गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो.
हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे. पण नेहमीच मंदिरातील गोड स्वरांचा भास होते. या रागातील आरोहात शेवटचे धनीधसा हे चलन खूपच परिणामकारक आणि गोड वाटते. मंदिरासारखे पावित्र्य या रागात आहे.
- घ्या थोडा आस्वाद या रागाचा
http://www.esnips.com/doc/19dbe8db-a2a2-4368-9faa-4b16461fc27d/Lata-Mang...
प्रतिक्रिया
9 Aug 2009 - 10:28 pm | घोडीवाले वैद्य
मोगरा फुलला! लता दीदींचा स्वर, हृदयनाथांचे संगीत खरेच अप्रतिम गाणे आहे.
हे गाणे गोरख कल्याण रागातील आहे हे माहित नव्हते.
गाण्यात एक टवटवीतपणा जाणवला. यामुळे श्रोताही ताजातवाना होत असेल.
माहितीबद्दल धन्यवाद
10 Aug 2009 - 8:51 am | क्रान्ति
पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो. १००% सहमत.
हा गोरखकल्याणचा आणखी एक सुरेल आविष्कार.
हा देखिल गोरखकल्याण आहे, असं ऐकलंय.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
10 Aug 2009 - 8:56 am | JAGOMOHANPYARE
फॉरीनची पाटलीण हा गेल्या वर्शी आलेला मराठी चित्रपट.. त्यातील एक गाणे... 'नाही सन्सार हा खेळ सारीपाट सोन्गटीचा. मान्डिते सन्सार माझा राम जानकीचा'... हे देखील गोरख कल्याण मधले आहे असे वाटते.. बागेश्री आहे, बागेश्री आहे असे वाटत असतानाच अचानक लक्षात येते, अरे गंधार कुठाय ?
10 Aug 2009 - 5:35 pm | अन्वय
मोहनप्यारे अगदी खरे आहे तमुचे म्हणणे. गोरख कल्याण आणि बागेश्रीत केवळ गंधारचा तर फरक आहे. त्यामुळे गोरख कल्याण ऐकताना गफलत होणे, हे समजण्यासारखे आहे.
परंतु गोरख कल्याण रागाच्या आरोहातील मधनिधसां आणि अवरोहातील रेनिधसा ही सुरावट या दोन रागातील फरक बऱ्यापैकी स्पष्ट करते.
11 Aug 2009 - 8:18 am | विसोबा खेचर
माझाही आवडता राग..
माणिकताईंचा ऐकला आहे. फार सुंदर गायच्या.
अन्वयराव, येऊ द्या अजूनही अशीच काही छोटेखानी राग-प्रकटने.. :)
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
11 Aug 2009 - 10:47 pm | अन्वय
धन्यवाद तात्या!
जरूर प्रयत्न करीन