अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन.
सिच्युएशन अशी..
जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन,
`...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर
मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत.
वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री
बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर...
मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले. आणि माझ्या संतप्त बायकोची चाहूल लागताच
मला एकटे सोडून पोबारा केला. पण तिने दार उघडलेच नाही.
त्या क्षणाची ही व्यथा... भीमराव पांचाळे गाताना आधी काही ओळी
गातात, त्या सकट...
पोचवाया जी आली ती माणसे गेली कुठे?
शूर आणि धीट सारी माणसे गेली कुठे?
मी तिला भलताच भितो, माहिती त्याना जरी
आग्रहाने पाजणारी माणसे गेली कुठे?
दारासमोर माझ्या मी एकटाच उरलो
बायकोला भ्यायलेली माणसे गेली कुठे?
......
(मी माझ्याच दारात नेमका येतो, त्या अर्थी..)
अंदाज बायकोचा वाटे खरा असावा
शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा
भेटून अंगणाला, इतुके विचार आता
निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो
झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा
ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही
ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा
(तिचा राग क्षणिक हे सत्य. पहाटे दार उघडेल
तेव्हा ती माझी जुनीच प्रेमळ, प्रसन्न बायको असावी एवढीच इच्छा...)
उघडेल दार तेव्हा संपून राग जावो
माझ्या समोर माझा तो मोगरा असावा
अविनाश ओगले...
प्रतिक्रिया
22 Jan 2008 - 9:53 pm | ऋषिकेश
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो
झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा
ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही
ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा
उघडेल दार तेव्हा संपून राग जावो
माझ्या समोर माझा तो मोगरा असावा
:)))))))))
हे खास आवडलं.. बाकी विडंबनही ठिक आवडलं.
-ऋषिकेश
23 Jan 2008 - 8:51 am | प्राजु
मस्त आहे..
आवडले. ऋषिकेश यांच्याशी सहमत.
- प्राजु
23 Jan 2008 - 1:02 pm | धोंडोपंत
वा वा पंत,
क्या बात है!!!! हा हा हा हा हा
अंदाज बायकोचा वाटे खरा असावा
शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा...
हसून हसून पुरेवाट. सही. अप्रतिम विडंबन. मुक्तकाचे विडंबनही झकास.
क्या बात है!!
आपला,
(हसरा)धोंडोपंत
तात्या,
मैफिल जमायला लागलेय रे!!!
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
24 Jan 2008 - 12:50 am | विसोबा खेचर
तात्या,
मैफिल जमायला लागलेय रे!!!
अगदी खरं आहे! दिवसेंदिवस मिपावर मजा येते आहे..
आपला,
(समधानी) तात्या.
12 Mar 2008 - 3:09 pm | मुकुंद लहाने
झ्कास बाय्कोचय भ्ह्द्रा
23 Jan 2008 - 4:49 pm | स्वाती राजेश
विडंबन आवडले. अजुनी अशीच येऊ देत. वाट पाहात आहे अशाच विडंबनाची..
ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही
ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा
उघडेल दार तेव्हा संपून राग जावो
माझ्या समोर माझा तो मोगरा असावा
हे आवडले.
24 Jan 2008 - 3:04 pm | दीपा॑जली
हयात जरा बदल करावा.
आपण घरात आहात आणि बायको बाहेरऊन party वरुन आली तर आपली काय प्रतिक्रीया असेल?
24 Jan 2008 - 8:52 pm | अविनाश ओगले
अंदाज या नशेचा वाटे खरा असावा
बहुतेक बायकोचा तो चेहरा असावा
बायको पार्टीला गेल्यावर मी घरी बसून नशेशिवाय दुसरे काय करणार?
24 Jan 2008 - 9:40 pm | सुनील
बदलही मस्त!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Jan 2008 - 10:12 pm | विसोबा खेचर
भेटून अंगणाला, इतुके विचार आता
निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा
वा वा! मस्त विडंबन..
अवांतर -
आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले...
तात्या.
25 Jan 2008 - 2:35 pm | अविनाश ओगले
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच.
`... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...
25 Jan 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच.
`... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...
क्या बात है...:)
25 Jan 2008 - 9:23 pm | केशवसुमार
अविनाशशेठ,
का सुमाराची थट्टा करता...
बाय द वे.. ते डोंबिवलीच्या चाळी मधले आणि ते मालिकांचे विडंबन पण येथे येऊ द्या.. दोनी ही उच्च आहेत..
ह्या विडंबनातील 'माणसे गेली कुठे ' च्या सगळ्या द्विपदी जबरा आहेत..
केशवसुमार
25 Jan 2008 - 7:12 pm | राजे (not verified)
कीती तरी पिय्यकडांच्या मनातील विचार बोलून दाखवले तुम्ही....
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
27 Jan 2008 - 5:13 pm | सुधीर कांदळकर
भेटून अंगणाला, इतुके विचार आता
निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा
या ओळी जास्त आवडल्या.
वा छान. पुढील कवितेसाठी शुभेच्छा.
11 Mar 2008 - 11:28 am | जितेंद्र शिंदे
अविनाशकाका खरंच मजा आली.
उघडेल दार तेव्हा संपून राग जावो
माझ्या समोर माझा तो मोगरा असावा
काय भन्नाट आहे
जितेंद्र शिंदे