संस्कार

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Aug 2009 - 1:15 pm

चुकले मी
परत अस कधीही करणार नाही.
तुझी शप्पथ.
तुला वाटत तस काहीही नाही.
हव तर मार परत एकदा मला.
तु सांगशिल ती शिक्षा मला मंजुर आहे.
आता इतर मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत त्याला मी काय करु?

आता ही पोर हाताशी नसती तर हीला कधीच सोडली असती.
आई म्हणायच का ह्या बयेला?
कसले संस्कार आयशीच्या घोवाचे.
तरी सांगत होतो एवढा जाच करु नकोस.
नाही दिवस राहीले पुर्वीचे.
हिच्या आग्रहाकरता कन्या शाळेत घातली.
आता पोर रुपाने माझ्यावर गेली त्यात तीचा काय दोष?
ही तीच्या रुपावर जळते की काय?
३६ गुण मिळतात म्हणून बापाने सांगितले.
लग्न केले.
लग्न कसले बोडक्याचे.
१७ वर्षाचा जाच झाला.
प्रत्येक गोष्टीत उलटच डोक चालत.
लग्न जेमतेम २ महीन्याचे.
दिवस गेले, संपले सगळे.
तरीसुद्धा पोरी कडे बघुन गप्प बसलो.
गुणाची पोर.
जरा भाषेत कमी मार्क पडले नसते तर बोर्डात आली असती.
डॉक्टर होणार म्हणते.
व्यवस्था करुन ठेवली आहे.
तिथे पण यश मिळ्वेल.
के.ई.एम मधे जाईल ह्याची खात्री आहे.
गेली सिनेमाला मैत्रीणीबरोबर.
काय झाले?
आता इतर मैत्रीणी ऐनेवेळी नाही आल्या.
एका मैत्रीणीचा भाउ आला.
म्हणुन पाळत ठेउन पाठलाग करायचा?
आता गोल्ड मधे सकाळच्या शो ला प्रेक्षक कमीच असतात.
आता त्यात बिछान्यासारख्या खुर्च्या असतात हे पोरीला काय माहीत ?
मला पण माहीत नाही.
ए.सी सहन नाही झाला तर ब्लँकेट पण देतात.
कोपर्‍यातील तिकिटे काय मुद्दाम घेतलेली नव्हती.
मध्यंतरात पोराची गचांडी धरुन सगळ्यांसमोर तमाशा करायचे काहीच कारण नव्हते.
घराण्याची अब्रु धुळीला मिळाली म्हणजे काय?
घरी आल्यावर बोलता आले असते की?
माझा पोरीवर पुर्ण विश्वास आहे.
ती तसे काही नाही म्हणते म्हणजे तर अजिबात नसणारच.
आता अगदी मुलाबरोबर सिनेमाला गेली म्हणून कॉलेजला जायचे नाही.
१८ ची झाले की लग्न?
हा काय अघोरीपणा.

तुम्हाला काय जाते हो उपदेश करायला.
रुप म्हणजे जळता निखारा.
ब्लॅकेट मधे काय चाळे चालेले होते कुणास ठाउक?
काय नको कॉलेज बिलेज.
लग्न करुन देते म्हणजे मी सुटले.
माझ्या आजीने माझ्या आईवर कडक लक्ष ठेवले.
माझ्या आईने माझ्यावर
आम्हाला त्याचा काहीही मानसिक त्रास नाही झाला.
'कपडे' तपासणे आईचे काम असते.
माझ्यावरचे संसकार मी पाळणारच.
मोकळे सोडायची नसती फॅड मला नाही जमणार.
नंतरची भानगड संभाळायची कोणी?
उद्या पोट वाढले तर लक्तरे वेशीला टांगतील घराण्याची.
तुम्हाला नाही कळायचे.
तुम्हाला मुलगी असती म्हणजे कळले असते.

हे बघा 'गॉन केस 'आहे तुमची बायको.
सध्या ती म्हणते तसे करा.
जा गावाला.
कॉलेजमधे अ‍ॅडमिशन घेतली आहे ना?
चार दिवस कॉलेज बुडेल
काहीही फरक पडत नाही.
घ्या शपथ कुलदैवतासमोर.
करा सकाळी ओलेत्याने पुजा मास्ती कट्ट्यावर.
होउन जाउ दे त्यांच्या मनासारखे
काही डीस्फंक्शन्स सुधारण्याच्या पलीकडे असतात.
आणि तु ग पोरी
ह्याचा जास्त विचार करु नकोस.
ह्या एक दिवसाचा अडथळा पार कर.
मेरीट मधे ये.
के.ए.एम. चे लक्ष्य ठेव.
नंतर सरळ हॉस्टेलला जा.
तु मुंबईची असली तरी सुद्धा हॉस्पीटलमधे हॉस्टेलची व्यवस्था मी करुन देतो.
मग बसु दे तुझ्या आईला बोंबलत. संस्कार संस्कार करत.
दोन वर्ष तिच्या चौकटीत जग.
शक्यतो कुठल्याही वादात शिरु नकोस.
त्याचा काही उपयोग नाही.
प्रतिकुल परिस्थीतीत थोडेसे नमते घ्यावे.
देवांच्या देवाला सुद्धा घ्यावे लागले होते.
ओबामाला सुद्धा रोज घ्यावे लागते.
तर तु आणि मी कोण?
येउ दे तीला कॉलेजला सोडायला आणि घ्यायला.
दुर्लक्ष कर.
मोबाईल नाही म्हणते तर नाही.
त्याने काहीही फरक पडत नाही.
जा दोन वर्ष कोषात.
दोन वर्षाने तुला ह्याचे काहीच वाटणार नाही.
मी सांगतो तुला विश्वास ठेव.
डोळ्यातले अंगार कधीही विझु देउ नकोस.
यशस्वी होशील.
आता हस बरे.
जाता जाता: मास्ती कट्टा= गावाबाहेरचा झाडाखाली सतीचे छोटेसे देउळ

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

5 Aug 2009 - 1:49 pm | महेश हतोळकर

काही नवीन नाही. कुठे बाप (फोकाचे वळ) तर कुठे आई. बाकी पोरीला दिलेला सल्ला मनापासून पटला.

-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

दशानन's picture

5 Aug 2009 - 2:04 pm | दशानन

:?

डोक्यावरुन गेलं !

ह्याचा अर्थ तुम्ही संस्कार... आई-वडील ह्या गोष्टींना काहीच समजत नाही का ? डॉक्टर.. इंजीनिअर समोर ???

काय पटले नाही बॉ !

आज काल पेपर वाचत नाही की काय ?
कालचा व आजचाच वाचा....

*१४ वर्षाच्या मुलीच्या बोयफेंन्ड ने मुलीचा गँग रेप केला.. !

*************

तुम्ही कधी गोल्ड क्लास मध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला आहात काय ?
गोल्ड क्लास असतोच "त्या" कारणासाठी हा माझा समज नाही आहे तर डोळ्यानी पाहीलेले आहे... गूडगांव डिगाने मॉल्स आहेत व ढिगाने गोल्ड क्लास...

तेव्हा वरील सल्ला पटला नाही !

+++++++++++++++++++++++++++++

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 2:51 pm | विनायक प्रभू

खरे आहे बाबा तुझे म्हणणे
मला 'गोल्ड' म्हणजे काय ते माहीत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2009 - 9:24 pm | llपुण्याचे पेशवेll

खालच्या इतर प्रतिक्रिया वाचा म्हणजे गोल्ड म्हणजे काय ते कळेल. :p
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सहज's picture

5 Aug 2009 - 2:14 pm | सहज

नशीब त्या बाईला एफ. जी. एम. / सी माहीत नाही.

वरील अनुभवावरुन :-

बाप : साधा, सरळ. आधी बापाच्या मग बायकोच्या अधीन.

आई : तथाकथित हुशार, कजाग.. तिच्यावर जे प्रसंग तिच्या आईमुळे आले, जसे ती वागली तसेच मुलीने वागावे असा मनोनिग्रह / मानसोपचारांची गरज दिसते. मुलगीस कन्याशाळेत घालता येते, पण बाकीच्या गोष्टींवर नियंत्रण कसे करणार?

मुलगी : बेरकी, आई-वडीलांना ओळखुन असलेली, अनपेक्षितपणे पकडली गेल्यावर पश्चातापाची भावना .. मार्क कमी पडल्याचे कारण असु शकेल.

थोडक्यात प्रयेक घरी, कधी ना कधी घडू शकणारी घटना.. यातुन वाचायचे असेल तर, मुलांशी संवाद - मोकळे वातावरण आवश्यक..

राजे:-

१४ वर्षाच्या मुलीला बॉयफ्रेंड असणे हा आई-वडीलांचा नैतिक पराभव
पुढारलेले, अप्पर मिडलक्लास म्हणवुन घेणारे आई-वडील, विदेशी संस्कृतीच्या आहारी गेलेले घर.. मग असे प्रसंग येणे सहाजीकच !!

आजकाल मुलांच्या कानावर, डोळ्यावर, मनावर, टीव्ही -चित्रपट - संगीत या जलदगतीने परीणाम करणार्‍या गोष्टीतुन "सेक्स" व्यवस्थितपणे पोहोचत आहे. कोवळ्या वयात मनावर बंधन नसते, पैशाच्या मागे लागलेले आई-वडील मुलांना वेळ कमी देऊ शकतात, परिणामी मुले समवयीन मुलांच्या साथीने बिघडु शकतात. म्हणुन भारतीय संस्कृती एकत्र कुटूंब-पध्दतीचा पुरस्कार करते, जेणे करुन मुलांना अजाणत्या वयात मोठा भाऊ-बहीण, काका-काकु, आजी-आजोबा कोणी ना कोणी भेटत राहुन त्यांचे बाल्य जपले जाऊ शकते. त्यांना बाहेरची \ चिकटवलेली \ स्वार्थी नाती व माणसे यांच्या आमिशांना बळी पडण्याची वेळ येत नाही...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१४ वर्षाच्या मुलीला बॉयफ्रेंड असणे हा आई-वडीलांचा नैतिक पराभव

याची गंमत वाटली. त्या मुलीला बॉयफ्रेंड म्हणजे नक्की काय समजलं असा एक प्रश्न पडला होताच. पण इतरांना कुणाला न कळत्या(?) वयात बॉयफ्रेंड असेल तर काय वाटतं असा आणखी एक प्रश्न पडला आहे. असो.
विदेशी संस्कृतीच्या आहारी जाणं म्हणजे काय ते मला कळलं नाही.

जेणे करुन मुलांना अजाणत्या वयात मोठा भाऊ-बहीण, काका-काकु, आजी-आजोबा कोणी ना कोणी भेटत राहुन त्यांचे बाल्य जपले जाऊ शकते.

बाल्य कुस्करल्या गेलेल्या मुला/मुलींना विचारा, याच लोकांपैकी कोणी एक असण्याची शक्यता जास्त असेल. (अधिक माहिती प्रभू मास्तर देऊ शकतील).

थोडक्यात प्रयेक घरी, कधी ना कधी घडू शकणारी घटना.. यातुन वाचायचे असेल तर, मुलांशी संवाद - मोकळे वातावरण आवश्यक..

याच्याशी मात्र सहमत. माहिती असली तर (अगदी कोणतीही, भले आग असो वा भूकंप!) दुर्घटना टळण्याची शक्यता वाढते.

अदिती

स्वाती२'s picture

5 Aug 2009 - 5:01 pm | स्वाती२

>>विदेशी संस्कृतीच्या आहारी गेलेले घर..
जो उठतो तो विदेशी संस्कृती म्हणून ओरडतो पण इथे अमेरिकेतही चांगल्या घरातील मुलांना १६ वर्षाची होई पर्यंत डेटींगला परवानगी नसते.
मी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात वाढले. मुलींची शाळा वेगळी होती.
एकत्र कुटूंब होती. ७०% आया पूर्णवेळ घरी असायच्या. काळ ३० वर्षापूर्वीचा तरीही भानगडी या व्हायच्याच.
मुलांशी ३-४ वर्षाची असल्यापासून सतत संवाद साधणे महत्वाचे. मग देश कुठलाही असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी माझ्या मनातलं बोललात स्वातीताई!

माझ्या अनेक इंग्रज मित्र-मैत्रिणींना दहावीची परीक्षा होईपर्यंत डेटींगला परवानगी नव्हती. आणि माझ्याच शाळेतल्या बरोबरीच्या मुलींना वरच्या वर्गातले बॉयफ्रेंड्स असल्याचं (मलाही) माहित होतं. आता बोला!!

तरीही, बॉयफ्रेंड (किंवा गर्लफ्रेंड) असणं हा पालकांचा पराभव म्हणजे नक्की काय?

अदिती

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 5:08 pm | विनायक प्रभू

मला वयाच्या १६व्या वर्षी अनेक मैत्रीणी होत्या.
अगदी घरातल्या सर्वांना माहीत होते.
तो त्यांना पराभव कधीच वाटला नाही.
आणि हे १९७०

विकास's picture

5 Aug 2009 - 6:34 pm | विकास

भिन्न लिंगी मित्र-मैत्रिण असणे हे आमच्याकडेपण आम्हा भावंडांबाबत अजिबातच वेगळे वाटले नव्हते. (अर्थात विप्रंच्या बराच पुढचा काळ).

मात्र अमेरिकेत आल्यावर boyfrined and girlfriend या शब्दांचे "व्यावहारीक" अर्थ समजले. परीणामी अमेरिकन लोकांशी बोलताना एखाद्या मैत्रीणीबद्दल सांगितले तर friend who is girl असे सांगितले की त्यांचा गैरसमज होत नसे :-)

हर्षद आनंदी's picture

6 Aug 2009 - 6:25 pm | हर्षद आनंदी

अहो, मराठी वळते म्हणुन वळवु नका हो ...

८ \ ९ तली पोरगी .. तिच्यावर गॅंगरेप?

भयंकर.... कल्पना करवत नाही !!

बॉयफ्रेंड \ गर्लफ्रेंड आणि मित्र \ मैत्रीण यांच्या अर्थात कींवा ह्यातुन ध्वनित होणारे अर्थ तुम्हाला मी कोण समजावुन देणार?

मला समजलेला अर्थ : मित्र \ मैत्रीण यांच्या काही सीमा असतात [विर्पयास करु नयेत हि विनंती] ह्या सीमा जिथे संपतात तिथे बॉयफ्रेंड \ गर्लफ्रेंड हे प्रकरण चालु होते.
म्हणुन तो पालकांचा नैतिक पराभव.

नुकत्याच वयात येणार्‍या मुलात नैसर्गिक विरुध्द लिंगी आकर्षण असते, मैत्री ही हवीच वैचारीक \ मानसिक जडण घडण इथे फार नाजुक वळणावर असते, काही गोष्टी पालकांशी नाही बोलता येत, लजा, भय, संकोच, भीड काहीही म्हणा, त्यावेळी मित्र \ मैत्रिण लागतात. नसतील तर तो प्रॉब्लेम म्हणू...

मास्तर, १९७० ल तुम्हाला १६ मैत्रिणी होत्या... अभिमानाची गोष्ट आहे, त्याकाळी नुसते बोलले तरी गहजब ... पण मुली आजच्या ऐवढ्या असुरक्षित नक्कीच नव्हत्या .. काय?

हर्षद आनंदी's picture

6 Aug 2009 - 6:45 pm | हर्षद आनंदी

राग मानु नका ... पण अमेरीकेचे, पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे ईथे गाऊ नका.

भारत देशाला काही संस्कृती आहे, इथे समाजबंधने आहेत, मुक्त संचार नाही .. मुक्त संस्कृती नाही

काही प्रश्न ..
मुळात 'डेटींग' का, गरज काय?
चुक झाली तर जबाबदारी घेतली किती जण घेतात?
जबाबदारी कसली, एक भुक भागवताना झाली चुक, डॉक्टर कशाला आहेत? मुळात असे काही करण्याची गरज काय? १६ व्या वर्षी गर्भपात?

भानगडी होणारच, हाताची पाचही बोटे सारखी नसतात, इथे मुद्दा प्रमाणाचा आणि गांभिर्याचा आहे..

आजचा काळ आणि '३० वर्षांपुर्वीची भानगड' ह्यांचा मेळ घालणे अशक्यच

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 7:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राग मानु नका ... पण अमेरीकेचे, पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे ईथे गाऊ नका.
छे हो, राग आणि तुमचा? संबंधच नाही.
पण ही जी काही अमेरिकन, पाश्चात्य संकृती म्हणून जे काही तुम्ही म्हणत आहात ती तुम्हाला किती माहित आहे? खरोखर तिकडे कुठे, कोणाच्या घरी राहून तुम्ही ती पाहिली आहेत का? का चार लोकं म्हणतात म्हणून पाश्चात्य संस्कृतीचा हल्ला म्हणून सांगता आहात? मी काही काळासाठी ब्रिटीश घरात राहून ब्रिटीश संस्कृती पाहिली आहे. आई-वडीलांचे मुलांशी असलेले संबंध जवळून पाहिलेले आहेत म्हणून विचारते.
आणि का म्हणून दुसर्‍याच्या (पक्षी: अमेरिकन, पाश्चात्य) चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही? त्यांचं चांगलं आहे त्याचे गोडवे गायले तर तुम्हाला का हो एवढा त्रास होतो?

भारत देशाला काही संस्कृती आहे, इथे समाजबंधने आहेत, मुक्त संचार नाही .. मुक्त संस्कृती नाही
कोणत्या देशात "मुक्त"संचार आहे असं तुमचं म्हणणं आहे? पाश्चात्य, अमेरिकन संस्कृतीचं अंधानुकरण नको म्हणताना त्यांनाही काही संस्कृती आहे हे तुम्ही स्वतःच मान्य करता आहातच ना? जी आपल्यासारखी नाही ती सगळी विकृतीच असते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? चांगल्या शिकलेल्या घरांमधे अगदी शाळेत असल्यापासून असलेली "प्रेमप्रकरणं" माझ्या माहितीची आहेत. दोघंही व्यवस्थित शिकले, नोकरी-धंद्याला लागले, स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकले, नंतरच लग्न केलं आणि आता मुलांसह सुखात रहात आहेत. हे विकृत का पाश्चात्य संस्कृतीवाले?

या मुलीची काही चूक नाहीच असं काही माझा दावा नाही. पण ती चुका कबूल करत आहे, त्या टाळून पुढे जायला तयार आहे तरीही तिला आता चूक कबूल केली म्हणून झोडायचं का उदार मनाने माफ करून पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या?

मुळात 'डेटींग' का, गरज काय?
चुक झाली तर जबाबदारी घेतली किती जण घेतात?
जबाबदारी कसली, एक भुक भागवताना झाली चुक, डॉक्टर कशाला आहेत? मुळात असे काही करण्याची गरज काय? १६ व्या वर्षी गर्भपात?

१६व्या वर्षी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असली की चूक होणारच हे जे काही विधान आहे त्याची गंमत वाटली. माझ्या पहाण्यात कदाचित समंजस जोडपीच जास्त आली असतील ...

आणि हो, डेटींगची गरजच नाही तर आता लव्ह मॅरेजेस बेकायदेशीर ठरवायचीत का? मुलामुलीने सगळ्यांसोबत एकमेकांना पहावं आणि लग्नं करावं. एकमेकांना समजून घेणं थोडीच महत्त्वाचं आहे? 'सप्तपदी'चं मात्र नंतर पहाता येईल.

अदिती

नीधप's picture

6 Aug 2009 - 10:22 pm | नीधप

+१..
बेजबाबदारपणा हा दडपा/ लपवा वृत्तीतून जास्त निर्माण होतो असं पाहण्यात आहे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

स्वाती२'s picture

7 Aug 2009 - 12:36 am | स्वाती२

गोडवे कोण गातय? मी इथली खरी परीस्थिती सांगीतली.
डेटिंगची गरज मनाजोगता जोडीदार शोधण्यासाठी. इथे आपल्या कांदेपोहे सारखा blind date प्रकारही असतो. डेटिंग म्हणजे one night stand नव्हे.
चुक झाली तर जबाबदारी घेतात. मुळात इथे गर्भपात ही गोष्ट भारतात घेतली जाते तेव्हड्या lightly घेतली जात नाही. prolife-prochoice असा बराच गोंधळ असतो. झाल्या प्रकाराला मुलगा मुलगी दोघेही जबाबदार धरले जातात.
बहूसंख्य मुली बाळ स्वतः वाढवतात किंवा द्त्तक देतात. मुलीने बाळ वाढवायचे ठरवले तर मुलाला संगोपनाच्या खर्चाचा वाटा उचलावा लागतो. भारतात केवळ गर्भ मुलीचा आहे म्हणून त्याला कचरापट्टी दाखवली जाते.
>>आजचा काळ आणि '३० वर्षांपुर्वीची भानगड ह्यांचा मेळ घालणे अशक्यच
मूल आणि आई-वडिल यांच्यात जे विश्वासाचे नाते आणि सुसंवाद हवा तो नाही म्हणूनच तर सगळे प्रश्न उभे राहातात. पौगंडावस्थेतील मुलांचे प्रश्न तेव्हाही होते, आजही आहेत.

चिरोटा's picture

5 Aug 2009 - 4:51 pm | चिरोटा

मस्त कथा.!

१४ वर्षाच्या मुलीला बॉयफ्रेंड असणे हा आई-वडीलांचा नैतिक पराभव

सहमत. पण हल्ली हे boy friend\girl friend चे खूळ देशभर विशेष्करुन मोठ्या शहरात पसरलेच आहे. इकडे शाळा सुटल्यावर शॉपिंग मॉल मध्ये फिरणारी शाळकरी 'जोडपी' मी पाहिली आहेत.मोबाइलमुळे तर आणखीनच परिस्थिती बिघडत आहे. विरोध झालाच तर 'नाक खूपसणार तुम्ही कोण?" असा सवाल केल्यावर काय बोलणार?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रसन्न केसकर's picture

6 Aug 2009 - 6:43 pm | प्रसन्न केसकर

>>>इकडे शाळा सुटल्यावर शॉपिंग मॉल मध्ये फिरणारी शाळकरी 'जोडपी' मी पाहिली आहेत.

अहो आता गावे खूप पुढारलीत. तिकडे शॉपिंग मॉलमधे जे चालते अन जे चालत नाही असे बरेच काही गावांमधे ७,८,९ वीतली मुले मुली करत असतात. फक्त ते गावाबाहेर कुठेतरी कोपर्‍यात चालते एव्हढेच.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 4:58 pm | विनायक प्रभू

बॉय फ्रेंड असणे म्हणजे नैतिक पराभव?
तो कसा काय बॉ?

दशानन's picture

5 Aug 2009 - 5:02 pm | दशानन

>>बॉय फ्रेंड असणे म्हणजे नैतिक पराभव?

ह्याला मी पण सहमत नाही..... !

पण बॉय फ्रेंड असणं व नंतर लफडं करणे ह्याला आपेक्ष आहे व तो राहणारच.

प्रत्येक गोष्टीला एक वय असतं.... त्या वयातच त्या गोष्टी शोभुन दिसतात सर... तुमच्या समूउपदेशाबद्दल काही वावडं नाही पण तुम्ही दिलेला सल्ला काही पटला नाही... !

तुम्हाला काय वाटतं... की मुलगी तुम्हाला सर्व काही खरं सांगेल ?

विकास's picture

5 Aug 2009 - 6:54 pm | विकास

तुम्हाला काय वाटतं... की मुलगी तुम्हाला सर्व काही खरं सांगेल ?

एकदम बरोब्बर!

अवलिया's picture

5 Aug 2009 - 5:01 pm | अवलिया

तुमचे सगळे बिनडोक क्लायंट इंजिनियरी मेडीकलचेच असतात का ?

स्वाती२'s picture

5 Aug 2009 - 5:29 pm | स्वाती२

>>आता इतर मैत्रीणी ऐनेवेळी नाही आल्या.एका मैत्रीणीचा भाउ आला.
सर, एवढ्या हुषार मुलीला कळलं कसं नाही की लोचा आहे? ह्या पोरीने स्वतःला सांभाळायला शिकल पाहीजे आधी. किंवा ती समजून उमजून आगीशी खेळतेय. आईने तमाशा करायला नको होता.
हे गोल्ड प्रकरण नव्यानेच कळल.आमच्या गावच्या 'विदेशी ' थेटरात गोल्ड नाही. आईबाप पोराना थेटरात सोडतात. योग्य त्या शोचच तिकिट काढून देतात.डोळा चुकवून पोर भलत्या शो ला जाऊन बसल तर अशर पकडून योग्य जागी नेऊन बसवतो.

दशानन's picture

5 Aug 2009 - 5:34 pm | दशानन

>>एवढ्या हुषार मुलीला कळलं कसं नाही की लोचा आहे?

हेच हेच म्हणायचे होते मला पण योग्य शब्द सापडत नव्हते... !
अहो सिनेमाला जाणे समजते तर भले वाईट पण समजत असावेच.

>>>'विदेशी ' थेटरात गोल्ड

हे नवीन फॅड आलं आहे भारतात सध्या ;)

जेथे नॉर्मल टिकीट २५०-३०० रु. चे तेथे गोल्ड टिकिट ७५० रु.
सर्व काही भेटतं गोल्ड टिकिट बरोबर... ( बीयर्..व्हिस्की पासून व्हेज-नॉनव्हेज फुड.. )

अवलिया's picture

5 Aug 2009 - 5:39 pm | अवलिया

( बीयर्..व्हिस्की पासून व्हेज-नॉनव्हेज फुड.. )
पाकिटात का?

दशानन's picture

5 Aug 2009 - 5:41 pm | दशानन
पर्नल नेने मराठे's picture

5 Aug 2009 - 6:06 pm | पर्नल नेने मराठे

जेथे नॉर्मल टिकीट २५०-३०० रु. चे तेथे गोल्ड टिकिट ७५० रु.
सर्व काही भेटतं गोल्ड टिकिट बरोबर... ( बीयर्..व्हिस्की पासून व्हेज-नॉनव्हेज फुड.. )

हे मी आजच आइक्तेय :-?

चुचु

छोटा डॉन's picture

5 Aug 2009 - 6:41 pm | छोटा डॉन

>>हे मी आजच आइक्तेय
हा हा हा, =)) =))
वाचुन मज्जा वाटली.

>>जेथे नॉर्मल टिकीट २५०-३०० रु. चे तेथे गोल्ड टिकिट ७५० रु.
सहमत आहे, इकडे नॉर्म्ल तिकीट २०० ~ २५० असते.
आणि गोल्ड क्लास आहे "४५० तिकीटाचे + १०० ( किंवा १५० ) स्नॅक्सचे" ...
अजुन एक महत्वाचा मुद्दा असा की "गोल्ड क्लास" हा काही वेगळा सेक्शन नसतो, इनफॅक्ट ही एक "वेगळीच स्क्रीन" असते की जिथे सर्वच तिकीटे गोल्ड क्लासची असतात. इथे सामान्य तिकिटे ( आणि लोक्स ) अस्तित्वात नसतात, ऑल इज ओन्ली गोल्ड .. ;)

- ("गोल्ड क्लास"वाला माहितगार ) छोटा डॉन

>>... ( बीयर्..व्हिस्की पासून व्हेज-नॉनव्हेज फुड.. )
आँ ???
सगळे भेटते हे खरे आहे पण "मद्य ( बियर , व्हिस्के किंवा इतर कसलेही ) " भेटत नाही, निदान मी तरी पाहिले नाही ...

- (अनभिज्ञ ) छोटा डॉन

दशानन's picture

5 Aug 2009 - 6:44 pm | दशानन

येथे भेटतं ;)
म्हणून तर मज्जा !

निखिल देशपांडे's picture

5 Aug 2009 - 6:54 pm | निखिल देशपांडे

डॉनराव फक्त काही रांगा गोल्डच्या असणारे पण सिनेमाहॉल आहेत....

निखिल
================================

सहज's picture

5 Aug 2009 - 6:43 pm | सहज

तुम्ही आजच्या आज समुपदेशन द्या बरे , प्रत्येकाने घरी होम थिएटर टाका उगाच पोरांच्या मागे जासुसी करण्यापेक्षा. तुमच्या समोर त्यांना सिनेमा दाखवा म्हणाव.

अवलिया's picture

5 Aug 2009 - 6:48 pm | अवलिया

च्यायला हे चांगले धंदे आहेत सहजराव तुमचे...

च्यामारी अलका राहुलवर घिरट्या घालत केटी काढल्या तुम्ही आणि होम थिएटर्सचे सल्ले देता...

हाऽऽऽऽऽड !! चालणार नाही ! चालणार नाही !!

सहजरावांचा जाहिर निषेध !

किधर है गोल्ड क्लास ? मै आ रहा हु...

सहज's picture

5 Aug 2009 - 6:57 pm | सहज

हॅ हॅ हॅ काय मंदीच्या झळा बसल्या काय?

तसेही तुम्ही अविवाहित फकीर तुम्ही कशाला मधे बोलताय

हॅ हॅ हॅ

अवलिया's picture

5 Aug 2009 - 7:06 pm | अवलिया

अंगावर आल्यावर पळुन जावु नका सहजराव.
मंदीच्या झळांचा आणि गोल्डक्लासचा काय संबंध याचा खुलासा करा... उगाच शेंडा बुडुख नसलेले विधाने करुन फार विचारवंत असल्याचा आव आणु नका... तसेही तुम्ही काय.. बाटलेले **** प्रेमी !!

तसेही तुम्ही अविवाहित फकीर तुम्ही कशाला मधे बोलताय
अविवाहित या शब्दात सगळे आले... तेव्हा उगा टमटम करु नका... तुम्हाला पहायचा असेल पिच्चर तर सांगा दोन तिकीटे मला अजुन तरी जड नाहीत... हो फक्त भारतातल्या धुळीत यावे लागेल तुम्हाला .. तेवढा त्रास बघा झेपेल का तुम्हाला... कारण काय..तसेही तुम्ही काय.. बाटलेले **** प्रेमी !!

दशानन's picture

5 Aug 2009 - 7:08 pm | दशानन

-१

:|

प्रेमीला असे हिणवू नका... आपलं म्हणा.. !

सहज's picture

5 Aug 2009 - 7:13 pm | सहज

लवकर बरे व्हा! :-)

आता एकच शब्द (वाक्य नाही नोंद घ्या) "संस्कार"

अवलिया's picture

5 Aug 2009 - 7:17 pm | अवलिया

बघा बरे आताच तुमची दाणादाण उडाली.. बरे वाटल्यावर पळता भुई थोडी होईल.. ;) असो.

संस्कार शिकवताय? बर बर ... हेच दिवस राहिले होते.. असो.

बाकी चालु द्या... !!!

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 6:55 pm | विनायक प्रभू

ठाण्याच्या गोल्ड ची किंमत मॉर्नींग शो ला फक्त रुपये ७०.(सिनेमा फक्त)

अवलिया's picture

5 Aug 2009 - 7:12 pm | अवलिया

ते 'गोल्ड फॉर ओल्ड' असेल.

विकास's picture

5 Aug 2009 - 7:09 pm | विकास

हे प्रभू!

आपल्या या लेखावर विचार केल्यावर आणि (गोल्ड वगैरेची) ज्ञानात (नव्याने) भर घातल्यावर थोडे वेगळे वाटायला लागले आहे:

  1. आईचे वागणे नक्कीच चुकलेले आहे. (हेरगिरी, चारचौघात वगैरे..)
  2. पण मुलीला जर कोणीतरी ब्लँकेटमधे घेत आहे आणि त्यात गैर वाटत नाही तर ते नक्कीच चुकीचे आहे. विचार करा जर "खरच" तिच्या मैत्रिणीच्या भावाऐवजी मैत्रीणीच असत्या तर त्या गोल्ड तिकीटे काढून ब्लँकेटमधे बसल्या असत्या का?
  3. मला वाटते आपण समुपदेशन करत असताना एकाच बाजूने टोकाची भुमिका तर घेत नाही आहात ना? म्हणजे असे की सुनेने लाथ मारली अशी तक्रार केली की सासू-सासरे, दिर-नणंद आणि अर्थातच नवर्‍यावर संशयच नाही तर आरोप करायचा? ;)
दशानन's picture

5 Aug 2009 - 7:10 pm | दशानन

सकाळ पासून हेच म्हणतो आहे मी !

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 7:10 pm | विनायक प्रभू

ब्लँकेट इंडीविजुअल आहे.

दशानन's picture

5 Aug 2009 - 7:14 pm | दशानन

त्याने काय फरक पडतो.... मास्तर तुम्ही असली ठीसुळ बाजू उचलाल असे वाटलं नव्हतं !

तुम्ही आपल्या क्लाइंटची चुक मान्य का करत नाही आहात ?

अहो, गोल्ड च्या खुर्च्या तुम्ही एकदा जाऊन पाहून या हो... दॅट्स मेड फॉर कपल्स ! असे कसे नादान होत आहात तुम्ही कळत नाही आहे :(

जर चित्रपट पहायचाच आहे तर गोल्ड क्लास'च का ?

नीधप's picture

5 Aug 2009 - 7:15 pm | नीधप

मला तरी मैत्रिणी आयत्या वेळेला न येणं आणि मैत्रिणीचा भाऊच केवळ येणं इत्यादी उपरोधिक वाटलं.
असो.
आईचं ओव्हररिअ‍ॅक्टींग नक्कीच चुकलं पण बापाचं पाठीशी घालणंही चुकलं असं वाटलं.
दोघांपैकी कुणालाच मुलीशी नीट संवाद साधायची गरज भासलेली दिसत नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अनामिक's picture

5 Aug 2009 - 7:53 pm | अनामिक

नीधपशी १००% सहमत.
आईने वेळोवेळी ओव्हरअ‍ॅक्ट करणे कदाचित चुकतही असेल, पण अगदीच बंधन नसणेही जरा जास्तंच वाटते (हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही). मुलांना मोकळीक ही द्यायलाच हवी, पण मोकळीक असुनही मर्यादेत राहणे(स्वतःच्या भल्यासाठी) हे पालकांनीच मुलांना शिकवायला हवे.

-अनामिक

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2009 - 9:28 pm | llपुण्याचे पेशवेll

+१ अनामिक साहेब... पण मर्यादा हा शब्द आला की व्यक्तिस्वातंत्र्यावर टाच येते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

लिखाळ's picture

5 Aug 2009 - 7:59 pm | लिखाळ

समुपदेशन-सल्ला हा वरील सारख्या स्थितीमध्ये केस सापेक्ष असतो असे माझे मत आहे. दिलेला सल्ला हा सर्व समाजाला, सामजीक परिस्थिला, संस्कृतीला वगैरे लाऊन पाहणे मला योग्य वाटत नाही. समोर आलेल्या कुटुंबीयांचा प्रश्न विप्रंनी सोडवला असेल तर त्यांचे अभिनंदन.

विप्रंना त्या आईबद्दल काय वाटले, मुलीबद्दल काय वाटले हे त्यांनी आपल्याला सांगीतलेले दिसत नाही. पण त्या आई-मुलीशी ते काय बोलले इतकेच सांगीतले आहे. ती त्यांची खुबी आहे. आणि त्यांनी प्रश्न सोडवला आहे.
(तसेच मुलीने तारतम्याने वागावे, आईचे ऐकावे असे जे इतरांना वाटले तेच विप्रंनी त्या मुलीला सांगीतलेले दिसते. पण मुलीच्या कलाकलांनी सांगीतले.)

-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 8:14 pm | विनायक प्रभू

हां लिखाळ भावोजी
मुलीचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, विषय संपला.

टारझन's picture

5 Aug 2009 - 11:10 pm | टारझन

वा वा वा !!! मास्तर हल्ली बरेच "उहापोह" घडवून आणत आहात मिपावर !!
छाण !!

मुलीचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, विषय संपला.

मला वाटतं शिक्षणाचा मार्ग मोकळा होउन विषय संपणार नाहीत , बाकी मार्ग तुंबलेत ते मोकळे होणं गरजेचं ! असो ..

-(हौषी समुपदेशक) टारायक महाप्रभू