मूळ रंगांचा एकदा झाला मोठा वाद
सारे म्हणती मीच श्रेष्ठ हेच निर्विवाद
शांतीप्रीय आम्ही हिरवा, निळा, जांभळा,
भडक व गर्विष्ट, लाल, नारींगी, पिवळा
प्रत्ये्कजण केवळ गाती आपली महती
मी श्रेष्ठ म्हणतांना इतरांस नावे ठेवती
काहीच करून त्यांचा वाद नाही शमला
तेव्हा लोलक धरून पांढरा सरसावला
बघा जरा म्हणत लोलका मधून तो गेला
अनेक रंगांचा फ़ुलोरा दुसऱ्या बाजूने आला
वेड्यांनो तुम्ही सारे माझेच आहात अंश
पांढऱ्यानेच बनवले सगळ्या रंगांचे वंश
सारे रंग गप्प बसले, पांढरा आनंदे नाचला
म्हणे मीच विश्व विजेता निर्विवाद ठरला
कृष्ण रंग बघत होता गुपचूप तमाशा
म्हणाला सगळ्यांना या माझ्यासवे बसा
एकेक करून रंग सगळे कृष्णाकडे गेले
सगळे आत विलीन हो़उन कृष्णमयी झाले
भले, बुरे, लहान, थोर, रंगात रंग कृष्ण
उगम वा अंतीम फ़क्त कृष्ण. कृष्ण. कृष्ण.
प्रतिक्रिया
16 Aug 2009 - 2:53 pm | क्रान्ति
भले, बुरे, लहान, थोर, रंगात रंग कृष्ण
उगम वा अंतीम फ़क्त कृष्ण. कृष्ण. कृष्ण.
वा!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
16 Aug 2009 - 3:19 pm | श्रावण मोडक
थोडी वेगळी होती. थोडे वेगळे मिळाले.
रंगांचे भाष्य राजकीय संदर्भांनुसार घेतले तर, काळ्याला कृष्ण ठरवणे... अगदी समर्पकच म्हणूया का?
16 Aug 2009 - 3:34 pm | मदनबाण
भले, बुरे, लहान, थोर, रंगात रंग कृष्ण
उगम वा अंतीम फ़क्त कृष्ण. कृष्ण. कृष्ण.
व्वा. :)
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
17 Aug 2009 - 1:36 pm | मनीषा
सुरेख सप्तरंगी कविता ...
भले, बुरे, लहान, थोर, रंगात रंग कृष्ण
उगम वा अंतीम फ़क्त कृष्ण. कृष्ण. कृष्ण. --- खूपच छान !
17 Aug 2009 - 6:58 pm | बिपिन कार्यकर्ते
छान आहे कविता.
बिपिन कार्यकर्ते
17 Aug 2009 - 8:27 pm | प्रशांत उदय मनोहर
आवडली.
आपला,
(रसिक) प्रशांत
17 Aug 2009 - 8:59 pm | अनिल हटेला
रंगीत कविता आवडली....
(कॄष्णवर्णी) कलर गेला तर पैसे परत....;-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
17 Aug 2009 - 9:11 pm | प्राजु
सुंदर कविता.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Aug 2009 - 6:26 am | अरुण मनोहर
सर्व वाचकांचे आणि प्रोत्साहन देणाऱ्यांचे मनापासून आभार.