ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........

समंजस's picture
समंजस in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 4:24 pm

ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........

(वि. सु.):
१. लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काहि चुका झाल्या असतीलच. तरी कृपया क्षमा करावे.
२. संपादकांना ह्या लिखाणात कोठलाहि भाग वगळने किंवा संपादन करणे आवश्यक वाटल्यास तसे जरुर करावे.

-------------------------------------------------------------------------------------------

मिपा चा मी नियमीत वाचक. साधारण ५-६ महिन्यांपासून. मिपा हे पहिलेच मराठी संकेत स्थळ जे माझ्या बघण्यात/वाचन्यात आले. मिपा चा शोध कसा लागला या मागे एक रुचकर कारण आहे. ते केव्हा तरी :>

जेव्हा पासून मिपा वर आलो तेव्हा पासून मी नियमीत वाचक झालो. फक्त या दरम्यानच्या चं नाही तर, मिपा अस्तित्वात आल्या पासूनचे लेख मी वाचून काढलेत....अजूनही वाचतोय.
मिपा वर आल्यावर मला इतर मराठी संकेत स्थळां बद्दल कळले. त्या संकेत स्थळांना सुदधा मी भेट दिली, मात्र जो प्रभाव मिपा ने माझ्यावर टाकला तो इतर संकेत स्थळांनी नाही. मिपा च्या नियमीत वाचनाने मिपा वरच्या सिद्धह्स्त लेखक/लेखिका तसेच प्रतिसाद देणारे यांची चांगलीच ओळख झाली

मात्र मागच्या आठवडयात, ठाण्याला होण्यार्‍या मिपा कट्टया बद्दल तात्यांकडून कळले(काथ्याकूट) आणि एकदम आनंद झाला आणि ठरवून टाकले की ही संधि सोडायची नाही. मिपा वरची मोठ मोठी माणसे कट्टयाला येणार...मिपा वरचे सिद्धह्स्त लेखक/प्रतिसाद देणारे येणार आणि ह्या सर्वांशी प्रत्यक्ष भेट होणार...यांच्या गप्पा ऐकता येणार ह्या कट्टयाच्या निमीत्त्ताने म्ह्टल्यावर आनंद झाला 8>

शुक्रवारी सकाळीच म्हणजे ११.३० ला, प्रत्यक्ष तात्यांशी भ्रमण ध्वनी वर संम्पर्क साधला(कटटया ला येणार हे सांगायला आणि परवानगी घ्यायला). मात्र तात्या त्या वेळेस कदाचित सौदे करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी माझं नाव विचारलं आणि सध्या कामात बिझी असल्यामूळे अर्धा/पाऊण तासाने परत फोन करतो असे बोलून संभाषण संपवले.....

पाऊण तास काय सहा तास होऊन गेलेत तरी तात्यांचा फोन आला नाही. मनात आलं, आता तात्या विसरलेत, फोन काही येणार नाही. मिपा कटटा हूकला :( हा विचार करतच घरी गेलो.
रात्री जेवायला बसल्यावर अचानक फोन वाजला, बघतो तर काय, हे तर तात्या!...अर्थातच आनंद झाला आणि बरे सुदधा वाट्ले की, तात्या सारखा मोठा माणूस आपल्याला विसरला नाही.
प्राथमीक बोलणे झाल्यावर तात्यांनी मला शनिवारी ठरलेल्या वेळेवर यायला सांगीतले. :D

शनिवारी संध्याकाळी ५ वाजता मी अंधेरीहून ठाण्याला जायला निघालो (ठाण्याला पोहोचायला साधारण दीड-दोन तास लागतात). ठाणे स्टेशनला बाहेर आल्यावर ऑटो रिक्शात बसून खोपट ला जायला निघालो. खोपट आल्यावर प्रताप थिएटर जवळ थांबायला सांगितले. ऑटो रिक्शा नेमका थिएटरच्या गेट जवळ थांबला. उतरल्यावर लक्ष्मी-केशव कार्यालय काही दिसेना #o . पत्त्याप्रमाणे ते कुठेतरी थिएटर च्या जवळपास असायला हवे होते. स्वतः शोधण्यात वेळ वाया जाउ नये म्हणून जवळच असलेल्या चहाच्या टपरी कडे गेलो आणि त्याला विचारले, त्याला माहीत नव्हते. बाजुलाच सिग्रेट/पाना ची टपरी होती. त्याला विचारले...त्याला माहित होते....कार्यालय हे नेमके थिएटरच्या विरूद्ध दिशेला म्हणजे समोर होते 8}

कार्यालयाच्या आत गेल्यावर बघतो काय, तिथे बरीचशी मंडळी आधीच येऊन बसलेली, त्यात स्त्री-पुरूष दोघेही होते. समोरच एक व्यासपिठ होते आणि त्यावर ४-५ माणसे बसलेली. एकूण उपस्थितांमध्ये काहि वयस्कर मंडळी सुद्धा होती..........काही क्षण मला कळेचना की हे काय आहे! :?
क्षणभर मला वाटलं की कदाचीत इथे यायला मला उशीर झाला आहे...आणि कटटा सुरू झाला आहे. :SS
घडयाळात वेळ बघीतली तर आत्ता कुठे ७ वाजलेले.....विचारात पडलो की हे काही बरोबर वाटत नाही, वेळेच्या आधी सर्वांनी येणे, कट्टा सुरू होणे, शक्यच नाही..
आणि हे व्यासपिठ कशा करीता ?? कट्टा आहे की मास्तरांचा समुपदेशन कार्यक्रम ?? ( मला खरंच असे वाटले..मास्तर कृपया क्षमा करणे )....आणि सदस्य संख्या सुदधा बरीच दिसतेय..तिथे असलेल्या जमावात एखादा तरी बघीतलेला (मिपावर) चेहरा दिसतो का हे मी डोळ्यांना ताण देउन बघु लागलो....मात्र यश काही आले नाही. आता आणखी वेळ न घालवता, तिथे जाउन बसावे आणि नंतर एखादा ओळ्खीचा चेहरा दिसतो का हे बघावे असं ठरवतोय तेव्हढयात तिथल्या चौकीदाराने कोणाला भेटायचंय असे मला विचारले, मी त्याला सांगीतले की इथे मिपा कट्टा होणार आहे आणि मी त्या करीता आलोय. मात्र त्याला काही कळले नाही, त्याला समजेल असे विचारावे म्हणून मी त्याला विचारले की इथे बसलेली मंडळी काय मिपा कटटया करीता आलेली आहे का ?? यावर तो गोंधळला, त्याने बाजुला बसलेल्या एका कर्मचार्‍याला मला मदत करायला सांगीतले.
त्या कर्मचार्‍यानी मला सांगीतले की ही +++++ यांची मिंटीग आहे.
आता मी थोडा सावरलो. मी चौकीदाराला सांगीतले, मला श्रीयूत जोशी यांना भेटायचंय...हे ऐकल्यावर त्याचा जीव भांडयात पडला आणी तो मला जोशींच्या ऑफिस कडे घेउन गेला.

आत प्रवेश केल्यावर दिसलं की, ४-५ मिपाकर, श्रीयूत जोशी, मदनबाण, अमोल खरे, संकेतजी कळके, निखील देशपांडे आधीच उपस्थीत आहेत आणि गप्पा सुरू आहेत. सर्वांशी ओळख करून घेतल्यावर परत गप्पा सुरु झाल्या.
काही वेळाने श्री आला, थोडया वेळाने ब्रिटीश टिंग्या आला, सगळ्यांशी ओळख झाल्यावर परत गप्पा सुरू......
काही वेळाने प्रभु मास्तरांचं आगमन झालं.......ज्यांच्या बद्द्ल खुप काही वाचलेलं (इतरांच्या लिखाणातुन्/प्रतिसादातून) तसंच त्यांच्या स्वतः च्या लिखाणातून (क्रिप्टीक का काय ते..:) ) ह्या सर्वांमुळे त्यांची एक प्रतिमा मनात निर्माण झाली होती......काही प्रमाणात ती जुळली..काही प्रमाणात नाही.. :)
प्रभु मास्तर हे खुप बिझी माणुस. आल्या पासून ते जाई पर्यंत भ्रमण ध्वनीवर व्यस्त होते. :)] नाही म्हणायला अधून मधून फोन बंद असायचा तेव्हा आमच्याशी बोलायचे..:)
मास्तर आल्या वर परत एकदा ओळख परेड झाली. :) मी आपला उत्सूकतेने त्यांच्या कडे बघत होते आणि ऐकत होते, की कोठे कोठे हे क्रिप्टीक बोलतात.....(ज्या करता मास्तर हे मिपावर प्रसिदध आहेत) :) मात्र आश्चर्य हे की मला त्यांचं बोललं सगळचं कळलं....( त्या मुळे मी आता सभ्रंमात आहे की मी खुप हुशार आहे की मास्तर काहीच क्रिप्टीक बोलले नाहीत :? )

फोटो बघण्या करीता इथे http://www.misalpav.com/node/8858 टिचकी दयावी...(आभार-श्रीयुत संतोष जोशी)

जोशींच्या ऑफीस मधील जागा आता छोटी पडायला लागलेली होती, त्यामुळे जोशींनी सुचवले की आपण आता पहिल्या माळ्यावर जाऊया, तिथे भरपूर जागा आहे आणि कटटयाची व्यवस्था तिथेच केली आहे. मास्तर बोललेत की आणखी काही मिपाकर येऊ देत मग जाऊ या.......

राहीलेल्या कट्टेकरीं कडून निरोप आला होताच, की ते निघाले आहेत आणि लवकरच पोहोचणार...

दरम्यान गप्पा सुरूच होत्या...काही एक ठरावीक विषय नव्हता....तेव्हढया वेळात मास्तरांनी, उपस्थितां पैकी कोण अविवाहीत आहे ही माहीती काढून घेतली आणि संधि साधून पटकन विवाहा बद्द्ल समुपदेशन करून टाकले :)

आता निर्णय घेण्यात आला की पहिल्या माळ्यावर जावे. आम्ही सर्व जण वर गेलो. तिथे जोशींनी जय्यत तयारी करून ठेवलेली दिसली.
पुढिल ५ मिनीटात सुनील आलेत...सोबत त्यांची पत्नी होती...काही वेळाने रामदास आलेत. ओळख परेड झाल्यावर गप्पा करत असताना, आमच्या पुढे सरबता चे ग्लास असलेलं ताट आलं. दोन प्रकारची सरबतं होती, लाल आणि पिवळं. लाल सरबत हे कोकम असेल म्हणून मी पिवळं सरबत घेतलं(आवळ्याचं).....(छ्या: घोटाळा झाला! ते लाल सरबत हे कोकम नसून करवंदाचे होते हे मला आज कळले! आता परत लक्ष्मी-केशव च्या कटटयाची वाट बघावी लागेल! :)

आम्ही सरबत घेत असताना, मास्तर हे भ्रमण ध्वनीवर व्यस्त होते मात्र खुर्ची वर न बसता, हॉल च्या एका कोपर्‍या पासून ते दुसर्‍या कोपर्‍या पर्यंत फेर्‍या मारत बोलत होते....सर्वांना प्रश्न पडला की अभिषेक बच्चन यांचा फेव्हरेट एक्टर आहे की यांच जाळं(नेटवर्क) हे आयडिया(Idea) चं आहे ?? .....
तसं मास्तरांनांच विचारल्या वर त्यांनी सांगीतले की, या दोहों पैंकी एक हि नाही. तर ही त्यांची मागील ३० वर्षांपासूनची सवय आहे.... :T

आता गप्पा जरी सुरू असल्या तरी, तात्या केव्हा येणार या कडे माझे आणि इतरांचे लक्ष होते.
आणि शेवटी तात्यांचं आगमन झालं..सोबत निलकांत होता...मी डोळे भरून तात्यांना बघून घेतले...(उगाच कोणी कोटी करू नये :) )

मराठी आंतरजालावर "फाट्टयावर मारणे" हे वाक्य प्रसिद्ध करणारा व्यक्ति.......कोनी तरी बोललं की "मराठी सकेंतस्थळ काढून दाखव आणि ते चालवून दाखव" , ह्याला प्रत्यूत्तर म्हणून मराठी सकेंतस्थळ काढून दाखवणारा आणि ते यशस्वीपणे चालवून दाखवणारा व्यक्ति.....गाण्यावर, साहित्यावर, माणसांवर, खाण्यावर,पिण्यावर प्रेम करणारा व्यक्ति.....स्पष्ट बोलणारा, मनाचा मोठेपणा असलेला.....अशी सर्व व्यक्तिमत्वे ज्या एकाच व्यक्तित एकत्र आली ती व्यक्ती प्रत्यक्षात समोर बघताना मला मनापासून आनंद झाला....

तात्या आल्यावर ठाणे मिपा कटटा हा आता तात्यांनी कटटयाच्या दीलेल्या रूपरेशेवर यायला लागला.
लाल आणि पिवळ्या सरबतांची एक फैरी परत झाली. (मी सरबता कडे लक्ष्य न देता, तात्या आणि मास्तर यांच्या जुगलबंदी कडे लक्ष देउ लागलो @) )...

थोडया वेळाने टारझन आला. टारझन हा मिपावर बघीतलेल्या फोटो प्रमाणेच दिसत असल्याने पटकन ओळख पटली. टारझनला पत्त्त्या बाबत थोडा संभ्रम झाल्यामुळे, यायला थोडा वेळ जास्त लागला.

विजुभाउ बरंच लांबून(पार्ल्याहून) येत असल्यामुळे, त्यांना थोडा आणखी वेळ लागणार होता :)
नितीन थत्ते हे जरी जवळच राहत असले तरी देखील उशीरा आले (काही आवश्यक काम असल्यामुळे).
सर्वसाक्षींना उशीर होणार होता. आता फक्त २ कट्टेकरी सोडून, सर्वच आले होते.

तात्यांनी घोषणा केली की, आता या पुढल्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या ह्या मदिरापाना सोबतच करूया... <:P
पटकन त्यानुसार तयारी करण्यात आली, टेबल मधोमध ठेवण्यात आला (आम्ही वर्तुळाकार बसलो होतो) टेबल वर काही बश्यांमधे चकणा ठेवण्यात आला. ह्या सर्व सजावटी नंतर, जे कोणी मदिरापान घेणार होते आणि जे कोणी फक्त थंड सरबत घेणार होते (५०% कट्टेकरी), असे दोंघांनाही आवाहन करण्यात आले......प्रत्येकाने आपापला आवडता ग्लास घेतला आणी घसा ओला करायला सुरूवात झाली.....जे मदिरापान घेत नव्हते त्यांनी पेप्सी, फेंटा, मेंगोला हे घेणे पसंत केले...(सर्दि व्हायची या भितीने, मी काहीच घेतले नाहि. :( )

हाँ चकणा मात्र सर्वांना आवडीचा (प्रायोजक तात्या होते म्हणून का? ) :) तात्या मात्र दिलदार माणूस. फक्त चणे,फुटाणे,भाजका पापड च न ठेवता खारवलेले शेंगदाणे, तळलेले काजू(मास्तरांनी आणले) टोमॅटो/काकडीचे काप, तळलेली मुग डाळ ही सुदधा चकण्यात होती :) गप्पा ऐकत मी चकण्याचा फडशा पाडत होतो =P~

विजुभाई आलेत आणि सर्वसाक्षी आलेत, आता मात्र शेवटची म्हणून परत एकदा ओळख परेड झाली :)

आता गप्पां/गोष्टींना चांगलाच रंग चढला होता...मास्तर आणि तात्या दोघेही खुप फॉर्मात होते...मधून मधून रामदास,विजुभाई,सर्वसाक्षी आणि जोशी सुदधा आपली भर टाकत होते...मास्तर त्यांच्या अनुभवाची शिदोरी काढून एक एक अनुभव वाटत होते, आणि आम्ही अविश्वास दाखवत ऐकत होतो....(आम्हा नवीन कटटेकर्‍यांना ही एक पर्वणीच होती...तात्या, मास्तर, रामदास, विजूभाऊ,सर्वसाक्षी,जोशी,सुनील एक एक अनुभवी व्यक्ति ऐकणे)

मास्तरांनी सोडवलेल्या/बघितलेल्या(विचित्र/अविश्वसनीय) समस्या ??.. विजुभांऊचे काही असेच अनुभव...या वर चर्चा होत होत ती गेली स्वातंत्र्यपूर्व काळात...........................
सर्वसाक्षी,जोशी यांची, त्यावेळेस घडलेल्या(क्रांतिकारक आणि त्यांची कार्ये) सत्य घटनां बद्दलची माहीती...काही व्यक्तिगत सुदधा...खुप रोचक होती.

हया सगळ्यात टारझन बराच शांत होता, काही फारसा बोलला नाही....काय माहीत..तात्या,मास्तर,विजुभाऊ ह्यांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे काहिसा अबोल झाला होता की....जेवणाचा मेन्यु आधीच कळल्यामुळे :) ...मात्र मिपावर लिखाणातून किंवा प्रतिसादातून जेव्हढा रंगात आलेला दिसतो तेव्हढा नाही दिसला..:(
(मला तर असे वाटतय की, ही & ही लिखाण बंद केल्या मुळे बसलेल्या शॉक मधून अजुन पर्यंत बाहेर नाही पडलाय :) ....टारझन ह.घे. )

सर्वसाक्षी यांनी लवकरच एक नविन लेख टाकण्याचे आश्वासन तात्यांना दिले....

अमोल खरे यांनी रामदासांना गाठून "गोडबोलेंच्या" कथेचा पुढील भाग केव्हा टाकणार असे विचारल्या
वर, रामदासानां उत्तर देणे थोडे अवघड झाले :) .. तरी त्यांनी उत्तर दिले की पुढील भाग हा थोडा नाजूक होत आहे, त्यामुळे तो भाग लिहायला थोडा जास्त वेळ लागतोय.

मदिरापान आणि सरबतपान हे सुरू होउन बराच वेळ होउन गेलेला, आता सर्वांना भूक लागत आलेली
त्यामुळे मिपाकरांचा मोर्चा जेवणा कडे वळला..

तेव्हढयात मिपाकर सोहम हे न जेवताच निघून गेलेत... मेन्यु आवडल्या मुळे नाही तर :) त्यांना शनिवार चा उपवास असल्या मुळे जेवायचे नव्हते. सर्व मिपाकरांना अभिवादन करून आणि कटटा चांगला झाल्या बद्दल आनंद व्यक्त करून निघून गेलेत.

मिपाकरांनी आधी मिसळ पाव कडे धाव घेतली...आणि मिपा धर्म जिवंत ठेवला ;)) मिसळ पाव तर्री झणझणीत होती....मला दुसर्‍या घासालाच ठसका लागला :)
मिसळ पाव नंतर कटटेकर्‍यांनी आपापल्या पसंती प्रमाणे मटण, आमटी, भात, भाकर,कोशींबीर, पापड यांचा समाचार घ्यायला सुरवात केली. =P~ मेन्यु बघीतला तर साधा होता पण सर्व पदार्थ चवदार होते..
मी जास्त नाही जेवू शकलो :( (माझ्या नंतर लक्ष्यात आले की मी चकणा जास्त खाल्ल्या मुळे असं झालं) :)

जेवण संपायला आल्यावर जोशींनी माहीती दिली की, गुलाबजाम ऐवजी श्रीखंड ठेवण्यात आलं आहे....
दोन्ही प्रकार मला आवडत असल्यामुळे मला काही दु:ख झाले नाही :)

जेवण संपलं तेव्हा रात्रीचे ११.१५ वाजले होते. जे मिपाकर लांबून आले होते जसे की बोरीवली, जोगेश्वरी, वर्ली त्यांनी निरोप घ्यायचे ठरवले. ब्रिटीश टिंग्या, श्री, अमोल, बर्वे हे मिपाकर निघून गेलेत. :H

ब्रिटीश टिंग्या, निलकांत हे पुण्याहून खास ठाणे कटटया करता आलेले. ब्रिटीश टिंग्या वर्ली ला जाणार होता, निलकांत चा विचार रात्रीच परत पुण्याला जाण्याचा होता. मात्र सर्वांनी, इथेच थांबण्याचा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी जाण्याचा सल्ला दिला. जोशींनी, आपल्याच कार्यालयात झोपण्याची उत्तम सोय आहे हे सांगीतले.
मास्तरांनी, निलकांतला आपल्या घरी यायला सांगीतलं आणि निलकांतने ते मान्य केले....(कटटा झाल्या वर मात्र निलकांत, मास्तरांच्या घरी न जाता, निखीलच्या घरी गेला :) )
हे झालं थोडं अवांतर....

जेवणा नंतर परत गप्पा/गोष्टींना रंग चढला. मास्तरांच्या अनुभवाची शिदोरी काही संपली नव्हती, विचित्र/अविश्वासनीय समस्या/किस्से हे निघत होते. त्यात विजुभाउ, रामदास हे सुदधा आपली भर टाकत होते. (विजुभाउ काहीसे गंभीर दिसले, मिपावर असतांना नेहमीचा जो खेळकरपणा असतो, तो नाही दिसला :( )

झालेल्या सगळ्याच गप्पां बद्दल इथे नाहि लिहीता येणार. (संपादन होण्याची शक्यता जास्त आहे :) आणी मी संपादकांचं काम वाढवू इच्छीत नाही) :)

मिपावर घडलेल्या आणि घडत असलेल्या घटनांवर थोडा उहापोह झाला :)

एका पेक्षा जास्त आयडी घेउन मिपावर वावरण्यार्‍या सदस्यां बाबत थोडा उहापोह झाला. मात्र कोणावर संशय घ्यावा आणि कोणावर नाही हे न कळल्यामुळे जास्त उहापोह न होता विषय तिथेच थांबला :)

निलकांत कडून बरच काही कळलं...मिपावर होणारे, होत असलेले हल्ले...निलकांतच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे...(निलकांत ची यावर असलेली करडी नजर आणि कणखर सर्वर)..

ह्याच दरम्यान मास्तरांनी घोषणा केली, शिक्षणा संबंधी कोणालाही समुपदेशन हवे असल्यास मास्तर ते करायला आनंदानी तयार आहेत....ह्या पाठोपाठ विजुभाउंनी सुदधा घोषणा केली, "राग नियंत्रीत करणे (Anger Management)" आणि "एकाग्रता वाढवणे (Concentration Enhancement)" या बाबतीत विदयार्थांना समुपदेशन करायला ते तयार आहेत.
हे ऐकून जोशींनी सुदधा घोषणा केली की, ते आपले कार्यालय या चांगल्या कार्या करीता उपलब्ध करून दयायला तयार आहेत. फक्त त्यांना आगाउ सुचना देण्यात यावी.

हे ऐकून सर्वांना आणि मला सुदधा आनंद झाला. =D> तसंच मिपा आणि मिपाकर यांचं वेगळेपण आणि मोठेपण हे माझ्या लक्ष्यात आलं. आपण ह्या मिपा परीवाराचे सदस्य आहोत ह्याचा अभिमान वाटला.
(मिपाकरी हे फक्त कटटा, खाणे, पिणे यातच धन्यता न मानता काही चांगली लोकोपयोगी कार्ये करत आहेत आणि ते सुदधा कसल्याही मोबद्ल्याची अपेक्षा न ठेवता)

एव्हाना रात्रीचे १२.१५ वाजले होते, समारोप करण्याचं ठरलं आणि तात्या तसं बोलताच, सर्वांनी दुजोरा दिला आणि ठाणे मिपा कटटयाचे सुप वाजले.................

पहिल्या माळ्या वरून आम्ही खाली आलो. कार्यालया च्या बाहेर आल्यावर, कोण कसे जाणार, हे बघून, विचारून निघायची तयारी करू लागलो..तेव्हढयात बिकांचा फोन आला. काही मिपाकरांशी त्यांचं बोलणं झालं.....या दरम्यान एक-एक जण नीघू लागला. काही दुचाकीं वर नीघून गेली... :H

तात्या टॅक्सीत बसून निघून गेले.....(ह्या मोटर वाहन कायदा कलम १८५ चा तात्यांनी बराच धसका घेतलेला दिसतोय. :) )

मिपाकरांनो इथे हा व्रुत्तांत आवरता घेतो.. :)
(कटटा संपल्यावर कोणीही डोलकर नव्हते आणि त्यामुळेच कोणीही सावरकर नव्हते :) सगळी मिपा कटटेकरी आपापल्या पायावर आली आणि आपापल्या पायावर गेली. :) )

फोटो बघण्या करीता इथे http://www.misalpav.com/node/8858 टिचकी दयावी...(आभार-श्रीयुत संतोष जोशी)

-------------------------------------------------------------------------------------------
थोडं अवांतर:
(वि.सु. - खाली दिलेली हि माझी व्यक्तिगत मते आहेत, इतरांनी सहमत होणे/ न होणे आवश्यक नाही)

१. या कटटयाची रूपरेशा ही तात्यांनी आधीच मिपावर प्रसिदध केली असल्यामुळे कटटयात काय काय
होणार या बद्दल मला काहीच शंका नव्हती.
२. ५०% मिपा कटटेकरी हे सुनील यांनी सांगीतल्या प्रमाणे नियमीत लेखक नाहीत, अधून मधून
प्रतिसादातून दिसतात. नियमीत वाचक मात्र आहेत.
३. मिपा चा प्रत्येक कटटा हा वेगळा असतो..वेगळं वैशिष्टय असतं आणि तसच असावं :) तरच
दुसर्‍यांनी केलेल्या कटटयाचा व्रुत्तांत वाचायला आवडेल. सगळे कटटे हे एक सारखेच झाले तर
कोणाला सांगायला आणि ऐकायला आवडेल.. :)
४. या ठाणे मिपा कटटयात एकच उणीव राहीली, ती म्हणजे तात्यांचं गाणं ऐकायला नाही मिळालं :(
(आता ही उणीव भरून काढायला का होइना, ठाणे मिपा कटटा हा परत व्हावा आणि त्याच्या
रूपरेशेत तात्यांच गाणं हे नं १ वर असावं मग इतर काही का नसेना :) )

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

7 Aug 2009 - 4:30 pm | सहज

समंजसराव मिपावर पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन!

कट्टावृत्तांत अतिशय आवडला.

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2009 - 4:36 pm | स्वाती दिनेश

समंजसराव मिपावर पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन!
कट्टावृत्तांत अतिशय आवडला.
असेच म्हणते,
स्वाती

दशानन's picture

7 Aug 2009 - 4:42 pm | दशानन

असेच म्हणतो.

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

अनिल हटेला's picture

7 Aug 2009 - 4:52 pm | अनिल हटेला

समंजसराव वॄत्तांत आवडला...
वाटत नाही पहीलं लिखाण आहे म्हणुन.....:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

टारझन's picture

7 Aug 2009 - 4:43 pm | टारझन

मस्त लिहीलाय रे बाबा वृत्तांत !!
पण मी गप्प बसलेलो ही गोष्ट जरा तपास की लेका !! मी बसलेलो प्रभुदेवाच्या शेजारी ... गलका एवढा चालू होता की आमच्या कमेंट्स प्रत्येकापर्यंत पोचणार कशा ?
आणि जेंव्हा मामला सर्वसाक्षी आणि रामदासांकडे आला ... तेंव्हा सिरीयसनेस मुळे सगळे लक्ष देऊन ऐकत होते !!

आम्ही हिणकसगिरी बंद केली तर टारझन उरणार नाही .. आयडी बदलून "संत एकनाथ" घ्यावा लागेल !!

आम्ही गोंधळ केला त्याचा एक नमुना :
तात्या (सर्व मिपाकरांना उद्देशुन पण नजर माझ्याकडे) : अरे बाळांनो .. तुम्ही तुम्ही तुम्ही दंगा करा करा ... पण जरा जरा जपुन जपुन रे ... नाही ... काये .. महिलावर्ग पण येतो रे वाचायला ... तेंव्हा जरा कमरेखालचे विनोद टाळा
एवढ्यात एकही सेकंद वाया न घालवता
टारझन : म्हणजे छातीवर हरकत नाही ना ?

असे बरेच होते की लेका !! असा रंगात नाही असं कसं म्हणतोस ?

असो !!
पहिल्या वृत्तांताबद्दल अभिणंदण !!

- (हिणकस रंगीत) टारझन

समंजस's picture

7 Aug 2009 - 5:49 pm | समंजस

अभिनंदना बद्दल धन्यवाद!

असे बरेच होते की लेका !! असा रंगात नाही असं कसं म्हणतोस ?
असेल असेल! सर्व काही माझ्या पर्यंत पोहोचलं नाही :)
पुढल्या वेळेस बारीक लक्ष्य ठेवेन! :) बाकी वाचून आनंद झाला की टारझन आहे तस्सा आहे :)

सूहास's picture

7 Aug 2009 - 4:46 pm | सूहास (not verified)

<<<<हया सगळ्यात टारझन बराच शांत होता, काही फारसा बोलला नाही....काय माहीत..तात्या,मास्तर,विजुभाऊ ह्यांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे काहिसा अबोल झाला होता की....जेवणाचा मेन्यु आधीच कळल्यामुळे ...मात्र मिपावर लिखाणातून किंवा प्रतिसादातून जेव्हढा रंगात आलेला दिसतो तेव्हढा नाही दिसला..>>>>
कट्ट्यावर सहसा शात॑च असतो तो...तो॑डात वेगवेगळे पदार्थ(विशेषता चिकन) कोब॑ल्यावर कस काय बोलणार...कट्ट्यावर बोलायला कोणी पाहिजे असेल तर धमुला सुपारी द्या..

<<<प्रभु मास्तर हे खुप बिझी माणुस. आल्या पासून ते जाई पर्यंत भ्रमण ध्वनीवर व्यस्त होते>>>
सुपरिचित माणुस आणी सुपरिचीत वक्तव्य...

बाकी वृता॑त आवडला..आणी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुअन ठेवत आहे..

सू हा स...

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 4:49 pm | विसोबा खेचर

समंजसराव,

मराठी आंतरजालावर "फाट्टयावर मारणे" हे वाक्य प्रसिद्ध करणारा व्यक्ति.......कोनी तरी बोललं की "मराठी सकेंतस्थळ काढून दाखव आणि ते चालवून दाखव" , ह्याला प्रत्यूत्तर म्हणून मराठी सकेंतस्थळ काढून दाखवणारा आणि ते यशस्वीपणे चालवून दाखवणारा व्यक्ति.....गाण्यावर, साहित्यावर, माणसांवर, खाण्यावर,पिण्यावर प्रेम करणारा व्यक्ति.....स्पष्ट बोलणारा, मनाचा मोठेपणा असलेला.....अशी सर्व व्यक्तिमत्वे ज्या एकाच व्यक्तित एकत्र आली ती व्यक्ती प्रत्यक्षात समोर बघताना मला मनापासून आनंद झाला....

आपली मनमुराद दाद मी समजू शकतो परंतु काम-क्रोध-मोह-माया-लोभ-मत्सर यांनी वेढलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचे आपण जरा जास्तच कौतुक केले आहे! :)

बाकी, बरेच कष्ट घेतलेत हो वृत्तांत लिहायला! पण अगदी अथपासून इतिपर्यंत लिहिला आहे, चांगला लिहिला आहे...

जियो...!

पुढचा कट्टा - तात्याचे एकापेक्षा एक सरस असे मांसाहारी विनोद आणि मनमुराद गाणं! :)

तात्या.

टारझन's picture

7 Aug 2009 - 4:59 pm | टारझन

"कोळंबी" ह्या शब्दाचा नविन अर्थ उमगला त्या दिवशी !!
झोपेतुन उठून हसत होतो कट्टा झाला त्या रात्री !!

-(देवमासा) टारझन

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 5:25 pm | विशाल कुलकर्णी

<<पुढचा कट्टा - तात्याचे एकापेक्षा एक सरस असे मांसाहारी विनोद आणि मनमुराद गाणं<<>>

त्या कट्ट्याला मात्र आम्ही पण असणार तात्यानु, आत्तापासुनच नोंदणी करुन ठेवतोय. समंजसराव, मस्त वृत्तांत !

अवांतरः जोशांच्या वृत्तांतातील फोटो माझ्याकडे दिसत नाहीत. फ्लिकरवर आहेत का? इथे ब्लॉक आहे फ्लिकर. :-(

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सखाराम_गटणे™'s picture

7 Aug 2009 - 5:33 pm | सखाराम_गटणे™

>त्या कट्ट्याला मात्र आम्ही पण असणार तात्यानु, आत्तापासुनच नोंदणी करुन ठेवतोय. समंजसराव, मस्त वृत्तांत !
मी सुद्धा

समंजस's picture

8 Aug 2009 - 2:34 pm | समंजस

धन्यवाद तात्या....!

आपली मनमुराद दाद मी समजू शकतो परंतु काम-क्रोध-मोह-माया-
लोभ-मत्सर यांनी वेढलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचे आपण
जरा जास्तच कौतुक केले आहे!

तात्या, जे वाटलं पटलं ते लिहीलं! :)
बाकी काय, मी सुदधा एक सांसारीक माणूस! दोष जास्त आणि गुण कमी! ;)

बाकी, बरेच कष्ट घेतलेत हो वृत्तांत लिहायला! पण अगदी अथपासून इतिपर्यंत
लिहिला आहे, चांगला लिहिला आहे...

हे मात्र खरं! मराठी टंकलेखन करणे हा किती कठीण प्रकार आहे हे, मला कळले! #:S
शाळा/महाविदयालयात असताना सुदधा एव्हढी मेहनत नाही घेतली!

(पुढील कटटयाची वाट बघत असलेला)....समंजस

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Aug 2009 - 6:25 pm | llपुण्याचे पेशवेll

वा समंजसराव चांगला लिहीला आहे वृत्तांत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

निखिल देशपांडे's picture

7 Aug 2009 - 5:55 pm | निखिल देशपांडे

मस्त लिहिलास रे वॄत्तांत...
आता तुझा आय डी समंजस आहे असे कळाले...
बाकी टारोबा इथल्या प्रतिसादाचा मानानी तुम्ही शांतच होतात बरं का.....

निखिल
================================

मदनबाण's picture

7 Aug 2009 - 6:55 pm | मदनबाण

मस्त लिहिलास रे वॄत्तांत...
आता तुझा आय डी समंजस आहे असे कळाले...
हेच म्हणतो म्या. :)

(अंमळ वाय झेड)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

टुकुल's picture

7 Aug 2009 - 8:35 pm | टुकुल

अजुन वाचल नाही, पण आधीच प्रतिकिया देवुन ठेवत आहे...
सविस्तर नंतर देतो..

--- टुकुल

Dhananjay Borgaonkar's picture

7 Aug 2009 - 8:39 pm | Dhananjay Borgaonkar

वॄत्तांत खरच छान लिहिला आहे. फोटो बघुन अजुनच मजा आली. धन्यवाद...

तात्या खुप खुप धन्यवाद तुम्हाला. तुम्ही मराठी संकेतस्थळ फक्त चालुच नाही केलत तर ते यश्स्वी करुन दाखवलत.

खुप लोक भेटली मीपावर. कोणी मुक्त आहे तर कोणी विमुक्त आहे.
कोणी समंजस आहे तर कोणी विक्षिप्त आहे.
प्रभु आणी देव एकाच वेळी इकडे सापडतात. राजे पण आहेत आणी पेशवे पण आहेत..अवलिया, टारझन, डांबिस, विजुभाऊ, केशवसुमार्..यादी खुप मोठी आहे..
सगळ्यांचे विचार, मतं खुप भिन्न आहेत. मीपा ने एक व्हर्च्युअल व्यासपीठ दिलं आहे या सगळ्यांन्ना.

हे सगळच अस अखंड चालु रहावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..

तात्या पुनःश्च धन्यवाद..

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर

धन्यवाद साहेब..

ऋषिकेश's picture

7 Aug 2009 - 9:42 pm | ऋषिकेश

मस्त वृतांत.. (अखेरीस एकदाची ;) ) समग्र कथा वाचून बरं वाटलं
वृत्तांत सविस्तर लिहिला आहे

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ९ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

खुपच छान शब्दाकंन केले आहे तुम्ही. बाकी आम्हालापण तात्यांना भेटायची खुप मनापासुन इच्छा आहे. टारझन्याचे फोटो देखिल शांत? वाटत होते. ही वादळापुर्वीची शांतता नसावी :D .परत एकद समंजसराव धन्यवाद.

वेताळ

भडकमकर मास्तर's picture

7 Aug 2009 - 11:44 pm | भडकमकर मास्तर

उत्तम वृत्तांत..
अगदी हजर राहिल्यासारखे वाटले.
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अभिज्ञ's picture

8 Aug 2009 - 12:01 pm | अभिज्ञ

फोटो पाहून मला तरी नक्की "समंजस" कोण आहे हे ओळखता आले नाही. ;)
कृपया ह.घ्या.

असो.
कट्टा वृत्तांत आवडला.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

समंजस's picture

8 Aug 2009 - 2:19 pm | समंजस

सर्वांचे आभार आणि धन्यवाद.......... :)
मी लिहिलेला व्रुत्तांत आवडला हे बघून आनंद झाला!

-----

खादाड's picture

8 Aug 2009 - 4:40 pm | खादाड

कट्टा अटेन्ड केल्यासारख वाटल ! धन्यवाद!

प्राजु's picture

8 Aug 2009 - 9:33 pm | प्राजु

वृत्तान्त लेखनात बराच वेगळेपणा असल्याने लेखन आवडले.
खास करून आपली शैली. :)
पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन!! यापुढेही अशाच उत्तम लेखनाची आपल्या कडून अपेक्षा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Aug 2009 - 10:41 am | श्रीयुत संतोष जोशी

खूपच छान.एकदम मस्त.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

हर्षद बर्वे's picture

9 Aug 2009 - 1:06 pm | हर्षद बर्वे

जेवण संपलं तेव्हा रात्रीचे ११.१५ वाजले होते. जे मिपाकर लांबून आले होते जसे की बोरीवली, जोगेश्वरी, वर्ली त्यांनी निरोप घ्यायचे ठरवले. ब्रिटीश टिंग्या, श्री, अमोल, बर्वे हे मिपाकर निघून गेलेत.

समंजस...आपली काहितरी गल्लत होते आहे....अहो आम्ही जन्मापासून ठाण्यातलेच...त्यामूळे अगदी कट्टा संपेपर्यंत उपस्थित होतो...असो..

एच.बी.

क्रान्ति's picture

9 Aug 2009 - 4:24 pm | क्रान्ति

अगदी मस्त लिहिलाय कट्टा वृत्तांत. :)

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी