नाक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Aug 2009 - 11:34 pm

या लेखाचे शीर्षक "नाक" असेच आहे. खरेतर नाक हा मानवी शरीराचा एक ठसशीत अवयव. पण आपण त्याच्या कडे तसे उपहासानेच पहातो. माणसाच्या चेहेर्‍याकडे पाहिल्यावर नजरेत भरतात ते दोन अवयव. डोळे आणि नाक.
डोळ्यांबद्दल लोकानी शायरानी फार काही लिहिलय.
डोळे जुल्मी असतात , डोळे लबाड असतात , डोळे खट्याळ असतात, डोळे बोलके असतात, डोळे पाणीदार असतात्.....असे बरेच काही. आता पाणीदार हे विषेशण डोळ्यांपणे नाकालाही लागु होते. पण पाणीदार डोळ्याची मुलगी असे म्हंटल्यावर एखादी झाशीची राणी आठवते. तिची करारी मुद्रा नजरेसमोर येते. पण पाणीदार नाकाची मुलगी म्हंटल्यावर नजरेसमोर जे काही येईल ते नजरेसमोर यावे असे वाटतही नाही .
नाकावरून सौंदर्य ठरत नाही असे नाही. तरतरीत नाकाची ,चाफेकळी नाकाची ,अपर्‍या नाकाची , अशा बर्‍याच नाकांची वर्णने सौंदर्याच्या वर्णनात येतात.
संस्कृतात कालीदासाच्या अष्टनायीकांची जी वर्णने येतात त्यात शंखीणी पद्मिनी अशी काही वर्णने आहेत. त्यात नाकाबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही. फारतर कुठेतरी किर्लोस्करांच्या नाटकात बिंबाधरा असा एकमेव शब्द नाकासम्दर्भात आला आहे. पण हे नाक नक्की कोणत्या प्रकारचे आहे ते समजत नाही.
नाही म्हणायला नाकावरून मराठीत बरेच वाक्प्रचार/म्हणी आहेत.
उदा: नाकापेक्षा मोती जड. नाकाला मिरच्या झोंबणे , नाक खुपसणे , नाकदुर्‍या काढणे , नाक उडवणे, नाकावर राग असणे, नाक कापणे,नाक ठेचणे, नाकावर टिच्चून करणे , नाकाने कांदे सोलणे,नाकासमोर बघून चालणे वगैरे वगैरे.....
आता नाकापेक्षा मोती जड ही म्हण काय अर्थाने आहे ते सगळे जण जाणतातच. पण ही म्हण ऐकताना मला ती म्हण शोधणार्‍या माणसाने नुसत्या नाकाचे वजन कसे केले असेल हा प्रश्न पडला होता
नाकावर मराठी कादंबर्‍यात खांडेकरानी आणि फडक्यानी अपार प्रेम केले. खांडेकरांची नायीका नेहमी अपर्‍या नाकाची असते. तीच्या नाकाचा शेंडा लाजेने लाल होतो
फडक्यांची नायीका अधूनमधून पातळाच्या शेपट्याबरोबर फणकार्‍याने नाकही उडवत असते
फडके खांडेकर जसे अदृष्य झाले तसे मराठी कथेतून नाकही हद्दपार झाले.
एकूणच नाकाबद्दल मराठीच काय इतर कोणत्याही भाषेला फारसे प्रेम वाटत नसावे.
प्रेयसीच्या सर्वांगांची वर्णने निरोप्या मेघाला लिहिणार्‍या कालीदासाच्या यक्षाला प्रेयसीचे नाक कसे आहे हे फक्त विरहाने रडुन रडून तीचे ना़क आणि डोळे लाल झाले असतील एवढेच लिहायला सुचावे?
हिन्दी/उर्दू शायरानीही प्रेयसीच्या नाकाचे फारसे वर्ण केलेले नाही.
वास्तवीक नाक नसते तर हे शायर लिहायला जिवंत तरी राहिले असते का?
नाकाचे प्रकार तरी किती. जरा चेहेरे निरखून पहा. गोबरे गाल आणि पानीदार डोळे या पलीकडे पहा एकेक नाकाचे तोरे तरी किती.
कोणाचे नाक चाफेकळी म्हणजे अगदी नाजूक असते. कोणाचे नाक बसके असते. कोणाचे टोकदार असते. गरुडाच्या चोचीसारख्या बाकदार नाकाची माणसे असतात. चपटे नाक असते, फुगीर नाक असते. आकार नसलेल्या भज्याच्या आकाराचे नाक असते. मुमताजसारख्या अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत तिच्या गोल टेंगळासारख्या आकाराच्या नाकाचा मोठा वाटा आहे.
तरतरीत धारदार नाक म्हंटले की शिवाजी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते. चित्रपटातही ते तसे नाक असल्याशिवाय शिवाजी खरा वाटत नाही.
शिल्पा शेट्टीने नाकाचा आकार बदलून घेतल्यानन्तर ती अधिकच सुंदर वाटु लागली.
मायकेल जॅक्सनने तर त्याला लोक फताड्या नाकाचा असे म्हणायचे म्हनून नाक तीन वेळा बदलून घेतले होते म्हणे.
असो....आपण मराठीतल्या नाक या शब्दाबद्दल बोलुयात.
नाक असणे म्हणजे महत्वाचे ठाणे असणे अशा अर्थाने नाक येते. नाक दाबले की तोंड उघडते.इंग्रजीत समथिंग बिलो म्य नोज म्हणजे अगदी नाकाखालीच उपद्व्याप करणे अशा अर्थाने नाक येते.
चौकाला नाका म्हणण्याची पद्धत मुम्बैत तीही लालबाग परळ भागात आहे. आमच्या गावात नाका केवळ जकात नाक्यालाच म्हणायचे. त्यामुळे कोनी नाक्यावरून पान खाऊन येउया असे म्हणाले की मला कळायचे नाही. नाका हा शब्द मी सर्वप्रथ ऐकला तो भाऊ पाध्येंच्या " वासू नाका सांगोपांग" या पुस्तकाच्या नावात . तेंव्हाही एखाद्या जागेला नाका असे का म्हणत असतील हा प्रश्न होताच.
मराठी कवितेत ही कवी बी यांच्या गावच्या पाटलाच्या पोरीचे वर्णन असणार्‍या "गोधूम वर्ण तीचा हरणाच्या पाडसाच्यापरी डोळे" या पलिकडे नायीकेच्या चेहेर्‍याचे वर्णन नाही. सातवीत असताना ही कविता अभ्यासाला होती. तेंव्हा त्या नायीकेचे चित्र काढा असे सांगितले असते तर नाकाशिवाय चित्र पूर्ण झालेच नसते.
(क्रमशः)

वावरविचार

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

13 Aug 2009 - 11:43 pm | अभिज्ञ

आयला कमाल आहे,
विजुभाउ तुम्हाला हे सर्व काहि सुचते कसे?
अन इथे पण क्रमशः???????

आतापासून तुमचे नाव
विजुभाउ क्रम शाह असे ठेवावे काय?

:)

अभिज्ञ.

अवांतरः लेख चांगला झालाय.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

टारझन's picture

14 Aug 2009 - 12:17 am | टारझन

च्यायला ... विजुभौ .. एकदम फॉर्मात की .. झकास लेखण हो ... ;)

आणि हो ..

माणसाच्या चेहेर्‍याकडे पाहिल्यावर नजरेत भरतात ते दोन अवयव.

हे वाक्य हृदयाला भिडले ... तो "चेहर्‍याकडे" हा शब्द दोन सेकंद दिसला नाही.. आणि भलतेच काही डोळ्यांत भिडले !

असो .. चालू द्या

- टारूभाऊ

प्रशांत उदय मनोहर's picture

14 Aug 2009 - 12:15 pm | प्रशांत उदय मनोहर

:))

शैलेन्द्र's picture

14 Aug 2009 - 5:26 pm | शैलेन्द्र

त्यात आणि नाकात एक साम्य आहे... माणसाचे नाक आयुष्य्भर वाढत असते, आणि डोळे तेवढेच राहतात..

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 2:01 am | स्वाती२

छान लेख.
>>किर्लोस्करांच्या नाटकात बिंबाधरा असा एकमेव शब्द नाकासम्दर्भात आला आहे. पण हे नाक नक्की कोणत्या प्रकारचे आहे ते समजत नाही.
मला वाटते बिंबाधरा हा शब्द ओठांचे वर्णन करायला वापरलाय.

विजुभाऊ's picture

14 Aug 2009 - 9:22 am | विजुभाऊ

बिंबाधरा हा शब्द ओठांचे वर्णन करायला वापरलाय
नसावा तो अधरावरील बिम्ब या प्रकाराने आलेला आहे. त्यामुळे कदाचित नाक किंवा अधरावरील तीळ असा असू शकेल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

यशोधरा's picture

14 Aug 2009 - 9:49 am | यशोधरा

>>नसावा तो अधरावरील बिम्ब या प्रकाराने आलेला आहे

नाही. बिंबाप्रमाणे अधर आहेत, अशा अर्थाने आहे ते. ओठांचे वर्णन करण्यासाठीच तो शब्द वापरलेला आहे. स्वाती२ ह्यांना अनुमोदन.

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 3:54 pm | स्वाती२

Cologne Digital Sanskrit Lexicon: Search Results
1 bimbAdhara m. a nether lip (red like the BñBimba fruit) S3ak.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2009 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाकावरचा लेख आवडला !
च्यायला तुम्हाला हे असे वेगवेगळे विषय सुचतात कसे ?

अवांतर : संपकाळातील प्राध्यापकांचे पगार रोखणार :(

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

14 Aug 2009 - 8:30 am | दशानन

असेच म्हणतो... !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

झकासराव's picture

14 Aug 2009 - 9:30 am | झकासराव

नाकाला मास्क लावा विजुभो स्वाइन फ्लु का जमाना है.
:)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुनील's picture

14 Aug 2009 - 9:42 am | सुनील

क्लिओपात्राचे नाक थोडे नकटे असते तर जगाचा इतिहास बदलला असता, असे म्हणतात!

थोडक्यात नाकाचे महत्त्व कोणीच नाकारीत नाही.

अवांतर - आपले विविध व्यंग्यचित्रकार इंदिरा गांधींचे नाक काय सुरेख काढीत असत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

14 Aug 2009 - 9:42 am | अवलिया

झक्कास हो विजुभाउ क्रमशः वाले ... :)

च्यायला, जपानी गादीवर झोपुन बरेच वेगवेगळे विषय सुचायला लागले की तुम्हाला ... वा ! झोपत रहा.. आय मिन.. लिहित रहा.. !

येवु द्या अजुनबाकीच्या पण अवयवांचे वर्णन.. असेच खुमासदार !

--अवलिया

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Aug 2009 - 1:37 pm | फ्रॅक्चर बंड्या

मास्क जर आठवडाभर वापरला तर नाक चपटे होण्याची शक्यता आहे का ?

अवलिया's picture

14 Aug 2009 - 1:45 pm | अवलिया

नाही. पण दोरी कानावरुन घट्ट बांधलेली असल्यास कान गळुन पडतो.

--अवलिया

अरुण वडुलेकर's picture

14 Aug 2009 - 4:04 pm | अरुण वडुलेकर

... याला स्त्री सौंदर्य वर्णात आधिक गुण दिलेले आढळतात.
उदा. मुमताज़
पहा ' तेरे मेरे सपने' गाणे : हां मैने कसम लीई..

विनायक प्रभू's picture

14 Aug 2009 - 5:09 pm | विनायक प्रभू

अहो धोकादायक गोष्ट आहे ती पुरुषांकरता म्ह्णुन वर्णन नाही.

सुधीर काळे's picture

14 Aug 2009 - 5:42 pm | सुधीर काळे

अतीशय खुसखुशीत विनोदाने भरलेला मस्त लेख. खूप आवडला.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2009 - 5:48 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला भूभूंचे काळ आन गारगार नाक जाम आवडतं ब्वॉ! माठाचे तत्व भुभुंचे नाक गार करते. कानाला,नाकाला आन गालाला भुभुंच्या गार गार नाकाचा स्पर्श म्हण्जे आहाहा काय सुखद असतं. सुख सुख म्हणतात ते हेच!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रीयुत संतोष जोशी's picture

15 Aug 2009 - 6:26 pm | श्रीयुत संतोष जोशी

छान लेख. आवडला.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2009 - 7:49 pm | बिपिन कार्यकर्ते

छान लिहिलंय. क्रमशः मधे पुढे काय आता?

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

15 Aug 2009 - 10:56 pm | विजुभाऊ

क्रमशः मधे पुढे काय आता?

बघुयात! नाकाच्या नन्तर ओठ असतात आणि वरती डोळे असतात.
( ओठ आणि नाकाच्या मध्ये कधितरी मिशी सुद्धा असते);)
ओठ आणि डोळे यावर बरेच साहित्य अगोदरच निर्माण झालेले आहे
तेरी आखोंसे पिला दे साकिया
आज तष्नगी मिटाने की आरजू है.........

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे