिरवे असे तिरंगी मोदक केले होते त्याची आठवण झाली. :)

--शाल्मली.

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 3:48 pm | विसोबा खेचर

खल्लास...!

तात्या.

घाटावरचे भट's picture

31 Aug 2009 - 3:58 pm | घाटावरचे भट

क ड क ! ! ! (मोदक नव्हेत बरं... प्रकटन, नायतर मला फ़ुकट निषेधाचे खलिते मिळतील)
मोदकांचे चित्र पाहून तोंडास पाणी सुटले (ही ऑफ़िशियल कामेंट).

बहुगुणी's picture

31 Aug 2009 - 5:35 pm | बहुगुणी

फार छान लिहिलंयत, तुम्ही मनाच्या गाभार्‍यापासून लिहिलेलं माझ्या मनापर्यंत पोहोचलं, डोळ्यांच्या वाटे ('पोटाच्या वाटे' म्हणायला आवडलं असतं, पण हे नेत्रसुखही काही कमी नाही.) आपल्या मातोश्रींपर्यंत आम्हा सर्वांचे धन्यवाद पोहोचवा, तुम्हाला 'हात' दिल्याबद्दल, आणि तुमचे आभार 'हात व्यवस्थित घेतल्याबद्दल'.

जाता जाता: तुमचं हे सोबतच्या प्रकाशचित्रांना घेऊन आलेलं लिखाण छान जमलं आहे, 'पाककृती', 'कलादालन' किंवा 'जनातलं मनातलं' यांपैकी कुठेही चपखल बसेल इतकं.

सुबक ठेंगणी यांच्या प्रतिक्रियेतलं आईचं वाक्य वाचलं -'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो', क्या बात है!! पाककृती म्हणजे कलाकृतीही असू शकते याचं अप्रतिम विवेचन!

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 5:40 pm | श्रावण मोडक

ए... हे धागे बंद करा रे... काय छळवाद आहे हा... :)
लिहिलेलं वाचा, फोटो पहा, खायला काही मिळत नाही. नुसतं वा म्हणा... छळ आहे नुसता छळ.
नीलकांत, असे धागे ब्लॉक करण्यासाठी काही कर असं तुला मागंच सांगितलं होतं राव. काय ते सांग एकदा. 'ठरवून' टाकूया.

चित्रा's picture

31 Aug 2009 - 5:42 pm | चित्रा

कोणाचे मोदक अधिक सुंदर झाले आहेत अशी स्पर्धा लावायची वेळ आली आहे. फारच कळीदार मोदक. (खरे तर याआधी प्राजु, आणि चुचुताई या दोघींनीही सुंदर केलेत आहेत मोदक, आणि हेही खूपच सुंदर)

वर बहुगुणींनी लिहीले आहे त्याच्याशी सहमत आहे.

क्रान्ति's picture

31 Aug 2009 - 9:51 pm | क्रान्ति

स्मिताताई, मोदक आणि लेख दोन्हीही अप्रतिम!

'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' ही शिकवण कायम लक्षात राहील सई!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

रेवती's picture

31 Aug 2009 - 10:07 pm | रेवती

अरे वा!!
थ्यांक्यूपूर्वक केलेले लेखन मोदकाइतके छान जमले आहे.
फोटो मस्तच आलेत.

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2009 - 10:07 pm | बिपिन कार्यकर्ते

@ राजे : सहमत
@ श्रामो : सहमत
@ नाना : सहमत
@ तात्या : सहमत
@ घा. भ. : सहमत
........

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

31 Aug 2009 - 10:59 pm | धनंजय

छान लिहिले आहे.

मोदक नाही तर अशा प्रकारे तिखटमिठाची उकड तरी करीन, म्हणतो.

स्मिता श्रीपाद's picture

1 Sep 2009 - 11:20 am | स्मिता श्रीपाद

प्रतिसादाबद्द्ल सर्वांची खुप खुप आभारी आहे :-)

-स्मिता

एकलव्य's picture

1 Sep 2009 - 3:01 pm | एकलव्य

मोदक! मोदक!! मोदक!!!

मीनल's picture

1 Sep 2009 - 5:25 pm | मीनल

छान लिहिले आहेस .
मीनल.

सनविवि's picture

1 Sep 2009 - 8:10 pm | सनविवि

एवढे सुंदर मोदक कधी पाहिले नव्हते हो, आईशप्पथ!!

आणि आईचे उपकार फेडणे शक्य आहे काय? आयुष्यभर घेतच असतो आपण तिच्याकडून. त्याची जाणीव ठेवायची आणि परतफेड करायचे निरर्थक प्रयत्न करत राहायचे.

प्राजु's picture

1 Sep 2009 - 10:08 pm | प्राजु

सुरेख प्रकटन आणि मोदकही...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/