डंकर्कचे विद्धविवेचन

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 12:52 pm

इस्पिक राजा
आणि किल्वर राणीचा
सुकुमार धूम्रतरल सहवास

बाहेर झिम्मड पाऊस
नास्पतीची गळणारी पाने
अन् मोक्याच्या क्षणी
त्याची निरभ्र माघार

न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?

हे नातंच असं पोकळ
रंग, गंध ना चव
जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी

मग फेकून द्याव्या
सार्‍या सहवासखुणा
अन् घेतले दिलेले
मनातलेच अल्लड काहीबाही-----------

----------------------काहीबाही म्हणजे हेच---
-रुसवा फुगवा रुतला चावा
विस्मय गहिरा रूदन धावा
कुंजवनी त्या भग्न दुपारी
रुजून गेला मनात पावा------

वगैरे वगैरे बाष्कळ यमकांची करपट वेलबुट्टी
प्लस हे सारं व्यापून उरणारी त्याची पुनःपुन्हा माघार
अन् नासपतीच्या खोडाशी पडलेला
फाटका पण युद्धपिपासू इस्पिक राजा

०६ ऑगस्ट २००९, पुणे

शृंगारकरुणमुक्तक

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Aug 2009 - 1:03 pm | टारझन

अर्रे बापरे !!
काय खतरा कविता केलिये ... शरदिनी जियो ...
आपण आज पासुन तुमचे फॅण... तुमच्या क्रिटिक्सच्या तोंडावर ह्या पेक्षा जड ते काय फेकून मारणार ... जियो ,...
जागा झालो , जन्मलो , उठलो , पुनर्जन्म झाला , राखेतुन वर आलो , नवचैतन्य आलं , !!!!

काय जबरदस्त व्यथा मांडलीये ... बिचारी किल्वर राणी ...
इस्पिकच्या राजाचं प्रभु देखिल काही करू शकणार नाही ... कालंच मिड डे मधे .. "जपानी तेल" ची अ‍ॅड्वर्टाईज पाहिली !! ते चालू शकेल बहुदा !!

- चौकट राजा
अधिक जपानी तेला साठी आम्हालाच भेटा

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:18 pm | मिसळभोक्ता

जागा झालो , जन्मलो , उठलो , पुनर्जन्म झाला , राखेतुन वर आलो , नवचैतन्य आलं , !!!!

राखेतून पुन्हा जीवंत
झालेला जाडसर
फीनिक्स,
दे तीनशे रुपये

(शरदिनीताईंचा शिष्य)

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

6 Aug 2009 - 1:30 pm | टारझन

(शरदिनीताईंचा शिष्य)
-- मिसळभोक्ता

शरदिनीताईंचा शिष्य
झाला थुलथुलीत मिसळभोक्ता ,
चला ,
दाबुन खाऊ(की घेऊ) आता ?

- (श्रदिनीश्रीचा मित्र) टार्‍या

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:32 pm | मिसळभोक्ता

चावट कुठला..

आम्ही नाही जा..

(युयुत्सुचा मित्र)

-- मिसळभोक्ता

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:03 pm | मिसळभोक्ता

वा !!!!


अन् नासपतीच्या खोडाशी पडलेला
फाटका पण युद्धपिपासू इस्पिक राजा

मस्त !!!

जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी

फारच सुंदर !!

न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?

क्या बात है !

ओबामा ला (आणि डेव्हिड अ‍ॅक्सेलरॉडला) ईमेलने पाठवली आहे. जरा वेळाने फोन आल्यावर अर्थ समजावून सांगेन. अफगाणिस्तानातून अमेरिकेने बाहेर पडावे, हे त्याला पटेलच.

शरदिनीताई, तुम्ही एकदा जकार्ताला जाच.

-- मिसळभोक्ता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?

क्या बात है !

मिभोकाकांशी अगदी सहमत. या ओळी (कळल्या असं वाटतंय त्यामुळे) फारच आवडल्या! एकूणच कविता कळली असं का कोण जाणे सूक्ष्म मनात वाटतंय.

अदिती

संदीप चित्रे's picture

6 Aug 2009 - 8:29 pm | संदीप चित्रे

>> एकूणच कविता कळली असं का कोण जाणे सूक्ष्म मनात वाटतंय.
त्यामुळे कविता खरंच आवडली.

या कवितेतल्या बर्‍याच ओळींचा इशारा तुमच्याकडे तर नाही आहे ना... ;)

(मराठी संकेतस्थळांचा इतिहास वाचलेला ) चेतन

दिपाली पाटिल's picture

6 Aug 2009 - 1:11 pm | दिपाली पाटिल

हे नातंच असं पोकळ
रंग, गंध ना चव
जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी

बापरे.... @)

दिपाली :)

ज्ञानेश...'s picture

6 Aug 2009 - 1:17 pm | ज्ञानेश...

दुसर्‍या महायुद्धात डंकर्कच्या किनार्‍यावर ब्रिटनने जी यशस्वी माघार घेतली, त्यासंबंधी काही आहे का? :/

"Great Power Comes With Great Responsibilities"

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:20 pm | मिसळभोक्ता

त्याचीच आजच्या काळातली आनुषंगिक हिंगानुभूती...

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 1:20 pm | विसोबा खेचर

शरदिनीतै,

मिपा आपण आजपासून तुमच्या नावावर करण्याचा विचार करत आहोत..

जियो...!

खल्लास कविता...

वारलो....!

आपला,
(बांधानी हिंग खाणारा, बदामच्या राणीवर लाईन मारणारा किलवरचा थुलथुलीत नव्वा!) तात्या.

दिपाली पाटिल's picture

6 Aug 2009 - 2:19 pm | दिपाली पाटिल

(बांधानी हिंग खाणारा, बदामच्या राणीवर लाईन मारणारा किलवरचा थुलथुलीत नव्वा!) तात्या.

=)) =)) =)) =)) =))

दिपाली :)

टारझन's picture

6 Aug 2009 - 2:27 pm | टारझन

(बांधानी हिंग खाणारा, बदामच्या राणीवर लाईन मारणारा किलवरचा थुलथुलीत नव्वा!) तात्या.

घ्या ... किलवर घराणा बदामच्या मागे ... का नाही किलवर राण्या बोंबा मारणार ?

- (चौकटचा हि&ही दस्सा) टारझन

श्रावण मोडक's picture

6 Aug 2009 - 1:21 pm | श्रावण मोडक

कविता समजली असं वाटतंय. दोन अर्थ दिसतात - एक मूळ कवितेचा म्हणून आणि दुसरा एकूण इथल्या तुमच्या कवितांविषयीच्या अनाकलनीय, अगम्य वगैरे धाटणीच्या माझ्यासह इतर प्रतिसादांवरचा टोला. वा.

अवलिया's picture

6 Aug 2009 - 1:21 pm | अवलिया

जय हो !!! !

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2009 - 1:27 pm | निखिल देशपांडे

अरे उगिचच कवितेचा काही तरी अर्थ कळतोय असे वाटतय.....

निखिल
================================

विनायक प्रभू's picture

6 Aug 2009 - 1:31 pm | विनायक प्रभू

लय भारी क्रिप्टीक कविता कळली बॉ एकदाची

बामनाचं पोर's picture

6 Aug 2009 - 1:42 pm | बामनाचं पोर

मस्त कविता ... तुमची प्रतिभा , शब्दांवरचे प्रभुत्व अफाट आहे..

मन's picture

6 Aug 2009 - 2:29 pm | मन

रक्तदर्शी कवितेतील भेदक, मणिस्फुट अग्निवास्तवाच्या शूलवेदना आता हे वाचुन अधिकच घृतप्रखर झाल्यात!

भुक्तनयनांनी शिल्पसाक्षी लेखनपर्वत झेलल्यावर अशा कर्दठिकर्‍या उडणारच.

( बोंबला तिच्यायला.....
आधी ही कविता कळत नव्हती आणि आता स्वतःचा प्रतिसादही नाही!
अक्कल नसेल तर झक मारत प्रतिक्रिया द्यायला नाक कायला खुपसतोस बे मनोबा?
)
अवांतरः- हा प्रतिसाद कळत नसेल त्यानं मराठीचा क्लास करुन यावा.
(आल्यावर मलाही ह्याचा अर्थ सांगावा.)थोडाक्यात काय , तर विद्वानांच्या रांगेत येण्यासाठी फुक्कट दिलेला प्रतिसाद.
आपलाच,
मनोबा

अनिल हटेला's picture

7 Aug 2009 - 2:01 am | अनिल हटेला

शरदीनीताईची कविता वचायला आवडतं..नवनविण वापरलेले शब्द वाचताना मजा येते..शिवाय ह्यावेळी तरी समजेन ही भाबडी भावना असतेच मागे (;-))...
असो....

बाकी उरलेली मंडई मनोबारावांनी केलीये....

ससंदर्भ स्प्ष्टीकरण करा... (१२ गूण)
रक्तदर्शी कवितेतील भेदक, मणिस्फुट अग्निवास्तवाच्या शूलवेदना आता हे वाचुन अधिकच घृतप्रखर झाल्यात!
भुक्तनयनांनी शिल्पसाक्षी लेखनपर्वत झेलल्यावर अशा कर्दठिकर्‍या उडणारच.
~X( :T ~X-(

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

फ्रॅक्चर बंड्या's picture

6 Aug 2009 - 2:31 pm | फ्रॅक्चर बंड्या

उनझेपेबल असते हो सगळे तुमचे काव्य

दत्ता काळे's picture

6 Aug 2009 - 4:50 pm | दत्ता काळे

कवितेचे नांव " डंकर्कचे विध्दविवेचन" कां दिले ? हेच लक्षात आले नाही ( इथपासूनच न कळण्याची सुरवात झाली :/ )

पण कविता कां आवडली हे ही लिहीणे तितकेच महत्वाचे :

१. कवितेत तुम्ही जे शब्द वापरले आहेत, ते अगदी वेगळे आहेत
( हिंग, बांधानी, करपट इ. ) त्यातून नासपती ह्या झाडाचा
उल्लेखही क्वचितच कुठल्या कवितेमध्ये आला असेल.

२. कवितेच्या ओळींमध्ये केलेली शब्दरचना विस्मयकारक आहे.
( थुलथुलीत प्रतारणा, बाष्कळ यमकांची करपट वेलबुट्टी, निरभ्र
माघार इ.)

एखादी अवघड, जरा उशीरा कळणारी पण ह्याच्यापेक्षा समजायला सोपी, अर्थ लावता येईल अशी कविता टाका नां ? म्हणजे मग आमच्याही मेंदूला व्यायाम होईल.

रामदास's picture

6 Aug 2009 - 7:28 pm | रामदास

लालजी गोधू यांचा जीव सुखावला असेल. बांधानी हिंगाची मराठी कवितेच्या इतिहासात नोंद झाली.

थुलथुलीत आणि बांधानी याचा काहीतरी संबंध असावा असेही काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.

अन् मोक्याच्या क्षणी
त्याची निरभ्र माघार
त्याची पुनःपुन्हा माघार

वा ! वा ! ताई ह्या ओळी वाचून मला एक जुने विडंबन आठवले.
भातुकलीच्या खेळामधली....
अर्ध्यावरती राजा उठला राणी तशीच उताणी

धमाल मुलगा's picture

6 Aug 2009 - 7:34 pm | धमाल मुलगा

लय लय लय दिवसांनी रामदासकाका फुल्ल फार्मात!!!
च्यायला, इतका डेंजर फुटलो, वरचा श्वास वर..खालचा खाली!!! मायला, मी बहुतेक प्रतिसाद वाचता वाचता फट्टकन गचकणार. =))

_/\_
दंडवत रामदासकाका...दंडवत!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 8:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीहीही

अदिती

संदीप चित्रे's picture

6 Aug 2009 - 8:34 pm | संदीप चित्रे

अशक्य आहे हे विडंबन ... फस्सकन हसलोय एकदम.
'तरूण आहे रात्र अजूनी राजसा विझलास का' ही विडंबनाची ओळ आठवली :)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Aug 2009 - 11:18 pm | बिपिन कार्यकर्ते

माझ्या घरी कळवा रे....

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

पीके's picture

2 Nov 2015 - 11:24 am | पीके

_/\_/\_

कालिन्दि मुधोळ्कर's picture

6 Aug 2009 - 9:46 pm | कालिन्दि मुधोळ्कर

छान कविता.

(आधी अवांतर : ईप्सितवंचन = frustration = हवे असलेले बळेच नाकारणे - यासाठी सोपा मराठी शब्द आहे का? म्हणजे लाईन मारतो तो मुली ने राखी बांधली की "पोपट होतो" हा विनोदी शब्द, त्यासाठी गंभीर शब्द कुठला आहे?)

अचाट ऐतिहासिक दृष्टांत (येथे डनकर्क), गुंतागुंतीचे सामासिक शब्दप्रयोग (धूम्रतरल), आणि एका ज्ञानेंद्रियाकडे दुसर्‍याच संवेदनेची कल्पना करणे (करपट वेलबुट्टी), या सर्व चमत्कृती शरदिनी यांचे वैशिष्ट्यच आहेत. त्या असणार हे जाणूनच कविता वाचली. त्याबद्दल तक्रार नाही.

काहीकाही शब्दांची निवड "नास्पती" द्वि-अर्थी (एक वाच्यार्थ, एक ध्वन्यर्थ) म्हणून उत्तम आहे. पण काही शब्द निष्काळजी वाटतात. "बांधानी" म्हणजे कणिक-मैद्याने "बांधलेले" हिंगाचे खडे. त्या तपशिलातून शब्दवैचित्र्याबरोबर काय मिळते? काही खोल अर्थ असेल तर माझ्यासाठी ईप्सितवंचन. उलट शब्दाचा सोस होऊन निष्काळजीपणा झाला असे वाटण्याचा मोह अनावर होतो. (मागे एका कवितेत "जवनिका-कर्णिका यांचा जीवशास्त्रीय क्रम का उलटवला?" या प्रश्नाने असेच वंचन आणि शब्दांचा सोस वाटण्याची भावना माझ्यात उत्पन्न झाली होती.) "विद्ध" म्हणजे तीक्ष्ण जखम झालेले, बाणाने शिकार झालेले... याचा अर्थ विनोदी अति-उपयोगाने गुळगुळीत झालेला आहे. येथेसुद्धा मला शब्दाचा सोस जाणवतो.

ही सगळी कोडी सोडवता सोडवता, "इस्पिक राजा आणि किल्वर राणी यांचा भग्न संबंध" या विषयाबद्दल माझ्या मनातले कुतूहल मारले गेले. त्याविषयी शब्दांपलीकडची कुठली समजूत मला झाली, अशी भावना खोल उद्भवली नाही.

म्हणून म्हणतो - वंचक. तरी वाचनीय कविता. चालू द्या, शरदिनी.

शाहरुख's picture

6 Aug 2009 - 11:20 pm | शाहरुख

>>म्हणजे लाईन मारतो तो मुली ने राखी बांधली की "पोपट होतो" हा विनोदी शब्द, त्यासाठी गंभीर शब्द कुठला आहे?

मी आपणांस शब्द सुचवणे म्हणजे तीनचाकी सायकल चालवणार्‍याने वैमानिकास सुचना देण्यासारखे आहे पण तरीही,

पोपट होणे = फजिती होणे

बाकी, जिथे आपल्याला कळत नाही तिथे आपण तोंड उघडत नाही..त्यामुळे कवितेबद्दल नो कमेंट्स..

अधिक चर्चा खरडवहीत.

ज्ञानेश...'s picture

7 Aug 2009 - 11:10 am | ज्ञानेश...

'हिरमोड होणे' हा शब्द कसा वाटतो धनंजय?

"Great Power Comes With Great Responsibilities"

धनंजय's picture

7 Aug 2009 - 9:08 pm | धनंजय

"हिरमोड" उत्तम.

याबाबत शाहरुख यांच्याबरोबर खरडचर्चा झाली. माझ्या मते "फ्रस्ट्रेट"साठी "प्रयत्नांचा विचका होणे" किंवा "आकांक्षांचा विचका होणे" हे प्रतिशब्द अर्थाच्या दृष्टीने नेमके असले, तरी मिताक्षरी असल्यामुळे "हिरमोड" हा उजवा.

बेसनलाडू's picture

7 Aug 2009 - 11:14 pm | बेसनलाडू

फ्रस्ट्रेशन साठी उद्विग्नता हा सगळ्यात सुयोग्य शब्द आहे. हिरमोड होणे म्हणजे अपेक्षाभंग, उत्साहावर विरजण पडणे यासारखे काहीसे व तसा अर्थ. नकारात्मक छटेच्या दृष्टिकोनातून फ्रस्ट्रेशन हे अपेक्षाभंग इ. पेक्षा जास्त गहिरे आहे. त्याला हिरमोड तितकेसे योग्य नाही. चू. भू. द्या. घ्या.
(पर्यायसूचक)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 10:51 pm | नितिन थत्ते

तुम्ही तुमच्या कविता 'तिकडे' का लिहित नाही हो.
नाय, कविता तिकडे लिहिली तरच 'केसु'नाना विडंबन करतात.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

_समीर_'s picture

6 Aug 2009 - 10:54 pm | _समीर_

बरोबर आहे. केसुरावांचा इथला दोन टायमाचा चा आणि शिग्रेट बंद केली ना सरपंचाने!! पण त्या रंग्याचे काय? रंग्या कुठाय?

विकास's picture

7 Aug 2009 - 2:16 am | विकास

आशा करतो की इस्पिकच्या राजाने सप्तपदी घातल्या नसतील.

बाकी किल्वरची राणी आणि या इस्पिकच्या राजाचा धुम्रतल सहवास गोल्ड तिकीटे काढून चालला होता का? तसे असेल तर राणीच्या आईस नक्कीच "न सोसणारं कदाचित अपेक्षांचं ओझं, पण का व्हावी नेहमीचही थुलथुलीत प्रतारणा?" असे झाले असेल...

विनायक प्रभू's picture

7 Aug 2009 - 10:27 am | विनायक प्रभू

विकास भौ द ग्रेट

समंजस's picture

7 Aug 2009 - 5:38 pm | समंजस

शरदीनीताई,
क्रिप्टीक लिखाणाचा वसा तुम्ही मास्तरां कडुन घेतला आहे का??
वा! छान! असंच लिखाण चालू राहो, हीच सदीच्छा! :)

(उतु नये मातु नये! घेतला वसा टाकु नये!)..............

नाना बेरके's picture

7 Aug 2009 - 7:30 pm | नाना बेरके

कविता एकदम डेंजर वाटली. :|

पिवळा डांबिस's picture

7 Aug 2009 - 7:40 pm | पिवळा डांबिस

खरं सांगू? या आधीच्या दोन कवितांइतकी ही कविता भावली नाही...
तरीही उगीच उडवून न लावता कवयत्रीच्या कवितेचा स्वीकार केल्याबद्दल मिपाकरांचे आभार!!!!
-बदामचा राजा!!!

चन्द्रशेखर गोखले's picture

10 Aug 2009 - 1:28 pm | चन्द्रशेखर गोखले

शब्दबंबाळ कविता ... आवडली ,पण कधी कधी शब्द जंजालात कवि आणि वाचणारा दोघेही आडकतात त्यामुळे कवितेच्या भावर्था पासून आपण दूर जातो..?

नीधप's picture

10 Aug 2009 - 1:37 pm | नीधप

तुम्ही तुमच्या कवितांबरोबर तुमची एक वेगळी डिक्शनरी का देत नाही?
कारण आम्ही आमच्यापरीने (थोडंफार संस्कृत आणि मराठीचं ज्ञान इत्यादी..) अर्थ लावायचा प्रयत्न केल्यावर एका ओळीचा दुसर्‍या ओळीशी, एका शब्दाचा दुसर्‍या शब्दाशी काहीही संबंध आहे असं मुळीच वाटत नाही.
केवळ अवघड आणि एकापुढे एक ठेवल्याने नादमयता येणारे शब्द एकत्र गोळा करून आम्हाला कविता म्हणून तुम्ही वाचायला लावताय असं वाटतंय.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मारवा's picture

1 Nov 2015 - 12:54 pm | मारवा

मिपा क्लासिक-६

आदूबाळ's picture

1 Nov 2015 - 1:25 pm | आदूबाळ

असहमत.

"डुडुळगावचा गोलंदाज" मध्ये जी गेयता आहे ती डंकर्कमध्ये नाही. म्हणून गोलंदाजाला अर्धा मार्क जास्त.

आदूबाळ's picture

1 Nov 2015 - 1:25 pm | आदूबाळ

डुप्रकाटाआ

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 1:18 pm | प्यारे१

(आज सुट्टी आहे.
गाढ़ झोप लागली होती तेव्हा का कुणास ठाऊक भडकमकर मास्तर स्वप्नात आले होते. मुलीला शाळेत सोडायला चालले होते. असो! )

कविता 2009 ची असली तरी ख़ास आहे आणि 2015 ला देखील नाही त्याहून जास्त लागू आहे.

दमामि's picture

1 Nov 2015 - 1:26 pm | दमामि

+11111

बोका-ए-आझम's picture

1 Nov 2015 - 9:23 pm | बोका-ए-आझम

ही व्हिंटेज शरूमावशी कविता आहे. आपला बाजार तर उठतोच पण बाजूच्या पब्लिकचा पण उठतो!