हिंदोळा

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
5 Aug 2009 - 10:05 am

हिंदोळा

साम्राज्ये लयाला जाती
पडली नि:शस्त्र समता
भाव तेथे ऋजुता
टणत्कार ढसाढसा

तप्त अग्निवर्षा
सुप्त जनगणना
भावविभोर
कंकणराणा

तुझा फ़सफ़शीत उत्साह
जणू तेजतर्रार
गोक्षुरादि गुग्गुळ
संहत नायट्रिक आम्लात

माझ्या दुधारी
वेदनेचे समूळ उच्चाटन
प्रेरणा
समिधा
यांची एकत्र भावधुम्मस

आणि एकटाच
डोलणारा
सचिंत
हिंदोळा

५ ऑगस्ट २००९, पुणे

करुणकलामुक्तक

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Aug 2009 - 10:09 am | ब्रिटिश टिंग्या

!

- टिंग्या

दशानन's picture

5 Aug 2009 - 1:54 pm | दशानन

.

+++

मला मराठी येत नाही हे तुमची कविता वाचून मला लगेच समजले :(

बाबा योगिराज's picture

2 Sep 2015 - 10:58 pm | बाबा योगिराज

मला मराठी येत नाही हे तुमची कविता वाचून मला लगेच समजले :(

सहमत...

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2009 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

¿

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

सहज's picture

5 Aug 2009 - 2:17 pm | सहज

स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने काही काव्य असेल असे वाटले पण बियर दिवसाचा असर असा आहे की

तुझा फ़सफ़शीत उत्साह
जणू तेजतर्रार....
आणि एकटाच
डोलणारा

वाचुन गडबड होतीय असे वाटले.

विसोबा खेचर's picture

5 Aug 2009 - 3:10 pm | विसोबा खेचर

कविता जराही म्हणजे जराही समजली नाही हो!

प्लीज, आमच्याकरता केव्हातरी साधी सोप्पी कविताही लिहा ना!

आपला,
(रडकुंडीला आलेला) तात्या.

दशानन's picture

5 Aug 2009 - 3:44 pm | दशानन

तुझा फ़सफ़शीत उत्साह
जणू तेजतर्रार
गोक्षुरादि गुग्गुळ
संहत नायट्रिक आम्लात

हे म्हणजे बीयर आहे हे समजले (१ तास लागला )

*

आणि एकटाच
डोलणारा
सचिंत
हिंदोळा

हा म्हणजे पिलेला... पियक्कड आहे .. माझ्या सारखा डोलकर (समजायला १ तास लागला)

*

तप्त अग्निवर्षा
सुप्त जनगणना
भावविभोर
कंकणराणा

ह्याचा पण अर्थ लागला आहे पण जो तुम्हाला अभिप्रेत आहे तोच मला समजला की तुम्हाला जो समजला आहे तो तुम्ही जसे संमजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो मला समजला हे समजायला काही मार्ग नाही पण थोडे फार मला समजले आहे (समजायला लागलेला कालावधी १.३० तास )

पुर्णं बियरचा बट्टाबोळ ;)

=))

+++++++++++++++++++++++++++++

नंदन's picture

5 Aug 2009 - 3:37 pm | नंदन

'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला :) [कृ. ह. घे.]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा नंदन पौर्णिमेच्याच दिवशी अशा तुफान कमेंट्स करत आहे, काहीतरी गोम आहे यात!

असो. कविता समजून घेण्याचा माझा आणखी एक प्रयत्न निष्फळ ठरला. पण ते टणत्कार, ढसढसा, कंकणराणा, फसफशीत, गोक्षुरादि गुग्गुळ, संहत नायट्रिक आम्ल वगैरे "नादमय" पण हार्श शब्दांचा वापर फारच आवडला.

अदिती

मुक्तसुनीत's picture

5 Aug 2009 - 9:19 pm | मुक्तसुनीत

'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला

हॉहॉहॉहॉहॉहॉ
जबर्‍या ! ;-)

यशोधरा's picture

5 Aug 2009 - 10:20 pm | यशोधरा

नंदन! _/\_ =))

मिसळभोक्ता's picture

5 Aug 2009 - 11:15 pm | मिसळभोक्ता

'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला

नंदनराव,

आ ड वा !

बाकी कविता अर्थगर्भ आहे. पूर्ण कळली. (कुठल्या तरी डे चा परिणाम असावा.)

-- मिसळभोक्ता

Nile's picture

6 Aug 2009 - 1:03 am | Nile

=)) =)) =)) =))

क्या बात है! सुप्प्प्पर!

बाकी, कवितेतलं आपल्याला काय कप्पाळ कळत नाही त्यामुळे 'नो कॉमेंट्स!

टारझन's picture

5 Aug 2009 - 3:37 pm | टारझन

कविता काळजाला भिडली !! शब्द न शब्द हृदय हेलावून गेला !!
वृत्त वगैरे व्यवस्थित जमली आहेत , कटाक्षाने पाहिल्यास कळते की कविता काय डोळ्यांसमोर ठेवून लिहील्ये !

ठँक्स !! जियो शरदिनी

-(शर्दिन्श्रीचा फॅन) टार्‍या

दशानन's picture

5 Aug 2009 - 3:49 pm | दशानन

पुर्ण कवितेचा शक्यतो हा अर्थ आहे की,

कडवं -१
एक पार अडवा झाला आहे (काम धंद्यातून )


कडवं -२
घरातल्या सुखाला ही मुकला आहे.

कडवं -३
त्याला फक्त बीयरचाच आसरा आहे.

कडवं -४
कडवं १ व कडवं २ च्या अडचणीवर त्याला उपाय सापडला आहे.

कडवं -५
आता तो मुक्त आहे त्याला काहीच अडचण नाही आहे.. कारण त्याला चढली आहे ;)

कडवं -६

राजे अडवा पडला आहे.... उचला कुणी तरी राव =))
+++++++++++++++++++++++++++++

अवलिया's picture

5 Aug 2009 - 5:34 pm | अवलिया

वा ! मस्त !!
सुरेख , असेच लिहित रहा !

आनंदयात्री's picture

5 Aug 2009 - 6:54 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो. वेड्यावाकड्या कमेंट्सनी हिरमुसुन जाउ नका.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

5 Aug 2009 - 6:50 pm | कालिन्दि मुधोळ्कर

तुमचा शब्दांचा खेळ आणि विरोधाभास असणारे अर्थ/ध्वनींची एकत्र गुंफण खास असते (जरी त्यामुळे कधी कधी आशय झाकोळला गेला तरी).

लिहीत रहा.

रामदास's picture

5 Aug 2009 - 6:59 pm | रामदास

मी बर्‍याच वेळा वाचूनही कविता कळली नाही.
ही अर्थातच पहीली वेळ नाही.
चकलीच्या सोर्‍यातून शेवटी शेवटी जसं पडतं असं शेवटचं कडवं का असतं बरं ?

दशानन's picture

5 Aug 2009 - 7:01 pm | दशानन

बास काय राव..... आम्ही हे त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतो आहे ;)

आनंदयात्री's picture

5 Aug 2009 - 7:02 pm | आनंदयात्री

>> चकलीच्या सोर्‍यातून शेवटी शेवटी जसं पडतं असं शेवटचं कडवं का असतं बरं ?

आणी तिच नेमकी खासियत वाटली .. असो.

नीधप's picture

5 Aug 2009 - 7:11 pm | नीधप

खूप प्रयत्न केला पण काहीही समजलं, उमजलं, पोचलं, भिडलं, नडलं नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धनंजय's picture

5 Aug 2009 - 7:41 pm | धनंजय

तुमची कविता नेहमी वाचतोच.

लिखाळ's picture

5 Aug 2009 - 7:49 pm | लिखाळ

कविता वाचली. नेहमी प्रमाणेच समजली नाही. पण वाचायला चांगली वाटली.
पंचाक्षरी विचित्रशब्द योजनेचा या कवितेतसुद्धा अभाव वाटला. तसे शब्द वाचायला मजा वाटते. आणि तुम्ही तयार केलेले शब्द खरेच खास असतात.
पु ले शु.

-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

इनोबा म्हणे's picture

5 Aug 2009 - 10:27 pm | इनोबा म्हणे

में दू ला मुं ग्या आ ल्या.

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

विनायक प्रभू's picture

6 Aug 2009 - 11:38 am | विनायक प्रभू

सर्वांगाला झीणझीण्या आल्या.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 11:41 am | मिसळभोक्ता

झाले झाले.. बावन्न झाले...

-- मिसळभोक्ता

श्रावण मोडक's picture

5 Aug 2009 - 10:51 pm | श्रावण मोडक

'हुच्च' रचना, त्यावरचे प्रतिसाद, त्यावरचेही प्रतिसाद, त्यावरचेही....

_समीर_'s picture

6 Aug 2009 - 1:11 am | _समीर_

तुम्ही कविता शिकायला ग्रेस ह्यांच्याकडे जाता का हो?

पाषाणभेद's picture

6 Aug 2009 - 2:06 am | पाषाणभेद

एवढ्या कविता कवयत्रीने प्रसिद्ध केल्या पण त्यांवर काही खुलासा केलेला नाही. कविता जर ज्यांच्यासाठी प्रसारीत करतो त्यांना समजत नसेल व त्यांना विचारूनही कवयत्री समजवून देत नसेल तर ही त्या वाचकांची उडवलेली खिल्ली आहे असे मला वाटते. ईतक्या दुर्भोध कविता वाचतांना जर मेंदुचा भुगा होत असेल वरती त्या समजुन घेण्यात जर अनंत यातना होत असतील तर या पुढे असले काव्य वाचणे म्हणजे एखादे मुक्तहस्त चित्र पाहण्यासारखे आहे.

पुर्वी काही कवींच्या कवीता दुर्बोध वाटत असे त्या काळी एकमेकांशी संपर्क एवढा वेगात नसल्याने कविला लोक प्रत्यक्ष विचारू शकत नसत व विचारले तरी सांगण्याची जरूरी भासली नसावी. या कवयत्रीला अनेकांनी विचारुनही त्याची दखल दिली नाही.

माझा आक्षेप कवयत्री वा कवितेवर नाही पण ती समजून घेण्यावर (की देण्यावर ?) आहे.

कवयत्री कविता समजुन देण्याची तसदी घेईल का? अन्यथा आपल्या कविता आपल्यासाठीच असल्याचा आमचा समज होईल.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विंजिनेर's picture

6 Aug 2009 - 7:12 am | विंजिनेर

कवयत्री कविता समजुन देण्याची तसदी घेईल का? अन्यथा आपल्या कविता आपल्यासाठीच असल्याचा आमचा समज होईल.

मकबुल फिदा हुसेन आपले घोडे कुणाला समजवून देतो का? गॉगने सूर्यफुलांवर समग्र विवेचन केले होते का?

अहो, कलाकारांचे असेच असते. आपण मर्त्य मानव असल्या कलाकृतींमधे अर्थ वगैरे शोधत बसतो. कलाकाराला काय त्याचे? तो कलेच्या धुंदीत असतो ;)

शरदिनी बै, तुम्ही लिहित राहा हो... बिनधास्त...

बाकी, तुम्ही संस्कृतात लिहियाचा का हो? चुकून मराठीकडे वळल्या सारख्या वाटता म्हणून विचारले.

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 7:46 am | विसोबा खेचर

शरदिनी बै, तुम्ही लिहित राहा हो... बिनधास्त...

खरं आहे. वाचक कोण लागून गेले आहेत की त्यांना तुम्ही एका ओळीचाही खुलासा करायची गरज आहे?! तुमच्यासारख्या महान व शब्दगूढ कवयत्रीने वाचकांना फाट्यावर मारून लिहीत राहणे हेच उत्तम! :)

आम्ही वाचू आणि काहीही न समजल्याचा आनंद घेऊ. एखादी गोष्ट समजल्यावर जसा आनंद होतो तसा तो एखादी गोष्ट काहीही न समजल्यामुळेही होऊ शकतो/होतो, हे आम्हाला तुमच्या कवितांनीच शिकवले! :)

आपला,
(अज्ञानात सुखी) तात्या.

समंजस's picture

6 Aug 2009 - 10:27 am | समंजस

पुर्ण सहमत................

पाषाणभेद's picture

6 Aug 2009 - 7:53 am | पाषाणभेद

खरय आपल म्हणण. पण कविता ज्यांच्यासाठी प्रसारीत करतो त्यांना समजत नसेल व त्यांनी विचारूनही कवयत्री समजवून देत नसेल तर त्याचे काय?

गॉगने कदाचीत त्याच्या जवळच्यांजवळ विवेचन केलेही असेल कदाचीत? आपल्यापर्यंत आले नाही ते एवढेच.

आणि मकबुल फिदा हुसेन च्या कलाकारीत (??) घोडे आहेत हे समजतात की!
"माझा आक्षेप कवयत्री वा कवितेवर नाही पण ती समजून घेण्यावर (की देण्यावर ?) आहे. " असे मी वरती लिहीलेलेच आहे ते आपण वाचा.

त्यांची कविता कलाकार म्हणुन योग्य आहेच. पण ती कलाक्रुती काहीतरी समजली तरच आपण त्या अमुर्ततेचा आनंद घेवू शकू.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

पॅपिलॉन's picture

6 Aug 2009 - 11:13 am | पॅपिलॉन

आपले आयुष्य हे सुख आणि दु:ख, उत्साह आणि नैराश्य, क्रौर्य आणि शांतता ह्यादरम्यान कायम हेलकावे घेत असते. त्या हेलकाव्यांचे वर्णन करणारी ही कविता अतिशय सुंदर.

प्रेरणा
समिधा
यांची एकत्र भावधुम्मस

वा. सुरेख अविष्कार

सचिंत
हिंदोळा

यातील हिंदोळ्याला दिलेला सचिंत हा शब्द खूप आवडला.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

शरदिनीआप्त's picture

2 Sep 2015 - 10:23 pm | शरदिनीआप्त

बरीच वर्ष ऊलटली ... अजुन समजली नाही!

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 10:28 pm | मांत्रिक

हे काय आहे?