... आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना?

Primary tabs

सुनील's picture
सुनील in कलादालन
21 Aug 2009 - 6:05 am

पाडगावकरांचे हे शब्द कदाचित भारतीय फुलांसाठी लागू होत असतील परंतु, लिलीसारख्या मूळच्या परदेशी फुलाला हा संयम मान्य नसावा! पावसाळा सुरू झाला की एरवी आठ महिने गुपचूप बसलेली लिली बहरू लागते. गुलाब, मोगरा आदी फुले प्रथम बरेच दिवस कळ्यांच्या स्वरूपात असतात आणि हळूहळू त्यांचे फुलात रुपांतर होते. पण ह्या लिलीचे सगळेच निराळे. संध्याकाळ झाली की, त्या कळ्या अगदी धुसमुसळेपणाने उमलतात.

त्याचीच एक झलक.........

छायाचित्रणाचा दिनांक आणि वेळ - १८ ऑगस्ट २००९ संध्याकाळी ६ वाजता
स्थान - घरचा बगिचा, ठाणे

टीप - चित्रण मोबाइलचा कॅमेरा वापरून केले आहे, तेव्हा त्याची प्रत फार चांगली नाही.

" alt="" />

छायाचित्रण

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

21 Aug 2009 - 8:40 am | पाषाणभेद

∴ संयम, धसमुसळेपणा ≈ भारतीय, परदेशी (अनुक्रमे)

व्हिडीओ खिडकीतून का घेतला हो? झाडाजवळ जाता येत नव्हते काय?

पयला फटू दिसना जनू.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

पिवळा डांबिस's picture

21 Aug 2009 - 9:46 am | पिवळा डांबिस

कुंपणापलिकडल्या ठाणेकर लिल्या धसमुसळेपणाने फुलतांना चोरून बघतांय......
हा छंद बरा नव्हे हां, सुनीलभाऊ!!!
गोत्यात याल कधीतरी!!!
:)))))

बिकट वाट वहिवाट नसावी
धोपटमार्गा सोडू नको....
संसारामधी ऐस आपुला
उगाच भटकत फिरू नको....
:)))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2009 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण सुनील, तुम्हाला बरा तोच क्षण मिळाला उमलण्याचा! सह्ही वाटलं...

अदिती

अवलिया's picture

21 Aug 2009 - 11:45 am | अवलिया

ठाण्याची मंडळी भारी हौशी बुवा... कशाकशाचे चित्रीकरण करतील काही नेम नाही.

--अवलिया

स्वाती दिनेश's picture

21 Aug 2009 - 11:48 am | स्वाती दिनेश

फूल होताना पाहिले, खरच अगदीच धसमुसळेपणाने कळीचे फूल झाले की.. पहिला फोटो दिसत नाही, :(
स्वाती

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 12:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अगदी हेच म्हणायचे आहे स्वातीसारखे.तुम्हाला तो क्षण टिपता आला,फारच छान.

मदनबाण's picture

21 Aug 2009 - 12:03 pm | मदनबाण

अगदी अचुक क्षण पिक्चरवला हाय !!! :)

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

चतुरंग's picture

21 Aug 2009 - 4:05 pm | चतुरंग

अचानक एका सेकंदात 'ढिली' पडत असेल असं वाटलं नव्हतं सुनीलराव! ;)
बाकी उमलण्याचा म्हणण्यापेक्षा 'उघडण्याचा' क्षण म्हणणे जास्त योग्य वाटेल कारण एखाद्या खोलीची दारे सताड उघडावीत तसे फूल उघडले गेले. आश्चर्यच आहे खरे! :O

चतुरंग

स्मिता श्रीपाद's picture

21 Aug 2009 - 6:08 pm | स्मिता श्रीपाद

मला फोटो / चित्रण काहीच दिसत नाहीये.. :-(
कोणीतरी मदत करु शकेल का?

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Aug 2009 - 6:13 pm | बिपिन कार्यकर्ते

आमच्या बिल्डिंगमधे ही लिलीची बरीच झाडं होती. विशेषतः पावसात खूप फुलायची. आणि अगदी अशीच फटकन फुलतात फुलं. आठवलं ते सगळं. मस्त.

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

21 Aug 2009 - 6:36 pm | लिखाळ

वा .. मी सुद्धा ही फुले उमलताना मुद्दमहुन थांबुन पाहिली आहेत. मजा येते. तुम्हाला छान नेमका क्षण पकडता आला. :)

-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

चित्रा's picture

21 Aug 2009 - 8:48 pm | चित्रा

व्हिडिओ आवडला. नावही काव्यमय.

बोरकरांच्या एका पुस्तकात कृष्णकमळ उलगडतानाचे असेच वर्णन आहे ते आठवले. पुस्तकाचे नाव आठवत नाही आता. लेखांचा छान संग्रह होता.