चारित्र्य

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
30 Jul 2009 - 10:28 pm

चारित्र्य

चोपन्नकशी चित्रकूटाने केली
चारित्र्याची चतुर चिरफ़ाड
भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी
खुदुखुदु डोकावे अलवार भरतार

भंगुनी कित्येक ओथंबली मने
झुरली जर्जर गळाठली पाने
पंजरी बाणांच्या शोकाकुल भीष्म
असा तळपला भयाकारी ग्रीष्म

बिल्वदल सपत्नीक
मूर्तीमंत मेकॅनिक
चपल
ड्रुपल
टपल
ढुम्

३० जुलै २००९ ,पुणे

शृंगारकरुणअद्भुतरसमुक्तक

प्रतिक्रिया

नानबा's picture

30 Jul 2009 - 10:49 pm | नानबा

फार वरून गेली पण एका गोष्टीचं कौतुक आहे.... आपलं शुद्धलेखन फारच अतिशुद्ध आहे.... तुम्ही लिहीत रहा आम्ही पामरे समजून घेण्याचा (निष्फळ) प्रयत्न करत राहूच....

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2009 - 11:17 pm | पिवळा डांबिस

एकदम प्रेरणादायी कविता...
तुमच्या कल्पना नेहमी ओरिजिनल असतात, मला आवडतात!!

अर्थात आमचा रिस्पॉन्स लावला आहे...
तो कृपया ह. घ्या...
:)

जित्याची खोड न जाणारा,
पिवळा डांबिस
:)

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 7:54 am | विसोबा खेचर

एकदम प्रेरणादायी कविता...
तुमच्या कल्पना नेहमी ओरिजिनल असतात, मला आवडतात!!

तुला काय घंटा कळलं रे डांबिसा?! :)

तात्या.

पाषाणभेद's picture

31 Jul 2009 - 8:09 am | पाषाणभेद

तात्या, खाली शाळेची घंटा ट्ण ट्ण ट्णsssss वाजलेली आहे. बघा जरा.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विजुभाऊ's picture

30 Jul 2009 - 11:21 pm | विजुभाऊ

सहमत.......
आम्हीही हेच म्हणतो.
बाकी पिंडा काका प्रमाणेच सारे काही.
विजुभाऊ सातारवी

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2009 - 11:29 pm | बिपिन कार्यकर्ते

:?

बिपिन कार्यकर्ते

लवंगी's picture

30 Jul 2009 - 11:48 pm | लवंगी

:? :/ :O

ही कविता निलकांत ला उद्देशून आहे

कवितेचे रसग्रहण पुढे (खाली)दिलेले आहे.
त्या आधी कवितेतील कठीण शब्द वहित लिहून घ्या.

चोपन्नकशी = डाटाबेस (चित्रकूटाचे रेकॉर्ड)
चित्रकूटाने = वेबमास्टर
चारित्र्याची = वेबसाईट (पक्षी मिपा)
भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी = साईट ऑनलाईन जायचा दिवस (भादव्याचा लई भारी मुहूर्त हाय. 'आला भादव्याचा महीना ss ')
खुदुखुदु डोकावे अलवार भरतार = जॉली नवरा / शासनकर्ता / मालक (किंवा व्यवस्थापक (तात्या ??) )
भंगुनी कित्येक ओथंबली मने = पोस्टींग करणारे (आपण)
झुरली जर्जर गळाठली पाने= जुने अकाउंट होल्डर
पंजरी बाणांच्या शोकाकुल भीष्म= टिका सहन करणारे अकाउंट होल्डर (कारण त्यांचे लेख जर बाण समजले तर तेच बाण त्यांना टिकेच्या माध्यमातून टोचतात.)
बिल्वदल सपत्नीक = कंपू करून एकमेकांना प्रतिसाद (बिल्वदल ) अर्पण करणारे (सपत्नीक सारखे वागणारे) अकाउंट होल्डर
मूर्तीमंत मेकॅनिक = दुसर कोण? आपला निलकांतच
चपल= फास्ट वेब सर्व्हर
ड्रुपल = वेबसाईट डिझाईन करणारे CMS
टपल=हा टपाल असा अभिप्रेत होता. संपादकाचा रिप्लाय
ढुम्= ढुम् ढुम् ढुमाक (आनंदाने ढोल वाजवणे.)

कवयत्री म्हणते:

हे फास्ट वेब सर्व्हर वर ड्रुपल वेबसाईट डिझाईन करणारे CMS वापरणार्‍या मूर्तीमंत मेकॅनिक निलकांता,

तुझे चित्रकूटासारखे रेकॉर्ड (डाटाबेस) असणारी तुझी वेबसाईट (मिपा), भादव्याच्या द्वितीय दिवशी ऑनलाईन झाली आहे.

तिथे (साईटवर) विनोदी स्वभावाचे मालक (तात्या) हळूवार (अलवार) अधुनमधून येतात.

तिथे (साईटवर) जुने अकाउंट होल्डर आहेत, प्रतिसादाच्या टिका सहन करणारे अकाउंट होल्डर आहेत तसेच कंपू करून एकमेकांना प्रतिसाद (बिल्वदल ) अर्पण करणारे (नवरा बायकोसारखे वागणारे) अकाउंट होल्डर पण आहेत.

या सर्व बघून मी 'ढुम् ढुम् ढुमाक' , 'ढुम् ढुम् ढुमाक' करते.

उद्या येतांना हि कविता पाठ झाली पाहिजे. येतांना प्रत्येकी दोन दोन विडंबने करून या. अर्थ समजला पाहिजे. नाहितर मी शाळाचालकांना (मालक तात्यांना) सांगून तुमचे नाव शाळेतून काढून टाकीन.

ज्याचे विडंबन चांगले असेल त्याला जास्त चांदण्या मिळतील व त्याला आठवड्याचा मॉनेटर केले जाईल.

ट्ण ट्ण ट्णsssss (चला आजची शाळा सुटली )

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद

सहज's picture

31 Jul 2009 - 5:56 am | सहज

वा वा. छान छान. असेच फोडत रहा.

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 8:23 am | विसोबा खेचर

जबरा विडंबन.. :)

नीधप's picture

31 Jul 2009 - 8:55 am | नीधप

कुठेय?
वरती तर रसग्रहण आहे... (ज्यामुळे कविता न समजायला अजून मदत होतेय.. ) :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पाषाणभेद's picture

31 Jul 2009 - 9:08 am | पाषाणभेद

"ज्यामुळे कविता न समजायला अजून मदत होतेय.. "

काय अडचण आहे रसग्रहण समजून न येण्यात.
लक्ष कुठेय तुझे, ऑ?

चल उभा रहा आणि काय शंका आहे ते विचार बर.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

दशानन's picture

31 Jul 2009 - 9:11 am | दशानन

दगडफोड्या सटकलास कि काय.... अरे तो तो नसून ती आहे ;)

+++++++++++++++++++++++++++++

पाषाणभेद's picture

31 Jul 2009 - 10:29 am | पाषाणभेद

शिंचें आजकालं चें मुलं मुलीं .... काहीं पणं समजत नाहीं हों नावांवंरून.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

दशानन's picture

31 Jul 2009 - 9:07 am | दशानन

=))

भयानक जबरा... रसग्रहण !

शरदिनी ताई/माई/काकु/मावशी/आज्जी जरा थोडे समजेल अश्या मराठीमध्ये कविते बरोबरच काही शब्द लिहीत चला हो... अक्षरशः घाबरत घाबरत तुमच्या कवितेचा धागा उघडतो मी... पहिल्या दोन ओळी वाचल्या कि प्रतिसाद वाचतो व मग परत कविता वाचतो :D

+++++++++++++++++++++++++++++

विशाल कुलकर्णी's picture

31 Jul 2009 - 11:12 am | विशाल कुलकर्णी

जबरा रसग्रहण !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

कालिन्दि मुधोळ्कर's picture

31 Jul 2009 - 9:51 am | कालिन्दि मुधोळ्कर

चतुर कविता. आवडली.

सानुली, श्रावणातली अनामिक हुरहूर इ. पालापाचोळा नसलेल्या कविता वाचायला खरोखर छान वाटतात हो.

ज्ञानेश...'s picture

31 Jul 2009 - 11:45 am | ज्ञानेश...

:T

"Great Power Comes With Great Responsibilities"

लिखाळ's picture

31 Jul 2009 - 5:32 pm | लिखाळ

वा .. चारित्र्य कविता समजली नाही. पण वाचायला आवडली.
या वेळेस पंचाक्षरी विचित्रशब्द योजना पहिल्या ओळीनंतर पुढे कुठेच नसल्याने थोडे चुकल्या चुकल्या सारखे झाले.
पु ले शु
-- लिखाळ.

दत्ता काळे's picture

1 Aug 2009 - 12:06 pm | दत्ता काळे

तुम्ही केलेल्या रसग्रहणामुळे कविता नाही म्हटंल तरी कळालीच शेवटी. फक्त शेवटचा "टपल . . . ढुम्" हा कविता टंकणे संपत आल्यावर फुलस्टॉपचा किबोर्डवरचा आवाज शेवटी टाकला असावा. असे वाटले होते.

मनीषा's picture

1 Aug 2009 - 12:33 pm | मनीषा

(काहीच न कळल्याने..)
चारित्र्याची चतुर चिरफ़ाड
वा ! मस्त !!!