एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
29 Aug 2009 - 9:52 am

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

परवाच(*) पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले.

एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली. पण जाताजाता वक्त्यांनी मांडलेले काही मुद्दे काही प्रश्न उपस्थित करून गेले. उदा. विवाह हा दोन व्यक्तींपुरता मर्यादीत नसतो, तर तो दोन कुटुम्बाना जोडतो, असे मत चर्चेच्या आयोजकांनी मांडले. पण प्रत्यक्षात कायदा मात्र दोन व्यक्तीनी प्रजोत्पादन करण्यासाठी एकत्र येऊन राहणे एवढाच अर्थ मानतो. दोन कुटुम्बांच्या एकत्र येण्याचा कायद्यात कुठेही विचार केलेला दिसत नाही.

कुटुंबात येणार्‍या मुलीला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नाही असा पण मुद्दा मांडण्यात आला. त्याचा परिणाम मुलगी सासरी एकरूप होण्यावर होतो, असेही सांगितले गेले. पण एका भयाण वास्तवाकडे यावेळी वक्त्यांकडून दूर्लक्ष झाले. ते असे की, ४९८-अ सारख्या एकतर्फी कायद्यांचा दुरूपयोग करणार्‍या मुलीना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली तर आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

दूसरी एक गोष्ट आयोजकांनी मांडली, ती म्हणजे समानतावादी आधुनिक स्त्रीची दुटप्पी भूमिका. ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. हे निरीक्षण सार्वजनिक व्यासपीठावरून आणि तेही एका स्त्रीने मांडले याचेच मला मोठ्ठे कौतुक वाटले.

विवाहाच्या आरोग्यविषयक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या डॉक्टरीणबाई आल्या त्यांनी मात्र "समुपदेशनास दोघेही आले तर ही समस्या सुटू शकते" असे गुळमुळीत उत्तर बर्‍याच प्रश्नांना दिले. HIV testची आवश्यकता प्रतिपादन करताना ती नेमकी कितीवेळा करावी याचा खुलासा त्यांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही टेस्ट तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा करणे आवश्यक असते. कामजीवनाविषयीच्या गैरसमजुतीना डॉक्टरीणबाईनी अजिबात हात लावला नाही.

या चर्चासत्रातील तिसरे वक्ते एक नामवंत ज्योतिषी आहेत. बरीच स्थळे ज्योतिषाच्या अर्धवट ज्ञानाने नाकारली जातात, असा महत्त्वाचा मुद्दा ज्योतिषी महाशयांनी मांडला. समाजात अनेक निरर्थक आणि निराधार समजुती कशा तग धरून आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. सप्तमस्थानातील मंगळ सोडून बाकी सर्व स्थानातील मंगळ फारसे त्रासदायक नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या अनुषंगाने मला पत्रिका मांडायची पद्धत आणि त्यातून होणारी दिशाभूल याविषयी लिहायचे आहे. आपल्याकडे पत्रिका मांडण्याचे उत्तर आणि दक्षिण भारतीय असे दोन प्रकार आहेत. यात एका आयतामध्ये बारा भाग करून त्यात ग्रह (आणि त्यांच्या राशी) मांडले जातात.

समजा, १ अंश मेष आणि २९ अंश मेष या ठिकाणी अनुक्रमे मंगळ व चंद्र असल्यास कुंडलीत ते एकाच स्थानात मांडले जातात त्यामुळे पत्रिकेत मंगळ-चंद्र युति आहे असे कित्येक अर्धवट ज्ञानी लोक मानतात आणि पत्रिका टाकून देतात. याच्याच उलट रवि-गुरु, चंद्र-गुरु यांच्यात नसलेल्या नवपंचमादि शुभ योगांचा भास केवळ पत्रिका लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतो व पत्रिका दूर्मिळ योगाची म्हणून खपवली जाते.

वास्तविक योग्य ते दीप्तांश विचारात घेउन रवि,चंद्र इत्यादि ग्रहांचे मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अष्टामांश मालिकेतील योग होत असतील तर ते विवाह आणि व्यावसायिक भागिदारीत अडचणी दाखवतात. तसेच जोडीदाराच्या पत्रिकेतील मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लुटॊ हे ग्रह जातकाच्या रविचंद्रांशी अष्टामांश मालिकेतील योग करत असतील तर ते वैवाहिक अथवा व्यावसायिक नात्यात अडचणी निर्माण करतात.

ज्योतिषी महोदयांनी चर्चेत आणखी एक मुद्दा मांडला तो असा की ३६ गुण जुळण्याचा अट्टाहास पालकांनी करू नये. ३६ गुण जुळले की मुलाची आणि मुलीची रास एक यायची शक्यता असते. असे झाल्यास दोघांचीही साडेसाती एकदमच येते...

बर्‍याच वेळा असे दिसते की काही वेळा कौटुंबिक कलह दीर्घकाळ चालू राहतो. अशावेळेस कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका एकत्र पाहिल्या तर असे दिसून येते की अशा कुटुम्बातील सदस्यांचे रविचंद्रादि ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ (युति नव्हे) असून ते मंदगती ग्रहांच्या भ्रमणांच्या तडाख्यात एका मागे एक असे सापडतात. साहजिकच ही परिस्थिती १+१ = ३ अशा स्वरूपाची असते.

तात्पर्य, आदर्श पत्रिकेच्या शोधात न राहता व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारून पत्रिकेचा उपयोग करून घेणे शहाणपणाचे ठरते.

* हे चर्चासत्र डिसेंबर २००८ मध्ये पुण्यात झाले होते. हा लेख http://rajeev-upadhye.blogspot.com/2008_12_01_archive.html येथून उचलला आहे

समाजप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

दशानन's picture

29 Aug 2009 - 9:57 am | दशानन

तुम्ही कुठल्या जगात राहता ओ :?

प्रत्येक लेखन तुमचे विवाहित स्त्रीच्या विरोधातच का ?
तुम्हाला कुठल्या स्त्रीने धोका दिला आहे काय ?
तुमच्या राहु व केतु मध्ये घटस्फोट झाला आहे काय ?
तुमची व मिपावाचकांची काही दुश्मनी आहे काय ?
तुमच्या मागील जन्मी (आयडीच्या) मिपावाचकांनी त्रास दिला होता का ?

एक नाडी वाले होते.. व एक तुम्ही !
क्या बात है ;)

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 10:13 am | युयुत्सु

जे उघड्पणे बोलले जात आहे त्याचे मी reporting केले. मी पुर्वी म्हटल्या प्रमाणे unfasionable विषय पचवायला कठीण असतात.

दशानन's picture

29 Aug 2009 - 10:18 am | दशानन

च्यामायला...

विवाहित + कार्यरत स्त्रीच्या विरोधात बोलणे ही काय फॅशन आहे काय रे...

मी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर दे आधी....

तुझे लेखन नेहमी स्त्री विरोधी का ????

बघेल तेव्हा... हे वाईट ते वाईट... च्यामायला.... डोळे खराब आहेत काय ? जगात चांगल्या गोष्टी पण आहेतच....

वर तुम्ही त्या स्त्री डॉक्टर चा व त्या किडमुड्या ज्योतिष्याचा उल्लेख केला आहे... ते काय देव आहेत काय....... म्हणे unfasionable ... माय फुट !

सुधीर काळे's picture

29 Aug 2009 - 10:27 am | सुधीर काळे

unfasionable? तुम्हाला unfashionable म्हणायचे आहे कीं unfeasible कीं unpalatable?
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 10:41 am | युयुत्सु

unpalatable हा शब्द चांगला आहे.

दशानन's picture

29 Aug 2009 - 10:46 am | दशानन

तो शब्द ठीक कि तो... हे राहू द्या..

आधी वरील प्रश्नाचे उत्तर द्या.

अवलिया's picture

29 Aug 2009 - 10:16 am | अवलिया

तुमचे लेख वाचुन मला लांडगा आला रे आला ची आठवण येते. खरोखरचा गहन मुद्दा मांडलात तरी तो आता दुर्लक्षिला जाईल.
एकाच विषयावर सतत तेच ते बोलले म्हणजे खरे असते असे नाही.
वेगळा विषय घ्या आता... की बाकी विषयात ठणठणगोपाळ ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

29 Aug 2009 - 12:08 pm | टारझन

हेच म्हणणार होतो :)
कोणाची स्पेषालिटी कशात तर कोणाची कशात ... कोणी बंब्या फक्त वांझोटी कौलं काढतो .. कोणी फक्त अवांतरपणा करतो .. तर कोणी हिणकसं'च' लिहीतो ...
तसं यांचं ... पदोपदी सप्तपदी ... विवाहविषयक कायदे ... न कैच्याकै ..
च्यामारी करणारी लग्न करतात .. काढणारी पोरं काढतात ... आणि इकडे त्याचे वांझोटे धागे .. कमाल आहे की नै ? ;)

असो .. चालू द्या !! आर्रे णाण्या ... सगळेच तुझ्यासारखं परिपुर्ण लेखण नाही रे करू शकत ...

- पदोपदीचा अवांतरकर्ता

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 2:35 pm | युयुत्सु

दूसरा विषय घेतला तर पचनी पडावा लागतो. आता बघा 'गोत्र' या विषयावर एकही मत मांडलं गेले नाही.

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 3:11 pm | युयुत्सु

एकाच विषयावर सतत तेच ते बोलले म्हणजे खरे असते असे नाही.

अनिंस वाले ज्योतिषाला सतत बडवत असतात, म्हणजे ते पण खरं नाही मानायचे का?

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2009 - 3:35 pm | बिपिन कार्यकर्ते

वरचे दोन्ही प्रतिसाद झेपले नाहीत हो युयुत्सुभाऊ. बेस्ट ऑफ लक.

बिपिन कार्यकर्ते

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 10:57 am | युयुत्सु

वैयक्तिक हल्ल्यानी मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. या सर्व प्रतिसादांवरून पंचतंत्रातील गुंजा गोळा करून त्यांचा ढीग पेटविणा-या माकडांच्या गोष्टीची आठवण झाली.

अवलिया's picture

29 Aug 2009 - 11:26 am | अवलिया

मग कशाला सांगता माकडांना माणसांच्या गोष्टी ?
जा की तिकडे माणसांमधे...

(हनुमंत) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

29 Aug 2009 - 11:28 am | दशानन

हॅ हॅ हॅ !

=))

वानरराज !

प्रकाश घाटपांडे's picture

29 Aug 2009 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

हा कार्यक्रम म्हणजे २५ डिसेंबर २००८ रोजी उद्यानप्रसाद कार्यालय,पुणे येथे अनुरुप विवाह संस्थेचा कार्यक्रम होय. सहभागी- डॉ विद्या दामले, गौरी कानेटकर (संचालिका अनुरुप), ज्योतिषी विजय केळकर . सुत्र संचालिका मंजिरी धामणकर
आम्ही बी गेल्तो कार्यक्रमाला. कोन्ला त्या कार्यक्रमाची ऑडियो रेकॉर्डिंग हवे असल्यास मपल्याक उपलब्ध आहे .
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नीधप's picture

29 Aug 2009 - 11:00 am | नीधप

विवाह करून आणलेली स्त्री ही घरातील एक घटक नसून घरातील कामे करणारे आणि पोरं जन्माला घालणारं एक यंत्र आहे. त्यापलिकडे त्या यंत्राला किंमत द्यायची गरज नाही असा या युयुत्सुचा दावा आहे. केवळ एवढंच याने निर्माण केलेल्या धाग्यांच्या गुंत्यावरून सिद्ध होतंय.

रोज उठून विवाहीत आणि करीअर करणार्‍या बायकांच्या नावाने शंख केलेला दिसतो इथे. तात्या हे किती दिवस चालू देणारात?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

युयुत्सु's picture

29 Aug 2009 - 11:14 am | युयुत्सु

विवाह करून आणलेली स्त्री ही घरातील एक घटक नसून घरातील कामे करणारे आणि पोरं जन्माला घालणारं एक यंत्र आहे. त्यापलिकडे त्या यंत्राला किंमत द्यायची गरज नाही असा या युयुत्सुचा दावा आहे.

मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न होतोय. मी याचा निषेध करतो. जे प्रश्न इथे उपस्थित केले आहेत त्यांची कुणाला allergy असेल तर त्यांनी अशा धाग्यांपासून दूर रहावे.

नितिन थत्ते's picture

29 Aug 2009 - 4:10 pm | नितिन थत्ते

>>रोज उठून विवाहीत आणि करीअर करणार्‍या बायकांच्या नावाने शंख केलेला दिसतो इथे. तात्या हे किती दिवस चालू देणारात?

आम्हाला पण भयंकर राग येतो यांचे लेख वाचून पण सेन्सॉरशिप नको बुवा.
यांचा स्टॅमिना संपेपर्यंत चालू द्या.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

ऋषिकेश's picture

29 Aug 2009 - 4:33 pm | ऋषिकेश

+१
सेंसॉरशिप नको ज्यांना नको त्यांनी वाचु नये
बाकी, त्यांनी "गोत्र" मधे (चक्क) काहि सुधारणावादी विचारहि मांडले आहेत. नावं ठेवण्याच्या चढाओढीत/बंदी घालण्याच्या नादात त्याकडे काणाडोळा नको असे वाटते.

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ४ वाजून ३२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बालगीत "आज हे बंद.. उद्या ते बंद.. आम्हा मुलांमुलांचा याच्याशी काय संबंध?...."

JAGOMOHANPYARE's picture

30 Aug 2009 - 10:54 am | JAGOMOHANPYARE

ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. >>>>>>>>>>>

१०० टक्के सहमत.... :(

पक्या's picture

30 Aug 2009 - 11:05 am | पक्या

अहो जागो मोहन प्यारे, नुसती अपेक्षाच ठेवते ना. नवरा खरोखर बरोबरीने कष्ट उपसतो का? माझ्या ओळखीतल्या असंख्य कुटुंबातील नोकरी करणार्‍या बायका ऑफीसहून /कामाहून घरी आल्या की परत घरातील कामाला लागतात. सकाळचा डबा, संध्याकाळचा स्वयंपाक ह्या शिवाय मुलांचे खाणेपिणे, शाळा, अभ्यास, आजारपण , पाहुण्यांचे आदरातिथ्य, भाजीपाला/बाजारहाट अशी अनेक कामे त्यांच्यासमोर असतात. शनिवार रविवार ची सुट्टि देखिल आठवड्याच्या तुंबलेल्या कामात जाते. मग नोकरी करणार्‍या स्त्रीने नवर्‍याने देखिल संसारातील कामांना हातभार लावावा अशी अपेक्षा ठेवली तर बिघडले कुठे?

नवरा बायको दोघेही ऑफीस हून घरी आल्यावर बायकोने बनवलेला चहा आरामात पिणारे महाभाग ही पाहिले आहेत.

युयुत्सु's picture

31 Aug 2009 - 10:34 am | युयुत्सु

तुमच्या युक्तीवादात एक गल्लत आहे ती अशी - तुम्ही ज्या बायका सांगत आहात त्यांची लग्नं झालेली आहेत. मी जे विधान उद्धृत केले ते आजच्या विवाहेच्छु मुलींच्या संदर्भात आहे.

पक्या's picture

31 Aug 2009 - 1:54 pm | पक्या

come on now..
गल्लत तुमचीच होते आहे. विवाहेच्छु मुलीवर लग्ना आधीच कशी काय उत्पन्नाच्या / खर्चाच्या वाटणीची वेळ येईल ? त्यामुळे लग्नाआधी घूमजाव करण्याचा प्रश्नच येत नाही.

युयुत्सु's picture

31 Aug 2009 - 4:03 pm | युयुत्सु

माझी काहीही गल्लत झालेली नाही. आजकालची शहाणी मुले-मुली लग्ना अगोदर भेटतात तेव्हा आर्थिक बाबींवर चर्चा करतात, त्यातून ही भूमिका कळते...